तांत्रिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना सुरू व्हायला काही तासांचा अवधी आहे. तरीही आताच धागा काढत आहे. उद्या नवा धागा काढून काही लिहायला एकसलग वेळ मिळेलच याची खात्री नसल्याने आताच नवा धागा काढत आहे.
या धाग्याच्या गाभ्यात दोन गोष्टी लिहित आहे.
१. ममता बॅनर्जी आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी स्वतःला मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायचा प्रयत्न करत आहेत असे दिसते. माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये आल्यापासून ममता गोवा विधानसभा निवडणुका गांभीर्याने घेत आहेत. काल त्यांनी गोव्यात जाऊन 'काँग्रेस निष्प्रभ झाली असल्याने मोदी इतके बलिष्ठ झाले आहेत' असे वक्तव्य केले. हे वक्तव्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर दिसले तरी काँग्रेस निष्प्रभ झाल्यामुळे मोदी बलिष्ठ झाले की मोदी बलिष्ठ झाल्याने काँग्रेस निष्प्रभ झाली असा उलटा प्रश्नही विचारता येऊ शकेल. काहीही असले तरी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेसकडे (आणि त्यातही राहुल गांधींकडे) आलेले आपण मान्य करणार नाही असा स्पष्ट संकेत ममतांनी दिलेला दिसतो. विरोधी पक्षातील इतर पक्षांना (द्रमुक, शिवसेना, समाजवादी पक्ष वगैरे) ममतांचे नेतृत्व मान्य करण्यात काही अडचण असेल असे वाटत नाही. मागे स्वतः राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस दावा करेलच असे नाही असेही म्हटले होते. पण ते प्रत्यक्षात कितपत येते हे बघायचे. मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची इतकी वाताहत होऊनही पक्षाला २०१९ मध्ये पूर्ण देशात १२ कोटी मते होती आणि २६० च्या आसपास लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पहिल्या किंवा दुसर्या क्रमांकावर होते. याचाच अर्थ जवळपास अर्ध्या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस लढायच्या स्थितीत आहे. म्हणजे इतकी पडझड झाली असली तरी काँग्रेसने आपले राष्ट्रीय स्थान टिकवले आहे. अशा परिस्थितीत ममतांच्या नेतृत्वात विरोधी आघाडी झाली तर आपला नेता पंतप्रधान होणार नाही अशा स्थितीत काँग्रेसची मते सगळी आघाडीला मिळतील का हा प्रश्न आहे. काँग्रेसही आपला दावा इतका सहजासहजी सोडायला तयार होईल का हा पण प्रश्नच आहे. लखिमपूर खेरी प्रकरणावरून इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा काँग्रेसने जास्त आवाज उठवला यातून काँग्रेसचा स्वतःला ठामपणे पुढे आणायचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो. तसेच ममता त्यापासून दूर राहिल्या आहेत म्हणजे परत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्याला जायचे नाही हा संदेश ममतांना द्यायचा आहे असे दिसते.
कदाचित यापुढील काळात हा काँग्रेस विरूध्द ममता संघर्ष होऊ शकेल. गोव्यात एकेकाळी काँग्रेस बर्यापैकी ताकद ठेऊन होता पण मागच्या वेळेस निवडून आलेले काँग्रेसचे बरेचसे आमदार भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे पक्ष गोव्यात पांगळा झाला आहे. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकायची शक्यता त्यामानाने कमी आहे. उत्तराखंडमध्ये
आणि पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजयाची शक्यता आहे. या दोन राज्यात अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुक जिंकलेला नाही. त्यानंतर मे २०२३ मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुक असेल. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे गणित इतर राज्यांपेक्षा पूर्ण वेगळे असते. तेव्हा त्या राज्यात काँग्रेस जिंकल्यास पक्ष सहजासहजी ममतांसाठी मार्ग मोकळा करेल ही शक्यता कमीच.
तेव्हा येणार्या काही महिन्यात परिस्थिती रोचक असेल.
२. ३० ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदारसंघातून २०१९ मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वी अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे 'आघाडीचा धर्म' म्हणून महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसचा उमेदवार येणे क्रमप्राप्त होते. काँग्रेसने तिथे रावसाहेबांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष स्वतंत्र लढले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे जिंकले होते. सुभाष साबणे १९९९ आणि २००४ मध्येही मुखेड मतदारसंघातून जिंकले होते. या मतदारसंघाच्या सीमारेषा बदलल्यानंतर साबणे नंतर देगलूरमधून निवडणुक लढवू लागले. तीनदा आमदार असलेल्या सुभाष साबणेंना आता आघाडीच्या धर्मामुळे शिवसेनेकडून निवडणुक लढवता येणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपचे उमेदवार आहेत. २५ वर्षे युती असताना अनेक मतदारसंघांमधून भाजपने एकदाही निवडणुक लढवली नव्हती. त्यात हा देगलूर मतदारसंघ आहे.२०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा तिथे भीमराव क्षीरसागर हा उमेदवार दिला पण त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. तेव्हा या मतदारसंघात भाजपचे फार बळ आहे असे नाही. तसेच शिवसेनेचे निष्ठावान मतदारही काँग्रेसला किती प्रमाणावर मते देतील हा प्रश्न आहेच. त्यात त्याच सुभाष साबणेंना भाजपने उमेदवारी दिल्याने ते अशी मते आपल्याकडे वळवू शकतील का यावर या पोटनिवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. सध्या तरी भाजपचे पारडे हलके वाटत आहे. मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे.
वाचने
23179
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
फुगा
In reply to मी पयला by उपयोजक
माजी मुख्यमंत्री लुईझिनो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भारतीय नौसेना को मिला पहला P15B गाइडेड-मिसाइल विध्वंसक, दुश्मन के होश उड़ाने की ताकतबै त्या तीर्थाचं काय करायचं
In reply to माजी मुख्यमंत्री लुईझिनो by मदनबाण
गोव्यात एकेकाळी सत्तेत
In reply to माजी मुख्यमंत्री लुईझिनो by मदनबाण
मगोप
In reply to गोव्यात एकेकाळी सत्तेत by चौकस२१२
जे आपल्याला समजते ते त्यांना
In reply to माजी मुख्यमंत्री लुईझिनो by मदनबाण
शक्यता
In reply to माजी मुख्यमंत्री लुईझिनो by मदनबाण
बै आता चर्चात जाऊन काय "दिवे
उच्चांक
एक रुपया
In reply to उच्चांक by कपिलमुनी
हा हा
In reply to उच्चांक by कपिलमुनी
गोव्यातील २०१७ नंतरचे राजकारण
गोवा
आप सरकारी खर्चाने इच्छुकांना तीर्थयात्रेला पाठविणार
कोटीच्या कोटी उड्डाणे....
लोकांची स्वप्न केंद्र सरकार नी धुळीस मिळवली
केंद्र सरकारच्या कणखरपणाचा
In reply to लोकांची स्वप्न केंद्र सरकार नी धुळीस मिळवली by Rajesh188
*Raut Vs BJP : 'भाजपचा पराभव
एक रूपयाची झुणकाभाकर पण खाऊन झाली ...
In reply to *Raut Vs BJP : 'भाजपचा पराभव by अमरेंद्र बाहुबली
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार...
पेट्रोल-डिझेलबाबतच्या निर्णयानंतर विखे पाटलांचा......
विघे पाटील
In reply to पेट्रोल-डिझेलबाबतच्या निर्णयानंतर विखे पाटलांचा...... by मुक्त विहारि
उद्धव ठाकरे यांचा टोला, 'युतीमध्ये 25 वर्ष अंडी उबवली'
हिमाचल मध्ये भीषण पराभव
नऊ राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या,
Vat किमती वर लागतो
मग केंद्राने किंमत वाढवली तर
In reply to Vat किमती वर लागतो by Rajesh188
तसेही महाराष्ट्र राज्य काहीही करत नाही ....
In reply to मग केंद्राने किंमत वाढवली तर by सुक्या
तसंही VAT काय आहे, त्याचे दर
In reply to तसेही महाराष्ट्र राज्य काहीही करत नाही .... by मुक्त विहारि
माननीय मुख्यमंत्री पण हेच म्हणाले
In reply to तसंही VAT काय आहे, त्याचे दर by सुक्या
मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव घेत आत्महत्या,
स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे.....
...अन्यथा राज्यात असंतोषाचा उद्रेक होईल : राज ठाकरेंचा
मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं! डिझेल 19 तर पेट्रोल...
पोट निवडणूकीत
दर 25 रुपयांनी कमी करायला होते, इंधन दर कपातीवर संजय राऊतांचा..
राज्य सरकार इंधनावरील कर कमी करणार का? शरद पवारांनी स्पष्टचं...
भाजपशासित राज्यांमध्ये दिवाळी, इतर ठिकाणी मात्र चर्चांचे गुऱ्हाळ
इंथन दर जितके जास्त
एक्साइज कमी केला की राज्याचा
वानखेडे कडून तपास काढून घेतला
मोदी सरकार ड्रग्जसंदर्भातील कायद्यामध्ये मोठा बदल करण्याच्या....
मुंबईच्या तमाम झोपडपट्ट्यांमध्ये या निर्णयाचं तुफान स्वागत होईल
आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे...
बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…..
बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…..
बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…..
मुक्त विहारी जी वेलकम बॅक...
या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील!