तांत्रिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना सुरू व्हायला काही तासांचा अवधी आहे. तरीही आताच धागा काढत आहे. उद्या नवा धागा काढून काही लिहायला एकसलग वेळ मिळेलच याची खात्री नसल्याने आताच नवा धागा काढत आहे.
या धाग्याच्या गाभ्यात दोन गोष्टी लिहित आहे.
१. ममता बॅनर्जी आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी स्वतःला मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायचा प्रयत्न करत आहेत असे दिसते. माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये आल्यापासून ममता गोवा विधानसभा निवडणुका गांभीर्याने घेत आहेत. काल त्यांनी गोव्यात जाऊन 'काँग्रेस निष्प्रभ झाली असल्याने मोदी इतके बलिष्ठ झाले आहेत' असे वक्तव्य केले. हे वक्तव्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर दिसले तरी काँग्रेस निष्प्रभ झाल्यामुळे मोदी बलिष्ठ झाले की मोदी बलिष्ठ झाल्याने काँग्रेस निष्प्रभ झाली असा उलटा प्रश्नही विचारता येऊ शकेल. काहीही असले तरी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेसकडे (आणि त्यातही राहुल गांधींकडे) आलेले आपण मान्य करणार नाही असा स्पष्ट संकेत ममतांनी दिलेला दिसतो. विरोधी पक्षातील इतर पक्षांना (द्रमुक, शिवसेना, समाजवादी पक्ष वगैरे) ममतांचे नेतृत्व मान्य करण्यात काही अडचण असेल असे वाटत नाही. मागे स्वतः राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस दावा करेलच असे नाही असेही म्हटले होते. पण ते प्रत्यक्षात कितपत येते हे बघायचे. मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची इतकी वाताहत होऊनही पक्षाला २०१९ मध्ये पूर्ण देशात १२ कोटी मते होती आणि २६० च्या आसपास लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पहिल्या किंवा दुसर्या क्रमांकावर होते. याचाच अर्थ जवळपास अर्ध्या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस लढायच्या स्थितीत आहे. म्हणजे इतकी पडझड झाली असली तरी काँग्रेसने आपले राष्ट्रीय स्थान टिकवले आहे. अशा परिस्थितीत ममतांच्या नेतृत्वात विरोधी आघाडी झाली तर आपला नेता पंतप्रधान होणार नाही अशा स्थितीत काँग्रेसची मते सगळी आघाडीला मिळतील का हा प्रश्न आहे. काँग्रेसही आपला दावा इतका सहजासहजी सोडायला तयार होईल का हा पण प्रश्नच आहे. लखिमपूर खेरी प्रकरणावरून इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा काँग्रेसने जास्त आवाज उठवला यातून काँग्रेसचा स्वतःला ठामपणे पुढे आणायचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो. तसेच ममता त्यापासून दूर राहिल्या आहेत म्हणजे परत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्याला जायचे नाही हा संदेश ममतांना द्यायचा आहे असे दिसते.
कदाचित यापुढील काळात हा काँग्रेस विरूध्द ममता संघर्ष होऊ शकेल. गोव्यात एकेकाळी काँग्रेस बर्यापैकी ताकद ठेऊन होता पण मागच्या वेळेस निवडून आलेले काँग्रेसचे बरेचसे आमदार भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे पक्ष गोव्यात पांगळा झाला आहे. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकायची शक्यता त्यामानाने कमी आहे. उत्तराखंडमध्ये
आणि पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजयाची शक्यता आहे. या दोन राज्यात अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुक जिंकलेला नाही. त्यानंतर मे २०२३ मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुक असेल. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे गणित इतर राज्यांपेक्षा पूर्ण वेगळे असते. तेव्हा त्या राज्यात काँग्रेस जिंकल्यास पक्ष सहजासहजी ममतांसाठी मार्ग मोकळा करेल ही शक्यता कमीच.
तेव्हा येणार्या काही महिन्यात परिस्थिती रोचक असेल.
२. ३० ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदारसंघातून २०१९ मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वी अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे 'आघाडीचा धर्म' म्हणून महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसचा उमेदवार येणे क्रमप्राप्त होते. काँग्रेसने तिथे रावसाहेबांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष स्वतंत्र लढले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे जिंकले होते. सुभाष साबणे १९९९ आणि २००४ मध्येही मुखेड मतदारसंघातून जिंकले होते. या मतदारसंघाच्या सीमारेषा बदलल्यानंतर साबणे नंतर देगलूरमधून निवडणुक लढवू लागले. तीनदा आमदार असलेल्या सुभाष साबणेंना आता आघाडीच्या धर्मामुळे शिवसेनेकडून निवडणुक लढवता येणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपचे उमेदवार आहेत. २५ वर्षे युती असताना अनेक मतदारसंघांमधून भाजपने एकदाही निवडणुक लढवली नव्हती. त्यात हा देगलूर मतदारसंघ आहे.२०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा तिथे भीमराव क्षीरसागर हा उमेदवार दिला पण त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. तेव्हा या मतदारसंघात भाजपचे फार बळ आहे असे नाही. तसेच शिवसेनेचे निष्ठावान मतदारही काँग्रेसला किती प्रमाणावर मते देतील हा प्रश्न आहेच. त्यात त्याच सुभाष साबणेंना भाजपने उमेदवारी दिल्याने ते अशी मते आपल्याकडे वळवू शकतील का यावर या पोटनिवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. सध्या तरी भाजपचे पारडे हलके वाटत आहे. मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे.
वाचने
23180
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती...
आता खाद्य तेलही झाले स्वस्त
कुख्यात ड्रग पेडलरकडूनही अनिल देशमुखांची वसूली?
Ahmednagar Hospital Fire:
दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ७६ रुग्णांचा मृत्यू
In reply to Ahmednagar Hospital Fire: by मुक्त विहारि
भारतीय मीडिया
पेगासस फेम इस्राएली कंपनी एन
पेगासस फेम इस्राएली कंपनी एन एस ओ यूएस ने ब्लॅकलिस्ट केली आहे
तुम्हाला यू एस गव्हर्नमेंट
In reply to पेगासस फेम इस्राएली कंपनी एन एस ओ यूएस ने ब्लॅकलिस्ट केली आहे by Rajesh188
ते सर्वज्ञानी आहेत . . .
In reply to तुम्हाला यू एस गव्हर्नमेंट by कॉमी
St कर्मचारी संपावर आहेत
गिरणी कामगारांचा संप झाला तेंव्हा आणि
In reply to St कर्मचारी संपावर आहेत by Rajesh188
गिरणी कामगार
In reply to गिरणी कामगारांचा संप झाला तेंव्हा आणि by मुक्त विहारि
कॉंग्रेसने असे बरेच काम करून ठेवले आहे
In reply to गिरणी कामगार by Rajesh188
हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी ......
समाजवादी पक्षाचे
In reply to हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी ...... by मुक्त विहारि
अत्यंत बालिश बातमी
फडणवीस च खरा चेहरा उद्या उघड होईल
राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन?
आता कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी
एस्टी कर्मचारी....गरीबी.
In reply to आता कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी by Rajesh188
जबाबदारी सरकार नी घेतली नाही
In reply to एस्टी कर्मचारी....गरीबी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही पायाभूत सुविधा या
In reply to जबाबदारी सरकार नी घेतली नाही by Rajesh188
+१
In reply to काही पायाभूत सुविधा या by सुबोध खरे
+१
In reply to काही पायाभूत सुविधा या by सुबोध खरे
+१
In reply to काही पायाभूत सुविधा या by सुबोध खरे
आयएएस अधिकारी हे सरकार चे
In reply to आता कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी by Rajesh188
बेस्ट नी आता कारभार सुधारला आहे
“जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस”, काँग्रेस नेते राशीद
हे होतच राहणार आहे...
In reply to “जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस”, काँग्रेस नेते राशीद by मुक्त विहारि
Typo
In reply to हे होतच राहणार आहे... by वामन देशमुख
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
In reply to हे होतच राहणार आहे... by वामन देशमुख
Not all those who chant Jai
In reply to “जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस”, काँग्रेस नेते राशीद by मुक्त विहारि
गांधीजींच्या तोंडी " हे राम "
In reply to Not all those who chant Jai by कॉमी
+१
In reply to गांधीजींच्या तोंडी " हे राम " by आग्या१९९०
The rakshas was chanting Jai
In reply to +१ by कॉमी
त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद....
हिंदुत्व म्हणजे मुस्लीम व शिखांना मारहाण करणे – राहुल गांधी
NCP चा Congress ला आणखी एक धक्का....
त्रिपुरा घटनेचे थेट भिवंडीत पडसाद....
अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण,
काश्मीर मध्यें पंडितांवर
In reply to अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, by मुक्त विहारि
पण लक्षात कोण घेतो?
In reply to काश्मीर मध्यें पंडितांवर by सुबोध खरे
एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
कारण
In reply to एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा by मुक्त विहारि
इतिहासाची पुनरावृत्ती ....
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू,
रझा अकादमीचा भाजप, संघावर हल्लाबोल; प्रमुख सईद नुरी म्हणाले....
In reply to रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, by मुक्त विहारि
नाव बदलण्याची मालिका सुरूच; आता आझमगडचं नाव होणार...
औरंगाबादचे, संभाजीनगर कधी होणार....?
In reply to नाव बदलण्याची मालिका सुरूच; आता आझमगडचं नाव होणार... by मुक्त विहारि