✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा गंमतगूढ (२) : आपले लेखन ओळखूया

ह
हेमंतकुमार यांनी
गुरुवार, 09/02/2021 - 05:37  ·  लेख
लेख
भाग-1 इथे https://www.misalpav.com/node/49180 …... नमस्कार. या खेळाच्या पहिल्या भागामध्ये आपण आपल्या मिपाकर बंधू-भगिनींची सदस्यनावे ओळखली. एकंदरीत धमाल आली. आता सादर करीत आहे या मालेतील पुढील भाग: धागा-शीर्षके ओळखणे खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकावरून मिपावरील धागा-शीर्षके ओळखा. १. तुम्हाला संबंधित शीर्षकाचे सर्व शब्दसमूह ओळखायचे आहेत. हे धागे मिपाच्या विविध विभागांमधून निवडले आहेत. दिलेल्या सूत्रापुढे दोन कंस आहेत. २. पहिल्या कंसात ओळखायच्या शीर्षकातील प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या आहे. शीर्षक ओळखून झाल्यावर त्याची खात्री पटवण्यासाठीची माहिती दुसऱ्या कंसात दिली आहे. तुमचे उत्तर या माहितीशी जुळले पाहिजे. त्यामध्ये संपूर्ण शीर्षकातील काही अक्षरांची वैशिष्ट्ये एकत्रित दिलेली आहेत. हे देण्यामागे, एखाद्या सूत्राचे पर्यायी उत्तर शक्यतो येऊ नये असा प्रयत्न आहे. ३. दिलेल्या सूत्रातील माहिती ही धाग्याच्या फक्त शीर्षकाशीच संबंधित आहे. त्याचा संबंध धाग्याच्या आशयाशी वगैरे लावू नये. ४. ओळखायची सर्व शीर्षके मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यातील प्रत्येक शब्द हा सलग असून त्यात कुठेही जोड नाही. शीर्षकामध्ये अंकांचा बिलकुल समावेश नाही. ५. हा भाग जरा गुंतागुंतीचा वाटू शकेल. म्हणून आधी एक उदाहरण देतो: सूत्र असे आहे : भयानक संहाराची आठवण (५, ५) ( एकूण चार वेलांट्या, एक जोडाक्षर). याचे उत्तर : … ... हिरोशिमाचा स्मृतिदिवस ( स्मृ हे जोडाक्षर, एकूण चार वेलांट्या मोजाव्यात). …….. शोधसूत्रे : १. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ( एकूण तीन वेलांट्या) २. भावना तशी अमर्याद (३, २, २) ( एक जोडाक्षर, दोन वेलांट्या) ३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) ( दोन जोडाक्षरे एक वेलांटी) ४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार) ५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) (एक जोडाक्षर एक मात्रा) ६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे ) ७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ( एक वेलांटी, एक जोडाक्षर) ८. कलुषित भडिमार (४,३,५) (१ जोडाक्षर ,१ अनुस्वार ) ९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) १०. हे पण दाद मागतात ? (४,३) ( २ वेलांट्या) …....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20604 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

यात गूढ इतके आहे

गॉडजिला
गुरुवार, 09/02/2021 - 07:15 नवीन
की मला गंमत उरतच नाही. इतरांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हे जास्त अवघड आहे

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/02/2021 - 07:50 नवीन
मिपावर जवळजवळ ५० हजार धागे आहेत. त्यातून हे १० शोधायचे (कितीही सुप्रसिध्द असले तरी) हे म्हणजे गवताच्या गंजीतुन सुई शोधण्याचे आव्हान आहे. कुठे म्यागनेट सापडते का ते पहातो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

म्यागनेट ?

गॉडजिला
गुरुवार, 09/02/2021 - 07:56 नवीन
http://misalpav.com/user/30033/track
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

गॉडजिला,

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 08:34 नवीन
नाही, तसं नाही म्हणता येणार . जी शीर्षके आकर्षक वाटली आहेत ती घेतली आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

धन्यवाद ,

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 07:52 नवीन
धागे गेल्या १-२ वर्षातील आहेत. सूत्रातील माहितीनुसार विचार करावा
  • Log in or register to post comments

चला झाली सुरुवात

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/02/2021 - 08:48 नवीन
१. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ( एकूण तीन वेलांट्या) - आठवणीतील किडे - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

+१

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 09:05 नवीन
आठवणीतील किडे - अगदी बरोबर उत्तम सुरुवात !!
  • Log in or register to post comments

दुसरे

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/02/2021 - 09:59 नवीन
५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) (एक जोडाक्षर एक मात्रा)- चहाच्या पलीकडे - मायमराठी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

५ बरोबर !

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 10:01 नवीन
चहाच्या पलीकडे अगदी बरोबर ! बुवा जमतंय कि वो छान तुम्हास्नी :)) मस्त...
  • Log in or register to post comments

अजुन एक

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/02/2021 - 10:03 नवीन
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) - स्मरण रंजन - नीलकंठ देशमुख पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

९ चूक

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 10:19 नवीन
कारण सुस्कारे पण विचारात घेतले पाहिजेत
  • Log in or register to post comments

आणि ..

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 10:22 नवीन
स्मरणरंजन हा त्या धाग्यामध्ये सलग सहा अक्षरी शब्द आहे ३, ३ हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हे चालेल का?

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/02/2021 - 11:00 नवीन
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) - श्वासांचा बाजार - आमचे परम मित्र - खिलजि पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

९ बरोबरच !

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 11:06 नवीन
श्वासांचा बाजार बरोबर. ज्ञा पै तुमची सलग हॅटट्रिक थोडक्यात हुकली परंतु तुम्ही ओव्हर हॅटट्रिक केलेली आहे अभिनंदन.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

२. प्रेमाला सीमा नाही ???

गवि
गुरुवार, 09/02/2021 - 10:38 नवीन
२. प्रेमाला सीमा नाही ???
  • Log in or register to post comments

२.

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 10:40 नवीन
२. प्रेमाला सीमा नाही अगदी बरोबर. वा !
  • Log in or register to post comments

प्रेमाला सीमा नसते. पण

गवि
गुरुवार, 09/02/2021 - 10:53 नवीन
प्रेमाला सीमा नसते. पण प्रेमाला सीमाशुल्क असते.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हे

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 10:58 नवीन
बरोबर बोललात ! हा धागा 2020 या दिवाळी अंकातला असल्यावर गवि नाही ओळखणार, तर कोण ओळखणार.! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आणि

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 15:19 नवीन
देखरेख करणारे सीमा शुल्क अधिकारी सुद्धा बराच त्रास देतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

१०

टर्मीनेटर
गुरुवार, 09/02/2021 - 12:00 नवीन
१०. हे पण दाद मागतात ? (४,३) ( २ वेलांट्या) कावळ्याची फिर्याद ???
  • Log in or register to post comments

१० बरोबर...

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 12:01 नवीन
कावळ्याची फिर्याद बरोब्बर ! छान. व इथे स्वागत !
  • Log in or register to post comments

एक तरी ओळ्खायला जमलं म्हणयचं :)

टर्मीनेटर
गुरुवार, 09/02/2021 - 12:08 नवीन
एक तरी ओळ्खायला जमलं म्हणयचं :) बाकी पैजार बुवांची गाडी सुसाट चालली आहे... मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धाग्याची

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 12:04 नवीन
गती सुंदर आहे . निम्मे संपले आता आहे उरलेत : ३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) ( दोन जोडाक्षरे एक वेलांटी) ४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार) ६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे ) ७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ( एक वेलांटी, एक जोडाक्षर) ८. कलुषित भडिमार (४,३,५) (१ जोडाक्षर ,१ अनुस्वार )
  • Log in or register to post comments

जोरदार

गुल्लू दादा
गुरुवार, 09/02/2021 - 12:36 नवीन
आमचं डोकं काही चालेना या खेळात. मजा मात्र पूर्ण घेतोय.
  • Log in or register to post comments

+१

शाम भागवत
गुरुवार, 09/02/2021 - 12:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

एक और

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/02/2021 - 12:55 नवीन
४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार) - विश्वामित्र आणि विषाणू - विवेकपटाईत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

एकहाती सर्वच कोडी सोडवतात वाटते

गवि
गुरुवार, 09/02/2021 - 13:19 नवीन
एकहाती सर्वच कोडी सोडवतात वाटते बुवा आज बुवा, एक्षेल शीट?? ;-) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ह कशाला घ्या? मी तेच केले...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/02/2021 - 13:35 नवीन
आधि नियम निट वाचले अन मग एक्सेल शीटच घेउन बसलो आहे..त्यात LEN चा यथेच्च वापर केला आणि मग Filter आणि लॉजिक लावत बसलो त्या शिवाय काही हे कोडे सुटले नसते कारण सप्टेंबर २०२० पासुन पुढे २१०० धागे निघाले आहेत आणि कुमार सरांनी २ वर्षांची रेंज दिली आहे. अन त्यातले दहा ओळखायचे आहेत . पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

Ethical Cracking... :) :) :)

टर्मीनेटर
गुरुवार, 09/02/2021 - 13:42 नवीन
Ethical Cracking... :) :) :) भारीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

+१

वामन देशमुख
गुरुवार, 09/02/2021 - 15:18 नवीन
Ethical Cracking... :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

आता.

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 13:56 नवीन
त्यात LEN चा यथेच्च वापर केला आणि मग Filter
हे काय असतं ते माझ्यासारख्या अडाण्याला शिकवा ना भाऊ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

एक्सेल शीटच घेउन बसलो आहे.

वामन देशमुख
गुरुवार, 09/02/2021 - 15:21 नवीन
एक्सेल शीटच घेउन बसलो आहे..त्यात LEN चा यथेच्च वापर केला आणि मग Filter आणि लॉजिक लावत बसलो
दिस् इझ् मात्र नॉट् फेअर् हं ! 😉
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

४

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 13:49 नवीन
विश्वामित्र आणि विषाणू बरोब्बर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

६

टर्मीनेटर
गुरुवार, 09/02/2021 - 13:25 नवीन
६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे ) ज्यात त्यात बटाटा ???
  • Log in or register to post comments

६

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 13:51 नवीन
ज्यात त्यात बटाटा बरोब्बर ! एवढ छान उत्तर देता आणि मग ती प्रश्नचिन्ह कशाला टाकता राव ! बरोबर आहे तुमचं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

खेळाचा

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 13:53 नवीन
तसा काही नियम नसला तरी आता बुवा जरा काही तास विश्रांती घेतील काय ? म्हणजे इतरांना पण जरा बॅट फिरवून बघता येईल राव :))
  • Log in or register to post comments

आपका हुक्म सर आँखों पर मेरे आका

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/02/2021 - 14:06 नवीन
आपका हुक्म सर आँखों पर मेरे आका, बसतो परत बाटलीत जाउन, नवी बाटली उघडलीत की पुन्हा प्रगट होईन, (बाटलीतला राक्षस) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पण ते एक्सेल शीट बनवले कसे ते

शाम भागवत
गुरुवार, 09/02/2021 - 17:50 नवीन
पण ते एक्सेल शीट बनवले कसे ते सांगा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आधी दोन वर्षांपूर्वी निघालेले

गॉडजिला
गुरुवार, 09/02/2021 - 18:55 नवीन
आधी दोन वर्षांपूर्वी निघालेले धागे बाद करायचे त्या नंतर एक शोधसूत्र घेऊन त्याच्या शीर्षकाचे दिस्क्रिपशन असलेले शीर्षक धागे वेगळे करायचे व हे वेगळे झालेले धागे अर्थातच शब्द संख्या व वेलांटी याच्या साधर्म्यमुळे अतिशय कमी उरतात व त्याचा अर्थ सहजपणें ताडून उत्तर मिळून जाते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

तरीहि तूम्ही शंका घ्याल की धागे बरेचं असतील

गॉडजिला
गुरुवार, 09/02/2021 - 18:59 नवीन
तर यासाठीच कुमार१ यांना ट्रॅक करायचे म्हणजे त्यांनी असे कोणते धागे पाहीले जे जास्तीजास्त दोन वर्षे जूने आहेत यांची सहज माहिती मिळून आपल्याला अंदाज करणे अजून सोपे जाते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

वा !

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 19:00 नवीन
छान युक्ती आहे. अर्थात मला एक्सेल वगैरे काहीच येत नाही. शिकावे लागेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

गॉ जि

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 19:05 नवीन
पण एक शंका आहे जी शीर्षके मी निवडली त्यांच्यावर टिचकी मारुन मी आत धाग्यात शिरलेलो नाही तरीसुद्धा ट्रॅक ने कसे काय जमेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हा फुल्लप्रूफ मार्ग अर्थातच

गॉडजिला
गुरुवार, 09/02/2021 - 19:24 नवीन
हा फुल्लप्रूफ मार्ग अर्थातच नाहीये फक्त एक सुरुवात म्हणून ठीक आहे... तसेही पुढील वेळीं तूम्ही रिसर्च डुआयडी वापरून कराल त्यावेळी तुम्हाला ट्रॅक करून देखील फायदा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हा हा !

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 19:29 नवीन
हे पण भारीच की ! हरकत नाही वरील सर्व युक्त्या वापरून होता कोण सोडवणार आहे 3, 7, व 8 ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

पैजारबुवा

गॉडजिला
गुरुवार, 09/02/2021 - 20:15 नवीन
सोडवतील कारणं त्यांचेकडे एक्सेल शीट आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

गॉजि,

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 20:25 नवीन
ते चालणार नाही बर का ;) पहिल्या कसोटीमध्ये शेवटी मैदानात उतरून तुम्ही एक छान उत्तर दिले होते तसे या खेपेसही एक तरी उत्तर तुमच्याकडून हवेच त्याशिवाय धाग्याची सांगता नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

म्हणजे "सर्व धाग्यांची नावे"

शाम भागवत
गुरुवार, 09/02/2021 - 20:25 नवीन
म्हणजे "सर्व धाग्यांची नावे" हा मूळ विदा कसा जमवला ते कळत नाहीये. नावे टाईप करून नक्कीच नसावे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

टाईप नाही पण कॉपी पेस्ट करून

गॉडजिला
गुरुवार, 09/02/2021 - 21:48 नवीन
कॉम्प्युटर वर हे सुलभ आहे मोबाइल वर किचकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

नवे लेखन मधे सर्व नावे दिसतात की

गॉडजिला
गुरुवार, 09/02/2021 - 21:48 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

धन्यवाद , हो बुवा !

हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 14:09 नवीन
धागा प्रकाशित केला तेव्हा निदान 36 तास चालेल अशी अटकळ बांधली होती. . परंतु या दुसऱ्या कसोटीतील खेळाडूंनी घणाघाती फलंदाजी करून आत्ताच 70 टक्के खेळ आटोक्यात आणलेला आहे . आता फक्त तीन राहिले आहेत. ३, ७,८. मागच्या पहिल्या कसोटीतील दमदार मंडळींची आठवण होत आहे कुठे गायब आहेत ? या मैदानात.....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा