जगण्याचे कित्येक मजला अर्थही कळाले
धन्य भाग देवा ऐसे प्रेम ही मिळाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले
वार्यावर उडणारा, मी केर, धूळ, माती
येता तू सांगाती दगडांचे झाले मोती.
परीस तो जाणू कैसा ,सांग काय केले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
गहिवरले मन माझे ,ओळखले नाही तुजला
र्हदयात काटा रुतला , माफी दे प्रेमा मजला
तालाच्या सोबतीला, बासरीचे सूर आले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
आकाशी मेघ दाटे , पाणी हे डोळ्यावाटे
डोळे गहीरे हे सांगती , प्रेमाचे हे गूज मोठे
पावसाच्या सरींनी माळ हिरवे झाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
एक दिवा मंदीरात ,अंधार संपवून गेला
निरागस स्पर्ष तुझा, विश्वास जागवून गेला.
रंग एक मागता , इंद्रधनू मला मिळाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
......चकोर शाह.
०१०९२०२१
चांगलंय
सुरेख
वाह !