✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ५ )

म
मदनबाण यांनी
Wed, 08/25/2021 - 18:44  ·  लेख
लेख
बुडत्याचा पाय खोलात ? क्लिप :-
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49954 वाचन

💬 प्रतिसाद (181)

प्रतिक्रिया

*अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 19:11 नवीन
*अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच भाजपा नेत्याचा राजीनामा* *आणखी 15 नेत्यांच्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ फुटेज असल्याचा दावा--* https://aajtaksolapur.in/bjp-leader-resigns-as-video-goes-viral/
  • Log in or register to post comments

तमीळनाडूचे संजय जोशी.

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/25/2021 - 19:20 नवीन
तमीळनाडूचे संजय जोशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

????

रामदास२९
Wed, 08/25/2021 - 23:13 नवीन
????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

https://youtu.be/9mErjn2yx4k

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 11:43 नवीन
https://youtu.be/9mErjn2yx4k
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

अश्या क्षुल्लक गोष्टीवरून

साहना
गुरुवार, 08/26/2021 - 00:33 नवीन
अश्या क्षुल्लक गोष्टीवरून नेते राजीनामा द्यायला लागले तर कोण नेते राजकारणात राहतील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

संजय राठोड हे नाव ऐकलंय का ?

जॅक द रिपर
गुरुवार, 08/26/2021 - 01:59 नवीन
संजय राठोड हे नाव ऐकलंय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काय हो, नाही म्हणजे ऑटोमॅटीक

जॅक द रिपर
गुरुवार, 08/26/2021 - 02:08 नवीन
काय हो, नाही म्हणजे ऑटोमॅटीक होतं का कुंथावं लागतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नारायण राणे पूर्णपणे खवळलेले

मदनबाण
Wed, 08/25/2021 - 21:41 नवीन
नारायण राणे पूर्णपणे खवळलेले दिसत आहेत, काल आजतक च्या पत्रकारांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती त्यात राणेंनी [ जे केंद्रीय मंत्री आहेत. ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र यांच्या बाबतीत गंभीर विधाने केलेली आहेत. मी मुलाखतीतील शब्द खाली जसे च्या तसे देत आहे, शिवाय ती मुलाखत देखील देत आहे. इसके हात मे कानुन है, शो करेंगे... अरे मगर उसका बच्चा, मुख्यमंत्री का, सुशांत के केस मे था, दिशा सालियन के, था, उसको क्यो, उसको बचाया ना ? Uddhav पर सवाल को लेकर बोले Rane- उसका लड़का सुशांत केस में था. हीच प्रतिक्रिया मी सुशांतच्या धाग्यात देखील देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Entammede Jimikki Kammal | Official Video Song HD
  • Log in or register to post comments

नेते लोकाना का मूर्ख समजत असतील

Rajesh188
गुरुवार, 08/26/2021 - 08:12 नवीन
लोक ह्या नेत्यांची बाप आहेत. सुशांत सिंह केस सीबीआय कडे ते आहे.त्यांनी का मग राणे ज्यांच्या वर आरोप करत आहेत त्यांना का अटक केली नाही. खोटे आरोप करणे हेच राणे चे काम आहे. सुशांत सिंग पासून च bjp ची पूर्ण पत महाराष्ट्रात गेली आहे. खोटे बोलणे हा bjp नेत्यांचा खास गुण आहे. तिकडे मोदी साहेब फेकत असतात आणि इकडे राणे,फडणवीस, फेकत असतात. कोणी ह्यांना गंभीर पने घेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सुशांत सिंग पासून च bjp ची

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 10:34 नवीन
सुशांत सिंग पासून च bjp ची पूर्ण पत महाराष्ट्रात गेली आहे.>>>> महाराष्ट्र पोलीसाना बदनाम करता येईल तितकं बदनाम फडणवीसानी केलं आणी भाजपची पत गेली. काल नाशिकच्या पोलिस आयुक्तांबद्दल बोलताना फडणवीस बोलले की “ते काय छत्रपती आहेत का??“ मागे रेमडेसीवीर वेळी हा ते एका अधिकार्याला दमदाटी करत होते. आयुक्त दर्जा असायला आय ए एस असावं लागतं तो माणूस निश्चीतच फडणवीसांपेक्षा मोठा आहे, आपले आमदार वडील आणी दाळ फेम मंत्री काकू ह्यांची घराणेशाही वापरून फडणवीस आमदार आणी मुख्यमंत्री झाले तसं आयपीएस व्हायला करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

गरज होती का ?????

लिओ
Wed, 08/25/2021 - 23:42 नवीन
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पोलिस आयुक्तांबद्दल जे विधान केले ते फार दुर्देवी होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी गृहमंत्री सुध्दा राहिले आहेत. त्याउपर नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी सभ्य भाषेत उत्तर देऊन शिस्त आणि सभ्यता दाखवुन दिली. सुशांत केसमध्ये महाराष्ट्र व बिहार राज्य पोलिस महासंचालकांनासुध्दा अशी सभ्यता दाखवता आली नाही..... https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/nashik-police-commissioner-deepak-pandey-gives-befitting-reply-to-devendra-fadnavis/articleshow/85617432.cms
  • Log in or register to post comments

सरकारी अधिकार्याना दमदाटी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 10:52 नवीन
सरकारी अधिकार्याना दमदाटी करण्याची “युपी संस्कृती“ फडणवीस महाराष्ट्रात रूजवताहेत. पवार/ठाकरे/ काॅग्रेस ह्यानी ४० वर्षात ऊभा केलेला विकसीत महाराष्ट्र ऊत्तर प्रदेश सारखा “सुजलाम सुफलाम” करायचा डाव असावा फडणवीसांचा. महाराष्ट्राचं नशीब बलवत्तर म्हणून भरमसाट भ्रष्ट लोक भरूनही १०५ वर आटोपले आणी आणखी एका काळ्या पर्वाला महाराष्ट्र मुकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ

तैवानच्या विस्ट्रॉन ने केली १३५० कोटी रुपयांची गुंतवणूक

निनाद
गुरुवार, 08/26/2021 - 06:25 नवीन
तैवानच्या विस्ट्रॉन आणि भारताच्या ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (ओईएल) ने मोबाईल डिव्हाइसेस, आयटी हार्डवेअर आणि ऑटोमोटिव्ह-ईव्ही उत्पादनांच्या निर्मितीसाठी करार केला आहे. या धोरणात्मक भागीदारी कराराअंतर्गत, पुढील ३ ते ५ वर्षात १३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणूकीतून विविध उत्पादन विभागात ३८००० कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. केवळ या करारावर आधारित ११००० नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. यासाठी ' मेक इन इंडिया' मोहिमेचा आधार आहे. भारत मोबाईल उत्पादनात जगात अव्वल आहे. आता इलेक्ट्रोनिकीमध्ये अव्वल होण्यासाठी प्रयत्न चालले आहेत.
  • Log in or register to post comments

राणे

कपिलमुनी
गुरुवार, 08/26/2021 - 09:15 नवीन
राणे मागे 26/11 बद्दल बडबडले होते. पुरावे शून्य ! भाजप ला खोटे आरोप करायची सवय आहे. 7 वर्ष सत्ता आहे.किती आरोपपत्र दाखल केलेत ??
  • Log in or register to post comments

शीला दिक्षितांविरूद्ध

श्रीगुरुजी
गुरुवार, 08/26/2021 - 09:42 नवीन
शीला दिक्षितांविरूद्ध माझ्याकडे ३७० पानी पुरावे आहेत असे एक सत्यवादी एकवचनी महात्मा बरळला होता, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचे विस्मरण झाले होते. त्याच्या अंध भक्तांनाही ते स्मरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अजित पवारांविरूध्द माझ्याकडे

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 10:37 नवीन
अजित पवारांविरूध्द माझ्याकडे बैलगाडीभरून पुरावे आहेत असे एक सत्यवादी एकवचनी महात्मा बरळला होता, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचे विस्मरण झाले होते. त्याचं पुढे काय झालं?? आता पुसटसा ऊल्लेख ही होत नाही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 10:45 नवीन
+१ सर्व भ्रष्टाना क्लिनचीट, कोर्टात केस चालू पण पुरावे देणार नाहीत, भाजपैत आले का तो भ्रष्ट माणूस पावन होतो. काळेधन तर परत आले नाही पण ह्या वर्षी सर्वात जास्त पैसा स्विस बॅंकेत जमा झाला. पेट्रोल ११० ला आहे, गॅस सिलेंडर चे दर गगणाला भिडलेत, ग्रामीण भागात लोक पुन्हा सरपण वापरू लागलेत. भाजपने खोटं बोलून देशाला फार फसवलंय. खोटं पण रेटून बोला हेच भाजपचं तत्व आहे. बाकी देशप्रेम, राष्ट्रहीत, प्यारे देशवासीयो हे फक्त मतं मिळवण्यासाठी रचलेले जुमले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अजून जोरात चालू ठेवा..

आनन्दा
गुरुवार, 08/26/2021 - 11:57 नवीन
अजून जोरात चालू ठेवा.. अश्याच विचारवंतांनी 2014 ला आणि 2019 ला मोदींचा आणि भाजपचा प्रचार केला होता. तुम्ही आता धुरा खांद्यावर घेतल्याचे पाहून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

निवडूण तर लालू,मुलायम, फडणवीस

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 12:02 नवीन
निवडूण तर लालू,मुलायम, फडणवीस पण येताहेत. लोकशाहीत कोणीना कोणी जिंकतंच. पण आपणच कसे स्वच्छ हे सांगनारा भाजप पक्ष किती भ्रष्ट, खोटारडा, जुमलेबाज आहे हे लोकाना लक्षात यायला लागलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

+१+१+१ .. खर आहे..

रामदास२९
गुरुवार, 08/26/2021 - 12:11 नवीन
+१+१+१ .. खर आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/27/2021 - 10:03 नवीन
पेट्रोल ११० ला आहे, गॅस सिलेंडर चे दर गगणाला भिडलेत, ग्रामीण भागात लोक पुन्हा सरपण वापरू लागलेत.
राजकारण थापा वगैरे सरकार सर्व ठीक पण ही भाववाढ आवरा म्हणा, त्या विषयावर सर्व सोडून सगळ्या विषयावर बोलतात मोदीसेठ. सर्व सरकारी मालमत्ता विका पण भाववाढ आवरा म्हणा. लोक महागाईच्या नावाने बोंबा मारत आहेत. काहींना तर बोलताही येईना. सरकारच्या निब्बरपणाला सलाम आहे, अजिबात लक्ष नै द्यायचं ही कला भारीच जमलीय सरकारला. लगे रहो शेठ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

गॉडजिला
Fri, 08/27/2021 - 10:41 नवीन
मोदी मला आवडतात याचे प्रमुख कारण त्यांची वा त्यांच्या पाठिरख्यांची विचारसरणीपेक्षाही त्यांचा वैयक्तिक करिश्मा हे आहे... आज देशाबाहेरील कोणत्याही शत्रूने मोठी खोड काढली तर मोदी उलटी कांनफाटात नक्की ठेऊन देणार हा विश्वास कायम आहे... पण देशांतर्गत पातळीवर त्यांना सुधारणा करायला अजूनही बराच वाव आहे हे खेदाने नमूद करावे लागेल :( पेट्रोल भरताना मनात प्रचंड फसवणूक होत असल्याची लुटले जात असल्याची भावना निर्माण होते आहे कदाचित पेट्रोल, खाद्यतेल यांचे भाव ज्या प्रमाणात वाढत आहेत त्या प्रमाणात पगार मात्र वाढत नाहीये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज देशाबाहेरील कोणत्याही

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/27/2021 - 12:53 नवीन
आज देशाबाहेरील कोणत्याही शत्रूने मोठी खोड काढली तर मोदी उलटी कांनफाटात नक्की ठेऊन देणार हा विश्वास कायम आहे...>>> कुठल्या जगात आहात?? तीन बद्दलच्या बातम्या वाचल्या नाहीत का?? सुब्रमण्सम स्वामी सत्य बाहेर आणून दाखवताहेत की मोदी वाजपेयींचाच दुसरा अवतार आहे त्यानी अतिरेक्यांपुढए टेकले हेलतिन पुढे टेकताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

बिनडोकांचा "माल" नेहमीच कडक

श्रीगुरुजी
Fri, 08/27/2021 - 14:33 नवीन
बिनडोकांचा "माल" नेहमीच कडक असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

तूम्ही अनावश्यक टेन्शन घेत आहात बाहुलीजी

गॉडजिला
Wed, 09/01/2021 - 09:07 नवीन
मस्त कोका कोला प्या व वाट बघतोय रिक्षावाला गाणे बघितल्यास आपला राग शांत होउ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सरकारी मालमत्ता विका पण

चौकस२१२
Wed, 09/01/2021 - 04:00 नवीन
सरकारी मालमत्ता विका पण भाववाढ आवरा म्हणा. अस काही केलं तर "का विकली" म्हणून परत बोंबा ..दोन्ही कडून डमरू.. साहेब सक्रिय करा गावातील पेट्रोल दर कसा आणि किती वाढला आणि जगात वाढला कि नाही हा धागा जरा बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मागील सरकारने काढलेल्या ऑईल

आग्या१९९०
Wed, 09/01/2021 - 18:57 नवीन
मागील सरकारने काढलेल्या ऑईल बाँडमुळे केंद्र सरकार इंधनावरील कर कमी करून इंधनाचे भाव कमी करू शकत नाही असे आपल्या अर्थमंत्री म्हणतात. ह्याचा अर्थ केंद्राने लावलेल्या भरमसाठ करांमुळे इंधन महाग झाले आहे असा होतो. ( ऑईल बॉण्ड ३.१ लाख कोटीचे, केंद्राची मागील एक वर्षात इंधन कर महसूल ४ लाख कोटी.) २०१४ ला डिझेल पेट्रोल स्वस्त करू असे निवडणुकीत आश्वासन देताना ऑईल बॉण्ड ह्या सरकारला माहीत नव्हते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.

रावसाहेब चिंगभूतकर
Wed, 09/01/2021 - 22:07 नवीन
1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बॉण्ड हे कर्ज असतं. बँका कर्ज देताना मध्येच तुम्ही रिपेमेंट करावं म्हणून देत नाहीत. त्यामुळे बँकांचा ताळेबंद आणि asset liability चा बॅलन्स बिघडतो. त्यामुळे आले पैसे की देऊन टाक असं करता येत नाही. 2. कर्ज घेताना सुद्धा आपल्याकडच्या कॅश ला दुसऱ्या गोष्टीत इन्व्हेस्ट करण्यासाठी घेतली जाते. समजा 2013 चा ऑइल रेव्हेन्यू क्ष असेल तर तो संपूर्णपणे खर्चासाठी वापरून टाकला तर हातात नवीन प्रोजेक्ट्स साठी फार कमी पैसे उरतात. म्हणून loans घेतली जातात. समजा माझ्याकडे 50 लाख रुपये असतील तर मी सगळे पैसे घर विकत घेण्यात घालणार की होम लोन घेणे हा जास्त चांगला निर्णय असेल? माझ्या मते मी दुसरा पर्याय निवडीन. 3. मागच्या सरकारने घेतलेले ऑइल बॉण्ड्स एका विशिष्ट परिस्थितीत घेतलेले असणार. ते फेडताना जेवढे ठरलेले व्याज असेल तेवढे द्यायलाच हवे. 4. ऑइल बॉण्ड्स साठी परतफेड करताना कोणकोणत्या अटी आणि व्याजदर ठरवला होता यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. सरकारचे उत्पन्न करांमधून येते आणि ते मर्यादित आहे. शिवाय 2014 मध्ये कोरोना येईल असं वाटलं सुद्धा नसेल. बदलत्या परिस्थितीत मंत्र्यांना त्या त्या वेळच्या परस्थितोपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

सरकार दरवर्षी ऑईल बॉण्डचे

आग्या१९९०
Wed, 09/01/2021 - 22:34 नवीन
सरकार दरवर्षी ऑईल बॉण्डचे ९९०० व्याज फेडत आहे. सरकारला इंधनावरील एक्साइज ड्युटी मधून २०१४ ला रू.९९००० कोटी आणि २०२०-२१ मध्ये अंदाजे रू. ३,७०,००० कोटी मिळाले. ह्याचा अर्थ ऑईल बाँडचे कर कमी करण्यासाठी ऑईल बॉण्डचा अडथळा नक्कीच नाही. २०१४ नंतर आणि कोरोना येण्यापूर्वीच अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. कोरोना हे निमित्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

@ रावसाहेब चिंगभूतकर

सुबोध खरे
गुरुवार, 09/02/2021 - 10:33 नवीन
@ रावसाहेब चिंगभूतकर प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देणे आवश्यक नाही. ऑइल बंदचे व्याज काय किंवा लसीकरण केलेल्या ६५ कोटी लसींची होणारी साधारण ५० हजार कोटी रुपये किंमत आणि त्याच्या तिप्पट पैसे म्हणजेच अधिक ६५ कोटी उरलेल्या लोकसंख्येच्या पहिल्या डोसचे आणि १३० कोटी दुसऱ्या डोसचे पैसे) हा पैसा सरकार कुठून आणणार आहे? सरकार जवळ स्वतःचे असे काहीच नसते. कुठून तरी पैसे जमा करूनच योजनांसाठी खर्च करावे लागतात. तेंव्हा कोणाचाही कर वाढवला कि ते लोक बोंबा मारणारच. जवाहिऱ्यांना १ टक्का अबकारी कर लावल्यावर त्यांनी संप केला होता. सरकारने त्यांना भीक घातली नव्हती हा भाग अलाहिदा. आता पण हॉल मार्किंग विरुद्ध संप केला होताच. तेंव्हा बोंब मारणारे बोंब मारणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 08/26/2021 - 11:55 नवीन
शिवसेनेच्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी राणे ह्यांची नियुक्ती झाली आहे. भविष्यात दुसरा 'बाळासाहेब ठाकरे' निर्माण होऊ नये ह्यासाठी हे चालु आहे असे ह्यांचे मत. पुर्वी बाळासाहेब असताना चित्रपट(बाँबे) प्रदर्शित होणे असो,संजय दत्तची सुटका असो वा एन्रॉन प्रकल्प असो आण्खी काही.. बाळासाहेबांशी 'चर्चा' केल्याशिवाय पुढे जाता येत नसे.अगदी वाजपेयी-अड्वाणीही सत्तेवर असताना मातोश्रीवर जाउन 'ठाकरी'विचार ऐकायचे.(किंवा ऐकल्यासारखे करायचे!) त्यामुळे उद्धव ह्यांची छबी 'सम्राट' वगैरे होणार नाही ह्यासाठी भाजपाचे हे प्रयत्न चालु असतील.
  • Log in or register to post comments

अगदी वाजपेयी-अड्वाणीही

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 12:07 नवीन
अगदी वाजपेयी-अड्वाणीही सत्तेवर असताना मातोश्रीवर जाउन 'ठाकरी'विचार ऐकायचे. >>> आजही ठाकरी विचार एकायला मातोश्रीवर यावंच लागतं. २०१९ ला नाही का महाराष्ट्रात डाव ऊधळला गेला तरी ज्याना चाणक्य म्हणायचे असते असे अमित शहा युती करा म्हणून मातोश्रावर ठाकरेना विनवण्या करायला आले होते. ऊद्या पुन्हा युती साठी विनवण्या करायला भाजप नेते एका पायावर तयार असताल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

प्रत्यक्ष मुख्यमंत्री होऊन

रावसाहेब चिंगभूतकर
गुरुवार, 08/26/2021 - 13:19 नवीन
प्रत्यक्ष मुख्यमंत्री होऊन उद्धव ठाकरेंनी काय कमावलं हे काळच सांगेल, पण एक महत्वाची गोष्ट झाली. ठाकरेंची प्रॉपर्टी किती ते आता निवडणूकी निमित्ताने जाहीर झालं. आता ही baseline समजली तर त्यांच्या wealth creation वर सेंट्रल agencies ची नजर असेल. आतापर्यंत जसं कमावलं तसं आता कमवायला गेलं तर अडकण्याची शक्यता आहे. रिमोट कंट्रोल असताना ती भीती नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सेंट्रल एजन्सीज ना ठाकरे भिक

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 13:26 नवीन
सेंट्रल एजन्सीज ना ठाकरे भिक घालतील असं वाटत नाही. रावसाहेब दाणवेंची दहा हजार करोड ची संपत्ती आहे असा दावा त्यांच्या जावयानेत केलाय, आणी एजन्सीज राज्य सरकारकडेहा आहे त्यामुळे सेंट्रल एजन्सी वापरन्याआधी केंद्र राज्याला टरकून असेल. मोदींच्या मंत्र्याला अटक करून दाखनलीय ठाकरेनी त्यामुळे पुन्हा ठाकरे आणी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

बॉर.....

नावातकायआहे
गुरुवार, 08/26/2021 - 16:46 नवीन
मोदींच्या मंत्र्याला अटक करून दाखनलीय ठाकरेनी त्यामुळे पुन्हा ठाकरे आणी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र जाणार नाही.>>>> माझा पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भावना गवळी, अनिल देशमुखचा

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 08:55 नवीन
भावना गवळी, अनिल देशमुखचा जावई यांच्यावर कारवाई झाली की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

जोपर्यंत शिवसेना किंवा

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 09:51 नवीन
जोपर्यंत शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांपैकी एक पक्ष भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देत नाही, तोपर्यंत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर अशी लुटुपुटीची कारवाई होत राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

२०१४ पासून नियोजन चालु आहे

सामान्यनागरिक
Tue, 08/31/2021 - 17:24 नवीन
शिवसेनेला आवर घालण्याचे २०१४ पासुनच सुरु झाले आहे. पडद्यामागुन काळजीपूर्वक हालचाली चालु आहेत. राणे, पडळ्कर यांना आणने हा त्याचाच एक भाग आहे. एकदा मुंबै महापालिका हातातुन गेली तर शिवसेनेचे हाल कुत्रा खाणार नाही. उद्धव ठाकरे यांना घरखर्चासाठी कर्ज घ्यावे लागेल. जर शिवसेना , खांग्रेस, भ्रष्ट्वादी यांच्याशी लढावे लागले तर साधन शुचिता पाळुन चालणार नाही. तुम्ही नागडे होणार तर आम्ही पण नागडे होउन लढणारे लोक आणु. हेच सूत्र आहे. कृपाशंकर सिंह वगैरे मंडली यात आर्थिक, सैनिकी, राजकीय ई. मदत करतील. काही दशके महापालिकेत घट्ट पाळेमुळे रोवुन बसलेल्या शिवसेनेला उखडणे सहज शक्य होणार नाही. आणि शुचिता पाळुन तर कधीच नाही. आणि शेवट चांगला होणार असेल तर काही हरकत नाही. नाहीतरी पन्नास वर्षे आम्ही लोक्शाही आणी पवित्र मार्गाने लढु असे म्हणुन भाजप ने काय साधले ? जसे पाक सीमेवर गोळीचे उत्तर मिसाईल ने दिले जाते तसेच या राजकारणात पण करावे लागेल. मोदी, अमित शाह आगे बढो . १२० कोटी जनता तुमच्या बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

प्रतिसाद वाचून हसू आले. जर

श्रीगुरुजी
Tue, 08/31/2021 - 17:59 नवीन
प्रतिसाद वाचून हसू आले. जर २०१४ पासून सेनेला आवर घालण्याचे काम सुरू झाले आहे, तर २०१९ पर्यंत सेनेसमोर लाचारी का सुरू होती? सेनेला फायदा होईल व आपल्याला तोटा होईल अशा पद्धतीने युती करून संपत आलेल्या सेनेला जीवदान का दिले? वारंवार मातोश्रीवर जाऊन हुजरेगिरी का करीत होते? २०१७ मध्येच मुंबई महापालिका हातात येत असताना रणांगणातून पूर्ण माघार घेऊन सेनेला पूर्ण रान मोकळे करून का दिले? कृपाशंकर, राणे, पडळकर वगैरे जनाधार नसलेल्या नेत्यांच्या मदतीने सेनेला संपविणे हे दिवास्वप्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

+१००

NiluMP
गुरुवार, 09/02/2021 - 01:39 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

जो बायडन

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 08/26/2021 - 11:55 नवीन
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता देण्यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले आहेत- अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना थारा मिळणार नाही, याविषयी तालिबान कोणती भूमिका घेणार, यावरच भविष्यातील सरकारच्या वैधतेवर निर्णय घेण्यात येणार आहे. https://maharashtratimes.com/international/international-news/afghanistan-crisis-g7-agrees-to-road-map-for-dealing-with-the-taliban/articleshow/85647663.cms म्हणजे याचा अर्थ तालिबान खरोखरच आता शांततावादी झाले आहेत याची शक्यता असल्याची शेखमहंमदी स्वप्ने स्वतः अमेरिकेच्या अध्यक्षांनाही पडायला लागलेली दिसतात. एकूणच जो बायडन अलीकडील काळातील अमेरिकेचे सर्वात वाईट अध्यक्ष ठरणार असे दिसते- जिमी कार्टर आणि जॉन केनेडींपेक्षाही जास्त वाईट. आताच्या परिस्थितीत तालिबान वर्ष-दोन वर्षे कसलीही आगळिक न करता स्वस्थ बसतील, जगाकडून मान्यता मिळवून घेतील आणि एकदा हे सगळे पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो ना' असे बरळायला लागले की मग हळूहळू ते आपले रंग दाखवायला लागतील हे सांगायला आंतरराष्ट्रीय राजकारणात पी.एच.डी करायची गरज नाही. किंबहुना आंतरराष्ट्रीय राजकारणात पी.एच.डी केलेल्या विचारवंतांनाच हे समजायचे नाही. ते सोडून इतर सगळ्यांना ते सहज समजू शकेल. जे लोक शरीया कायद्यावर आपले राज्य चालवणार आहेत आणि जगाची दार-उल- इस्लाम आणि दार-उल-हरब अशी सरळसरळ विभागणी करतात त्यांच्याकडून शांततेची अपेक्षा करणे हाच मूर्खपणा ठरेल.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 12:09 नवीन
+१ तात्या ट्रंप जिंकायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

जनतेच्या मनातले राष्ट्रपती :)

रामदास२९
गुरुवार, 08/26/2021 - 12:09 नवीन
जनतेच्या मनातले राष्ट्रपती :) १९८८ पासून 'भावी'.. घ्या म्हणाव लोकान्ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

भावी

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 08/26/2021 - 12:17 नवीन
जनतेच्या मनातले राष्ट्रपती :) १९८८ पासून 'भावी'.. घ्या म्हणाव लोकान्ना...
तिकडे १९८८ पासूनचे भावी अध्यक्ष २०२१ मध्ये खरोखरच अध्यक्ष झाले. आपल्याकडे १९९१ पासूनचे भावी पंतप्रधान २०२४ मध्ये खरोखरच पंतप्रधान नाही झाले म्हणजे मिळवली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

वय त्यान्च्या बाजूच नाही ना..

रामदास२९
गुरुवार, 08/26/2021 - 15:47 नवीन
वय त्यान्च्या बाजूच नाही ना.. पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

तालिबान चा नवा वाली कोण? कतार

रामदास२९
गुरुवार, 08/26/2021 - 12:07 नवीन
तालिबान चा नवा वाली कोण? कतार का पाकिस्तान... ज्या मुल्ला अब्दुल गनी बरादर ला पाकिस्तान्मध्ये २०१८ पर्यन्त तुरुन्गात ठेवले होते तो सध्या कतार मध्ये आहे आणि त्याच्याशी अमेरिका, कतार, रशिया बोलणी करत आहेत.. त्याचा पाकिस्तान ला कडाडून विरोध आहे..
  • Log in or register to post comments

त्याचा पाकिस्तान ला कडाडून

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 08/26/2021 - 12:42 नवीन
त्याचा पाकिस्तान ला कडाडून विरोध आहे पाकिस्तान तर तालिबान बरोबर जुळवून घ्यायच्या विचारात आहे, त्यांना दुसरा पर्याय पण नाही. तालिबान एकदा अफगाणिस्तान मध्ये स्थिरावले की त्यांचा सर्वात पहिले टार्गेट हे पाकिस्तानच असेल. सत्तेत आल्या आल्या त्यांनी ttp च्या दाहशक्तवाद्यांना सोडून दिले, आणि ttp चे पाहिले लक्ष पाकिस्तानच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 12:47 नवीन
पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज देश आहे. आणि तालिबान म्हणजे कसलेल सैन्य वगैरे नाही. तालिबान पाकिस्तानच्या वाटेला आजिबात जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

तालिबान युद्ध करून पाकिस्तान

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 08/26/2021 - 12:58 नवीन
तालिबान युद्ध करून पाकिस्तान जिंकणार नाहीच पण दहशतवादी कारवाया तरी नक्कीच करणार. पाक अफगाण सीमेवर शरिया कायदा लावायचा प्रयत्न करणार. आणि पाकिस्तान साठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पाकिस्तान च्या नागरिकांची झोप

रावसाहेब चिंगभूतकर
गुरुवार, 08/26/2021 - 13:22 नवीन
पाकिस्तान च्या नागरिकांची झोप उडायचे दिवस जवळ आहेत. TTK पाकिस्तान मध्ये लवकरच कारवाया सुरू करणार. खास करून पेशावर मध्ये आता दहशतवादी हल्ले सुरू होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा