वॉटरगेट (भाग १)
वॉटरगेट (भाग २)
वॉटरगेट (भाग ३)
वॉटरगेट (भाग ४)
वॉटरगेट (भाग ५)
______________________________________________________________________________
मार्च १९७४ मध्ये निक्सन यांच्या ७ सहकर्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले. निक्सन यांच्या सूचनेनुसार या ७ पैकी ५ जणांनी आपण दोषी असल्याचे आधीच न्यायालयात मान्य केले होते. काही महिन्यांनंतर उर्वरीत दोघेही दोषी सिद्ध झाले. निक्सनचे सहकारी चार्ल्स कोलसन, जॉन डीन यांना अटक झाली तर गॉर्डन लिडी, होवॉर्ड हंट यांना तुरूंगवासाची शिक्षा झाली.
अमेरिकेचे अॅटर्नी जनरल व निक्सनचे सहकारी जॉन मिचेल यांना १९ महिने, या योजनेचा सूत्रधार गॉर्डन लिडी याला साडेचार वर्षे, निक्सन यांच्या कर्मचार्यांचा प्रमुख हाल्डमन याला १९ महिने व जॉन एनरिकमन याला १८ महिने तुरूंगावासाची शिक्षा मिळाली. या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेल्या ६९ आरोपींपैकी ४८ जण न्यायालयात दोषी सिद्ध ठरून त्यांना शिक्षा मिळाली.
विरोधी पक्षाच्या कार्यालयावर दरोडा टाकून त्यांची कागदपत्रे चोरणे, त्यांच्यावर हेरगिरी करणे, पाळत ठेवणारी सामग्री गुपचुप बसविणे या प्रकरणात प्रत्यक्ष अध्यक्ष गुंतलेले आहेत व अमेरिकन लोकशाहीसाठी हे लांच्छनास्पद आहे, हे चौकशी समितीचे मत झाले होते. त्यामुळे अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हने निक्सनविरोधात महाभियोग (Impeachment) प्रस्ताव दाखल करून घेऊन त्यांच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली.
निक्सन यांना चौकशी चमितीसमोर यावे लागले. त्यावेळी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये आलेल्या कॉल्सचे रेकॉर्डिंग द्यावे लागले. परंतु त्यातही त्यांनी लबाडी करून काटछाट केलेले रेकॉर्डिंग सादर केले. हे समितीच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सर्व मूळ ध्वनिफीती द्यायल्या लावल्या. यातील एक टेप Smoking Gun Tape या नावाने प्रसिद्ध आहे. यात निक्सन असे सांगतात की "आपल्या प्रशासनाने CIA चे संचालक रिचर्ड हॅम्स आणि व्हर्नॉन वॉल्टर्स यांच्याकडून FBI प्रमुख पॅट्रिक ग्रे यांना हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगून वॉटरगेट प्रकरणाचा तपास त्वरीत थांबविण्यास सांगावा.". निक्सन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत होते हे एव्हाना स्पष्ट झाले होते.
निक्सनने कर भरण्याच्या संदर्भात अनेकदा गंभीर उल्लंघन केले आहे हे देखील चौकशीत आढळले. अध्यक्ष आपल्या वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधी वापरत होते हे सुद्धा तपासात दिसून आले.
संपूर्ण तपासणीनंतर सिनेट आणि प्रतिनिधींच्या हे लक्षात आले की की निक्सन यांनी राष्ट्रपतीपदाच्या अधिकारांचा गैरवापर केला होता व ते करताना अनेकदा कायद्याचे उल्लंघन केले होते.
आता निक्सन यांची लोकप्रियता घसरली होती. त्यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्यावर महाभियोग चालवावा यासाठी अनेक शहरातून निदर्शने होऊ लागली.
नागरिकांची निदर्शने
नागरिकांची निदर्शने
निक्सन यांचा राजीनामा
गैरप्रकार केल्याचे निक्सन यांनी नाकारले
मानहानी होऊन मुदतीआधी राजीनामा द्यावा लागलेले निक्सन हे अमेरिकेच्या जवळपास २०० वर्षांच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष. त्यांच्याविरूद्ध महाभियोग चालविण्यासाठी तो प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ज मध्ये साध्या बहुमताने तर सिनेटमध्ये दोन तॄतीयांश बहुमताने मान्य व्हावा लागतो. अमेरिकन लोकशाही इतकी प्रबळ आहे की सिनेटमध्ये एकाच पक्षाचे, विशेषतः विरोधी पक्षाचे, दोन तॄतीयांश सभासद असणे खूप अवघड असते. या प्रस्तावाच्या बाजूने सिनेटमध्ये सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी मत दिले तरच दोन तृतीयांश बहुमत मिळू शकते. यावर्षी ट्रंप यांच्यविरूद्ध महाभियोग चालविण्यास सिनेटला दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यास अपयश आले होते. बिल क्लिंटन यांच्यविरूद्ध सुद्धा महाभियोग चालविण्यास सिनेटला दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यास अपयश आले होते. पूर्वी १८६८ मध्ये तत्कालीन अध्यक्ष अॅन्ड्र्यू जॉन्सन विरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ज मध्ये साध्या बहुमताने संमत केलेल्या प्रस्तावाला सिनेटमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यास अपयश आले होते. अमेरिकन सिनेटमध्ये १०० सदस्य असतात व महाभियोग प्रस्ताव संमत होण्यासाठी त्या प्रस्तावाच्या बाजूने किमान ६७ सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक होते. त्यावेळी सिनेटमध्ये विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे ५५ सदस्य होते. परंतु निक्सन यांच्याविरूद्ध असलेले आरोप अत्यंत गंभीर होते. सत्तेचा गैरवापर, गुन्हेगारी कृत्ये, संसदेचा अपमान, न्यायव्यवस्थेची दिशाभूल करणे, तपासाला असहकार्य, पुराव्यांमध्ये फेरफार करणे हे आरोप अमेरिकी खासदारांच्या पचनी पडणारे नव्हते. ऑगस्ट १९७४ च्या पहिल्या आठवड्यात निक्सनच्या रिपब्लिकन पक्षाच्या काही खासदारांनी निक्सनना सांगितले की तुमच्याविरूद्धचे आरोप अत्यंत गंभीर आहेत व तुमच्याविरूद्ध महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव सिनेटमध्ये आल्यास आम्ही प्रस्तावाच्या बाजूने मत देऊ. आपण आता वाचू शकत नाही हे निक्सनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेवटी नाईलाजाने ९ ऑगस्ट १९७४ या दिवशी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. निक्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष जेराल्ड फोर्ड अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर लगेच त्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निक्सन यांना त्यांच्या काळात त्यांच्याकडून झालेल्या सर्व गुन्ह्यासांठी पूर्ण व विनाअट माफी जाहीर केली. हा अमेरिकन जनतेला मिळालेला अजून एक धक्का होता. जेराल्ड फोर्ड यांची कारकीर्द खूप रोचक आहे. निक्सन यांनी २० जानेवारी १९७३ या दिवशी दुसर्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर उपाध्यक्ष म्हणून स्पायरो अॅग्न्यू यांनी सुद्धा दुसर्यांदा शपथ घेतली. परंतु काही काळातच १९७३ मध्ये गुन्हेगारी कटकारस्थान, लाचखोरी, अपहरण, करचुकवेगिरी अशा विविध आरोपांखाली त्यांची चौकशी सुरू झाली. १९६९ मध्ये प्रथम उपाध्यक्ष होण्यापूर्वी ते बाल्टीमोर काऊंटीचे मुख्य कार्यकारी व नंतर मेरीलँड राज्याचे गव्हर्नर (म्हणजे मुख्यमंत्री) होते. त्या काळात त्यांनी काही कंत्राटदारांकडून लाच घेतल्याचे आरोप होते. करचुकवेगिरीचेही आरोप होते. शेवटी१० ऑक्टोबर १९७३ या दिवशी त्यांना उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार निक्सन यांनी ६ डिसेंबर १९७३ या दिवशी सभागृहातील रिपब्लिकन पक्षाचे गटनेते जेराल्ड फोर्ड यांची उपाध्यक्षपदी नेमणूक केली. नंतर वॉटरगेट प्रकरणामुळे निक्सन यांना राजीनामा द्यावा लागल्यामुळे पुन्हा एकदा घटनेतील तरतुदीनुसार उपाध्यक्ष असलेले जेराल्ड फोर्ड यांची ९ ऑगस्ट १९७४ या दिवशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक झाली व या पदावर ते २० जानेवारी १९७७ पर्यंत होते. अमेरिकेच्या इतिहासात काही वेळा मुदत पूर्ण होण्याआधीच राष्ट्राध्यक्ष निधन झाल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे पदावरून गेल्यामुळे त्यांच्या जागी नवीन राष्ट्राध्यक्ष येण्याचे प्रसंग घडले आहेत. परंतु उपाध्यक्ष पदावरून जाण्याचा प्रसंग एकदाच १८३२ मध्ये घडला होता, तेव्हा तत्कालीन उपाध्यक्ष जॉन कॅलहॉन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढविण्यासाठी मुदत पूर्ण होण्याआधीच उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या काळात उपाध्यक्षपद रिकामे न ठेवण्याची कायदेशीर तरतूद नसल्याने पुढील निवडणुकीपर्यंत उपाध्यक्षपद रिकामे राहिले होते. परंतु निक्सन यांनी आपल्या आध्यक्षपदाच्या पहिल्या कार्कीर्दीत घटनादुरुस्ती करून उपाध्यक्षपद रिकामे न ठेवता त्या जागी नवीन उपाध्यक्ष नेमण्याचा कायदा केला होता. त्यामुळे १९७३ मध्ये उपाध्यक्ष स्पायरो अॅग्न्यू यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर निक्सन यांनी आपल्या अधिकारात जेराल्ड फोर्ड यांची उपाध्यक्षपदी नेमणूक केली होती व ८ महिन्यांनी प्रत्यक्ष निक्सन यांनाच राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने त्यांच्या जागी उपाध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. निवडून न येता उपाध्यक्ष व राष्ट्राध्यक्ष या दोन्ही पदांवर आरूढ झालेले जेराल्ड फोर्ड हे अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव! जेराल्ड फोर्ड यांचा राष्ट्राध्यक्षपदी शपथविधी झाल्यानंतर ४ महिन्यांहून अधिक काळ उपाध्यक्षपद रिकामे होते. शेवटी १९ डिसेंबर १९७४ या दिवशी फोर्ड यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते नेल्सन रॉकफेलर यांची उपाध्यक्षपदी नेमणूक केली. म्हणजे २० जानेवारी १९७३ ते २० जानेवारी १९७७ या ४ वर्षांच्या काळात अमेरिकेला २ राष्ट्राध्यक्ष व ३ उपाध्यक्ष मिळाले. हे प्रकरण तडीस नेण्यास वॉशिंग्टन पोस्टचे निर्भीड पत्रकार बॉब वॉडवर्ड्स व बर्नस्टीन, त्यांच्या पाठीशी ठाम उभे असलेले वॉशिंग्टन पोस्ट हे दैनिक, पडद्याआड राहून मदत करणारा मार्क फेल्ट, सॅम आयर्विन व टिप ओ'नील सारखे डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन पक्षातील निर्भीड भूमिका घेणारे सिनेटर्स, इतर माध्यमे आणि कोणत्याही दबावाखाली न आलेली निष्पक्षपाती न्यायव्यवस्था हेच कारणीभूत ठरले. वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार बॉब वूडवर्ड्स आणि कार्ल बेर्नस्टिन यांनी या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून पुरावे मिळवून हे प्रकरण शेवटास नेले व त्याचा शेवट निक्सनना अर्धचंद्र मिळण्यात झाला. त्यांच्या या अतुलनीय, निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांना पुलित्झर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रकरणावर त्यांनी नंतर "All the Presiden's Men" हे पुस्तक लिहिले ज्याची तडाखेबंद विक्री झाली. वूडवर्ड यांना ९/११ च्या हल्ल्यानंतर केलेल्या रिपोर्टिंगबद्दल २००२ मध्ये पुन्हा एकदा पुलित्झर पुरस्कार देण्यात आला. "All the Presiden's Men" या चित्रपटाचे खालील ३ मिनिटांचे ट्रेलर अवश्य पहावे. "https://www.youtube.com/watch?v=DC3YFyah_Yg" याच चित्रपटावर आधारीत एका डॉक्युमेंटरी मध्ये या प्रकरणातील सर्व स्टेक होल्डर्सच्या मुलाखती, त्या काळातील तपास व इतर सर्व गोष्टींचे सविस्तर चित्रण आहे. ते सुद्धा पाहण्यासारखे आहे. https://www.youtube.com/watch?v=Xo7KWzOgnf8&list=PLhEyhZUiBh7IXZGu-8vZ4… या प्रकरणातील बरीचशी माहिती व पुरावे त्यांना एका अनामिक व्हिसलब्लोअर कडून निळाले होते. त्याचा उल्लेख त्यांनी "Deep Throat" असा केला होता. जवळपास ३२-३३ वर्षांनंतर २००५ मध्ये डीप थ्रोट कोण होता हे उघड झाले. एफबीआयचा माजी सहाय्यक संचालक मार्क फेल्ट हाच डीप थ्रोट होता. Life, Liberty and Pursuit of Happiness हे अमेरिकन घटनेने जनतेला दिलेले तीन मूलभूत अधिकार आहेत. निक्सन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून यातील Liberty या अधिकारावर आक्रमण केले होते. परंतु अत्यंत समर्थ लोकशाही असलेल्या अमेरिकेने कोणत्याही दडपणाखाली न येता हे आक्रमण परतवून लावले व जनतेला दिलेल्या मूलभूत अधिकारांचे रक्षण केले. वॉटरगेट प्रकरण हे सत्तेवर नियंत्रण ठेवण्याविरूद्ध झगडणार्यांच्या आणि शोधक, निर्भीड पत्रकारितेच्या विजयाचे प्रतीक आहे. १९६० च्या दशकात अध्यक्ष केनेडींची झालेली हत्या, रशियाबरोबरील शीतयुद्ध, वर्णभेद विरोधात लढणारे मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या, सलग ७ वर्षे चाललेले व्हिएटनाम बरोबरील युद्ध व त्यात मरण पावलेले ५७,००० सैनिक अशा अनेक धक्कादायक घटनांमुळे धक्का बसलेल्या अमेरिकन जनतेला वॉटरगेट प्रकरण व त्यात प्रत्यक्ष गुंतलेले अध्यक्ष निक्सन यामुळे अजून एक जोरदार मानसिक धक्का बसला. वॉटरगेट या इमारतीत हे प्रकरण घडल्यामुळे या प्रकरणाला वॉटरगेट स्कँडल हे नाव मिळाले. नंतर क्लिंटन अंतर्गत मोनिकागेट, ररीगन अंतर्गत इराणगेट, फॉक्सवॅगन कार कंपनीचा घोटाळा ज्याला डिझेलगेट असे नाव पडले होते, अशी प्रकरणे प्रसिद्ध झाली. इति लेखनसीमा. ____________________________________________________________________________________ ही मालिका लिहिण्यात माझे शून्य संशोधन आहे. वेगवेगळ्या लेखातून माहिती एकत्रित करून मी त्याचे संकलन केले आहे. त्यासाठी खालील माहितीस्रोतांचा आधार घेतला आहे. लेखांमध्ये तपशीलांच्या आणि व्याकरणाच्या काही चुका राहिल्या असण्याची शक्यता आहे. https://en.wikipedia.org/wiki/Gerald_Ford https://en.wikipedia.org/wiki/Spiro_Agnew https://en.wikipedia.org/wiki/Richard_Nixon https://amp/s/www.history.com/.amp/topics/1970s/watergate https://mr.istanbulbear.org/uotergeytskoe-delo-v-ssha-istoriya-6380 https://www.smithsonianmag.com/history/who-was-deep-throat-96058276/ https://bolbhidu.com/what-happened-at-watergate/ https://timesofindia.indiatimes.com/world/us/g-gordon-liddy-watergate-m… https://indianexpress.com/article/world/g-gordon-liddy-watergate-master…
आता बचावाचा कोणताच मार्ग शिल्लक राहिल्याने निक्सन यांनी शेवटी ९ ऑगस्ट १९७४ या दिवशी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

वाचने
25705
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखमाला खुप आवडली.
धन्यवाद
आणखी एक. ९ ऑगस्ट १९७४ ते २०
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
आणखी एक. ९ ऑगस्ट १९७४ ते २० जानेवारी १९७७ या काळात अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघेही त्यांच्या पदावर निवडून गेलेले नव्हते.जेराल्ड फोर्ड हे इतके नशीबवान ठरले की अजिबात निवडून न येता त्यांना दोन्ही पदे मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथ घेताना शेवटी "So help me God" असे बोलतात. अमेरिकतील चलनी नाण्यांवर "In God We Trust" असे कोरलेले असते. हे वाक्य अमेरिकेचा व फ्लॉरिडा राज्याचा official motto आहे. भारतात शपथ घेताना शपथेत देवाचे नाव अधिकृतपणे समाविष्ट केले तर अक्षरशः आभाळ कोसळेल.शपथ
In reply to आणखी एक. ९ ऑगस्ट १९७४ ते २० by श्रीगुरुजी
मोदी किंवा वाजपेयींसारखा
In reply to शपथ by चंद्रसूर्यकुमार
जेम्स बुकानन राष्ट्राधयक्ष काळ १८५७ ते १८६१
In reply to मोदी किंवा वाजपेयींसारखा by श्रीगुरुजी
विधुर अध्यक्ष
In reply to मोदी किंवा वाजपेयींसारखा by श्रीगुरुजी
ईश्वर कि शपथ ...
In reply to आणखी एक. ९ ऑगस्ट १९७४ ते २० by श्रीगुरुजी
https://www.mea.gov.in/Images
In reply to आणखी एक. ९ ऑगस्ट १९७४ ते २० by श्रीगुरुजी
थोडा फरक
In reply to https://www.mea.gov.in/Images by निपा
भारतात शपथ घेताना गीता किंवा
In reply to थोडा फरक by चंद्रसूर्यकुमार
न्यायालय
In reply to भारतात शपथ घेताना गीता किंवा by श्रीगुरुजी
भारतीय न्यायालयात हे थांबवले आहे
In reply to न्यायालय by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to भारतीय न्यायालयात हे थांबवले आहे by श्रीरंग_जोशी
वॉटरगेटवर नॅशनल जिऑग्राफिकची डॉक्युमेन्टरी
रोचक लेखमाला
उत्तम लेखमाला ...
लेखमाला वाचणाऱ्या व प्रतिसाद
लेखमाला मस्त झाली.
माहितीवर्धक लेखमाला!
मस्त मालिका झाली ही.
रोचक आणि माहितीपूर्ण मालिका
माहितीपूर्ण, उत्कंठावर्धक आणि वेगाने भाग प्रकाशित झालेली लेखमाला
मस्त झाली मालिका
भारतातील पत्रकारिता
चांगली शोधपत्रकारिता
In reply to भारतातील पत्रकारिता by चौकटराजा
माहितीपूर्ण
सर्व भाग वाचले; फारच रोमन्चक
भारतात शोधपत्राकारीतेची अनेक
नगरवाला प्रकरण
In reply to भारतात शोधपत्राकारीतेची अनेक by विजुभाऊ
अमक्यामागे सी.आय.ए, तमक्यामागे सी.आय.ए
In reply to नगरवाला प्रकरण by चंद्रसूर्यकुमार
पण जिवावर उदार होऊन काम
In reply to भारतात शोधपत्राकारीतेची अनेक by विजुभाऊ
माहितीपूर्ण लेखमाला.
छान लेखमाला
छान झाली लेखमाला.
लेखमालिका आवडली
एक राहिलेच
In reply to लेखमालिका आवडली by जुइ
रोचक मालिकेची मेजवानी दिल्या
लेखमाला आवडली ...
एक विषय सुचला ...
हेच का ते ?
In reply to एक विषय सुचला ... by चौकटराजा
होय
In reply to हेच का ते ? by गॉडजिला
सर्व वाचकांना व प्रतिसादकांना
एका सुंदर आणि वेगवान लेखमाला !
बोल भिडू मधील लेख मी वाचला
In reply to एका सुंदर आणि वेगवान लेखमाला ! by संग्राम
ऐतिहासिक घडामोडी चर्वितचर्वण
छान मालीका श्रिगुरूजी, आता
एरीया ५१*
In reply to छान मालीका श्रिगुरूजी, आता by अमरेंद्र बाहुबली