चित्रपट परिचय : The Big Short

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
6 May 2021 - 12:25 pm

The Big Short, २०१५ सालातील Adam MacKey लखित दिग्दर्शित हा चित्रपट २००७-२००८ सालातील सत्य घटना आणि खऱ्या पात्रांवर आधारीत एक महत्वाचा चित्रपट, हा चित्रपट Michael Lewis यांच्या The Big Short: Inside the Doomsday Machine या पुस्तकावर आधारीत होता. चित्रपटाने इन्व्हेस्टमेंट बॅकींग विश्वाचा बुरखा फाडला.

विषय
चित्रपटाचा विषय आहे २००७-२००८ सालातील Subprime Mortgage Crisis. साधारणतः सामान्य माणूस शेअर मार्केट, बाँड मार्केट, बँकेचे काउंटरपलीकडीले व्यवहार या साऱ्या विषयी अनिभिज्ञ असतो. या साऱ्याशी माझा संबंध नाही अशीच एक सर्वसाधारण धारणा असते. (तसे इथे त्यासंबंधी माहिती देणारे बरेच धागे आहेत आणि खूप उपयुक्त माहिती त्यात असते) आपण बॅकेत जमा केलेला पैसे, विमा, आपले EPF मधील पैसे कुठल्यातरी रुपाने शेअर मार्केट किंवा बाँड मार्केट मधे वापरले जातात. विचार करा बँकेत जर एक करोड लोकांच्या सरासरी फक्त एक लाख रुपयांची जरी ठेव आहे असे म्हटले तरी एक लाख करोड रुपये येवढा मोठा आकडा तयार होतो. त्या पैशाची गुंतवणुक तितकीच महत्वाची ठरते. त्यामुळेच त्या व्यवहाराचा सामान्यांवर परीणाम होतो. चित्रपटाच्या अगदी सुरवातीलाच गंमतीने म्हटल्याप्रमाणे १९७० पर्यंत बँकेचे व्यवहार कंटाळवाणे होते. कुणीतरी कर्ज घेणार तो ते तीस वर्षात फेडणार आणि बॅका त्यावर व्याज घेणार. सत्तरच्या दशकात Lewis Ranieri या व्यक्तीने Mortgage Backed Securities चा शोध लावला. कल्पना तशी भन्नाट होती. Investment Bank कंपनी बॅकेने दिलेले कर्ज विकत घेणार त्या कर्जांना एकत्र करुन त्यांचे वेगवेगळे गट करणार. त्यांचे बाँड काढून विकणार. त्यावर लोकांना बाँड कुपनवर ज्या पद्धतीने परतावा दिला जातो तसा परतावा दिला जाणार. कर्ज देणे, कर्ज जमा करणे ही कामे बँका करणार तर बँकेने केलेल्या मेहनीतीच्या जोरावर Investment Bank पैसे मिळविणार. बँकेसाठी हा फायदा होता की तारण कर्जाची बँकेची जोखीम आता कुणीतरी दुसरा शेअर करणार होता. बऱ्याच बँका हेच बाँड विकत घेऊन पैसे मिळवित होते. हा सारा व्यवहार दोन मोठ्या गृहीतकांवर आधारीत होता १. हे गृहतारण कर्ज आहे तेंव्हा कर्ज घेणारा ते फेडणारच अन्यथा त्याला घर गमवावे लागनार. तेंव्हा कर्ज न फेडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. २. नाहीच फेडले तर तारण असल्याने घर ताब्य़ात घेता येते. घराच्या किंमती वाढतच असतात. बँकांनी, पेन्शन फंडांनी कोणते बाँड विकत घ्यावे यासाठी प्रसिद्ध क्रेडीट रेटींग कंपन्या बाँडला AAA, BBB असे रेटींग देत होते. त्यामुळे हा व्यवहार खूप फोफावला. जगातल्या कितीतरी पेंशन फंडापासून ते बँकापर्यंत साऱ्यानी यात पैसा गुंतवला पण जेंव्हा वरील गृहीतक खोटी ठरायची वेळ आली तेंव्हा सारा व्यवहार कोसळला. सुरवातीला हा व्यवहार बँकेपासून इनव्हेस्ट बँक आणि तेथून हे विकत घेणारे फंड असा जात होता. बँका कर्ज देत होत्या, ती कर्जे विकत होत्या जगातले मोठे फंड, बँका बाँड विकत घेत होते. परंतु तो कालांतराने व्यवहार उलट व्हायला लागला. बाँड, MBS याची मागणी प्रचंड वाढली. बाँडची मागणी वाढल्यामुळे अधिकाधिक कर्ज देण्याची गरज पडू लगाली. त्यात Alan Greenspan ने व्याजाचे दर खूप कमी केले. त्यामुळे बँकांवर कर्ज देण्यासाठी दबाव वाढत गेला. बँकांनी कर्ज देताना जी पथ्थे पाळायची असतात ती पाळली गेली नाहीत. अशात जी व्यक्ती कर्ज फेडू शकत नाही त्यांना सुद्धा कर्ज देण्यात आली. हीच ती Subprime Mortgage. Freddie Mac and Fanne Mae या सारख्या कपंन्या तयार झाल्या ज्यांनी सारे नियम, पथ्थे धाब्यावर बसवून कर्जे दिलीत. २००७-२००८ साली जी काही अर्थव्यवस्थेची घसरण झाली त्याविषयी Panic या नावाचा एक माहितीपट सुद्धा आहे. ज्यात या अमेरीकन फेडरल बँकेच्या Hank Paulson, Henry Bernanke यांच्या मुलाखती तर आहेच शिवाय जॉर्ज बुश, बराक ओबामा यांच्या सुद्धा मुलाखती आहेत. काही प्रमाणात तो माहितीपट पॉलसनने जे बँकांचे बेलआउट केले ते यो्ग्यच होते हे सांगण्याचा प्रयत्न करतो त्या दृष्टिकोनाशी सहमती असेलच असे नाही. तरीही तो माहितीपट चांगला आहे. तसे बरेच माहितीपट आहे पण ते फक्त बँकेचे अधिकारी मोठे झाले आणि सामान्यांना मात्र त्रास झाला हा तुम्हा आम्हाला माहिती असलेलाच मु्द्दा सांगतात पण त्यामागची कारणे सांगत नाही.

कथा
चित्रपटाच्या कथेत तीन धागे आहेत प्रत्येक धाग्याचे स्वतंत्र नायक आहेत असे एकून सहा नायक कथेत आहे. पहिला धागा आहे Scion Capital या कंपनीचा मालक असनाऱ्या डॉ. मायकेल बरीचा, खऱ्या पात्राचे नाव सुद्धा मायकेल बरी असे होते. याला कॅलिफोर्निया येथील हाउसिंग मार्केटचा अभ्यास करताना असे जाणवते की २००० साली डॉट कॉम कंपन्यांचा फुगा फुटल्यावर कॅलिफोर्नियात पगार वाढले नाहीत परंतु घराच्या किंमती मात्र भरमसाट वाढल्या. याचा अभ्यास करता त्याच्या लक्षात आले की या साऱ्याच्या मुळाशी आहे सहज मिळणारी कर्जे. त्यामुळे कुणीही कर्ज घेतो, घर घेतो वर्षभरात त्यावर नफा मिळवून ते विकतो, दुसरा घर विकत घेतो. बँका हे कर्ज पुरवित आहेत कारण MBS मुळे त्यांची जोखीम जवळजवळ संपली आहे. त्याने जसाजसा अभ्यास केला तर त्याला जाणवले की हा एक मोठा फुगा आहे आणि तो लवकर फुटणार. त्यामुळे तो हाउसिंग मार्केटच्या विरोधात बेट करायचे ठरवितो म्हणजे Short करायचे ठरवितो . हा एक वेडा आहे असे समजून साऱ्या बँका त्यासाठी तयार होतात कारण हाउसिंग मार्केट कधी पडणार नाही याची सर्वांनांच खात्री असते.
दुसरा धागा आहे Jared Vennett (खऱ्या आयुष्यातील व्यक्तीचे नाव Greg Lippman) आणि Mark Baum (खऱ्या आयुष्यातील व्यक्तीचे नाव Steve Eisman) या दोघांचा. जॅरेड हा Deutsche Bank मधे कामाला असतो. एका पबमधे त्याला त्याच्या मित्रांकडून कुणीतरी मूर्ख डॉ. बरी हाउसिंग मार्केटच्या शॉर्ट कतोय असे कळते. तो त्याकडे दुर्लक्ष न करता त्याचा अभ्यास करतो आणि त्याला डॉ. बरी असे का करीत असेल याचा अंदाज येतो आणि तो असे हाउसिंग मार्केटचे शॉर्ट विकायचे ठरवितो. त्यासाठी तो Front Point Partner या कपनीला फोन करतो. त्याचा फोन त्याच नावाच्या भलत्याच कंपनीला लागतो. त्या कंपनीचा मुख्य असतो मार्क बाम. त्या चौघांनाही कुणीतरी जारेड हाउसिंग मार्केटचे शॉर्ट विकत आहे हे कळते. सुरवातीला त्यांनाही हा मूर्खपणा वाटतो परंतु Deutsche Bank या सारख्या प्रतिष्ठित कंपनीतील व्यक्ती असे कसे करील म्हणून ते त्याला भेटायचे ठरवितात. जारेड त्यांना समजावून सांगतो की AAA रेटींग असनाऱ्या ९८ कर्जात जर BBB रेटींग असनारी २ कर्ज मिसळली तरी रेटींगमधे फरक पडत नाही. जर का अशा BBB मधून कर्ज न फेडनाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत गेली तर संपूर्ण व्यवस्था कोसळेल. त्या चौघांना त्याचे मत पटलेच असे नाही पण पटले नाही असेही नाही. त्यामुळे ते फिल्ड स्टडी करुन शहानिशा करायचे ठरवितात. फिल्ड स्टडी करायला ते रियल इस्टेट एजंटला भेटतात ती त्यांना सांगते कसे घराचे भाव सतत वाढत आहेत. कशी लोक दरवर्षी मोठी घरे घेत आहेत. ते कर्ज गोळा करनाऱ्या एजंटला भेटतात ते त्यांना सांगतात की ते शुक्रवारी फॉर्म भरतात आणि बँका सोमवारी कर्ज देतात. कोणत्याही प्रकारचे चेकींग होत नाही. आजपर्यंत त्यांनी दिलेली कर्जे कधी बँकेने रिजेक्ट केली नाही. ते कोणालाही कर्ज देतात. त्यांनी स्ट्रिप डांसरला कर्जे दिली आहेत. मार्क बाम अशाच एका स्टिप डांसरला जाऊन भेटतो आणि ती त्याला सांगते कसे तिने पाच घरे घेतली आहेत. एका कर्जाने दुसरे आणि दुसऱ्याने तिसरे. हे सारे बघितल्यावर त्याची खातरी होते का हा मोठा फुगा आहे आणि तो लवकर फुटनार आहे. Front Point Partner हाउसिंग मार्केट शॉर्ट करायचे ठरवितात.
तिसरा धागा आहे जेमी आणि चार्लीचा. ती दोघे Brownfield Capital नावाचा छोटा फंड चालवत असतात. त्यांचे गणित अगदी साधे असते. जी गोष्ट घडण्याची शक्यता फार कमी आहेत असे जगाला वाटत असते त्यावर पैसा लावायचा म्हणजे येणारा परतावा खूप जास्त असतो. ते जे. पी मॉर्गन चेझ या कंपनीत गेले असताना एक रिपोर्ट वाचतात ( प्रत्यक्षात थोडे वेगळे घडले होते ते सिनेमातच समजते). तो रिपोर्ट जारेडने लिहिलेला असतो. त्यात त्याने हाउसिंग मार्केट हा कसा फुगा आहे आणि तो फुटनार हे समजावून सांगितले असते. त्यांना हे Credit Default Swap विकत घ्यायचे असतात पण त्यासाठी त्यांना तिसऱ्या व्यक्तीची गरज लागत असते कारण त्यांचे कॅपिटल कमी असल्याने तसे लायसेंस नसते. यात त्यांना एकेकाळचा सरकारी कंपनीसाठी काम करीत असलेल्या Ben Rickert (खऱ्या आयुष्यातील नाव Ben Hockett) मदत करतो. ते हाउसिंग मार्केट शॉर्ट करतात.
पुढे काय होते तो सारा इतिहास आणि बहुतेकांना माहित आहे तो चित्रपटात बघण्यातच मजा आहे.

वैशिष्टे
एका सर्वेक्षणानुसार हा चित्रपट ९० टक्क्याच्या वर सत्य आहे असे सांगतात. (संदर्भ विकिपिडिया) या गोष्टीचा अभिमान वाटत नाही तर त्याची धडकी भरते. हे सारे व्यवहार असे चालतात असा प्रश्न मनात निर्माण होतो. बँकेचे डिपॉझीट, विमा पॉलीसी, पेन्शन फंड यात आपण विश्वासाने ठेवलेला पैसा जर अशा रितीने कसलीही शहानिशा न करता कर्ज देण्यासाठी वापरात येत असेल तर धडकी भरनारच. २००८ सालानंतर काही रेगुलेशन आले त्यामुळे हल्ली हा सारा व्यवहार इतका राजरोसपणे चालत नाही.
हा चित्रपट आम्ही चित्रपट तयार करतोय असा आव आणत नाही जे घडले ते जसेच्या तसे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सत्य जितके उघडे नागडे करुन सांगता येईल तसे सांगितल्या जाते. त्यामुळे चित्रपट बनविताना दिग्दर्शक किंवा लेखक ज्या तंत्रांचा वापर करतात तसलं काहीही लेखक दिग्दर्शक Adam MacKey याने केलेले नाही. या चित्रपटात कुठलीही प्रतीके, उगाच दिसनारा विरोधाभास, पात्रांच्या काही लकबी किंवा वैशिष्टे, पात्रांच्या तोंडून आलेले तत्वज्ञान (बऱ्याचदा ही मते लेखकाची असतात आणि तो पात्रांच्या तोंडी देत असतो) असल काहीही आढळत नाही. याच विषयावरील दुसरा चित्रपट Margin Call यात या साऱ्या चित्रपट तंत्रांचा वापर केल्याचे जाणवते. फारच शोधायचे म्हटले तर क्रेडीट रेटींग एजंसीत काम करनाऱ्या स्त्रीला धड न दिसणे तिच्या डोळ्यावर असनारा काळा चष्मा असे काहीतरी सापडेल पण तेही तुरळकच. कदाचित हा या चित्रपटाचा दोष सुद्धा म्हणता येऊ शकतो. त्यामुळे नामांकन मिळूनही या चित्रपटाला फक्त एकच अॅकेडेमी पुरस्कार मिळाला.
दुसरे वैशिष्ट असे की या चित्रपटात तीन समांतर धागे आहेत आणि सहा नायक आहे पण कुणीही एक खलनायक नाही. संपूर्ण व्यवस्था ही खलनायकी आहे त्यात काम करनारे सारे मोहरे या खलनायकी व्यवस्थेचा भाग आहे. मग तो अॅलन ग्रीनस्पॅन असो, कुण्या मोठ्या बँकेचा सीईओ असो की कुण्या मोठ्या बँकेत नुकतेच जॉइन झालेला असोसियेट असो सारे या व्यवस्थेचा भाग आहे. ही सारी मंडळी त्या प्रसंगात जरी खलनायकी पद्धतीची वाटत असली तरी ते सारे या व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यांना स्वतःला सुद्धा कल्पना नाही नाही की आपण एका मोठ्या खलनायकी व्यवस्थेचा भाग आहोत. त्यामुळे सहा नायक विरुद्ध एक खलनायकी व्यवस्था असे चित्र उभे करण्यात चित्रपट यशस्वी होतो. मार्क बाम हे पात्र ज्या व्यक्तीवर आधारीत आहे त्या स्टिव्ह आइझमेनने एका मुलाखतीत सांगितले होते की तो अशा कितीतरी व्यक्तींना भेटला होता ज्यांना पूर्ण खातरी होती की ते कधीच चुकनार नाहीत ते चुकुच शकत नाही. त्याच्या मते वॉलस्ट्रिटमधे काम करनाऱ्यांची ही मानसिकता २००७ च्या अर्थव्यवस्थेच्या घसरणीस कारणीभूत ठरली.
वर सांगितल्याप्रमाणे चित्रपटात तीन समांतर धागे आहेत. तिनही धागे एकाच विषयाशी संबंधित आहेत. हे तीनही धागे समांतर पातळीवर पुढे जात असतात तरी चित्रपट पकड तशीच कायम ठेवतो. तीन धाग्यातील नायक कधीही एकमेकांना भेटत नाहीत किंवा ओढूत ताणून त्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानी केलेला नाही. प्रत्येक व्यक्ती त्याचा संघर्ष त्याच्या पातळीवर हाताळत असतो. डॉ बरी त्याच्या कंपनीतील गुंतवणुकदारांशी भांडत असतो कारण त्यांना त्याचा हा व्यवहार आवडला नसतो. मार्क बाम ज्या व्यवहाराच्या विरोधात भांडत असतो त्याच व्यवहारात त्याच्या फंडाची मालक कंपनी मेरील लिंच मोठ्या प्रमाणात अडकली असते. तो प्रत्येकाचा स्वतःतचा संघर्ष आहे.
चित्रपटात मोठ्या कलाकारांची मांदियाळी आहे. रायन गोसलिंगचा जॅरेड प्रभावी आहे. प्रत्यक्षात ग्रेग लिपमॅन हे पात्र कसे होते याविषयी फार माहिती नाही परंतु रायन गॉसलिंगने त्याच्या पात्राला एक विनोदी ढंग दिला आहे. तो कथेचा सूत्रधार आहे त्यामुळे अजून मजा आणली आहे. डॉ. बरी हे पात्र Asperger Syndrome ने त्रस्त आहे तसेच त्याला एक डोळा नाही त्यामुळे त्याला संवाद साधताना त्रास होतो. हे सारेच क्रिस्टिन बेल या कलाकाराने मस्त उभे केले आहे. सहा नायकात तसा दुय्यम तरीही तितक्याच प्रभावीपणे वठविला गेला तो ब्रॅड पिटचा Ben Rickert. जेमी आणि चार्लीमधला चार्ली त्याच्या बोलक्या डोळ्यांमुळे जास्त लक्षात राहिला. खरी कमाल आणली आहे ती Mark Baum हे पात्र निभावनाऱ्या Steven Carelli या कलाकराने. तसा हा विनोदी भूमिका करनारा कलाकार आहे. The Office या मालिकेतील त्याची बॉसची भूमिका खूप गाजली. मार्क बामची व्यवस्थेविषयी असलेली चीड, कुणालाही जे आहे ते सरळ सांगण्याची त्याची पद्धत त्याने मस्त उभे केले. एकदा तो भाषण देत असताना Bears Sterns या कंपनीचा सीईओ त्याची चेष्टा करायची म्हणून काहीतरी विचारतो त्याला प्रत्युत्तर म्हणून तो सांगतो माझी परिस्थिती जर तुझ्यासारखी असती तर मला आता विनोद सुचला नसता. अप्रतिम. तसेच शेवटी शॉर्ट विकायला जेंव्हा तो परवानगी देतो तो प्रसंग सुद्धा अप्रतिम अभिनयाने उभा केला आहे.

काही प्रयोग
यात काही प्रयोग केले आहेत. जसे या चित्रपटातील पात्रे मघेच थांबून तुमच्याशी संवाद साधतात. संवाद तसा फार छोटा असतो बऱ्याचदा प्रत्यक्षात काय घडले आणि आम्ही सिनेमात काय दाखवतो ते सांगनारा असतो.
चित्रपटाच्या विषयाशी संबंधित बऱ्याच क्लिष्ट अर्थशास्त्रीय संकल्पना आहेत. उदा. MBS (Mortgage backed Securities), CDO (Collateralized Debt Obligation), Synthetic CDO. या संकलपना समजल्याशिवाय चित्रपट कळनार नाही. या संकलपना समजावून सांगण्याची एक वेगळीच पद्धत चित्रपटात वापरली आहे. चित्रपटात नसनारी पण त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती येऊन एकेक संकलपना जेव्हा गरज असते तेंव्हा येऊन समजावून सांगते. उदा. कधी कुणी हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री तर कधी प्रसिद्ध शेफ तर कधी प्रसिद्ध अर्थशास्त्री येतो. हे असे पात्र अचानक येते तरी चित्रपट बघण्याची लिंक तुटत नाही की चित्रपटातला रस जात नाही. हा एक अभिनव असा प्रयोग आहे असेच म्हणावे लागेल.
हा ना व्यावसायिक चित्रपट आहे ना फेस्टीवलचा चित्रपट आहे याला कदाचित मनोरंजनात्मक माहितीपट म्हणता येईल. हा चित्रपट एक असे जग ज्याची सामान्य माणसाला फारशी कल्पना नसते ते जग त्या गुणदोषासकट लोकांसमोर उभे करण्यात नक्कीच यशस्वी होतो. वॉलस्ट्रीटची दुनिया ज्या काही चित्रपटांनी अत्यंत प्रभावीपणे उभी केली त्यात या चित्रपटाचा नंबर बऱाच वरचा असेल. वॉलस्टीट संबंधित मी पाहिलेल्या चित्रपटात या चित्रपटाला त्याच्या विषयाशी पूर्णपणे प्रामाणिक राहण्याच्या प्रयत्नांमुळे मी पहिला क्रमांक देईल.
चित्रपट संपल्यानंतर लक्षात राहतात ते चित्रपटातील काही ह्रद्य प्रसंग. ज्या कंपनीच्या रिसेप्शनमधे बसले तरी खूप अभिमान वाटत होता ती कंपनी जेंव्हा आतून बघायचा योग आला तेंव्हा ती पूर्णपणे उध्वस्त झाली होती फक्त रिकाम्या खुर्च्या आणि कांपुटर उरले होते. ते बघितल्यावर चार्ली म्हणतो मला हे असे बघायचे नव्हते. मला आवडलेला आणि लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे मार्क बाम आणि Synthetic CDO कंपनीच्या सीईओ मधील लंच टेबलवरचा प्रसंग. लंच टेबलवर तो सीईओ मार्कला Synthetic CDO काय ते समजावून सांगत असतो. जिथे CDO ही पूर्पणपे पोकळ संकल्पना आहे असे मार्कचे ठाम मत असते तिथे Synthetic CDO विषयी ऐकण्यात त्याला अजिबात रस नसतो. त्याला माहित होते हे सारे ज्या कर्जाच्या आधारावर चालले आहे तिथे सारे गोडबंगाल आहे. हे न्यूयॉर्कमधल्या फाइव्ह स्टार ऑफिसमधे बसून कारभार करनाऱ्याला समजनार नाही. अशी कितीतरी मंडळी होती ज्यांना खाली काय चालले याची काहीही माहिती नसताना वर ते आपला खेळ खेळत असतात. मार्क बाम त्या व्यक्तीसोबत बऱ्याच पद्धतीने आपला मुद्दा मांडतो ती व्यक्ती ते समजावून घेण्याच्या मानसिकतेत नसते. त्या व्यक्तीला मार्कचे बोलणे आवडत नाही आणि ती व्यक्ती म्हणते.
Lets talk how much worth you are. How much money you made last year? I made मार्क बाम उठतो आणि त्याला म्हणतो
You do not know how much shit you are in.
आपण कुठल्यातरी खलनायकी व्यवस्थेचा भाग तर नाही ना, या साऱ्याची खरी किंमत काय हे असे प्रश्न स्वतःलाच विचारले नाही तर मार्क बाम चित्रपटात म्हणतो तशी आपली अवस्था होऊ शकते. प्रवाहासोबत धावत असताना हे धावणे कितपत योग्य आहे हा प्रश्न सतत विचारायला हवा नाहीतर आपल्याला कल्पनाच नाही की आपण कुठल्या गर्तेत अडकत जातोय. चित्रपटाच्या विषयाशी प्रामाणिक राहण्याच्या या भूमिकेमुळेच चित्रपट अप्रतिम होतो. त्याचमुळे हा चित्रपट मला भयंकर आवडला आणि कायम लक्षात राहिल.

अवांतर
१. वॉलस्ट्रीट विषयावरील चित्रपटांची भाषा ही एखाद्या क्राइम थ्रीलर चित्रपटासारखी शिवराळ का असते हे कधी समजले नाही. तिथे वापरली जाणारी भाषा तशीच असते की चित्रपटांनी ते पण गँगवॉर पेक्षा कमी नाही हे दाखविण्यासाठी तशी भाषा वापरली.
२. नुकत्याच घडलेल्या Game Shop Short च्या किस्सानंतर हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अचानक वाढली.

~मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

6 May 2021 - 12:59 pm | अमर विश्वास

ह्या विषयावरचा सर्वोत्तम चित्रपट ...

कुठेही माहितीपटासारखा डॉक्युमेंटरी सारखा कंटाळवाणा होत नाही .. तरीही पुरेशी माहिती देत जातो ..

छोट्या "स्किट्स" मधून महत्वाच्या संकल्पना (concepts ) मस्त समजावून सांगितले आहेत

आंद्रे वडापाव's picture

6 May 2021 - 1:12 pm | आंद्रे वडापाव

मस्त पिक्चर आहे, आर्थिक साक्षरता सुधारावी असं ज्यांना वाटत त्यांनी जरूर हा पिक्चर पाहावा कुटुंबासहित.
भारतात आजकाल हर्षद मेहेता सारख्या बैलांना डोक्यावर उचलून घेतलं जातंय/ उद्दात्तीकर होतंय , अश्या परिस्थितीत
उघड्या डोळ्याने व मोकळ्या मानाने विषय समजून घेण्यारांसाठीच फक्त..
बाकीच्यांनी चालू द्यात ...

- कर्ज परवडणार नाही आश्या लोकांना गृह कर्ज दिली गेली आणि मग ती करजाची जोखीम बँकांनी त्याचे बॉण्ड बनवून शेअर सारखे विकून आपल्या शिरा वरून हलवून इतर जनतेत किंवा जनतेचे पैसे जे निवृत्ती फंड यांच्या शिरावर ठेवली ...
हे सर्व आधीच बाबान्धलेली घरांसाठी आणि नवीन बांढलेल्या घरांसाठी होते... इथपर्यंत ठीक..
हे क्रमाक्रमाने कळले पण एक गोष्ट मात्र निशिचत मनात प्रश्न करून राहिली आहे ती अशी

कि हा सगला पैसे काही अदृश्य झाला नाही ?
तो बाजारात फिरतच राहिला काई म्हणजे असे कि ज्यांनी तयार घरे विकली आणि ज्यांनी नानाविण घरे बनवून विकली त्यांचा धंदा झालं आणि त्यांचं कडे संपत्ती आलीच कि?
गेला कुठे पैसा. हा थोडा पैसे देशाबाहेर गेला असेल ज्यांनी यातून कमावले त्यांनी केलेल्या खर्चातून पण बहुतेक देशातच राहील असावा..
हे कोणी समजावून सांगत नाही
समजा १००० कोटी चे "लोन बुक" चे बॉण्ड मध्ये रूपांतर केले म्हणजे ते १००० कोटी आधी गृह खरेदीत घातले गेले ना? मग ज्यांनी १००० कोटी ची घरे विकली त्यांच्या कडे १००० कोटी गेलेच कि? आणि यात जेव्हा नवीन घर बांधणी झाली तेव्हा हजारोंना रोजगार मिळालाच कि ?
मग पैसे काय अदृश्य झाले का? फक्त इकडून तिकडे गेले !

रोजच्या रोज हातात रोख असणारा पैसा खरा पैसा. बाकीचं पोर्टफोलियो, बॅंक बॅलंस हा सगळा नोशनल मनी, कागदावरचं काळं पांढरं ते कधीही शून्य होऊ शकतं.

-(नोशनल श्रिमंत) सोकाजी

चौकस२१२'s picture

6 May 2021 - 2:46 pm | चौकस२१२

उदाहरण देतो ( आकडे प्रतीकात्मक आहेत)
- बँकेकडे १००० रुपये भांडवल आहे
- बँक त्याचे १० गुणिले १०० असे घर कर्ज देते आणि १० माणसे घरे विकत घेतात ,
- हे १००० रुपये या वयहारामुळे अश्या प्रकारे घर विकणारे, वकील, दलाल, सरकार, विमा इत्यादी लोकांकडे विखुरले जातात ( यात काही घरे जुनी असतील काही नवी वैगरे )
- बँक १००० चे जे लोन बुक झाले त्याचे त्यांनी मॉर्गेज बॅक्ड सिक्युरिटी करून बाजारात विकले आणि आपले भांडवल परत मिळवले
- हे एम बी एस काहि निवेशकाने कीवा विविध पेन्शन विकत घेतले
शक्यता १:
सर्व १० कर्जदात्यांनी हात वर केले आणि ताबा बॉण्ड धारकाकडे दिला ( अमेरिकेत नॉन रिकोर्स घर कर्ज असते म्हणजे नाही कर्ज फेडता आले तर फक्त घर परत देणं ,, इतर देशात ते कर्ज फेडण्यासाठी तुम्ही पुढेही जबाबदार असता .. असो तो वेगळा मुद्दा)
- बॉण्ड धारकाकडे घराची मालकी आली पण बरीच घरे वाईट अवस्थेत त्यामुळे बॉण्ड ची किंमत कमी झाली .. आणि त्याच किमतीला ती घरे विकणे शक्य नाही असे दिसले त्यामुळे एकूण १००० च्या बॉण्ड ची किंमत ९०० वर आली .. पण मुळात जे १००० विखुरले गेलं ते काही गायब झालेले नाहीत

शक्यता २:
यात शक्यता १ सारखेच पण सर्व घरे वादळात नष्ट झाली व राहिली ती फक्त जमीन म्हणजे बॉण्ड ची किंमत १००० वरून ६०० वर आली समजा .. पण परत तेच मुळात जे १००० विखुरले गेलं ते काही गायब झालेले नाहीत !

बॉण्ड धारक तोट्यात गेले हे खरे पण मूळ पैसे अदृश्य झाले नाहीत ना !

> मग ज्यांनी १००० कोटी ची घरे विकली त्यांच्या कडे १००० कोटी गेलेच कि?

१ कोटीचे घर आयुष्यभर एक कोटीचे राहत नाही. मार्केट पडले कि त्याची किंमत शून्य सुद्धा होऊ शकते. आपण १० लाखांची गाडी घेतली तर दुसऱ्या दिवशी सेकण्ड हॅन्ड म्हणून त्याची किंमत ८ लाख होते तशी.

बिग शॉर्ट चित्रपट चांगला असला तरी ह्याला दुसरी बाजू सुद्धा आहे. अमेरिकन सरकारने "प्रत्येक माणसाकडे घर पाहिजे" अश्या प्रकारची बतावणी करून बँकांना लोन द्यायला भाग पाडले. त्यामुळे ज्यांची औकात नव्हती त्यांनी मोठी मोठी महागडी घरे घेतली. इथे बँकांना रिस्क अनलाईझ करण्यास मनाई होती. हा प्रकार शेवटी कोसळणार होत ह्याची कल्पना सर्वानाच होती पण राजकीय बंधनाने कुणालाही ते बोलून दाखवणे अवघड होते.

भारतांत "प्रायोरिटी सेक्टर" लेन्डिंग प्रकार हाच आहे. सरकार जबरदस्तीने बँकांना शेतकऱ्यांना लोन द्यायला भाग पाडते आणि मग करदात्यांचा पैसा वापरून ती लोन माफ करते.

> मग पैसे काय अदृश्य झाले का? फक्त इकडून तिकडे गेले !

किंमत आणि व्हॅल्यू ह्यांत फरक आहे. तुम्ही घरांत किती पैसे घातले ह्यावर घराची किंमत ठरत नाही. इतर लोकांना ते घर किती पैश्यांत हवे आहे ह्यावर ती किंमत ठरते. चलनाची किंमत सुद्धा एकूण व्हॅल्यू देशांत किती आहे ह्यावर ठरते. व्हॅल्यू हि १००% व्यक्ती आणि काळ सापेक्ष आहे.

पैसे कुणाच्या तरी हातांत गेले तरी सुद्धा एकूण देशांतील व्हॅल्यू कमी झाली तर तर त्या पैश्यांची किंमत सुद्धा कमी होते.

चौकस२१२'s picture

7 May 2021 - 4:56 am | चौकस२१२

साहनाजी मी याचे सामाजिक राजकीय परीनाम या बद्दल बोलत नाहीये आपला अभ्यास आहे मी दिलेल्या गणितात काही चूक आहे का?मला समजले तर आवडेल

१००० कोटी बँकांकडून ज्या लोकांनि / कंपनींनीं घरे विकली किंवा निर्माण करून विकली यांचे कडे गेले म्हणजे इकोनोमि मध्येच खएकटे राहिले नाही का?
मी २दिले आहे ते हे कि समजा घरे जाळली तरी सुद्धा मूळ १००० कोटी समजत फिरताच राहिले .. मी योग्य अयोग्य या बद्दल बोलत नाहीये

हा हे मान्य कि
१) बॉण्ड धारक बुडाले, आणि दत्त स्वॅप आणि इन्शुरन्स हे डेरवटिव्ह होते त्यातील त्यातील ते इन्शुरन्स ईससुन करणारे गोत्यात आले पण तो उप मुद्दा )
२) डॉमिनो इफेक्ट मुले इतर मार्केट वॉर परिणाम
मूळ १००० कोटी गेले कुठे?

विजुभाऊ's picture

7 May 2021 - 7:36 am | विजुभाऊ

पैसा अदृष्य झाला नाही. पण मुळातच जो नव्हता तो अदृश्य झाला
म्हणजे एखाद्या गोष्टीची किम्मत जर दहा रुपये आहे. आणि दुसर्‍याने ती पंधरा रुपयाला सांगितली म्हणून वरचे पाच रुपये काही निर्माण होत नाहीत.
दुसरे म्हणजे जरी मानले की त्या वस्तुची किम्मत वाढली पण जेंव्हा ती वस्तु बाजार कोसळल्यावर मूळ किम्मत दहा रुपयांऐवजी चार रुपयांना विकली गेली.
तर तो पैसा नष्टच झाला की.
ज्याने त्याने त्या दहा रुपयाच्या वस्तुसाठी पंधरा रुपये मोजले त्याच्यासाठी तो नष्टच झाला. ज्याला दहा रुपयांच्या वस्तुसाठी पंधरा रुपये मिळाले त्याने ही मिळालेले पम्धरा रुपये अशाच एखाद्या वस्तुसाठी गुंतवलेत.
आता सांगा मार्केट पडले तर दोघांचेही पैसे अदृष्य झाले.
ज्यांना योग्य वेळी बाजारातून बाहेर पडता आले आणि योग्य गुंतवणूक करता आली त्यांनाच फायदा झाला.

चौकस२१२'s picture

7 May 2021 - 9:05 am | चौकस२१२

ज्याने त्याने त्या दहा रुपयाच्या वस्तुसाठी पंधरा रुपये मोजले त्याच्यासाठी तो नष्टच झाला. बरोबर मी त्याबद्दल कुठे काय म्हणलय
मग ते घर ४ रुपयांवर गेलं तर कागदी त्याचाच तोटा ११ बरोबर..
ज्याला दहा रुपयांच्या वस्तुसाठी पंधरा रुपये मिळाले त्याने ही मिळालेले पम्धरा रुपये अशाच एखाद्या वस्तुसाठी गुंतवलेत.
त्याने ते १५ कुठे गुंतवले असतील किंवा नसस्टील सुद्धा "अशाच एखाद्य असे आपण म्हणून शकत नाही "
आणि गादि खाली ठेवले असतील ... ( शक्यता कमी ) तर ते १५ किंवा त्यातील काही पैसे हे परत इकॉनॉमी मध्ये आले असणार . म्हणजे पैशाचे हस्तांतर झाले .. हा
आणि हे जर बरोबर असेल तर तोच तर्क मॉर्गेज बॅक्ड सिक्युरिटी ला लावला तर तिथे सुद्धा पैशाचे हस्तांतरण झाले .असे म्हणावे लागेल
ह माझा मुद्दा आहे .. माध्यमातून मात्र हे सांगितले जात कि जणू पैसे अदृश्य झाला !

कोणतीही गुणवत्ता ( व्हॅल्यू ) न वाढता वाढलेली किम्मत हा हवेतलाच पैसा होता. तो हवेत नाहीसा झाला असेच म्हणावे लागेल.
गुणवत्ता , सर्विस, मटीरीयल अ‍ॅड न होता वस्तुची वाढलेली किम्मत हा आभासी पैसा असतो.
मुळात ज्याने दहा रुपयांची वस्तु पंधरा रुपयाला घेतली त्याने वरचे पाच रुपये हे काहितरी देवूनच मिळवले होते. त्यामुळे ते पाच रुपये हे त्या कहितरीची किम्मत होते.
पैसा खरे तर ही एक भासमान वस्तू आहे. त्याचे मूल्य तुमच्या गरजेवर आणि त्या गरजेअभावी टीकून रहाण्याच्या क्षमतेवर ठरते.
( मायला मी अर्थतज्ञ आणि त्याचसोबत "बाबा" पण व्हायला लागलोय

चौकस२१२'s picture

7 May 2021 - 10:29 am | चौकस२१२

भासमान वैगरे राहूद्या हो साधे गणित सोडवा ना आणि दाखवा कि मूळ पैसे गेले कुठे?
परत उदाहरण देतो
मी माझी १० रु ची वस्तू तुम्हाला १५ ला विकली आणि ते हवेतर म्हणूयात खोटे पनाने ... २ दिवसात त्याची किंमत बाजारात फक्त २ रु आहे म्हणजे तुमचे १३ रु गेले .. बरोबर ? कीवा असे म्हणू कि त्याची किंमत ० झाली आहे म्हणजे तुमचे १५ गेले बरोबर ?
माझ्या कडे जे तुम्ही १५ दिलेत ते आहेतच कि.. आणि मी ते कोणत्याही कारणासाठी जर वापरले तर ते १५ हे बाजरात फिरत आहेत मग त्याची मिठाई घेतली असले सोन घेतला असेल नाहीतर प्रवास केला असेल मी !

म्हजे पैसे हवेत गेले नाहीत
आता या १० आणि १५ च्या जागी आणि मी आणि तुम्ही ऐवजी बँक- घर विकणारा + घर आणि कर्ज घेणार + एम बीएस आणि एमबीएस घेणारा इतयादी चा क्रम त्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लावा
आणि कोण्ही सांगावे कि १५ रुपये गेले कुठे एकतर ते माझ्य गादी खाली किंवा मी ते वयवहारात ( इकॉनॉमी ) आणले

हा सिनेमा अफाट आहे, मस्ट वॅाच कॅटेगोरी!

- (बीग फॅट) सोकाजी

मदनबाण's picture

6 May 2021 - 2:48 pm | मदनबाण

एका सर्वेक्षणानुसार हा चित्रपट ९० टक्क्याच्या वर सत्य आहे असे सांगतात. (संदर्भ विकिपिडिया) या गोष्टीचा अभिमान वाटत नाही तर त्याची धडकी भरते.
अगदी, या चित्रपटातील मला वाटलेले २ महत्वाचे सीन मी The ticking time bomb... या प्रतिसादात देउन ठेवले आहेत.

नुकत्याच घडलेल्या Game Shop Short च्या किस्सानंतर हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अचानक वाढली.
हा हा हा... जेव्हा हे घडत होत [ वॉल स्ट्रीट व्हर्सेस रिटेलर्स... ]
तेव्हा वॉलस्ट्रीट बेट्सला मी अगदी जवळुन फॉलो करत होतो आणि तिथेच लिहली गेलेली एक कमेंट नेटवर व्हायरल झालेली होती[ जी आता तिथल्या मॉडरेटर्सनी उडवलेली आहे ] ट्युलिप मेनिया नंतर बहुधा गेम स्टॉप मेनिया झाला का ? असे त्यावेळी मला वाटत होते.
असो... ती व्ह्यायरल कमेंट इथे देउन ठेवतो. [ २९ जानेवारीला माझ्या एका सिग्नल ग्रुपवर मी ही पोस्ट शेअर केली होती. ]
D1
सोर्स :- "This is for you, Dad": Interview with an Anonymous GameStop Investor

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kangal Irandal... :- Subramaniapuram

मित्रहो's picture

6 May 2021 - 3:02 pm | मित्रहो

धन्यवाद अमर विश्वास, आंद्रे वडापाव आणि चौकस१२

आंद्रे वडापाव
मी स्कॅम९२ ही मालिका बघितली नाही तसेच सुचेता दलाल यांचे पुस्तक वाचले नाही. सुचेता दलाल यांचे जेवढे लिखाण वाचले किंवा ऐकले त्यावरुन पुस्तकात हर्षदचे उदात्तीकरण केले असेल असे वाटत नाही. कदाचित तो एकटाच गुन्हेगार नव्हता इतरही होते असे असू शकते. हा माझा अंदाज.

चौकस१२
माझ्या माहितीप्रमाणे लोकांनी कर्जे परत केली नाही त्यामुळे बंकांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे इतर म्हणजे अगदी पेन्शनरला सुद्धा पैसे मिळाले नाही. जशी मार्केटमझे लिक्विडीटी कमी झाली म्हणजे सहज कर्जे उपलब्ध होणे बंद झाले तशा घरांच्या किंमती सुद्धा कोसळल्या. मला वाटते साधारणतः आठ ते दहा टक्क्यांनी किंमती कोसळल्या त्यामुळे व्यवस्था उध्वस्त झाली.
आता तुमचा प्रश्न असा आहे की ज्य़ाने घरी विकली त्यांच्याकडे पैसे आले असतील. जर खरच आहे ती सारी घरे विकून कुणी मोकळा झाला असेल तर तो नशीबवान, बाकी लोभापायी चार पाच घरी असतील तर दोन मधे फायदा आणि तीन मधे नुकसान एकंदरीत नुकसान. मुळात नंतर घर राहायला नाही तर पैसे कमवायला लोक घ्यायला लागले होते.

आंद्रे वडापाव's picture

6 May 2021 - 3:47 pm | आंद्रे वडापाव

नै हो सर सुचेता दलाल यांचे पुस्तक नव्हते म्हणायचे मला.
अभिषेक बच्चन चा एक चित्रपट आलाय, त्यात उद्दात्तीकरण वाटतंय.
त्या चित्रपटाला काही शुंभ डोक्यावर घेऊन नाचतायेत , कारण का ? तर त्या पिक्चर द्वारे त्यांना एका पूर्व पंतप्रधानांवर बोल लावता येतात, व सध्याचा भक्तिमाहीमाँ चालू ठेवता येतो .. असो ..

चौकस२१२'s picture

6 May 2021 - 4:58 pm | चौकस२१२

माझे म्हणणे असे आहे कि जी मुद्दल प्रथम लोन साठी लावली ती अदृश्य झाली नाही ती १००% घर विकणाऱ्यांकडे आणि त्या व्यापारातील इतरांकडे गेली आणि ती परत चलनात या ना त्या रूपात आली ( यात घर विकणारे म्हम्हणजे धनाढ्य असे नाही .. सहज लोन मुळे विकत घेत आहेत म्हणू ज्यांनी विकली ते सर्व सामान्य लोक सुद्धा, आणि मिळालेल्या पैशातून कोणी प्रवास केला असेल, वस्तू घेतलाय असतील , इत्यादी पैसे खेळत राहिले

मी दिलेल्या उदाहरणातील गणित पहा
हा हे खरे हि बॉण्ड धारकांचे पैसे बुडाले आणि "डॉमिनो " मुले इतरांचे हि पण ते शेअर बाजारातील कोसळण्यासारखेच आहे पॅसीए अदृश्य होतात ते हस्तांतर करतात ... बघा तर्क पटतोय का ते

मित्रहो's picture

6 May 2021 - 8:32 pm | मित्रहो

तुमचा तर्क बरोबर आहे. एजंट वगैरेनी पैसे कमावले असतील. पुढेही असाच पैसा मिळणार म्हणून जर काही मोठी गुंतवणुक केली असेल तर फसले.
माझा दुसरा तर्क असा आहे की पुरवठा जास्त होता. लोक एकापेक्षा अधिक घर घेत होते ते सारेच फसले.

चौकस२१२'s picture

7 May 2021 - 4:59 am | चौकस२१२

मित्रहो
मी तेच म्हणतोय कि मूळ १००० कोटी हवेत अदृश्य नाही झाले .. कोणी या बद्दल बोलतच नाही...

विजुभाऊ's picture

7 May 2021 - 7:44 am | विजुभाऊ

ते पैसे हवेत निर्माण झाले होते हे पण लक्ष्यात घ्या ना.
जी गोष्ट १० रुपयाला उपलब्ध होती . त्यात कोणतीही व्हॅल्यू अ‍ॅड न होता त्या वस्तुची किम्मत पंधरा रुपये झाली .
हे वरचे पाच रुपये हवेतूनच आले होते ना.
हवेतले पैसे हवेत विरुन गेले.
जी घरे राहिली त्यांची किम्मत वस्तुनिहाय उरली

विजुभौ गणिताबद्दल बोलूयात,,, मूलतः असली कर्जे देण्यासाठी बॅंकेतने जे काही पैसे सुरवातीला घातले ते कुठेही गेले नाहीत , ते त्यांनी एमबीएस मध्ये रूपांतर केल्यावर ते परत मिळाले , त्यांनी फक्त आपली रिस्क दुसतिकडे ढकलली
पैसे एक हातातून दुसरी कडे गेलं ... ज्याने ज्याने घरे विकली त्या काळात त्यांच्याकडे ज्यांनी घरे विकत घेतली ( स्वस्त कर्जे घेऊन) त्यांच्याकडून गेला
मी येथे कोणताही भावनात्मक/ सामाजिक चूक बरोबर या बद्दल बोलत नाहीये ... फक्त आर्थिक गणित बद्दल
आपण तो विडोव परत बघा ...

फक्त एजंट जे काही विकले गेले त्यात घर मालक, डेव्हलपर, सरकार काढले पण मी मार्जिन बद्दल बोलतच नाहिये
-"पुढेही असाच पैसा मिळणार म्हणून जर काही मोठी गुंतवणुक केली असेल तर फसले"
हो पण परत, ज्यांनी घरे विकली त्यांचं कडे पैसा गेलाच ना? म्हणजे परत इकनॉमी मध्ये खेळता राहीला !
घरांच्या किमती कारण नसताना वाढल्या व लोक चुकीच्या किमतीला घेऊन फसले ... बरोबर .. तरी पैसे अदृश्य नाही ना झाला?

चेतन सुभाष गुगळे's picture

9 May 2021 - 10:53 pm | चेतन सुभाष गुगळे

पैसा बिल्डरला मिळाला पण बिल्डरने झटपट कर्जावर लोकांना झटपट घरे देता यावीत याकरिता हजारो घरे वेगात बांधण्याकरिता डॉन लोकांकडून भरमसाठ दराने व्याज दराने कर्ज घेतले व घर विकल्यावर ते कर्ज सव्याज फेडले म्हणजे वरचा पैसा हा त्या डॉन सावकाराला गेला.

अधिक सरळसोटपणे सांगायचे जर सामान्य बचतखोर लोकांनी बँकेत कमी व्याजदराच्या आशेने ठेवलेला पैसा, बँकांनी सामान्य उधळ्या (त्यात फार थोडे गरजू देखील असू शकतात) लोकांना थोड्या अधिक व्याजाने दिला. त्यांनी तो बिल्डरच्या हवाली करुन फुगविलेल्या किमतीत घरे विकत घेतली. बिल्डरने ह्याच पैशातून कमाविलेला प्रचंड नफा पठाणी व्याज दराच्या रुपाने डॉन लोकांच्या हवाली केला.

डॉन लोकांकडे पैसा कुठून आला हे विचारु नका. गणेशोत्सव, दहीहंडी, खंडणी, हफ्ताखोरी, अपहरण, लूटमार असे अनेक मार्ग असतात कमी पडले तर पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या, शंभर कोटींचं टार्गेट अशा अनेक वाटा आहेतच.

हजारो घरे वेगात बांधण्याकरिता डॉन लोकांकडून भरमसाठ दराने व्याज दराने कर्ज घेतले
गुगळे, हे आपण भारताबद्दल बोलताय का?
मला वाटते मूळ धडगाकार आणि मी अमेरिकेत घडलेली गोष्टींवर बोलतोय
किती हि फुगवत आला तरी या देशात बिल्डर ला ळणाऱ्या कर्जाचाच दर आणि कर्ज घेनयसाठी दोन कडे जावे लागते असे मला वाटत नाही ..
तोवर प्लॅनिन्ग चे नियोजाय चांगले असल्यामुळे अशी परिस्थिती तिथे फारशी नाहीये

चेतन सुभाष गुगळे's picture

10 May 2021 - 1:56 pm | चेतन सुभाष गुगळे

भारतातला बिल्डर डॉनची देणी देतो आणि अमेरिकेतला बिल्डर लास वेगासमध्ये उडवितो. पण दोन्ही बाबी दोन्ही देशांत होऊ शकतात. अमेरिकेत देखील बिल्डला कर्जाकरिता बँक काहीशी अडचणीचीच ठरणार. अन्यथा बँकांनी भरमसाठ गतीने ग्राहकांना कर्ज देण्याऐवजी बिल्डरला कर्ज देण्यावर भर दिला असता.

चौकस२१२'s picture

10 May 2021 - 2:02 pm | चौकस२१२

अमेरिकेतला बिल्डर लास वेगासमध्ये उडवितो
हा काय प्रतिसाद... असो बीलदार/ डेव्हलपर ला कर्ज फक्त सुरवातीच्या मॅझनीने फिनान्स साठी लागते बाकी ज्यांनी घर नांदणी केली आहे त्यांचे कर्ज मंजूर झालेलं असल्यामुळे बिल्डर ला चिंता नसते तुम्ही भारतातले नियम इतर ठिकाणी का लावतयय !
हा त्या सगळ्या घोटाळ्यात बिल्डर / डेव्हलपर लोकांनी पण आपलं फायदा करून घेतला असणार पण त्यासाठी त्यांनी घरे हि बांधली ... उगाचच त्यांच्यावर आगपाखड कशाला

चेतन सुभाष गुगळे's picture

10 May 2021 - 5:33 pm | चेतन सुभाष गुगळे

तुमच्या प्रश्नात पैसा हवेत कुठे विरला हा मुद्दा होता मी शक्यता मांडल्यात. तुमच्या मते काही वेगळ्या शक्यता असतील त्या मांडा.

बर , पण माझा प्रश्न हा नव्हतं कि ज्यांनी हा पैस ज्यांनी मिळवाल तो त्यांनी कुठे घातले ? आणि तुम्ही म्हणता तसा लास वेगास मध्ये गेलआ असेल तरीही तो परत इकॉनॉमी मध्ये फिरत राहिला... माझा मुद्दा फक्त हा होता कि तो वयहारात फिरत राहीला अदृश्य झाला नाही एकूण चित्र बघितलं तर

चेतन सुभाष गुगळे's picture

11 May 2021 - 4:50 pm | चेतन सुभाष गुगळे

अस्तित्त्वात असलेली कोणतीच गोष्ट अदृश्य होत नाही फक्त हस्तांतरित अथवा रुपांतरीत होते. अनेकांचा जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तोटा होतो तेव्हा काहींचा बराच मोठा फायदा होतो.

मित्रहो's picture

6 May 2021 - 3:36 pm | मित्रहो

धन्यवाद मदणबाण आणि सोत्री
Game Shop Short हे भयंकर प्रकरण होत. अगदी चार डॉलर काय दोन डॉलर किंमतीला सुद्धा त्यांनी शॉर्ट लावले होते. तेंव्हा Hedge Fund Manager ला जो झटका बसला तो योग्य होता. Hedging हे गरजेचे आहे. त्यामुळे रिस्क घेण्याची क्षमता वाढते. या Hedging लाच पैसे कमावायचे साधन बनविले तर मात्र ते चुकीचे आहे. या लोकांना एक वाटत की ते खूप हुषार आहेत. मुळात त्यांच्याकडे खेळायला भरपूर पैसे आहेत ते त्यांना सहज मिळतात म्हणून ते महान आहे. वरील चित्रपटात नसनारे परंतु Steve Eisman चे एक प्रसिद्ध वाक्य आहे They mistook their leverage as genius. जे दोन फंड बंद झाले ते योग्यच होते.

ह्या लेखमुळे काल रात्री जागून परत बघितला सिनेमा, तितकीच मजा परत आली!

- (बींज वॉचर) सोकाजी

तुषार काळभोर's picture

7 May 2021 - 1:38 pm | तुषार काळभोर

ह्या लेखमुळे काल रात्री जागून परत बघितला सिनेमा, तितकीच मजा परत आली!

- (बींज वॉचर) पैलवान

मित्रहो's picture

7 May 2021 - 5:18 pm | मित्रहो

धन्यवाद सोत्रि आणि पैलवान
मार्जिन कॉल हा चित्रपट सुद्धा बघा म्हणजे तुलनेत यातील वास्तविकता नाट्यमयतेपेक्षा चांगली वाटते. प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो.

टवाळ कार्टा's picture

7 May 2021 - 6:33 pm | टवाळ कार्टा

आयडी बदलायचा राहिला =))

तुषार काळभोर's picture

7 May 2021 - 7:15 pm | तुषार काळभोर

आयडी बदललेलाच आहे :)
बऱ्याच जणांना माहिती पण आहे.

गॉडजिला's picture

7 May 2021 - 6:35 pm | गॉडजिला

ह्या लेखमुळे आज सकाळी मुद्दामुन बघितला हा सिनेमा, तितकीच मजा परत आली..!

असं वाटलं काहीतरी वेगळं थ्रिलिंग घडलं म्हणून फार खुष झालो तितक्यात चित्रपटातील ब्रॅड पिटचा डॉयलॉग आठवला नाचताय काय वेड्यांनो ? जर का आपण खरे असु तर लाखो लोक बेघर होतील, नोकर्‍या गमावुन बसतील. आपण यातुन पैसा कमावणार आहोत यात आनंद कसला ?

प्रचेतस's picture

6 May 2021 - 3:42 pm | प्रचेतस

उत्तम परिचय

टवाळ कार्टा's picture

6 May 2021 - 4:06 pm | टवाळ कार्टा

भारी पिच्चर आहे हा

धन्यवाद

काहीच कळला नाही.

मग दुसर्‍यांदा अभ्यास मोड मधे सवकाश बघितला अन उकल झाली की नेमकं काय चालु आहे... चित्रपट कहर वगैरे आजिबात नाही तर त्यातील वास्तव कल्पनातीत आहे.

चित्रपटात कुठलीही प्रतीके, उगाच दिसनारा विरोधाभास, पात्रांच्या काही लकबी किंवा वैशिष्टे, पात्रांच्या तोंडून आलेले तत्वज्ञान (बऱ्याचदा ही मते लेखकाची असतात आणि तो पात्रांच्या तोंडी देत असतो) असल काहीही आढळत नाही.

मार्गो रॉबी बाथटबमधुन फायनान्स एक्सप्लेन करेल हे माझ्या कधी स्वप्नातही आहे न्हवते :)

टिनटिन's picture

6 May 2021 - 7:42 pm | टिनटिन

Margin Call नावाचा अजुन एक चित्रपट आहे. Lehmann Brothers च्या अखेरच्या दिवसात काय झाले असेल याचे नाट्यमय चित्रण आहे. बहुदा Netflix वर आहे

काही पुस्तके (Hostile Takeover Theme)
Barbarians at the Gate: The Fall of RJR Nabisco- RJR हि अमेरिकेमधील सिगारेट कम्पनीआणि Nabisco हि बिस्किट कम्पनी यान्चे एकत्रीकरणामागची कहाणी आहे. यावर पिक्चर पण आहे

Cold Steel : Arcelor ही फ्रेन्च स्टील कम्पनी आणि मित्तल स्टील ही ब्रिटीश / भारतीय कम्पनी यान्च्या Merger ची पडद्यामागची कहाणी. यावर एक उत्तम चित्रपट होउ शकतो.

मित्रहो's picture

6 May 2021 - 8:28 pm | मित्रहो

प्रचेतस, टवाळ कार्टा, मुविजी, गॉडजिला, टिनटिन प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@गॉडजिला
सुरवातीला तिचे अचानक येऊन MBS समजावून सांगणे कळले नाही नंतर लक्षात आले की या चित्रपटाने ती पद्धत बऱ्याचदा वापरली आहे.

@टिनटिन
हो मार्जिन कॉलचा विषय तोच आहे मी वर लेखात म्हटल्याप्रमाणे तो सिनेमा मला सिनेमा बनविल्यासारखा वाटला तर हा सिनेमा वास्तव जसेच्या तसे खऱ्या घटनां मधे बदल न करता दाखविणारा वाटला. माझ्या माहितीप्रमाणे मार्जिन कॉल Goldman Sachs वर आधारीत होता. कुठेतरी वाचले होते. ते पहिले होते ज्यांनी सारे अॅसेटस मिळेल त्या किंमतीला विकले. Lehman Brothers विकत पर्यंत बाजारात माहिती पसरली होती आणि कंपनी कोसळली.

आंद्रे वडापाव's picture

6 May 2021 - 8:43 pm | आंद्रे वडापाव

मेहमूदचा एक जुना चित्रपट आहे, मैं सदर हू .. बहुतेक.
काय होतं , मेहमूद साधा भोळा माणूस.
चित्रपटात रस्त्याने जाताना त्याला दहा पैसे सापडतात .. खुश होतो , उचलून खिश्यात ठेवतो ..
४ पावलं पुढं गेल्यावर अजून १० पैसे रस्त्यावर दिसतात ... अजून खुश होतो , उचलून खिश्यात ठेवतो ..
आणखी ८ पावलं पुढं गेल्यावर जून १० पैसे रस्त्यावर दिसतात ... अजून खुप्प खुश होतो , उचलून खिश्यात ठेवतो ..

त्याकाळी ३० पैशात हॉटेलात राईस प्लेट मिळत असते.
हॉटेलात जातो ऑर्डर देतो .. जेवण करतो , पैसे द्यायच्या वेळी लक्षात येत .. खिसा फटका आहे. आणि पहिल्यांदा जे १० पैसे सापडले होते, तेच नाणं खिशातून गळून , पुढच्या दोन वेळेला त्याला परत भेटले..

एकूण नाणें १ च पण त्याला वाटलेले की ३ नाणी आहेत त्याच्या कडे ..

{तात्पर्य: एकूण अर्थव्यस्थेत तेव्हडाच पैसा होता, लोकांनीं गैरव्यवहार करून अनेकपटींनी तो भासवला ... }

उगाच कोणीही श्रीमंत झाल नाही हा ... कैच्याकै

हाच मेहमूद चां सिन धडाकेबाज ह्या मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे साकारतो.
पण ह्या गोष्टीपेक्षा एक अजून भारी गोष्ट आहे.
एक बाप आपल्या चारही मुलांना १०० रुपये प्रत्येकी देतो आणि त्यातून धंदा करा आणि कमवा असे सांगतो. चारजण निघतात. एकजण १०० चे शेंगदाणे घेऊन विकायला बसतो. बाकी तिघे अनुक्रमे बोरे, भेळ आणि मक्याची कणसे घेऊन त्याच एरियात विकायला बसतात. दुपारपर्यंत चौघांचा गल्ला रिकामा असतो. अखेरीस एक जण गिऱ्हाईक बोरे वाल्याकडे येऊन १० रुपयाची बोरे घेऊन जातो. मग बोरेवाला तेच १० रुपये घेऊन भेलवाल्या भावाकडे जाऊन १० रपायाची भेळ घेऊन खातो. भेळवाला १० रुपयाचे शेंगदाणे घेऊन खातो. सरतेशेवटी चौघात मिळून १० रुपये आणि भरल्या पोटाने घरी येतात.

एकूण अर्थव्यस्थेत तेव्हडाच पैसा होता,

तुषार काळभोर's picture

6 May 2021 - 9:31 pm | तुषार काळभोर

हा पिक्चर, स्कॅम १९९२ हे पिक्चर बघताना आपण किती क्षुद्र किडे आहोत आणि वरती किती मोठे खेळ चाललेले असतात, ते समजावून घेणं सुद्धा आवाक्याबाहेरचे आहे.
आणि हे लोक रोज हे खेळ खेळतात.

भितीदायक आहेत हे खेळ!

चौकस२१२'s picture

7 May 2021 - 6:54 am | चौकस२१२

https://www.youtube.com/watch?v=feDw649zekw
हा विडिओ जरूर पहा यात दिसेल कि झोल तर घातला गेलाच सगळ्यांकडून पण मूळ चे पैसे ( एमबीएस बँकेने घातलेले भांडवल) तसेच राहिले

यात पुढे पुढेक्लिष्ट होत जाते एमबीएस निर्माण करून आम जनतेला विकल्यानंतर नंतर त्यातीळ धोका ( कारन मूळ गृहकर्जे भिकार दर्जाची होती) कमी करण्यासाठी क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप ( एक प्रकारचा इन्शुरन्स ) नावाचे डेरीवेटीव्ह निरमान केलं गेले ...
मूळ कर्जे भिकार असल्यामुळे आणि रेटिंग एजन्सी ने खोटे प्रमाणपत्र दिल्याने सगळे कोसळले
मूळ बँकांनी जे गुंतवले होते ते भांडवल त्यानं परत मिळाले आणि ज्यांनी हे स्वॅप घेतले त्यांचा फायदा झालं... बाकी जनता बुडाली
म्हणजे काय पैसे इकडून तिकडे गेले ...

मूळ सिनेमात दाखवले आहे, कि मोठ्या संस्थांनी स्वॅप चे वाढीव मूल्यमापन मुद्दामून पुढे ढकलले, आहे त्या कमी किमतीत आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला स्वाप्स घेतले आणि त्यानंतर स्वाप्स चे योग्य ते मूल्यमापन केले. तोपर्यंत मूळ ट्रेंच मधल्या सिक्युरिटीज सुद्धा पब्लिकला शक्य तेव्हढ्या विकल्या, आणि सगळं नुकसान आम पब्लिकवर टाकलं.

चौकस२१२'s picture

7 May 2021 - 10:35 am | चौकस२१२

तोपर्यंत मूळ ट्रेंच मधल्या सिक्युरिटीज सुद्धा पब्लिकला शक्य तेव्हढ्या विकल्या, आणि सगळं नुकसान आम पब्लिकवर टाकलं.
हो ना म्हणजे पैसे इकडून तिकडे फिरलेच ना ( तोटा लोकांचा झाला हे खरे ) ... उडून नाही गेले ! इकॉनॉमी मधून , त्या स्वॅप होल्डर नि परत ते पैसे या ना कारणाने इकनॉमी मध्ये आणले मग दारू असो , गाड्या किंवा स्वत्तात मिळणारी घरे किंवा इतर काहीही .. (त्यावर्षी जर खूप स्कॉच विकली गेली असेल तर हवं तर असे म्हणता येईल कि पैसे अमेरिकेत ना राहता स्कॉटलंड ला गेले ... )

सुखी's picture

7 May 2021 - 9:23 am | सुखी

प्राईम वर सापडला

Hey I’m watching The Big Short. Check it out now on Prime Video!
https://app.primevideo.com/detail?gti=amzn1.dv.gti.84b49af0-cc89-50c5-17...

चौकटराजा's picture

7 May 2021 - 12:00 pm | चौकटराजा

माझा कॉमन सेन्स मला असे सांगतो की पैसे जे माझ्या हातात आहेत तेच पैसे खरे ! ( जगात व्यवहार होणार आहे हे यातील गृहीत आहे ) माझी इस्टेट ,गाडी कुणाला घ्यायचीच नसेल तर तिची किंमत शून्य अगदीच नाही पण ती माझ्या कामाचीही नाही व अगदी स्क्रॅप म्हणूनही ती कुणाला नको आहे अशा वेळी तिची किंमत शून्य ! मेलेल्या माणसाला प्राणवायू ची किंमत शून्य ! दुसरे असे की समजा माझे खरे पैसे ( नोटा ) माझ्याकडे आहेत व माझ्या गरजेच्या गोष्टी मला विकायच्याच नाहीत असे जगाने ठरवले तरी त्यांची किंमत फक्त सरपण म्हणून मला शेकोटी करता येईल एवढेच ! पैसे कधी अदृश्य होत नाहीत त्याच्याकडे पाहण्याची जी परिस्थिती असते त्यासंदर्भातच ते पैसे आहेत की कागद आहेत हे ठरते !

बाकी बेल आउट ,गव्हमेंट गायडेड लोन्स हे प्रकार भांडवलशाही देशातही झाले हे वाचून इझम किती तकलादू असतात याचा प्रत्यय आला ! मागे रशियाचे जनरल सेक्रेटरी ब्रेझनेव्ह असे म्हणाले होते की पुरेशी ऐहिक प्रगती झाल्यावरती आम्ही काही गोष्टीत सूट देण्यास सुरुवात करू ! " त्याची आठवण आली !

मित्रहो's picture

7 May 2021 - 5:57 pm | मित्रहो

धन्यवाद चौकटराजा
खरे आहे कोणताच देश एका इझमला धरुन चालू शकत नाही. माझे वैयक्तीक मत हे आहे की बेल आउट केले ते काही प्रमाणात योग्यच होते. परंतु बेल आउटच्या पैशातून या बँकांच्या लोकांना जे मिलियन डॉलर्समधे बोनस दिले त्याचे समर्थन होऊ शकत नाही. मी माझ्या लेखात उल्लेखलेल्या Panic या माहितीपटात Haunk Paulson याने त्याचेही समर्थन केले आहे ते न पटण्यासारखे आहे.

क्षमा करा मंडळी
प्रत्येक जण येथे "ज्याचे गेले त्याचे गेले वैगरे" हे म्हणतोय.. .किंवा वैचारिक तात्विक वैगरे गोष्टी
पण कुणीच मी जे "आर्थिक गणित" दाखवलेले आहे ते तपासून त्यात काहि खोट असेल आणि अतर्क्य असेल तर मुद्देसूद पने सांगत नाहीये ....
बर यात मी काही शोध लावला नाहीये .. मि कुठेही "झाले ते चांगले झाले " किंवा "व्हॅल्यू ऍड झाली" असे म्हणत नाहीये
फक्त कारण आणि परिणाम यांचे नाते मांडले (cause and effect )
ह...म... जाऊदे कंटाळलो

चेतन सुभाष गुगळे's picture

9 May 2021 - 11:03 pm | चेतन सुभाष गुगळे

मी उत्तर दिले आहे.

मित्रहो's picture

7 May 2021 - 5:46 pm | मित्रहो

धन्यवाद विजुभाऊ, साहना, सुखी, कॉमी, सुरिया.
चौकस२१२
तुम्ही विचारलेल्या चौकस प्रश्नांमुळे इथे बरीच चर्चा झाली. त्यामुळे माझ्यासारख्या माठाला बरेच काही शिकायला मिळाले. प्रत्येकाचा दृष्टोकोण वेगळा असू शकतो. मी वर म्हटल्याप्रमाणे १००० कोटी ज्या घरांसाठी दिले होते ते या ना त्या प्रकारे सिस्टममधे राहिले. प्रश्न दोन होते. १. गरज नसतानाही १००० कोटींच्या घरांची गरज उभी केली गेली. तशी घरे मुबलक प्रमाणात कर्ज देउन विकली. माझ्या मते तरीही ही छोटी समस्या होती. २. या १००० कोटीच्या व्यवहारावर जो १०००० कोटींचा व्यवहार उभा केला ती खर तर फार मोठी समस्या होती. इथली १ टक्क्याची हालचाल वर दहा ते वीस टक्क्यांनी हलवू शकत होती. या चित्रपटात तसा एक प्रसंग आहे. तसेही घरांच्या किंमती फक्त आठ टक्क्यांनी पडल्या होत्या. तितकेच संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळण्यासाठी पुरेसे होते. या संपूर्ण सीडीओच्या व्यवहारात सरकारला चांगले कर उत्पन्न मिळाले.

या विषयावरील हा मस्त मजेदार युट्युब विडियो सुद्धा एकदा बघावा.
https://www.youtube.com/watch?v=mzJmTCYmo9g

कुमार१'s picture

8 May 2021 - 10:55 am | कुमार१

उत्तम परिचय.

चौकस२१२'s picture

8 May 2021 - 3:01 pm | चौकस२१२

विडिओ बद्दल धन्यवाद ... तरल ब्रिटिश विनोदी बुद्धीचे अजून एक मस्त उदाहरण ....
"१००० कोटी ज्या घरांसाठी दिले होते ते या ना त्या प्रकारे सिस्टममधे राहिले"
हे आणि एवढेच मला निदर्शनास आणून द्यायचे होते .. बाकी जे घडले ते , अधाशीपना, धोका हे होते हे मान्यच ...इंग्रजीत त्यास "स्क्लडगरी " असे हि म्हणतात
यातील अजून एक सूक्ष्म गोष्ट म्हणजे मूळ कल्पन कि जी अशी होती कि ३० वर्षे बँकेचे पैसे अडकून राहाण्यापेक्षा " त्याचे मॉर्गेज बॅक सिक्युरिटी मध्ये रूपांतर करणे व ते कंपनी सारखे आम जनतेला विकणे " हे तसे फार वाईट नवहते ... एक प्रकारचं रीएल इस्टेट ट्रस्ट फंड कारण्यासारखेचक म्हणूयात ....
परंतु पुढे भूक वाढली कारण पहिले १००० कोटी लगेच च परत मिळाले मग पुढे काय.. परत तेच करणे भाग म्हणून मग आणि धोकेबाजी सुरु झाली ... एम बीस एस सुमार दर्जाची , निन्जा लोन वैग्रे .... आणि म्हणून हे सर्व कोसळले

आंद्रे वडापाव's picture

8 May 2021 - 3:35 pm | आंद्रे वडापाव

चला आता या विषयावर एव्हडी चर्चा झाली, तर
म्युचल फंड विषयी बोलुया,
आपले पैसे अश्या फंड ने कुठे गुंतवले , कोणत्या अँसेट मधे गुंतवत आहे हे नेहमी तपासून पाहिले पाहिजे....

अभिजीत अवलिया's picture

11 May 2021 - 7:51 am | अभिजीत अवलिया

छान परिचय. चित्रपट पाहिला जाईल.