आज काय घडले ... फाल्गुन शु. १२ दांडी-यात्रेचा प्रारंभ! शके १८५१ च्या फाल्गुन शु. १२ रोजी महात्मा गांधींच्या प्रसिद्ध दांडीयात्रेला प्रारंभ झाला.

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
9 Apr 2021 - 11:16 am

gandhi

भारताच्या विस्तृत किनाऱ्यावर अपरंपार मीठ तयार होत असूनहि या रोज लागणाऱ्या वस्तूवर सरकारला कर द्यावा लागत असे. त्याविरुद्ध गाधींजींनी लढा पुकारला. सरकार दाद देत नाहीसे पाहून सत्याग्रह करण्याचे त्यांनी ठरविले.
गुजराथमधील दांडी हे क्षेत्र निवडण्यात आले. फाल्गुन शु. १२ रोजी सकाळी साडेसहा वाजतां या अभूतपूर्व यात्रेस प्रारंभ झाला. त्यांच्या कपाळावर कुंकुमतिलक शोभत होता. हातांत आधारासाठी एक काठी होती. अंगावर दोनच खादीची वस्त्रे आणि कमरेला घड्याळ ! तरिही एक वेगळे तेज गांधीजींच्या मुखावर खेळत होते.” सुवासिनींनी पंचारती घेऊन ओवाळल्यानंतर यात्रेतील पहिले पाऊल पडले. या तुकडींत एकूण बहात्तर सत्याग्रही वीर होते. वाटेने प्रत्येक खेडेगांवांत या महात्म्याचे अपूर्व स्वागत झाले. सुरत, नडियाद, आदि शहरांत हजारों रुपयांच्या राशी गांधीजींच्या पायावर अर्पण करण्यांत आल्या. मला पैसा नको. खादी, दारूबंदी व ऐक्य या कार्यावर.शक्ति खर्च करा" असा उपदेश ते देत असत.

“मलयगिरीवरील शीतल, सुगंधी व संजीवक अशा वाऱ्याप्रमाणे गांधीजी आपल्या सेनेसह या गांवाहून, त्या गांवास चालले. खेडेगांवांतील गरीब व अडाणी पण साध्याभोळ्या व प्रेमळ शेतकऱ्यांनी त्यांच्या रस्त्यावर पाणी शिंपून व लतापल्लवांची तोरणे उभारून व कोठे कोठे वाजंत्री वाजवून त्यांचे उत्साहाने स्वागत केले." सत्यासाठी, न्यायासाठी गांधींचा हा लढा होता. “राज्यकर्त्यांचा नाश करणे हा आमचा हेतु नव्हे, पण राज्यपद्धतीचा मात्र उच्छेद झाला पाहिजे.” " आतां मला स्पष्ट असे वाटते की, इंग्रजी राज्याचा नाश करण्याप्ताठी माझा जन्म झाला आहे...मला घाण्यांत पिळून काढले तरी मी या राज्याचा नाश करावा असेच सांगत राहीन.” असा त्यांचा संदेश होता.
-१२ मार्च १९३०

इतिहासलेख

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

9 Apr 2021 - 12:15 pm | उपयोजक

परत सुरु झालं हे!! :(

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 1:07 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण !