अंतर्नाद — अनन्त्_यात्री, Sat, 03/27/2021 - 19:55 अमूर्ताचा अंतर्नाद अक्षरांच्या कपारीत शब्दाशब्दाच्या घळीत ओळीओळीत गुंजला अमूर्ताचा पायरव हलकेच जाणवता अनाहत तरंगांनी डोहडोह डहुळला अमूर्ताचा पोत कसा अमूर्ताचा पैस किती अमूर्ताचा डंख कुठे विचारत विचारत अणुरेणू झंकारला प्रतिक्रिया द्या 1462 वाचन 💬 प्रतिसाद (1) वाह! रंगीला रतन Tue, 04/27/2021 - 15:41 नवीन वाह!
वाह!