Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 21/02/2021 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भचौकटी मोडून पडल्या तेव्हा मी अधांतराचा धरला अलगद हात मग रिक्तपणाने भरलो काठोकाठ अन् ओसंडून सांडलो आतल्या आत धगधगून निखारे विझून गेले तेव्हा मी हिमपातावर कसून केली मात मग पलित्यातळिच्या अंधारात बुडालो अन् लखलख तेजाळलो आतल्या आत भ्रमनिरास बनले जगणे सगळे तेव्हा मी सुखस्वप्नांचा सहज सोडला हात जरी भोवतालच्या कोलाहली विस्कटलो उलगडलो अवघा पुन्हा आतल्या आत
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4303
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आपणाच आपल्याला उलगडतोय ही भावना खूपच मजेदार असते. भारी लिहिली आहे आवडली पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

उलगडली ही कविता म्हणताहात, मग विचार कसला.. उचला अपुला टाक विडंबनाचे यात्री आपण आहात पाडून टाका एक इथे त्यातल्या त्यात! (मूळ कविता आवडली आहेच हो कविराज)