"श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव" पोथी परिचय-
संत महंतांच्या जीवनावर आधारित काव्यातून किंवा गद्यातून केलेले लेखन पोथी लेखन म्हणून मानले जाते. अद्भूत रम्यता, पारलौकिक अनुभव, चरित्र नायकांचे अचाट किंवा अवास्तव वर्णन त्यांच्या भक्तगणांना मान्य असते. ते श्रद्धा भावनेने पोथी लिखाण वाचतात, पारायणे करतात. त्यांनाही अदभूत अनुभव येतात. ते खाजगीत सांगितले वा बोलले जातात. पण मुद्दाम ते सार्वजनिक करून सांगण्याचे साहस करायच्या भानगडीत पडत नाही... असो.
एक पोथी माझ्या वाचनात आली. यावर प्रकाश टाकावासा वाटला म्हणून सादर...
"श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव" पोथी परिचय-
विठ्ठल बाबा यांना प्रवचनातुन श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रातील अनेक घटनांची अनुभूती येत असे. त्या दिव्यानुभूतीच्या प्रभावातून बाहेर आल्यावर ते त्या तेलुगू मधून उपस्थितांना रसाळपणे वर्णन करत. जयाभारती ते शब्द पटापट लिहून घेत. ते कथन नंतर लीला वैभव पोथीतून प्रकाशित सन २००५ मधे झाले. मराठीत ते सन २०१४ मधे वाचकांच्या हाती आले.
श्री स्वामी विठ्ठलानंद सरस्वती महाराज पूर्वाश्रमीचे विठ्ठलबाबा साई आणि दत्त संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांचाकडून दीक्षित माता निरंजनानंद सरस्वती (पूर्वाश्रमीच्या पोस्टमास्तर जयाभारती) सन १९८९ पासून संपर्कात आल्या. कृष्णा नदीच्या पात्रातील कुरवपुरबेट क्षेत्राच्या पंचदेव पहाडाच्या बाजूच्या किनार्यावर सध्या श्रीक्षेत्र वल्लभापूर या आश्रम संस्थानाची स्थापना झाली. जुलै २०१४ मधे स्वामी विठ्ठलबाबांचे निजगमन झाले.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्र अमृता पोथी सन २००१ च्या सुमारास प्रकाशात आली. तिचे अनेक भाषांमध्ये सुरस अनुवाद निर्माण झाले. मराठीत हभप हरिभाऊ निटुरकर प्रत निघाल्यानंतर गोपाळ बाबांच्या ट्रस्टच्या वतीने ते माफक किंमतीत उपलब्ध आहे. त्या पोथीमधे श्रींच्या पीठिकापुरातील वास्तव्याचे कथन प्रामुख्याने येते. तर २४ अध्यायाच्या लीला वैभव पोथीतून अध्याय १२ पर्यंत पीठिकापुर गमन, बद्रिकावन, गोकर्ण महाबळेश्वर, श्री शैल्य येथे वास्तव्य करून कुरवपुरातील स्थायिक झाल्या नंतर घटनांचे, नंतर साधारणपणे अध्याय २२ वीस पर्यंत तेथे संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विशेषत्वाने कथन येते. अध्याय २३ मधे श्रींचे निजगमन आणि अध्याय २४ वल्लभेशाला वाचवायला ते पुन्हा प्रगट झाले याचे सुरस वर्णन येते. त्यानंतर अनुबंध प्रकरणात आत्ता पर्यंतच्या प्रखर शिष्यगणांचा संक्षिप्त आढावा आहे. दत्तपीठ वल्लभापूर क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचा परिचय करून दिला आहे.
श्री विठ्ठलबाबांच्या प्रवचनातील वेचक विचारधन ज्ञानसागरातील मोती सादर केले आहे.


वर्गीकरण
प्रतिक्रिया
पुस्तक परिचय
पोथ्या, पुराणे वगैरे ...
लीला वैभव पोथी म्हणजे जे काही अगम्य घटना, अनुभव
सुरस कथा....
श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या नायकत्वातून
योगक्षेम वहाम्यहम्
"निरंतर स्मरण करणाऱ्यांचा योगक्षेम मी पाहतो".
कणाद महर्षींचा कण सिद्धांत श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत
असं जर आहे तर,
लढाऊ वृत्ती
हा एक भाग झाला ....
षंढ वृत्ती हिंदू धर्मात वाढत आहे ..
अहो साधी गोष्ट आहे ....
बराच पळाला हा धागा...
उपक्रम उत्कृष्ट आहे