भाजप शिवाय, इतर पक्षांकडे, राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत का?

Primary tabs

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
27 Jan 2021 - 4:15 pm
गाभा: 

आजच्या घडीला तरी, राष्ट्रीय पातळीवर, भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.

राष्ट्रीय पातळीवर, भाजपमध्ये घराणेशाही नाही. हा एक महत्वाचा भाग आहे.

आज, भाजपची चौथी फळी पण तयार होत आहे. त्यामुळे, मोदींच्या नंतर कोण? हा प्रश्र्न, भाजपच्या पुढे नाही.

अमित शहा, योगी, तेजस्वी सुर्या, इथपर्यंत पंतप्रधान पदासाठी, भाजपचे उमेदवार तयार आहेत.

लोकसभेतील, ह्या वरील व्यक्तींची भाषणे ऐकलीत तर, प्रचिती नक्कीच येईल.

माझ्या मते, इतर पक्षांकडे इतके सक्षम उमेदवार नाहीत.

तुमच्या मते, पुढील निवडणूकीत, इतर पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी, मोदींच्या इतका सक्षम नेता आहे का?

प्रतिक्रिया

राजकारण ह्या विषयावरील इतके ओपन एंडेड धागे प्रचंड प्रमाणात वाढत जातात आणि त्यातून काहीही तत्वबोध होत नाही पण मला सर्वप्रथम कमेंट टाकून वादाचा श्रीगणेश करायला मिळत आहे ह्याचा पूर्ण फायदा घेते.

स्थानिक पक्षांना नवीन नेते निर्माण करणे जड जाणार नाही. बहुतेक स्थानिक पक्ष हे एक तर काही लोकांची वैयक्तिक संस्थाने आहेत नाहीतर निव्वळ संधीसाधू लोक एकत्र येऊन जमलेला ठगांचा घोळका. एखाद्या गुप्तरोगाप्रमाणे हे पक्ष कधीही नामशेष होतील असे वाटत नाही.

राष्ट्रीय स्तरावर तीनच मोठ्या शक्ती आहेत. भाजप, काँग्रेस आणि बिनडोक निर्लज्ज कॅम्युनिस्ट. ह्यातील कम्युनिस्टांचे दिवस संपले असून २० वर्षांत हि मंडळी पूर्ण पणे गायब होईल.

काँग्रेस पक्षा ची स्थिती वाईट वाटत असली तरी त्यांची समस्या वेगळी आहे. एखाद्या खोलीत कितीहि अत्तराच्या बाटल्या ठेवल्या पण मध्यभागी जर एक कुसलेले अंडे ठेवले तर लोकांचे लक्ष तिथेच जाईल आणि अत्तराचा वास कुणालाही मिळणार नाही. काँग्रेसची गत तीच आहे. काँग्रेस मध्ये सुद्धा नवीन नेते निर्माण होऊ शकतात पण जो मूर्ख नेता सध्या सुकाणू धरून आहे त्याची उचलबांडगी झाली पाहिजे. नाहीतर त्याच्या दुर्गंधीत नवीन नेते असले तरी दिसणार नाहीत.

भाजप ची स्थिती उलटी आहे. सध्या भाजप पक्ष हा दोनच लोकांचा आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी. हे दोघे ठरवतील ती पूर्व दिशा. प्रकाश जावडेकर हा ह्यांचा दरबारांतील विदूषक तर रवी शंकर प्रसाद हे चरवी ढाळणारे नोकर आहेत. संपुन कॅबिनेट मध्ये कर्तबगार अशी एक व्यक्ती सुद्धा नाही. कदाचित नितीन गडकरी हे अपवाद असतील. एका वरिष्ठ सरकारी बाबूशी बोलताना त्यांनी विनोदाने म्हटले कि दिल्लीत असे म्हटले जाते कि पियुष गोयल ह्यांच्याशी मूर्खपणात जर कोणी स्पर्धा करू शकतो तर तो म्हणजे भाजप प्रवक्ता राम माधव. राम माधव हे अमेरिकन रिपब्लिकन पार्टीच्या काही नेत्यांना राम भाऊ म्हाळगी प्रबोधिनी दाखवायला गेले. तिथे त्यांचे वर्तन इतके खराब होते कि तिथे असलेल्या अनेक भारतीयांना मान शरमेने खाली घालावी लागली. दुसरे भाजपचे वरिष्ठ नेते जे राज्यसभेंत खासदार आहेत (पण सुदैवाने मंत्री नाहीत) आणि मोठी मोठी निकृष्ट दर्जाची पुस्तके लिहितात आणि स्वतःला पत्रकार म्हणतात हे एकदा कॅलिफोर्निया मध्ये आले असता येथील भारतीय समुदायाने त्यांना डिनर साठी बोलावले तर रेस्टोरंट मध्ये हि व्यक्ती अश्या पद्धतीने दारू पिऊ लागली कि जणू काही ह्यांनी दारू पहिलीच नव्हती. काही लोक योगी ह्यांचे नाव पुढील नेते म्हणून घेतात आणि योगी कदाचित समर्थ सुद्धा असतील पण योगी ह्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी मोदी आणि शाह ह्यांनी प्रचंड प्रयत्न केले होते.

सध्या भाजपच्या शिडांत वारा आहे म्हणून आलबेल वाटते पण हा वारा जेंव्हा कमी होईल तेंव्हा मोदी आणि शहा ह्यांना सर्वांवर अंकुश ठेवणे जड जाणार आहे.

बौद्धिक दिवाळखोरी हि भाजप आणि संघ ह्यांची मोठी कमजोरी आहे. आपल्या संपुन अस्तित्वांत कुठल्याही महत्वाच्या विषयावर ह्या मंडळींनी बौद्धिक काम केलेले नाही. आपला कंपू सोडून इतरांचा पूर्वपक्ष केला नाही आणि आपल्या कंपूत सुद्धा जितं मम् म्हणून हि मंडळी खरा वाद टाळतात. आर्थिक नीती असो वर शिक्षण व्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षा किंवा धार्मिक तेढ सर्वत्र ह्यांचा कारभार ऍड हॉक पद्धतीने चालतो. सध्या ह्यांचे ३०३ खासदार आहेत म्हणे पण तरी सुद्धा व्यवहार असा आहे कि ३३ खासदार आहेत. काँग्रेस सरकारने ह्यापेक्षा अर्धे खासदार असून सुद्धा फार दूरगामी कायदे आणि घटना दुरुस्ती भाजपच्या नाकावर टिचून केल्या, भाजप मात्र प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस चीच री ओढत आहे असे वाटते.

सध्या मोदी हे सर्वांत लोकप्रिय आणि राष्ट्रीय स्तरावर जबरदस्त शक्ती आणि प्रभाव असलेले नेते आहेत. कुणीही त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही पण समाज उद्या मोदींनी निवृत्ती घेतली तर मला वाटत नाही कि भाजप समर्थ आणि एका आवाजांत दुसऱ्या नेत्याला पुढे आणू शकेल. ज्या पद्धतीने शरद पवार ह्यांनी काँग्रेस फोडली त्या पद्धतीने भाजप चे सुद्धा विभाजन होईल असे मला वाटते.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 5:27 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद

चौकस२१२'s picture

28 Jan 2021 - 6:03 am | चौकस२१२

आपली कुजलेल्या अंडयांची कल्पना आवडली... खरंच काँग्रेस च्या समर्थांककडे एवढी दिवाळखोरी आहे? काँग्रेस मध्ये उत्तम प्रशासक आणि नेते होते आणि आहेत पण गांधी नेहरू परिवारवार एवढा गाढ विश्वास ठेवून त्यांची जनता जी झोपली आहे त्याचा खेद वाटतो...
- भारताची आजची परिस्थिती पाहता भाजप आणि काँग्रेस हेच खऱ्या राष्ट्रपातळीवरील पक्ष दिसतात बाकी सगळे प्रत्येक राज्यातील संस्थानिक जणू ... राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांना नेते म्हणून लोक मानतील पण स्वतःचा सवता सुभा काढून ते बसले आणि "राज्यपातळीवर " येऊन बसले .. साधा राज्याचा मुख्यमंत्री पण होता येत नाही स्वबळावर ! असो

- मोंदीनंतर कोण हा तात्कालिक प्रश्न आहे ( खरा तर तो नही कारण शाह किंवा गडकरी हा उपाय "तयार" आहे ,, यात बहुतेक गडकरी सरस ठरतील असे वटते कारण जसे बाजपेयी आणि अडववनी तसे गडकरी आणि शहा) .. पण भाजपचा इतिहास बघितला तर भाजप एकापाठोपाठ नेते तयार करण्यात तयार आहे .. संघ जसा आहे तसेच.. संघाचे मूळ किंवा नंतर च्या संस्थपकांना घराणेशाही करता आली असती.. झाली? मुळात बहुतेक अविवाहित पण तरी पुतण्या भाच्या ला पुढे करता आले असते ( लाँच रोहित पवार किंवा युवा सेनापतींना जसे लाँच केले गेले तसे ... असो
- मला तरी २-4 गोष्टी काळजीच्या वाटत
१) भारतीय जनता व्यक्तिपूजेत वाक्बगार आहे त्यामुळे एखाद्याला राक्षसी मताधिक्य देणे आणि एकदम ते काढून घेणे हे होते ( राजीव ना मिळालेली मते आणि गेली २ निवडणुइक्त काँग्रेस ला भारलेले धुराळा ) यामुळे कदाचित भाजप एकदम १०० war येऊन बसू शकते* ...
याला कारण पक्ष तत्व्वर फार कमी चालतात ...भाजप चालते पण त्यांचे तत्व कधी कधी दुधात पाणी मिसळल्या दुधासारखे होते, कम्युनिस्ट त्यामानाने तरी एका तत्व्वर पण जगभर ती विचारसरणी लोकांना पसंद नाही , काँग्रेस चे तत्व स्वान्त्र्य मिळवणे हेच होते त्यानंतर फक्त काँग्रेसचं राज करू शकते हे समीकरण झाले मग कसला तत्व अंडी कसलं काय !
* कदाचित हि भीती अनाठायी असेल सुद्धा ... कदाचित भारतीय जनतेने कॉग्रेस च्या "मध्य डाव्या विचारसरणीला" उत्तर मधून यापुढे "मध्य उजवी " अशी भाजपची विचारसरणी अगदी नेहमीच डोकयावर नाही धरली तरी या मातीत ती आता टिकून राहणार आहे हे स्वीकारले असावे .. असे झाले तर लोकशाही च्या दृष्टीने २ समतोल पक्ष झाले तर चांगलेच आहे
२) भाजपत आयाराम गयाराम होऊन त्याचा साचा पार बदलून जाणे याची भीती ...
३) काँग्रेस ने असेच दुर्बल राहणे हे फार चांगले नाही पण घराणेशाही मात्र संपली पाहिजे
४) काँग्रेस वरील अति दवयांचा पगडा आणि भाजप वरील अति उजव्याचा पगडा कमी व्हायला पाहिजे

आपल्या संपुन अस्तित्वांत कुठल्याही महत्वाच्या विषयावर ह्या मंडळींनी बौद्धिक काम केलेले नाही.
हे विधान मात्र पटले नाही
काश्मीर . तीन तलाक सारखया गोष्टीवर बौद्धिक काम केल्यशियवाय त्या झाल्या का?
गोव्यात, केरळात आणि आत कदाचित बंगाल मध्ये पाऊलखुणा उमटवला ते बौद्धिक काम ना करता?

राघव's picture

28 Jan 2021 - 1:11 pm | राघव

प्रतिसाद आवडला.

राघव's picture

28 Jan 2021 - 1:12 pm | राघव

प्रतिसाद आवडला.

नितीन गडकरी सोडल्यास भाजपा मध्ये एकही दुरादृष्टी असणारा मंत्री नाही..
आणि मोदी, अमित शहा असे व्यक्ती केंद्रित राजकारणाचा हव्यास असणारे नेते भाजपा मध्ये असणे हीच भाजपाच्या अस्ताची सुरुवात आहे.

भाजपा ला, अटल बिहारी यांच्या सारखा राजाशिष्टाचार पाळणारा नेता पुन्हा पंतप्रधान न लाभणे हे वाईट झाले आहे.

अटलबिहारीं च्या वेळेस मी bjp ला त्यांच्या मुळे मतदान केले होते.२०१४ नंतर जे राजकारणाचे जातीय आणि अविकासाचे रूप पाहून खरेच खेद वाटतो.

आणि माझ्या पुर्ण जीवनात अजून जरी मी काँग्रेस ला कधीही मतदान केले नसले तरी, लोकसभेला मी काँग्रेस ला मतदान करणार आहे..

जसा तुम्हाला भाजपाला, मोदींना पर्याय दिसत नाही ( तुमचे मत ते काही problem नाही ) तसा मला आताचे भाजपा सरकार निव्वळ ढोंगी सरकार वाटते आहे.. फक्त पुंजीवादाला कवटाळून बसलेले निगरगट्ट, सवाकेंद्री, भुलथापा पसरवून स्वतःची इमेज तयार करणारे सरकार...

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 6:08 pm | मुक्त विहारि

तसाही, तो मिळण्याची शक्यता कमीच आहे.

पर्याय पर्याय काय लावले आहे..

१३० + करोड लोकसंख्या असणाऱ्या देशात एका माणसाला पर्याय नसणे, असे माणणेच मला कीव करण्या सारखे वाटते.
त्यात हि हा काय मसीहा लागून गेलेला नाही, कि याने खूप कल्याण केले आहे..

पर्याय सांगा.. पर्याय सांगा..

मोदी सोडून या देशाला कोणीही पंतप्रधान लाभले तरी ते मोदी यांच्या पेक्षा योग्यच असेल, मग ते भाजपाचे असो नाहीतर भाजपातर..

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 6:35 pm | मुक्त विहारि

तुमच्याकडे पर्याय नाही.

मोदी यांनी पंतप्रधान पदाची गरिमा इतकी खालची केली आहे कि मला रामदास आठवले पंतप्रधान केले तरी चालतील असे वाटत आहे..

मोदी सोडून कोणी हि म्हणालो तरी तुमच्याकडे पर्याय नाही असे तुम्ही म्हणताय.
उलट पर्याय खरे तर तुमच्याकडे नाही..

मोदी यांनी पंतप्रधान पदाची गरिमा इतकी खालची केली आहे कि मला रामदास आठवले पंतप्रधान केले तरी चालतील असे वाटत आहे..

हा विनोद आवडला.. आणखी पाठवा.. !!!!

प्रसाद_१९८२'s picture

27 Jan 2021 - 7:36 pm | प्रसाद_१९८२

मोदी यांनी पंतप्रधान पदाची गरिमा इतकी खालची केली आहे कि मला रामदास आठवले पंतप्रधान केले तरी चालतील असे वाटत आहे.

--

याची काही उदाहरणे मिळतील का ? अर्थात असल्यास.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 8:11 pm | मुक्त विहारि

इतर पक्षांकडे एकही नाही...

असता, तर, तुम्ही नक्कीच सांगीतला असता ....

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2021 - 8:47 pm | श्रीगुरुजी

रामदास आठवल्यांसारखा आचरट सर्वकालीन विदूषक सुद्धा पंतप्रधान म्हणून मोदींपेक्षा जास्त चांगला वाटत असेल याचा अर्थ मोदी अत्यंत वाईट आहेत व पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत वाईट आहे. अशा व्यक्तीला पुढील निवडणुकीत नक्कीच धडा शिकवून सत्तेवरून पायउतार करेल.

परंतु मोदींबद्दल बहुसंख्य जनतेचे मत अजूनही चांगले आहे. बहुमतासाठी जितकी मते आवश्यक असतात, त्याहून जास्त मते त्यांना मिळतात. नुकत्याच जाहीर झालेल्या मतदार सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

पुढील निवडणुकीपर्यंत मोदींनी काही गंभीर चुका केल्या आणि मोदींना सुयोग्य पर्याय निर्माण झाला तर मोदी नक्कीच पराभूत होतील.

राज२००९'s picture

27 Jan 2021 - 10:38 pm | राज२००९

>>... मोदींनी काही गंभीर चुका केल्या...

गंभीर चूकांची तुमची व्याख्या काय आहे...

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2021 - 10:45 pm | श्रीगुरुजी

मनसोक्त भ्रष्टाचार, भ्रष्ट सहकाऱ्यांना संरक्षण, देशाच्या सुरक्षेशी तडजोड, मुस्लिम किंवा तत्सम गटांचे लांगुलचालन व त्यांचे फाजील लाड, देशाच्या शत्रूंसमोर नांगी टाकणे, वरीष्ठांची मर्जी राखण्यासाठी देशहिताशी तडजोड, गुळमुळीत धोरण, निर्णयक्षमतेचा अभाव अशा चुका मी गंभीर समजतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jan 2021 - 7:47 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2021 - 6:12 pm | श्रीगुरुजी

सध्या मोदींना एकही पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे.

आपल्याला हवे असलेले निर्णय गुप्तता राखून अचानक ते उघड करणे व निर्णयांची अंमलबजावणी करणे हे त्यांचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे. निश्चलनीकरण, उरी व बालाकोट येथील अतिरेकी हल्ल्यांनंतर अत्यंत गुप्तता राखून केलेले सर्जिकल हल्ले, अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने कायदेशीर मार्गाने रद्द केलेले कलम ३७०, मुस्लिमातील तात्काळ तोंडी घटस्फोटावर बंदी आणणारा कायदा हे निर्णय त्यांचा निर्धार व योजनाबद्ध आखणीकौशल्य दृग्गोचर करतात. एखादा अपवाद वगळता ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात असे दिसून आले आहे. फार न बोलता व वाच्यता न करता ते निर्णयाच्या दिशेने वाटचाल करतात. परराष्ट्र धोरणासंदर्भात त्यांनी मागील ६-७ वर्षात घेतलेल्या मेहनतीची फळे दिसत आहेत.

कोणाच्याही दबावाखाली न येणे व गुळगुळीत आश्वासने ध देता ठाम निर्णय घेऊन ते रेटून नेणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

त्यांनी घेतलेले बहुसंख्य निर्णय दूरगामी परीणाम करणारे आहेत. त्यांचे प्रत्येक निर्णय योग्यच होते असे मी म्हणणार नाही.

निश्चलनीकरणाच्या निर्णयाची फारशी अपेक्षित फळे मिळाली नाहीत असे माझे मत आहे. २०२० मधील शाहीनबाग आंदोलन व सध्याचे पंजाबी शेतकऱ्यांचे आंदोलन त्यांनी अत्यंत सोम्यपणे हाताळले असे दिसत आहे. मागील २-३ वर्षांपासून मोदींनी फडणवीस-पाटील या दोघांना मुक्तहस्त देऊन महाराष्ट्रात घेतलेले सर्व निर्णय चुकले आहेत.

पंतप्रधान म्हणून मी त्यांना १०० पैकी किमान ८० गुण देईन. किमान २०२९ पर्यंत तेच पंतप्रधान असावे असे माझे मत आह.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 6:40 pm | मुक्त विहारि

ते शिकल्या सवरलेल्या माणसांना समजत नाही.

दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध करू शकत नाहीत. ही वस्तुस्थिति आहे.

चौकटराजा's picture

28 Jan 2021 - 10:01 am | चौकटराजा

त्या सर्वसामान्य लोकांना " सायलेंट मेजॉरिटी " असा नुकताच दिलेला एक शब्द ऐकला !

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 10:11 am | मुक्त विहारि

शब्द आवडला .

भाजपा कडे मोदींशिवाय पर्याय नाही असे मलातरी वाटतं नाही.

1) योगी आदित्यनाथ
2) अमित शाह
3) तेजस्वी सूर्या
4) नितीन गडकरी
5) देवेन्द्र फडणवीस

यापैकी कोणत्याही व्यक्तीस पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत असे मला व्यक्तिशः वाटते. तेजस्वी सूर्य अगदीच नवखे आहेत पण जबाबदारी आल्यावर आणि सिनिअर चे योग्य च्या मार्गदर्शनाखाली ते योग्य पद्धतीने हाताळतील असे वाटते.

काँग्रेस बाबत बोलायचं झालं तर पंतप्रधान किंवा त्यायोग्य पदाच्या लायक खालील व्यक्ती आहेत

1) राहुल गांधी
2) राहुल गांधी
3) राहुल गांधी
.
.
.
Infinity ) राहुल गांधी.

इतर पार्टी ( left, NCP, AAP, शिवसेना, tmc, मायावती, अखिलेश इ इ ) यांच्याबाबत न बोललेलेच बरे.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 8:15 pm | मुक्त विहारि

यशवंतराव चव्हाण, यांना पंतप्रधान पदा पासून, आपल्याच मराठी जनतेने दूर ठेवले होते.

सुर्याजी पिसाळ यांचा आदर्श ठेवणारे, महाराष्ट्रात कमी नाहीत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Jan 2021 - 10:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वर म्हंटल्याप्रमाणे '१३० कोटीत देशाची नेत्रुत्व करणारी व्यक्ती असणार नाही" हे शक्यच नाही. ३० कोटीच्या अमेरिकेत ओबामानंतर कोण? हा प्रश्न पडत नाही. ८ कोटीच्या जर्मनीत एंजेला मर्केलनंतर कोण? ह्यावर चर्चा होत नाही. मग १३० कोटीच्या भारतात अशी चर्चा का होते? मोदींचे नाव पंतप्रधानपदी आल्यावर 'त्यानी राज्य सांभाळले आहे. त्याना देश पेलवेल काय?" अशीही चर्चा झाली. असो.
राजकीय पदावरील व्यक्ती ही लोकानी लोकशाही व्यवस्थेतून निवडून दिलेली असते म्हणजे ती सक्षम असणारच हे गृहतिक आहे. अध्यक्षपदी/पंतप्रधानपदी असणारी व्यक्ती ही काही विद्वान वगैरे असलीच पाहिजे हा भ्रम गेल्या काही वर्षात अमेरिकेने/ब्रिटनने दूर केला. भारताची स्थिती त्यामानाने बरीच चांगली.

Rajesh188's picture

27 Jan 2021 - 10:53 pm | Rajesh188

तुम्ही फक्त तुमच्या इमारतीच्या अध्यक्ष बना आणि इमारतीचा कारभार उत्तम चालवून दाखवा .
बघा जमते आहे का.
समाजातील तुम्ही ज्या लोकांना विद्वान समजता त्या लोका मध्ये राजकीय नेत्या एवढी कार्य करण्याची क्षमता नाही..
डिग्री ,शिक्षण आणि राज्य कारभार चालवणे ह्याचा काडी चा संबंध नाही.
डिग्री,आणि शिक्षण ह्यांनी फक्त माणसाची लायकी ठरत असते तर कमी शिक्षण असणाऱ्या पण खूप मोठ्या उद्योगाचे मालक असणाऱ्या लोकांच्या हाताखाली खूप साऱ्या degrya घेवून नोकऱ्या करण्याची वेळ आलीच नसती.
शिक्षण आणि यश.
शिक्षण आणि धडाडी आणि कर्तृत्व.
ह्यांचा पण काडीचा पण संबंध नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Jan 2021 - 11:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

समाजातील तुम्ही ज्या लोकांना विद्वान समजता त्या लोका मध्ये राजकीय नेत्या एवढी कार्य करण्याची क्षमता नाही.

ही तुलनाच चुकीची आहे. संगणक अभियंत्यामध्ये ह्रुदयाची शस्त्रक्रिया करण्याची क्षमता नाही म्हणण्यासारखे आहे. राजकीय/सामाजिक काम करत असतानाच तुमच्यात क्षमता निर्माण होत असते. राजकीय पद म्हणजे काही क्लिष्ट गणीती प्रमेये सोडवणे नव्हे. सामाजिक्/राजकीय कार्य करण्याची ईच्छा असेल व लोकाना समजून घेणे, त्यांच्या समस्या सोड्वण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतील तर राजकीय पद सांभाळणे कठीण नाही.
आम्ही भाजपाचे समर्थक नाही पण गेल्या २०/२५ वर्षात त्यानी विशेष प्रयत्न करूनच त्यांच्या नेत्यांना तशा जबाबदार्या दिल्या आहेत.म्हणूनच मोदींनंतर कोण? शहांनंतर कोण? हे प्रश्न त्यांना पडणार नाहीत असे वाटते.

डिग्री ,शिक्षण आणि राज्य कारभार चालवणे ह्याचा काडी चा संबंध नाही.

तो तसा असावा अशी अपेक्षाही कुणी ठेवत नाही. लोकांमधून निवडून येणे हीच राज्यकारभार करण्यासाठी/सत्तासंपादनासाठी अट ठेवली आहे. सरकारी यंत्रणेत राजकीय नेत्यांना मदतीसाठी आय ए एस्/आय पी एस्/आय एफ एस हे डिग्री/शिक्षण घेतलेले लोक असताच. भारतच नाहे तर बहुतांशी लोकशाही देशांमध्ये हीच पद्धत आहे.

अनन्त अवधुत's picture

28 Jan 2021 - 4:38 am | अनन्त अवधुत

लोकांमधून निवडून येणे हीच राज्यकारभार करण्यासाठी/सत्तासंपादनासाठी अट ठेवली आहे.

असे काही नाही. आपले सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि माजी पं.प्र. मनमोहनसिंग काही लोकांमधुन निवडून आले नाहित. मनमोहनसिंग तर लोकसभा हरले होते.
अवांतर: विधानपरिषद, आणि राज्यसभेचे सभासद असलेल्या ह्या दोघांसाठी जितक्या लोकांनी मतदान केले त्याहून अधिक मतदान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी होते. असो.

Rajesh188's picture

27 Jan 2021 - 10:44 pm | Rajesh188

हे गुजरात चे मुख्यमंत्री होते ते पण यशस्वी मुख्यमंत्री नव्हते.
भारतातील बाकी राज्य पेक्षा गुजरात मध्ये वेगळे वातावरण नाही.
तिथे भ्रष्ट प्रशासीय व्यवस्था च आहे.
तिथे पण प्रचंड बोरोजगरी आहे.
तिथे पण सार्वजनिक वाहतुकीचे 12 वाजलेले असतात.
तिथे पण सरकारी योजना तळागाळापर्यंत पोचत नाहीत.
फक्त आकडेवारी ला कुत्रा पण विचारात नाही .
रिअल स्थिती काय आहे हे महत्वाचे.
त्या मानाने महाराष्ट्रात अत्यंत चांगली नेतृत्व जन्माला आली आणि त्यांनी मोदी पेक्षा खूप उत्तम राज्य कारभार केला.
मोदी ना पर्याय नाही ,bjp ल पर्याय नाही असले प्रश्न फक्त भक्तांना पडतात.
इंदिराजी चे व्यक्तिमत्त्व मोदी पेक्षा हजारो पट उत्तुंग होते पण त्यांच्या नंतर नरसिंह सारख्या. व्यक्ती नी सुद्धा उत्तम राज्य कारभार केला.
मोदी पेक्षा पण नरसिंह राव,मनमोहन सिंग हे पंतप्रानपदासाठी योग्य होते.
भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशात राष्ट्रीय पक्ष हा प्रकार च नष्ट झाला पाहिजे .
विविध पक्ष सहभागी असलेले केंद्र सरकार च उत्तम कार्य करेल.
राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून त्यांची ताकत कमी केली तर च देश प्रगती करेल आणि
सर्वांना न्याय देणारे केंद्र सरकार पण देशाला मिळेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Jan 2021 - 11:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नेहरूंनंतर कोण? हा प्रश्न तत्कालिन नेहरू-गांधी घराण्याच्या भक्तांनादेखील पडला होता रे राजेशा. "नेहरूंनंतर काय?" असे विचारल्यावर अत्रे की कुणी म्हणाले होते "नेहरूंनंतर त्यांची अंतयात्रा!" असो
आमच्या कुमार केतकरांना तर नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तीच देश उत्तम चालवू शकते असे अजूनही वाटते.
"भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशात राष्ट्रीय पक्ष हा प्रकार च नष्ट झाला पाहिजे ."
लोकांच्याच हातात आहे ते शेवटी. त्रुणमूल कॉन्ग्रेसचा बंगालमधील कारभार कसा होता ?द्रमुकचा तामिळनाडूतील कारभार कसा होता? यादवांच्या पक्षांबद्दल बोलावे तेवढे कमी आहे. दुकान चालवल्यासारखे पक्ष चालव्णे,अस्मितेचे राजकारण करत स्व्तःच्या तुंबड्या भरणे ह्यापलिकडे बहुतांशी राज्यस्तरीय प़क्षांनी फार काही केले नाही.

सुबोध खरे's picture

28 Jan 2021 - 12:38 pm | सुबोध खरे

हे गुजरात चे मुख्यमंत्री होते ते पण यशस्वी मुख्यमंत्री नव्हते.

राजेश १८८

डोक्यावर पडल्यासारखे प्रतिसाद देत आहेत.

जो माणूस सलग चार वेळेस मुख्यमंत्री म्हणून निवडून आला तो यशस्वी नाही?

तिथे भ्रष्ट प्रशासीय व्यवस्था च आहे.

आपल्याला काही अनुभव वगैरे?

बाकी कोव्हीड नंतर पुणे महापालिकेतील उंदीर मारायचा विभाग उघडलेला दिसत नाही.

Nitin Palkar's picture

29 Jan 2021 - 8:31 pm | Nitin Palkar

मार्मिक.... एवढेच म्हणू शकतो. पण.. उंदीर मारायला देखील काही पात्रता लागत असेल. मिपावर खरडण्यापेक्षा काही अधिक...

व्यक्तीकेंद्रित राजकारण किंवा व्यक्तीपुजा हा भारताला मिळालेला शाप आहे. कुठलीही पार्टी घ्या. जिथे दुसरी पिढी आली तिथे व्यक्तीकेंद्रित राजकारण झाले आहे. मग तिथे डाक्टर चा मुलगा डाक्टर या चालीवर राजकीय वारसा हस्तांतरीत होतो.

ज्याने काही काम केले त्याचे श्रेय त्याला मिळणे हे ही होत नाही. आताचे शेतकरी आन्दोलन घ्या. कृषीमंत्री तोमर यांनी ह्या आंदोलनाच्या वाटाघाटी समर्थ पणे हाताळल्या. परंतु "मोदी जी को बात करणी चहिये" हा प्रकार चालु होता. देशात कुठे खुट्ट झाले की "मोदी क्या कर रहे है" वगेरे बाता होतात. मग ते खुट्ट नगर पालिकेचे काम असले तरी ..

पियुश गोयल , गडकरी , स्वः सुशमा स्वराज व इतर लोकांनी आपापले काम व्यवस्थीत केले आहे. तरी प्रचार असा केला जातो की .. मोदी किंवा शहा हेच सर्व करत आहेत. याला विपक्ष आणी सत्ताधारी दोघेही जबाबदार आहेत.

सक्षम पर्याय सगळी कडे असतात .. फक्त ईच्छाशक्ती असावी लागते. भाजप त्यातल्यात्यात ईतरांपेक्षा थोडी उजवी आहे. कॉन्ग्रेस अजुनही त्या बाबतीत बाल्यावस्थेतच आहे.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 10:20 am | मुक्त विहारि

ज्या पक्षाला असे करणे जमते, तो पक्ष जिवंत राहतो.

राहुल गांधी, अपरिपक्व निघाले, म्हणून तर भाजपचे फावले.

व्यक्तिपूजा ही राष्ट्राला घातकच असते.... पण, व्यक्तीपूजा करणे, हे अतिशय नैसर्गिक आहे... कळपात राहणार्या सगळ्या प्राण्यांना नेता लागतोच, मग ती माकडे असोत किंवा हत्ती...

माणूस हा पण कळपात राहणारा प्राणी आहे, त्यामुळे माणसांना, नेता हवाच.... पण तो नेता लायकी प्रमाणे, निवडून द्यायचे स्वातंत्र्य देखील,लोकशाही राज्य पद्धतित, माणसाला दिले आहे....

भाजप शिवाय, इतर पक्ष, असा लोकमान्य नेता देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिति आहे.

चौकस२१२'s picture

28 Jan 2021 - 12:33 pm | चौकस२१२

व्यक्तिपूजा ही राष्ट्राला घातकच असते....
पण, व्यक्तीपूजा करणे, हे अतिशय नैसर्गिक आहे...

माझ्या म्हणण्याचा संदर्भ असा कि
- भारतीय राजकारणात जी व्यक्तिपूजा चालते ती अति टोकाची असते... त्यामानाने भारतासारख्याच द्विपक्षीय , वेस्टमिनिस्टर पद्धतीवर बेतलेल्या लोकशाही असलेल्या इतर देशात ती फारच कमी प्रमाणात दिसते.. असे का?
- येथेही आवडते नेते होऊन गेले पण म्हणून एकतर त्यन्चि जनतेने एवढ्या टोकाची व्यक्तिपूजा केली नाही आणि घराणेशाही नाही ( फर कमि )
(ऑस्ट्रेलिया आणि nueziland चे उदाहरण घेतले तर)

चौकटराजा's picture

28 Jan 2021 - 5:50 am | चौकटराजा

मोदीना भारतात एकच पर्याय आहे तो म्हणजे " शरद पवार साहेब " ! इतके गारूड कुणाकडेही नाही ! पंजाब पुन्हाअस्थिर करण्याचे पातक करू नका असा सल्ला त्यांनी आपल्या दिल्लीतल्या परम शिष्याला दिला आहे ! याचा अर्थ एकच की पंजाब अस्थिर करण्याचे पातक पूर्वीच्या कोणीतरी पी एम नेच केले होते असे पवारांना म्हणायचे आहे ! आज महाआघाडीत " त्या" अस्थिर करणाऱ्या पक्षासह पवार साहेब " सत्तेचे " वाण घेऊन उभे आहेत ! अशी जगलरी ज्यांना जमते असे ते एकमेव नेते ठरावेत ! त्यांच्या पुढे अमेरिका , उत्तर कोरिया ,चीन पाकिस्तान,, तुर्कस्तान सर्वच लोळण घालतील हे नक्की !

शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यामुळे ते पंतप्रधान होतील असे वाटत नाही..
बजाज म्हणाले तसे, देशाला न मिळालेले ते सर्वोत्तम पंतप्रधान आहेत.

ह्यातच, आपल्या विचारांची दिशा समजली ....

आता, आपल्या बरोबर संवाद साधणे अशक्य आहे.

मग श्री मोदी, वसंत दादा शुगर च्या येथे, शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत, त्यांचे बोट धरून मी राजकारण शिकलो..असे म्हणाले.

त्यावेळेस मोदी तुमची लायकी कळाली असे म्हणण्याची हिम्मत का झाली नाही?

कसे आहे, आपले ते विचार आणि दुसऱ्याचे ते अज्ञान हे बंद करा वो, प्रत्येकाचे विचार वेगळे असणारच..

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2021 - 11:37 am | श्रीगुरुजी

त्या वाक्यातील उपरोध तुम्हाला समजलेला दिसत नाही.

जेव्हा एखाद्याला आमंत्रण देऊन त्याचा आदरसत्कार केला जातो, तेव्हा यजमानाविषयी वाईट न बोलता उपचार म्हणून चार शब्द बरे बोलले जातात. त्यामुळेच मोदींनी बारामतीत यजमानांची लायकी काढली नाही.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 11:55 am | मुक्त विहारि

समजने वाले को इशारा काफी है

सर्व तुम्हालाच कळते का? आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही का?

बाकी मोदी जेथे जेथे जातात, तेथे तुम्हीच माझे गुरु तुमच्याच बोटाला धरून राजकारण शिकलो असे प्रत्येक यजमानाला फेकून येतात काय?

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2021 - 2:20 pm | श्रीगुरुजी

पवार वगळता मोदींना आजवर किती विरोधी नेत्यांनी स्वतःच्या मतदारसंघात व स्वतःच्या घरी बोलावून त्यांचा आदरसत्कार केला आहे? जे बोलावतील त्यांच्याविषयी मोदी नक्कीच असेच बोलतील.

सातत्याने चर्चेत राहण्यासाठी वरीष्ठ नेत्यांना बारामतीस बोलावून त्यांचा आदरसत्कार करणे हे पवारांचे वैशिष्ट्य आहे. त्यातून माध्यमांना जोरदार गॉसिप करता येते व पवार आपोआप चर्चेत राहतात. आलेला पाहुणा यजमान पवारांविषयी चार शब्द बरे बोलतो. पवारांनी पूर्वी चंद्रशेखर, देवेगौडा, प्रणव मुखर्जी अशांना बारामतीत बोलावून आपली पाठ थोपटून घेतली आहे. हे कवित्व त्या भेटीपुरतेच मर्यादीत असते व त्यातून कोणताही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसते.

आणि लायकी मोदींनी पवारांची नाही, समर्थकांनी मोदींची का काढली नाही असे बोललोय मी..

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2021 - 2:24 pm | श्रीगुरुजी

कशाला मोदींची लायकी काढायची? मोदी पवारांना पूर्ण ओळखून आहेत व त्यामुळे ते पवारांच्या धूर्तपणाला फसत नाहीत. २३ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २९ ऑक्टोबरला पवार दिल्लीत जाऊन मोदी व नंतर शहांना डील करण्यासाठी भेटले होते. परंतु दोघांनीही पवारांच्या मागण्या धुडकावून लावल्याने नंतर पवार सेनेबरोबर गेले.

पंतप्रधान उपरोधिक बोलत आहेत :):) हा हा पंतप्रधान म्हणून नाही मोदी म्हणून तेव्हा ते बोलत होते..ते पण खरं.

मोदींनी काहीही केले कि "हि त्यांची ५६ मितीतील बुद्धिबळांची जबरदस्त खेळी होती तुम्हा पामरांना समजणार नाही " असा आव भक्त लोक आणतात. मोदींच्या भाषणात उपरोध होता असे वाटत नाही. शरद पवार कितीही भ्रष्ट असले तरी राजकीय दृष्ट्या महत्वाचे आहेत आणि त्यांचा योग्य तो आदर ठेवण्यात शहाणपणा आहे असा विचार करून मोदींनी जाणून बुजून स्तुती केली आहे असे वाटते त्याशिवाय शरद पवार ह्यांचा अनुभव दांडगा आहे आणि काही विषयावर त्यांनी त्यांचा सल्ला घेतला सुद्धा असू शकतो.

सुबोध खरे's picture

28 Jan 2021 - 12:46 pm | सुबोध खरे

दुर्जनम प्रथमं वंदे

असा वाक्प्रचार आहे.

ashok dalvi's picture

29 Jan 2021 - 5:11 pm | ashok dalvi

बरोबर...

चौकटराजा's picture

28 Jan 2021 - 9:43 am | चौकटराजा

बजाज यांचे काय मनावर घेता एवढे ? ते पुण्यातूनही निवडून येणार नाहीत ! बजाज चा एकही कामगार वा कुटुंब त्यांना मत देणार नाही ! मग इतर मतदारांची काय कथा ?

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 9:53 am | मुक्त विहारि

असे एकांगी विचार मनांत येणारच.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2021 - 9:46 am | श्रीगुरुजी

बजाज म्हणाले तसे, देशाला न मिळालेले ते सर्वोत्तम पंतप्रधान आहेत.

हे वाचून खूप हसायला आले.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 9:56 am | मुक्त विहारि

शिकला सवरलेला माणूस, एकांगी विचार कसा काय करू शकतो?

आपलेच कुठेतरी चुकत आहे.

माध्यमांचा इतका पगडा जर, सुशिक्षित माणसांच्या मनावर होत असेल तर, आपलेच चुकत आहे...

Rajesh188's picture

28 Jan 2021 - 10:21 am | Rajesh188

तुमचा काही तरी गोंधळ होत आहे .
तुमच्या मताशी जे सहमत होत नाहीत.
किंवा तुमच्या मनात असलेल्या bjp aani मोदी च्या प्रतीमे विरूद्ध कोणी सत्य मत व्यक्त केले की.
एक त्या व्यक्ती ला अडाणी म्हणायचे किंवा
शिकला सवरला असून काही कळत नाही अशी कमेंट करायची.
ही सर्व मानसिक रोगाची लक्षणे आहेत.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 10:23 am | मुक्त विहारि

स्वतः वरून इतरांची परिक्षा करणे, हे नैसर्गिक आहे...

गणेशा's picture

28 Jan 2021 - 11:13 am | गणेशा

For your kind information, माझ्यावर माध्यम किंवा बातम्यांचा प्रभाव नाहीये, माझे ते मत आहे.. आणि मी कुठलेही it cell च्या मेसेज वर, भडकावू news वर विश्वास ठेवत नाही..

आणि एकांगी विचार तुमचा हि आहेच, फक्त तुम्हाला तो सार्वभौम वाटतो आहे...

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 11:53 am | मुक्त विहारि

दुसरा पर्याय कोणता?

प्रसाद_१९८२'s picture

28 Jan 2021 - 12:02 pm | प्रसाद_१९८२

आऊल गांधी. दुसरा कोण. :))

तुमचे कसे झाले आहे, पर्याय कुठला हा प्रश्न तुम्ही विचारता, पण पर्याय नाहीयेच हेच मनात बिंबवून ठेवलेले आहे.
मग कोणी वेगळे उत्तर दिले कि शिकले सवरलेले आणी फलाना सुरु करायचे..कोणीही इतर म्हणाले तरी नाव सांगा म्हणायचे.. किंवा विनोद फलाना बोलायचे.

आणि पुढे काय, कोण? यापेक्षाहि सद्य परिस्थिती मध्ये मोदींना पर्याय नाही असे पाहण्यापेक्षा मला वयक्तिक अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या सारख्या उत्कृष्ट माणसांनंतर असला माणुस पंतप्रधान निवडला गेला आहे त्याचेच जास्त दुःख वाटत आहे...

एक जागरूक नागरिक म्हणुन जे चूक ते चूक,
असे न म्हणता वेसण घातलेल्या बैला सारखे कोणाला तरी आपला मालक समजुन त्याने म्हणेल ती पूर्व दिशा आणि तोच सर्वात कल्याणकारी असले समजणे मला मुळीच आवडत नाही...

प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, तुम्हाला पुढे पर्याय नाही वाटत असेल, तुमच्या मनाने ते योग्य असेल,
पण मला हाच पर्याय चूक वाटत आहे, ते माझे मत आहे... आणि त्याच्यावर मला कळत नाही किंवा मीडियाचा प्रभाव असे बोलणे तुम्हाला शोभत नाही..

दुसऱ्यांच्या विचारांचा respect करा.. तर तुमच्या विचारांचा हि विचार केला जाईल..
नाही तर असे १००० धागे रंगवले तरी त्यांचा काडीचाही उपयोग नाही...

प्रसाद_१९८२'s picture

28 Jan 2021 - 12:22 pm | प्रसाद_१९८२

जातीयवादी शरद पवार हा पर्याय कसा वाटतो ?
मला तर अगदी सक्षम पर्याय वाटतो. तुमचे मत काय ?

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 12:44 pm | मुक्त विहारि

दुसरा पर्याय कोणता?

एका वाक्यात प्रश्र्न आहे...

तुमचे पर्याय सांगा ...

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2021 - 2:26 pm | श्रीगुरुजी

त्यांनी आधीच सांगितलंय की. आठवले, राहुल, गडकरी असे कोणीही त्यांना चालणार आहे.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 3:54 pm | मुक्त विहारि

आठवले होऊ शकत नाहीत, कारण, तितके खासदार, त्यांना मिळणार नाहीत.

राहुल होऊ शकतात .... बटाट्या पासून सोने, अशा अफाट कल्पना ते नक्कीच मांडू शकतात. शिवाय, थायलंड आणि इटली मधून, राष्ट्र कारभार पण हाकू शकतील.

गडकरीच कशाला, कुठलाही मराठी माणूस, कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाही.... आपलीच माणसे घात करतात ...

चांदणे संदीप's picture

30 Jan 2021 - 2:37 pm | चांदणे संदीप

बटाट्या पासून सोने, अशा अफाट कल्पना ते नक्कीच मांडू शकतात.

गटारात पाईप टाकून इन्स्टंट गॅस काढणे विसरलात बहुतेक! :)

सं - दी - प

Bhakti's picture

28 Jan 2021 - 12:01 pm | Bhakti

सहमत
_/\_
पण त्यांनी एकदा पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं

त्यांच्या पुढे अमेरिका , उत्तर कोरिया ,चीन पाकिस्तान,, तुर्कस्तान सर्वच लोळण घालतील हे नक्की !
हसून हसून गडबडा लोळायला हवे...

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2021 - 8:34 am | श्रीगुरुजी

मोदीना भारतात एकच पर्याय आहे तो म्हणजे " शरद पवार साहेब " ! इतके गारूड कुणाकडेही नाही !

हे उपरोधाने लिहिलंय असं मी गृहीत धरतोय. उपरोध नसेल तर हा मोठा विनोद आहे.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 9:52 am | मुक्त विहारि

झुकानेवाला चाहिए ....

शरद पवार, गेली 35-40 वर्षे राजकारणात आहेत. कधीच एकहाती सत्ता घेऊ शकले नाहीत.

फक्त फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत असतात.

वसंतराव नाईक ते पृथ्वीराज चव्हाण, ही यादी खूप मोठी आहे.

प्रचंड बुद्धीवान माणूस, धरसोड वृत्ती मुळे, लोकांची विश्र्वासार्हता गमावून बसतो.... ह्याचे चपखल उदाहरण म्हणजे, शरद पवार...

मोदी हे उत्तम,सक्षम राज्यकर्ते आहे असे मानले तर मग bjp ची पक्षाची यंत्रणा मोदी विरुद्ध वातावरण निर्माण करत आहेत असे म्हणावे लागेल.
कोणतेच तथ्य नसलेले सरकारी कामाविषयी समाज माध्यमावर पोस्ट करणे .
हे तर पक्ष च करत आहे ना.
नको ते दावे समाज माध्यमावर करणे जे अतिशय निर्बुद्ध असतात.
हे पण पक्षाची यंत्रणा च करत आहे.
म्हणजे bjp मधूनच मोदी ना विरोध आहे.
शक्य होईल तेवढी त्यांची प्रतिमा खराब करण्याचे काम bjp samarthak च करत आहेत.
राम मंदिर साठी वर्गणी गोळा करण्याचे अवडंबर माजवणे.
पाकिस्तान वर लष्कर नी केलेल्या कारवाई चे अतिशोक्ती युक्त वर्णन करणे.
कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या हे सत्य असून सुद्धा अर्थव्यवस्था चांगली आहे असे च चुकीचे रेटून बोलणे,
कोणत्या ही आंदोलन करणाऱ्या लोकांना पाकिस्तानी हस्तक,किंवा अतिरेकी ठरवणे.
Bjp virudh जो बोलेल त्याला देशद्रोही ठरवणे.
स्वतंत्र नंतर खडतर स्थिती असताना सुद्धा ज्या विविध राज्यकर्त्या नी देशाला योग्य वळण दिले त्यांचे चरित्र हनन करणे.
हे सर्व उद्योग bjp च्या पक्षांची यंत्रणा च करत आहे .
आणि ह्या मुळे खरेच मोदी चांगले असले तरी त्यांची प्रतिमा सामान्य लोकांच्या मनातून उतरत आहे.
पुढच्या निवडणुकीत यश मिळाले तरी मोदी नको अशी स्थिती निर्माण करण्यासाठी च पक्ष हे करत असेल अशी शंका येते.

तुमच्या मते, दुसरा पर्याय कोणता?

Rajesh188's picture

28 Jan 2021 - 10:51 am | Rajesh188

130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात खूप पर्याय आहेत.
अनेक व्यक्ती आहेत ज्या देश उत्तम चालवू शकतात .
तरुण लोकांच्या हातात देश देणे आता गरजेचे आहे.
वलय नसलेल्या पण बुद्धिवान नेत्याला पंतप्रधान पद दिले तर ते उत्तम देश चालवतील
प्रतेक पक्षात अशी हुशार, तरुण मंडळी आहेत .
आणि ती सक्षम पण आहेत.
ज्यांच्या भोवती प्रसिध्दी च वलय आहे फक्त त्यांचाच तुम्ही विचार करत आहात.
त्या मुळे देशातील सर्व खासदार,आमदार,तुम्हा ला नालायक दिसत आहेत.
आणि हे तुमचे मत साफ चुकीचे आहे.
स्वतः तुम्हाला पंतप्रधान बनवले तर तुम्ही देश चालवू शकणार नाही का.?

सुबोध खरे's picture

28 Jan 2021 - 12:43 pm | सुबोध खरे

Rajesh188

कोव्हीड नंतर पुणे महापालिकेतील उंदीर मारायचा विभाग उघडलेला दिसत नाही.

>>> स्वतः तुम्हाला पंतप्रधान बनवले तर तुम्ही देश चालवू शकणार नाही का.?

पुढच्या निवडणुकीत तुंही उभे राहा, बघूया पंतप्रधान होता येते का ते..

Rajesh188's picture

28 Jan 2021 - 10:51 am | Rajesh188

130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात खूप पर्याय आहेत.
अनेक व्यक्ती आहेत ज्या देश उत्तम चालवू शकतात .
तरुण लोकांच्या हातात देश देणे आता गरजेचे आहे.
वलय नसलेल्या पण बुद्धिवान नेत्याला पंतप्रधान पद दिले तर ते उत्तम देश चालवतील
प्रतेक पक्षात अशी हुशार, तरुण मंडळी आहेत .
आणि ती सक्षम पण आहेत.
ज्यांच्या भोवती प्रसिध्दी च वलय आहे फक्त त्यांचाच तुम्ही विचार करत आहात.
त्या मुळे देशातील सर्व खासदार,आमदार,तुम्हा ला नालायक दिसत आहेत.
आणि हे तुमचे मत साफ चुकीचे आहे.
स्वतः तुम्हाला पंतप्रधान बनवले तर तुम्ही देश चालवू शकणार नाही का.?

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 11:53 am | मुक्त विहारि

तुमच्या कडे दुसरा पर्याय नाही...

प्रसाद_१९८२'s picture

28 Jan 2021 - 12:06 pm | प्रसाद_१९८२

तरुण म्हणजे कोण, राहुल की रेहान गांधी/वाड्रा ?

प्रसाद_१९८२'s picture

28 Jan 2021 - 12:05 pm | प्रसाद_१९८२

किती ही आपटलित तरी २०२९ पर्यंत तुमच्या नशिबी मोदीच आहेत. तेंव्हा मोदींच्या नावाने आणखी खोटा प्रचार करा.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 12:16 pm | मुक्त विहारि

कारण, इतर पक्षांकडे सोडा, सामान्य माणसाला देखील, दुसरा पर्याय सापडत नाही.

अद्याप तरी कुणीही, दुसरा पर्याय दिलेला नाही.

बाकी आमच्या कडे खूप पर्याय आहेत देश उत्तम चालवतील असे .
तुम्ही मात्र मोदी कोषातून बाहेर येवू नका.

वडगावकर's picture

28 Jan 2021 - 3:39 pm | वडगावकर

एक अगदी संतुलित मत मांडायचा प्रयत्न करतोय , बघा जमतोय का 
तुम्ही ,आम्ही मोदी ना काहीही म्हणालो तरी सामान्य जनता (कुणी त्यांना मंद भक्त ,मोदी भक्त काहीही म्ह्णूद्या ) जो पर्यंत स्वयंस्फूर्ती ने आपली मते त्यांच्या झोळीत घालतील तो पर्यंत त्यांना पर्याय नाही.
(आज की ग्यान गुटी : कोणताहि समीक्षक एखादा पिक्चर हिट करू शकत नाही त्याला हिट करणारी असते ती चार चार वेळा तिकीट काढून तो पिक्चर बघणारी पिटातली पब्लिक ) 

तो राज्यकारभार अत्यंत सुमार दर्जा च आहे .
अगदी आदित्य ठाकरे,रोहित पवार, किंवा कोणी ही तरुण खासदार मोदी पेक्षा उत्तम देश चालवतील.
अगदी राहुल गांधी सुद्धा उत्तम देश चालवू शकतात .
व्यक्ती म्हणून राहुल गांधी मोदी पेक्षा खूप उत्तम आहेत.
मायावती,अखिलेश यादव, शिंदे राज घराण्याचा आताच वारस jyotitndra राजे शिंदे.
अरविंद केजरीवाल,खूप आहेत .
फक्त त्यांना त्या पदावर बसवा .
किती तरी उत्तम प्रकारे देश चालवतील ते.

राष्ट्रीय पातळी वरचा नेता पण नको आणि राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष पण केंद्रात सत्तेमध्ये.
मोदी पण राज्य पातळीवर चे च नेते होते .
अगदी ग्राम पंचायत जरी उत्तम चालवणारा नेता असेल तेरी तो पंतप्रधान पद सुद्धा उत्तम रित्या सांभाळू शकतो.
लोकांना उत्तम राज्यकारभार म्हणजे काय हे चांगले समजते.
जेव्हा सहज क्षमते नुसार बिलकुल पैसे न भरता उत्तम कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो.
जेव्हा सरकारी यंत्रणा सामान्य लोकांची काम वेगात करतात आणि 1 रुपया पण लाच घेण्याची हिम्मत करत नाहीत.
लोकांची नोकरी वर पिळवणूक होत नाही.
अशी खूप लगेच दिसून येणारे बदल झाले की राज्य कारभार उत्तम चालला आहे हे लक्षात येते.
मोदी आल्यानंतर काडी च पण फरक दिसून येत नाहीं
पहिल्या सारखाच बेशिस्त ,बेकायदा काम पूर्ण क्षमतेने चालू आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

28 Jan 2021 - 12:36 pm | प्रसाद_१९८२

मोदी आल्यानंतर काडी च पण फरक दिसून येत नाहीं
--

आता तुम्हाला टमरेल घेऊन रेल्वेट्रकवर बसायची आहे सवय.
त्याला मोदी काय करणार.

सुबोध खरे's picture

28 Jan 2021 - 12:45 pm | सुबोध खरे

अगदी ग्राम पंचायत जरी उत्तम चालवणारा नेता असेल तेरी तो पंतप्रधान पद सुद्धा उत्तम रित्या सांभाळू शकतो.

अण्णा हजारे याना पंतप्रधान करायचे का?

एकदम गल्ली ते दिल्ली

मंत्री काम करत नसेल तर अण्णा उपोषण करून त्यांची आत्मशुद्धी आणि चित्तशुद्धी करून देतील.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 12:50 pm | मुक्त विहारि

शाहीनबाग दंगल आणि शेतकरी आंदोलन, देशभरात चालू होईल....

चालेल का?

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 12:46 pm | मुक्त विहारि

तुमच्या कडे दुसरा पर्याय नाही .... असता तर,सांगीतला असता.

शा वि कु's picture

28 Jan 2021 - 1:50 pm | शा वि कु

समजा पर्याय म्हणून १८८नी एक रँडम नाव सांगितलं तर ?

उदा- रावसाहेब चिंगभूतकर हे वाश्याड गावातील एक अतिशय ज्ञानी मनुष्य आहेत. लोकांची त्यांना उत्तम पारख आहे. समाजकल्याणामध्ये वाश्याड गावातील सगळी जाणती मंडळी चिंगभूतकर साहेबांचे नाव ऐकून आहेत. चिंगभूतकर साहेब हे पंतप्रधान होऊ शकतात. ते सुद्धा अविवाहित आहेत.

ह्यावर तुमचे काय मत ?

(जोक असाईड, मोदींशीवाय कोणीही पंतप्रधान होऊ शकण्याच्या लायक नाही असे वाटत असल्यास तुमचे मत भयंकर हास्यास्पद आहे.)

रावसाहेब चिंगभूतकर हे वाश्याड गावातील एक अतिशय ज्ञानी मनुष्य आहेत.

असं त्यांचं स्वतःचं मत आहे ( आणि काही चेल्या चमच्यांचं)

त्यांना कोणी कुत्रं सुद्धा विचारत नाही.

श्री मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी याना साधारण ६० कोटी लोकांनी २०१९ मध्ये मत दिलं आहे.

६० कोटी लोकांच्या एकत्रित शहाणपणा पेक्षा आपणच शहाणे समजणारे अनेक भंपक लोक आहेत

त्यात रावसाहेब चिंगभूतकर यांच्या सारखे लोक पैशाला पासरी मिळतील

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 8:01 pm | मुक्त विहारि

सहमत आहे...

राहुल गांधी, यांच्या पेक्षा, हुषार आहेत का?

Nitin Palkar's picture

29 Jan 2021 - 9:28 pm | Nitin Palkar

भयंकर हास्यास्पद... तुमच्या दृष्टीने.

एक साधा प्रश्न आहे.. मोदींना पर्याय सांगा... आजच्या घडीला तो नक्की दिसत नाही.

अतिशय खोलात जाण्याची इच्छा नाही, तरी लोकांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये, प्रत्येक नागरिकाचा बँक खाते असावं असं या आधी कोणालाही का वाटलं नाही ...

चौकटराजा's picture

30 Jan 2021 - 10:16 am | चौकटराजा

एफ डी ची विमा सुरक्षा मर्यादा ५ लाख करणे
जेनेरिक औधधाविषयी प्रसार करणे
एल ई डी दिव्याविषयी मार्गदर्शन करणे
आयकर परतावा लवकर मिळावा म्हणून प्रयत्न
आयकर जास्तीत जास्त लोकांनी भरावा यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशन चे प्रयत्न
रस्ते निर्माणातील वाढ
पी एम ऑफिस ने सामान्य लोकांच्या प्रशासकीय विषयक तक्रारीची दखल घेतल्याच्या उदाहरणात वाढ

काही अजून ना जमलेले
सरकारी बँकांतील करबुडव्यावर कारवाई निर्णाय स्वरूपात
राजकीय लोकांसाठी त्वरित गुन्हा शाबीत होणे वा निर्दोष सुटण्याची सोय ( उदा कलमाडी ,खडसे,,भुजबळ ई केसेस ,,)
महागाईवर नियंत्रण
पेट्रोल किमती कमी करणे .

काही बाबतीत मोदी फारच मौन धारण करतात असे अलीकडे आढळून आले आहे ! त्यामुळे त्यांच्या विरोधकांना गरसमज पसरवण्यास मदत मिळते .एक उदा देतो. रोजगार निर्मिंती झाली नाही असे विरोधक म्हणतात पण पी एफ खात्यांच्या संख्येत वाढ झाली असे ते खाते म्हणते यात ही माहिती खरी की खोटी याचे निवेदन थेट मोदीकांडून येणे अपेक्शित कारण भारत देश प्रणाली केंदित नसून तो जास्त व्यक्तिकेंद्रित आहे म्हणून ! ( अलीकडेच एका " साहेबांच्या " फोनने क्रिकेट खेळाडू क्वॅरंटाइन ना होताच घरी गेले ना ? ) .

ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे, त्याला मतदान न करणे... मी तरी अशा व्यक्तीला मतदान करत नाही आणि करणार पण नाही ...

पंतप्रधानपदाच्या बाबतीत तरी, भारतात नेहमीच व्यक्तीपूजेची परंपरा राहिलेली आहे. ते चूक की बरोबर ही वेगळी बाब.

तटस्थपणे लोकांची मानसिकता बघीतली तर दिसेल की,
- लोकांना जी व्यक्ती नेता म्हणून काम करू शकेल असा विश्वास वाटतो, त्यांनाच ते मँडेट देतात. ते खरोखर किती काम करतात आणि किती प्रपोगंडा ह्याकडे सरळ दुर्लक्ष केल्या जातं.
- लोकांची सामुहिक स्मरणशक्ती फार कमी असते, त्यामुळे कोणत्याही नेत्याला आपला ब्रँड हा लोकांपुढे सतत वाजवत रहावा लागतो. राहुल गांधी हा सक्षम पर्याय आहे किंवा नाही याबद्दल बहुतांश लोकं नाहीच म्हणतात. पण पर्याय म्हटलं की राहुल गांधींचं नाव समोर तरी येतं, याला ब्रँडींग म्हणतात.
- काम करण्याचा [केले / न केले हा भाग अलाहिदा] डंका वाजवायचा की राजकीय कुरघोड्यांचा हे ज्याने-त्याने त्याचे स्वत:चे ठरवायचे असते. उद्धव ठाकर्‍यांनी वर्षभरात काय कामं केलीत याचा लेखाजोखा स्वतःहून दिला आणि त्यावर लोकांचा विश्वास बसला, तर त्यांचाही ब्रँड नीट वाजेल.

मोदीच्या बाबतीत एक आरोप नेहमी केला जातो. ते प्रपोगंडा खूप करतात, त्यामानानं काम अजिबातच करत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणे प्रपोगंडा करण्यात काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही. आणि काम जर केलेले नसेल तर, ते लोकांना पटेल अशा पद्धतीने, जनमानसात पोहोचवणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. होतंय काय की, विरोधासाठी विरोध करतांना, सगळे विरोधी पक्ष त्यांची लोकांमधली विश्वासार्हता गमावून बसलेले आहेत. अगदी ते सत्य जरी सांगत असतील तरी, लोकं साशंक नजरेनंच पाहतात. जर मोदींच्या नावानं एक अ‍ॅप तयार होऊ शकते तर ते बाकी नेत्यांच्या नावानंही होऊ शकतं की. पण लोकं बघतील किती हा प्रश्न आहे.

कामं करण्यासाठी प्रशासनावर मजबूत पकड लागते. ते मॅनेजमेंट स्कील आहे. अजित पवार, नितिन गडकरी ही काही उदाहरणं म्हणता येतील. फडणवीसांनी वकिलीची प्रॅक्टीस केली तर ती जास्त चांगली चालेल अशा पद्धतीने ते मुद्दे मांडतात, पण प्रशासनावर तेवढी त्यांची पकड वाटत नाही. उद्धव ठाकर्‍यांची अशी कोणतीच बाब अजून तरी समजली नाही.

नेत्याला आपल्या लक्ष्याला पूरक अशा नवनवीन कल्पना सुचून त्या राबवता आल्या पाहिजेत. तेच विजनरी म्हटल्या जातात. सोबतच, जे चांगलं आहे ते कोणतंही काम मान्य करून, त्यातलं उचलून दुसरीकडे वापर करण्याचं शहाणपण आणि प्रामाणिकपणाही असायला हवा.

थोडक्यात काय तर,
मला माझ्या हाताखाली काम करण्यासाठी कोणता माणूस आवडेल?
माझ्यासाठी हे तीन मापदंड आहेत - प्रामाणिक, बुडात आग असलेला आणि प्रश्न पडणारा व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारा. स्किल कमी असेल तरी चालेल, ते मी ठीक करून घेईन.
आता जर एका छोट्या कंपनीतल्या जागेवर काम करण्यासाठी ही प्राथमिकता योग्य वाटत असेल तर, पंतप्रधानपदासाठी किती मापदंड असायला हवेत?
अशा मापदंडात बसणारा आणि लोकाश्रय असणारा कोणीही उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्यातरी दुसरा कोणी असा दिसत नाही.

इतरत्र पर्याय नाहीतच असे नाही.

केजरीवाल हा मला या क्षणी सर्वोत्कृष्ट पर्याय दिसतोय.. अर्थात आज नाही, कदाचित 2029 मध्ये, चांगल्या प्रकारे स्वतःला घडवले तर.. त्याच्याकडे क्षमता आहे, वापरली पाहिजे.

राहुल गांधी पर्याय म्हणून कुठेही उभा राहत नाही, त्याला स्वतःला आपण काय बोलतो तेच बऱ्याच वेळा कळत नाही.. तो बाहेर भारताला काय रेप्रेसेंट करणार?

याशिवाय मला वाटते नवीन पटनायक हा देखील एक चांगला पर्याय बनू शकेल.

भाजपमध्ये पाहिले तर माझी पहिली पसंती अमित शहा याना असेल, पण ते होणार नाहीत. किंगमेकर स्वतः राजा होऊ शकत नाही. त्यानंतर योगी ना पसंती असेल. पण ते देखील 2027 च्या आसपास. मोदीनी 75/76 पूर्ण झाल्यावर राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे मला वाटते.. ते 25 साली 75 वर्षांचे होतील. त्यानंतर असा चेहरा असावा जो किमान 4 निवडणुका पक्षाला पुरेल..

बाकी -
भारताच्या पंतप्रधानाने निवडणुकीच्या राजकारणात स्वतःला सिद्ध केलेच पाहिजे.. ज्याला साध्या निवडणुकीचे डावपेच खेळता येत नाहीत, तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दबाव कसा सांभाळेल?

इतरत्र पर्याय नाहीतच असे नाही.

मला सध्यातरी तयार पर्याय दिसत नाही असं म्हणायचं होतं. पर्याय होऊ/ठरू शकतील असे खूप आहेत. पण त्यांना तशी संधी मिळेलच असं नाही.
मोदींना नेतृत्वात येण्याची संधी वाजपेयींनी दिली हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचं तसं होईलच असं नाही.

भारताच्या पंतप्रधानाने निवडणुकीच्या राजकारणात स्वतःला सिद्ध केलेच पाहिजे.. ज्याला साध्या निवडणुकीचे डावपेच खेळता येत नाहीत, तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दबाव कसा सांभाळेल?

ह्याच्याशी पूर्ण सहमत. काम आणि राजकारण ही दोन चाकं झाली गाडीची. एक असल्याशिवाय दुसर्‍याला महत्त्व राखता येत नाही. पण तेवढ्याच त्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टीही आहेत. फक्त एकाच दिशेने जायला हवीत नाही तर बोर्‍या वाजतो.

कामं होत आहेत असा विश्वास लोकांना असला तर राजकारणाकडे तटस्थपणं बघणं किंवा सरळ दुर्लक्ष करणं आपसूकच होतं! :-)

Rajesh188's picture

28 Jan 2021 - 2:57 pm | Rajesh188

योगी आणि ओवसि मध्ये मला तरी काहीच फरक दिसत नाहीत.
फक्त बोलबच्चन आहे मोदी सारखाच.
योगी la उत्तर प्रदेश सांभाळता येत नाही आणि त्यांच्या हातात देश द्यायला चाललेत.
जंगल राज आहे यूपी मध्ये.
रायडर चे vlogs बघितले तरी माहिती पडेल यूपी मध्ये प्रवेश केला की .
काय ते रस्ते, काय ती बेशिस्त.
जनावर रस्त्यावर फिरत असतात.
त्या पेक्षा आसाम,ओरिसा ,सारखी राज्य उत्तम आहेत.

तुम्हीच व्हा ना पंतप्रधान!!
नाही तर उद्धवरावांना करूया.
मग तर झाले?

खेडूत's picture

28 Jan 2021 - 3:10 pm | खेडूत

फिरू द्या हो सर, ती मुकी जनावरे बिचारी कुठे जातील?
अन् राजकारणात जाण्यापेक्षा रस्त्यात फिरलेली बरी. :))

रस्ता म्हणाल तर एक्स्प्रेस वेज आपल्यापेक्षा उप्र मध्ये जास्त आहेत बरं का...आणि सतत नवे बांधत आहेत. दिल्ली मेरठ, लखनौ कानपूर, ईस्टर्न पेरीफेरल, वगैरे एकदा दुरून तरी बघा.

आता पूर्वांचल, बुंदेलखंड, गोरखपूर लिंक वगैरे झाले की ते राज्य बरेच बदलेल.

प्रसाद_१९८२'s picture

28 Jan 2021 - 3:14 pm | प्रसाद_१९८२

सारखा महाज्ञानी, महाप्रतिभावान व्यक्ति या भुतलावर अस्तित्वात असताना,
तुम्हीच इतर लोकांची नावे पंतप्रधानपदासाठी सुचवणे हा तुमच्या महान प्रतिभेचा अपमान आहे.

> योगी आणि ओवसि मध्ये मला तरी काहीच फरक दिसत नाहीत.

आपणाला गुलाबजामून आणि शेण ह्यातील फरक समजतो का ?

योगी आदित्यनाथ ह्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश ने बरयापैकी कामगिरी केली आहे. अर्थांत हत्तीने उपवास केला म्हणून तो काही घोडा होत नाही त्या प्रमाणे उत्तर प्रदेश ज्याने शेकडो वर्षे इस्लाम रुपी हलहल पचवून भारताचे रक्षण केले आहे त्या उत्तर प्रदेशाचे भविष्य पालटवणे हे ३ वर्षांत होणारे काम नाही.

पण २०२० मध्ये उत्तर प्रदेश ची कामगिरी पाहू

१. गुन्हे

Incidence of serious crimes such as murder and rape fell 7.8% and 28% respectively year-on-year to 2032 and 1216. Compared to 2016, the last year of the previous Samajwadi Party government, cases fell 26% and 38.7% respectively under the two heads. Compared to 2013, crimes committed fell 27% and 26% respectively.

योगी ह्यांच्या कार्यकाळांत रिकॉर्ड गुंडांचे एन्काउंटर झाले आहे.

२. बदल्या

योगींच्या नेतृत्वांत पोलीस आणि इतर महत्वाच्या पदांच्या बदल्या जवळ जवळ बंद झाल्या आहेत.

३. स्त्री सुरक्षा

महिलांची छेडछाड हा गुन्हा उत्तर प्रदेश मध्य आता अत्यंत गांभीर्याने घेतला जात आहे. त्याच बरोबर इस्लामिक रॉड रोमिओ पासून हिंदू महिलांचे संरक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे होते आहे.

४. किन्नर समाजाला प्रतिष्ठा

५. परीक्षांतील भ्रष्टाचारावर बऱ्यापैकी आळा.

६. रस्त्यांचे बांधकाम. योगी ह्यांनी दिल्लीशी जोडणाऱ्या रस्त्याना प्राधान्य दिले आहे आणि कित्येक एक्सप्रेस वे चे काम सुरु आहे.

७. गंगा बऱ्यापैकी साफ झाली आहे.

९. इस्लामिक वसाहतवादाच्या नष्ट केलेले राम मंदिर बनविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

१०. कोव्हिडच्या दरम्यान सर्वप्रथम योगी सरकारने आपल्या कामगारांना घरी आणण्याची व्यवस्था आपुलकीने केली होती.
> रायडर चे vlogs बघितले तरी माहिती पडेल यूपी मध्ये प्रवेश केला की .

युपी आधी पासून जंगल राज होते आधीचे अय्याश नवाब, काँग्रेसचे घाणेरडे राजकारण, मूर्ख इस्लामिक जनता इत्यादींनी उत्तर प्रदेश च्या समस्या वाढल्या होत्या त्यांना बऱ्यापैकी आळा योगी ह्यांनी घातला आहे. प्रदेश मधील गुन्हे वेगाने कमी होत आहेत.

> काय ते रस्ते, काय ती बेशिस्त.जनावर रस्त्यावर फिरत असतात.

आपण अश्या कुठल्या भारतीय शहरांत राहता जिथे बेशीस्त नाही आणि जनावरे रस्त्यावर फिरत नाहीत ?

नोएडा भारतांतील सर्वांत चांगल्या शहरा पैकी एक आहे. गाझियाबाद सर्वांत वेगाने प्रगती करणारे शहर आहे. महाराष्ट्रा पेक्षा दुप्पट मुले प्रदेश IIT मध्ये पाठवतो.

पण महत्वाचा मुद्दा आहे आहे कि आपल्यासारखे विचार "जंत" राजकीय हेतूने प्रेरित होऊन जी वळवळ करतात त्यातून आपला सामान्य लोकांप्रती असलेला द्वेष दिसून येतो. योगी आवडत नसले तरी विनाकारण अख्या उत्तर प्रदेशाला शिव्या देण्याची गरज नाही. आसाम काय किंवा ओरिसा काय सर्वच भारतीय राज्ये असून मुख्यमंत्री कोण आहे ह्यावरून त्यांना शिव्या देण्याची गरज नाही.

माझ्या मते योगी आदित्यनाथ ह्यांचे सर्वांत महत्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी आपल्या सारख्या विचारजंतांची वळवळ जी आहे ती पुढे आणली आहे. भगवे वस्त्र धारण करणारा हा योगी बिनदिक्कत पणे सर्व इस्लामिक, साम्यवादी समाजवादी किड्यांच्या नाकावर टिच्चून वागत आहे तेच पाहून हृदयाचे सार्थक होते. नाहीतर ह्याच खुर्चीत बाया नाचविणारा एक माणूस बसत होता आणि दलितांच्या नावाने प्रचंड संपत्ती चोरून गोळा करणारी एक महिला बसत होती.

टीप : पुढील विलेक्शन मध्ये योगीच बिनधास्त जिंकून येणार. रायबरेली सुद्धा काँग्रेस च्या हातातून जाणार आहे आणि अखिलेश आपल्या नाकाने सोडच्या बाटल्या उघडत बसणार आहे.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 4:20 pm | मुक्त विहारि

सहमत आहे...

आता तुम्हाला, एक किताब मिळेल आणि एक सल्ला मिळेल ...

महाराष्ट्र सोडून जा, हा सल्ला मिळेल

आणि

"महाराष्ट्र द्वेषी" हा किताब मिळेल ....

योगींच्या कार्याची स्तूती केली की, हे आपसूकच मिळतात ...

गणेशा's picture

29 Jan 2021 - 8:08 am | गणेशा

हे तुम्ही का ठरवता आहात?
वयक्तिक रित्या त्यांना माहिती असेल तिथली..

मला up ची जास्त माहिती नाही.. त्यामुळे हे मुद्द्यावर मी बोलत नाही..
पण मागे हैद्राबाद मधील rape आणि police कारवाही वरती तुमची मते वाचली होती..पुन्हा आठवू शकता आपण.. बहुतेक यशोधरा यांचा धागा असेल...

मग up मधील
हाथरस बद्दल आणि सरकार, पोलिस यांच्याबद्दल काय म्हणणे आहे?
कि ते पण योग्य व्यवस्थेचे उदाहरण वाटते आहे..
पोलिस आणि सरकार च्या या वागणुकी नक्कीच काळिमा फसणाऱ्या होत्या..
हेच तेथे काँग्रेस सरकार असते तर भाजपाई लोकांनी देशात रान उठवले असते, माझे म्हणणे आहे जे चूक ते चूक..

बाकि up च काय काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतातले प्रत्येक राज्य चांगले व्हावे... जो सुधर रहा है वो accha है..

पण अर्णब च्या मेसेज मध्ये काय वावगे होते असे म्हणताना आणि त्याला पाठीमागे घालताना ही त्याला राजकीय किनार असल्याने दुर्लक्ष केले जातेय..
म्हणजे आपण आपले विचार मोदी यांच्या साठी किती एकांगी केलेत ते दिसते परंतु आपण दुसर्यांना एकांगी म्हणता..

त्यामुळे पर्याय कोणता नाही या पेक्षा हाच पर्याय चुकीचा मिळाला आहे ह्या गोष्टीला तुम्हाला मीडियाचा प्रभाव फलाना असे बोलावे लागते आहे..

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 9:21 am | मुक्त विहारि

एका साध्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकाल का?

इतर पक्षांकडे, पंतप्रधान पदासाठी, योग्य उमेदवार कोणता?

गणेशा's picture

29 Jan 2021 - 11:18 am | गणेशा

तुम्हाला एक clear सांगतो पुन्हा,
उद्या कोण योग्य होईल हि भविषवाणी करण्यात काहीच उपयोग नाही.

जसे २०१४ ला, मोदी येणार म्हणजे विकास होणारच असे वाटत होते, पण तो भ्रमनिरास ठरला..
त्यामुळे सद्य परिस्थिती मध्ये मोदी हे आधीच्या दोन्ही पंतप्रधान नेत्यांपेक्ष्या निकृष्ट आहेत...

त्यामुळे तुम्ही हाच पर्याय चुकलाय तर पुढचे काय विचारता.. हे bjp आणि त्यांच्या समर्थकांचा प्रोपोगंडा आहे, पर्याय नाही म्हणुन आम्ही कसे हि असु आम्हीच श्रेष्ठ..
या पेक्षा आम्ही विकास करतोय आम्हालाच पुन्हा निवडून द्या हे योग्य..

पर्याय नाही पर्याय नाही.. हा प्रोपोगंडा या साठी कि आम्ही काय करतोय ते विचारू नका..

आणि मोदी यांच्या लेवल ला कोणताच नेता मला सध्या दिसत नाही, इतकी खालची लेवल पंतप्रधान पदाची मी पाहिलेली नाही..

तरी मी सोडून कोणीच नाही हा अहम फडणवीस सारखा त्यांना नडू नये, आणि पुढचे पंतप्रधान तेच झाले तरी मला काहीच फरक पडणार नाही...
परंतु ते योग्य नाहीत हे माझे मत आहे..

जसे वरती, योगी आणि इतर नावे बोलली गेली, मी त्यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या नाहीत, कारण ते योग्य कि अयोग्य हे ते पंतप्रधान झाल्यावर सांगणे योग्य, कोणाचे विश्लेषण ते पंतप्रधान झाल्यावर करणे ठीक आहे, आणि मोदींचे विश्लेषण माझे फिक्स आहे,
तुमचे मत तसेच असावे असा आग्रह नाहीच...

पण इतरांची मते म्हणजे मीडियाचा अवडंबर हे चूक आहे...
तुमची मते तुमच्या पाशी..

तुम्हाला प्रश्नच विचारायचा असेल तर तो असा

आताचे पंतप्रधान तुम्हाला योग्य वाटतात काय?
आणि याचे उत्तर माझ्याकडून नाही आहे,
जे २०१४ नंतर तंतोतंत विरुद्ध आहे..

मग आत्ताचा पंत प्रधान मला योग्य वाटत नाही म्हणल्यावर त्यांच्या पेक्षा भारी कोण असे विचारल्यावर भविष्य का म्हणू सांगायचे?
इतक्या खालच्या लेवल ला तर मला कोणी हि पंत प्रधान झाले तरी ते योग्य पर्याय असतील असे वाटते.. हे मी पहिल्या पासून सांगतोय..
तरी तुम्हाला ते कळत नाही..तुम्हाला असे वाटते आहे कि कोणीच नाही.. माझे म्हणणे आहे कोणी हि...

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 11:36 am | मुक्त विहारि

असेच ना?

सुबोध खरे's picture

29 Jan 2021 - 11:56 am | सुबोध खरे

मुवि

कशाला वाद घालताय?

लग्न संस्था वाईट आहे हे बेंबीच्या देठा पासून ओरडणारे लोक त्याला सशक्त पर्याय आज तरी नाही हे निदान नाईलाजाने कबुल करतात.

पण मोदी द्वेषाची कावीळ झालेले लोक तसे मान्य करण्याचा किमान प्रामाणिक पणा सुद्धा दाखवू शकत नाहीत.

लग्नसंस्थेत नक्कीच अनेक त्रुटी आहेत परंतु त्याचे पर्याय अजूनतरी समाजासाठी भंपक, भयंकर किंवा अव्यवहार्य आहेत.

बाकी सुज्ञ लोक समजून घेतीलच

प्रमाणिक पणा दुसऱ्याला का शिकवता आहात? तुम्ही तुमच्या मुद्द्यावर प्रामाणिक असाल, मी माझ्या मुद्द्यावर प्रामाणिक आहे..

पण दुसरे म्हणजे मोदी द्वेषाचे काविळ झालेले आणि तुम्ही काय मोदी नावाची नागीन पाठीवर घेऊन मिरवणारे आहात काय?

कृपया आपण फक्त प्रामाणिक इतर म्हणजे अप्रामाणिक हे बंद करा..

बाकी विषयांतर करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही.. लग्न संस्था बद्दल येथे बोलण्यात अर्थ नाही..

सुबोध खरे's picture

29 Jan 2021 - 2:10 pm | सुबोध खरे

श्री मोदींच्या जागी आजमितीला तुमच्या कडे सशक्त पर्याय आहे का?

तसे सांगा मग चर्चा करू

> माझे म्हणणे आहे जे चूक ते चूक

माझा इथे काहीही आक्षेप नाही. योगी हे धुतल्या तांदळा प्रमाणे स्वस्च्छ आहेत, आधुनिक हरिश्चंद्र आहेत आणि उत्तर प्रदेश हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे असे माझे म्हणजे नव्हते पण त्यांची वागणूक आणि काम करण्याची पद्धती आणि भ्रष्टाचार विरोध अखिलेश, पप्पू आणि मायावती ह्यांच्या पैकी कैक पटीने चांगला आहे. मागील ३ वर्षे प्रदेशांत नवीन उद्योग यावेत ह्यासाठी प्रचंड मेहनत ते करत आहेत. अखिलेश हे ह्या उलट होते. आयटम सोंग करणे, अभिनेत्रींसोबत फोटो, कुणाला फुकटची खातरी सायकल देणे आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत घाणेरडी वाटणारी टोपी घालून फिरणे इतकेच काय ते काम ते करत होते.

राघव's picture

29 Jan 2021 - 2:48 pm | राघव

नाही नाही, असे कसे?
ते एक एक्स्प्रेस वे बांधण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी [मिडियावर] कित्ती मेहनत घेतलेली माहित नाही?

Rajesh188's picture

28 Jan 2021 - 10:09 pm | Rajesh188

तुम्ही तुमच्या काही पोस्ट वर असे सांगितले आहे की तुम्ही bjp samarthak नाही आणि तुमची मत मांडली होती .
काँग्रेसी साम्य वादा विषयी.
आणि दुसऱ्याच कोणत्या लेखिके ची मत पण त्यांच्या लेख प्रस्तुत करून मांडली होती .
आणि दावा केला होता ती लेखिका bjp samarthak नाही.
पण लोक खूप हुशार आहेत सर्व काही ओळखतात .
भूल थापणा बळी पडत नाहीत.
उत्तर प्रदेश सारख्या बेशिस्त,कायद्या चे कुठेच अस्तित्व नसलेल्या,देशातील अत्यंत गरीब राज्य असलेल्या ,100 रुपये रोज कमावणे पण त्या राज्यात शक्य नसल्या मुळे देशभर वणवण करणाऱ्या लोकांचे राज्य असलेल्या .
उत्तर प्रदेश ला उत्तम राज्य सिद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न म्हणजे तुम्ही bjp ची कट्टर पाठीराखे आहात.
योगी आल्या मुळे उत्तर प्रदेश ची परिस्थिती बिलकुल बदलेली नाही हे सत्य आहे.
तीच बेशिस्त,जंगल राज ,बेरोजगारी.
100 रुपये रोज कमाविण्या साठी दुसऱ्या राज्यात जावे लागणे हे आज पण चालू आहे
मोदी आणि bjp ची पाठराखण करण्यासाठी ovesi सारखीच वृत्ती असणाऱ्या व्यक्ती ला तुम्ही महात्मा करण्याचा प्रयत्न करत आहात.
पण लोक विश्वास ठेवणार नाहीत त्या वर

Rajesh188's picture

28 Jan 2021 - 10:10 pm | Rajesh188

असे वाचावे .

> आणि दुसऱ्याच कोणत्या लेखिके ची मत पण त्यांच्या लेख प्रस्तुत करून मांडली होती .

खिसलेली है क्या ? - लंबू आटा (गुंडा चित्रपट)

चौकस२१२'s picture

28 Jan 2021 - 5:25 pm | चौकस२१२

जंगल राज आहे यूपी मध्ये.
रायडर चे vlogs बघितले तरी माहिती पडेल यूपी मध्ये प्रवेश केला की .
काय ते रस्ते, काय ती बेशिस्त.
जनावर रस्त्यावर फिरत असतात.

हे योगी/ मोदी सत्तेत आल्यापासून सुरु झाले नाही का? त्याआधी उत्तर प्रदेश म्हणजे काय वर्णन करावे ...आह्हह्ह
नतमस्तक या तर्कापुढे ( कि तर्कटपणापुढे!) राजेशभाऊ

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 5:45 pm | मुक्त विहारि

गाडी पलटी आणि गुंड ठार

चौकस२१२'s picture

28 Jan 2021 - 5:26 pm | चौकस२१२

जंगल राज आहे यूपी मध्ये.
रायडर चे vlogs बघितले तरी माहिती पडेल यूपी मध्ये प्रवेश केला की .
काय ते रस्ते, काय ती बेशिस्त.
जनावर रस्त्यावर फिरत असतात.

हे योगी/ मोदी सत्तेत आल्यापासून सुरु झाले नाही का? त्याआधी उत्तर प्रदेश म्हणजे काय वर्णन करावे ...आह्हह्ह
नतमस्तक या तर्कापुढे ( कि तर्कटपणापुढे!) राजेशभाऊ

गंगा नदी आता इतकी स्वच्छ झाली आहे की तिच्या नितळ पाण्यामुळे नदीचा तळ स्पष्ट दिसत आहे.
गंगेत सोडले जाणारे शहरांचे सांडपाणी बहुतेक direct बंगाल च्या उपसागरात सोडण्याची उपाय योजना योगी नी केलेली दिसतेय.
राज्यातील कायदा सुव्यवस्था खूपच सुधारली पण पोलिस कारवाई ची टिप गुंडांना मिळून पोलिस च गुंडाच्या सापळ्यात सापडून मृत्यू मुखी पडले हे घडले तेव्हा योगी राज्यात नसतील कारण ते असते तर अशी घटना घडलीच नसती.
घरोघरी असलेला बंदुका बनवायचा कुटीर उद्योग योगी नी बंद केला असावा आता उत्तम प्रदेशात कोणाकडेच परवाना नसलेली better नाहीत.
लग्नात जो गोळीबार करतात तो परवाना धारी हत्यार मधूनच.
हत्यारांची परवाना ची खिरापत बंद केल्या मुळे बाकी राज्यात असलेल्या बंदुका धारी सुरक्षा रक्षक उत्तम प्रदेशातून मिळणे कठीण झाले आहे.
राष्ट्रीय grid मधून उत्तम प्रदेश आता वीज चोरत नाही
आणि काय काय वर्णावे तिथे रामराज्य च आले आहे.

सुक्या's picture

29 Jan 2021 - 3:44 am | सुक्या

१८८ साहेब ..
तुमच्या प्रतीसादांना कुणी आता सीरियसली घेत नाही. तेव्हा आपले टंकनश्रम वाचवता आले तर बघा.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 7:55 am | मुक्त विहारि

तितकाच टाईमपास होतो...

सामना चित्रपट बघीतला आहे का?

सुक्या's picture

29 Jan 2021 - 8:35 am | सुक्या

:)

साहना's picture

29 Jan 2021 - 12:45 am | साहना

> घरोघरी असलेला बंदुका बनवायचा कुटीर उद्योग योगी नी बंद केला असावा आता उत्तम प्रदेशात कोणाकडेच परवाना नसलेली better नाहीत.
लग्नात जो गोळीबार करतात तो परवाना धारी हत्यार मधूनच.

नागरिकांना बंदूक ठेवण्याचा अधिकार असावा अश्या मताची मी आहे. योगींच्या नेतृत्वांत प्रदेश मधील नागरिक बंदूक बाळगून आहेत ह्याचा आनंदच आहे. हा नैसर्गिक अधिकार असून माझ्या मते इथे परवाने वगैरेची आवश्यकता नाही. साम्यवादाची हिंसा तसेच इस्लामिक हिंसा रोखण्यासाठी हिंदू समाजाचे सशस्त्रीकरण झाले तर चांगलेच आहे. अश्या ठिकाणी हे दोन्ही रोग पसरत नाहीत असा अनुभव आहे.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 7:54 am | मुक्त विहारि

सहमत आहे

Rajesh188's picture

29 Jan 2021 - 9:36 am | Rajesh188

सर्वात जास्त उत्तर प्रदेश मध्येच मुघलांनी पाडली आहेत.
त्यांनी काहीच विरोध केला नाही.
राम मंदिर पाडून मशीद बांधली तेव्हा पण विरोध झाला नाही.
आणि आता बाबरी मशीद पाडली त्या मध्ये उत्तर प्रदेशी नव्हते बाहेरच्या राज्यातील लोकांनाच ते काम करावे लागले.
ते कसले विरोध करणार.
घरोघरी बंदुका निर्माण होतात म्हणजे कायदा आणि सू व्यवस्था ह्याचे 12 वाजले आहेत.असा त्याचा अर्थ आहे.
BJP samarthak आणि पुरोगामी मंडळी एकाच पातळीवर वर आहेत.
जसे पुरोगामी बिनडोक लॉजिक मांडतात तसेच भक्त सुद्धा त्याच प्रकारचे लॉजिक मांडत आहेत.
आणि तेच टाळ्या वाजवत आहेत.
बाकी लोक ह्यांच्या पोस्ट सरळ न वाचता delete करतात.
वाचायचे पण कष्ट कोणी घेत नाही.
अशीच वृत्ती राहिली तर लोक पूर्ण दुर्लक्ष करतील ह्यांच्या कडे.
कंगना आणि अर्णव ची आता कशी अवस्था झाली आहे.
मूर्ख समजतात लोक त्यांना.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 9:40 am | मुक्त विहारि

मुळ प्रश्र्न असा आहे की ....

इतर पक्षांकडे, पंतप्रधान पदासाठी योग्य, असा उमेदवार आहे का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Jan 2021 - 10:04 am | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य उमेद्वार म्हणजे कसा? सभा/निवडणुका जिंकणारा?अर्थशास्त्राचे चांगले ज्ञान असणारा?सगळ्याना एकत्र का काय म्हणतात तसे घेउन जाणारा?गरीबी कशी दूर करायची/ आरोग्य/शिक्षण व्यवस्था कशी सुधारायची ह्यावर उत्तरे असलेला?
राजकीय पदावरील फक्त एक व्यक्ती देश बदलू शकते..समस्या चुटकीसरशी दूर करू शकते..ह्या भ्रमातून आपण बाहेर यायला हवे.

प्रसाद_१९८२'s picture

29 Jan 2021 - 10:26 am | प्रसाद_१९८२

राजकीय पदावरील फक्त एक व्यक्ती देश बदलू शकते..समस्या चुटकीसरशी दूर करू शकते..ह्या भ्रमातून आपण बाहेर यायला हवे.
--

सहमत !

तेच देश चालवण्या साठी सक्षम नाहीत.देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या काळात.
अनेक राज्य नाराज झाली आहेत देशाची एकता च धोक्यात आली आहे.
यूपी आणि उत्तरेची दोन तीन राज्य म्हणजेच भारत देश असा ह्यांचा गोड गैर समज झालेला आहे.
समाजातील विविध घटकात द्वेष निर्माण करण्याचे काम चालू आहे.
महागाई वाढत आहे पेट्रोल दर 90 रुपये पेक्षा जास्त झाले आहेत,गॅस 700 रुपये झाला आहे.
सर्वच क्षेत्रात महागाई झालेली आहे.
रेल्वे चे खासगीकरण करण्याचे धोरण राबवले जात कशी काही मार्ग उद्योगपती ना आंदण सुद्धा देवून झाले आहेत.
मीडिया वर दबाव टाकून त्यांना हव्या त्याच बातम्या दिल्या जात आहेत.
देशाची अर्थ व्यवस्था बिघडली आहे.
चांगल्या चालणाऱ्या सरकारी कंपन्या तोट्यात आणून त्या विकल्या जात आहेत.
देशाचा विकास पूर्ण थांबलेला आहे.
अशा पंतप्रधान ना कसला जोड शोधत आहात.

सुबोध खरे's picture

29 Jan 2021 - 10:32 am | सुबोध खरे

समाजातील विविध घटकात द्वेष निर्माण करण्याचे काम चालू आहे.

महागाई वाढत आहे पेट्रोल दर 90 रुपये पेक्षा जास्त झाले आहेत,गॅस 700 रुपये झाला आहे.

सर्वच क्षेत्रात महागाई झालेली आहे.

उद्योगांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबवले जात कशी काही मार्ग उद्योगपती ना आंदण सुद्धा देवून झाले आहेत.

मीडिया वर दबाव टाकून त्यांना हव्या त्याच बातम्या दिल्या जात आहेत.

देशाची अर्थ व्यवस्था बिघडली आहे.

चांगल्या चालणाऱ्या सरकारी कंपन्या तोट्यात आणून त्या विकल्या जात आहेत.

देशाचा विकास पूर्ण थांबलेला आहे.

हायला

तंतोतंत हेच शब्द वाममार्गी लोकांनी १९९१ च्या सुधारणांबद्दल पुढच्या काही दिवसात काढले होते.

त्याचा परीणाम पुढच्या काही वर्षात दिसून आलाच.

वाममार्गी आणि पुरोगामी लिब्रान्दू लोक टाहो फोडत आहेत याचा अर्थच सरकार व्यवस्थित मार्गावर चालत आहे.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 11:04 am | मुक्त विहारि

सहमत आहे ....

साहना's picture

29 Jan 2021 - 12:38 pm | साहना

मार्क्स, माओ, स्टालिन इत्यादींनी गुळणी करून फेकलेले पाणी ह्या भारतीय नतद्रष्टया लिब्रान्दू मंडळींनी तीर्थ म्हणून आणले आणि आपल्या समस्त कॉम्रेड मंडळीत वाटले. आता तेच तीर्थ हे पुन्हा पुन्हा रिसायकल केले जातेय. जग पुढे पोचले तरी ह्यांची झेप मात्र रेल्वे विकली आणि BSNL विकली इथेच आहे.

आणखीन २० वर्षांनी सुद्धा हेच तीर्थ वाटत बसणार आहेत हि मंडळी.

> बाकी लोक ह्यांच्या पोस्ट सरळ न वाचता delete करतात.
> वाचायचे पण कष्ट कोणी घेत नाही.
> अशीच वृत्ती राहिली तर लोक पूर्ण दुर्लक्ष करतील ह्यांच्या कडे.

अहो न वाचता डिलीट केले तर त्यालाच दुर्लक्ष म्हणायचे ना ? पूर्ण दुर्लक्षांत आणखीन वेगळे काय अपेक्षित आहे ?

> कंगना आणि अर्णव ची आता कशी अवस्था झाली आहे. मूर्ख समजतात लोक त्यांना.

कंगना करोडपती आहे आणि महाराष्ट्र सरकार तिची माफी मागून नुकसान भरपाई देत आहे. अर्णब चा चॅनेल सर्वाधिक लोकप्रिय असून त्याने एकट्याने हाजदीप, रॉय जोडी इत्यादींचे बँड पूर्ण पणे वाजवून ठेवले आहे.

आपले उठणे बसणे कुठल्या लोकांत आहे हे ठाऊक नाही पण अर्णब तरी किमान आपल्या क्षेत्रांत आणखीन अनेक वर्षे गाजवणार आहे हे सर्वानाच ठाऊक आहे.
---

मी भाजप समर्थक नाही आणि भाजपला मत सुद्धा दिले नाही. त्याच वेळी भाजप मध्ये मूर्खांचा बाजार आहे म्हणून तुमच्या सारखे विचारजंत बरोबर आहेत असे होत नाही. तुमची हि क्षुद्र वळवळ आणि वैचारिक बद्धकोष्ठता मोदी किंवा भाजपच्या कर्तृत्वावर अवलंबून नाही. मोदींनी काहीही केले तरी तुमची हि वळवळ चालूच असेल त्यामुळे तुम्हाला मी फक्त एक बी ग्रेड मनोरंजन म्हणून पाहाते.

माणूस म्हणून समाजांत जगायचे असेल तर एक काही किमान बौद्धिक पातळी, काही तरी किमान तर्कक्षमता आणि थोडा तरी स्वतःहून विचार करण्याची क्षमता त्या प्राण्यात असावी लागते अशी माझी समज होती. पण कदाचित घनघोर मोदी द्वेष हा एक असा रोग आहे ज्यांतून ह्या गोष्टी गायब होतात आणि तुम्हाला पाहून तसेच वाटते. तुमचं प्रतिक्रियांना मी इथे उत्तर देते ह्याचा अर्थ प्रतिक्रिया समजण्याची तुमची लायकी आहे असे समजू नका. आपले जे वैचारिक कुंठन आहे ते माझ्या मते प्रतीकात्मक आहे. तुमचं सारख्या लोकांची संख्या ह्या देशांत एके काळी खूप होती आणि काँग्रेस पक्षाने तळवे चाटण्याची वृत्ती ओळखून अश्या लोकांना मोठ्या पदावर स्थानापन्न केले होते. त्यामुळे ह्या लोकांनी सर्वत्र गोंधळ घालून माझ्या देशाचे गोव्यांत म्हणतात तसे "बारा बिरेस्तार" केले. आता ह्या विचारजंतांचे दिवस भरले आहेत आणि ह्यांनी तोंड उघडताच युवा पिढी ह्यांची बिनदिक्कत टर उडवते. एके काळी धडकी भरवणारे डाकू लोक आता फक्त सब टीव्ही वरील बी ग्रेड कॉमेडी सीरिअल्स मधेय विनोदी पत्रे म्हणून वापरली जातात त्याच प्रमाणे राजेश साहेब आपल्या विचारवृत्तीचे विचारजंत आता विनोदास पात्र झाले आहेत आणि त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी दिसेल तिथे ह्या विचारजंतांची जाहीर खिल्ली उडवणे मी माझे कर्तव्य समजते.

मिपा वरील माझ्या शेती विषयक पोस्ट वर APMC कायद्याचे निर्लज्जपणे समर्थन करणारी एकमेव व्यक्ती फक्त आपणच आहात. शितावरून भाताची परीक्षा न्यायाने शेतकरी आंदोलन करते आणि त्यांचे समर्थक ह्यांची बौद्धिक कुवत (रादर लॅक ऑफ) आपल्या प्रमाणेच असावी असे वाटते.

त्यामुळे, फक्त हाच विषय धरून, ह्या प्रतिसादावरील, शेती ह्या विषयावर लिहितो....

खाजगी सावकार आणि दलाल, हे सारखेच असतात.

मनुष्य आर्थिक मदतीसाठी, खाजगी सावकाराकडे जातो आणि फसतो, तसेच, स्वतःचे मार्केट, तयार करू न शकणारा, दलालांच्या कडे जातो.

शेतकरी आत्महत्या करतो, त्याला जी काही कारणे असतात, त्यापैकी, सावकाराचे कर्ज, हे एक प्रमुख कारण आणि दलालांनी केलेली आर्थिक फसवणूक, हे इतर कारणांपैकी एक कारण ...

केंद्रीय सरकार, हळूहळू का होईना पण, शेतकरी वर्गाला आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळेल, ह्याचीच पावले उचलत आहे.

130 कोटी जनतेपैकी, किमान, 70 कोटी जनता, शेती करते किंवा शेती आधारित इतर कामे करते.

Make In India, अंतर्गत, शेती हा पुर्णवेळ व्यवसाय आहे, असे समजून काही सवलती दिल्या आहेत.

बांबू आपण चीन मधून आयात करत होतो. आता बांबू लागवडीला 100% सबसिडी आहे.

एका मुलीमागे, 10-12, चंदन रोपे लावायला परवानगी दिली आहे आणि 10-15 वर्षांनी ही झाडे, सरकार बाजारभावाने विकत घेणार.

ह्या दोन्ही पिकांमुळे, चीनचे थोडेफार का होईना, पण आर्थिक नुकसान होणारच आहे.

थेंबे थेंबे तळे साचे, ह्या म्हणी प्रमाणे, एक एक करत, चीन मधून होणारी आयात, हे सरकार बंद करत आहे.

पण, उद्या दलालांमार्फत ह्या वस्तूंवरील आर्थिक नियंत्रण, चीनने किंवा भारतातील एकाद्या धन दांडग्या माणसाने, बाजारपेठ ताब्यात घेऊ नये, हा पहिला उद्देश आहे...

दुसरा उद्देश असा आहे की, खरेदीदार जर भरपूर असतील तर, शेतमालाला योग्य तो भाव, शेतकरी वर्गाला मिळेल.
...
आता ह्याचा फायदा, शेतकरी वर्गाला होत आहे. विविध ठिकाणी, शेतकरी वर्गाचे गृप्स तयार होत आहेत आणि वाहतुक खर्च कमी कसा होईल, ह्या उद्देशाने आणि एकमेकांना बाजारपेठ देऊन, ही नविन पिढी, परत उभी रहात आहे.
.......
दुर्दैवाने, काही लोकांना, मुळात शेतकरी वर्गाला नक्की काय हवे आहे? हे न विचारता, वाचून मते बनवायची आवड असते.

वाचलेली, ऐकलेली, पाहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य नसते...हे समजून घेण्याची, मानसिक तयारी पण नसते.
.........

माझ्या ओळखीतला एकही शेतकरी, ह्या कायद्यांना विरोध करत नाही आहे...

बांबू साठी एक बेवकूफासारखा कायदा होता, ज्यानं बांबूची शेती करण्यावर अडचण होती.
असला कायदा बदलायला इतकी वर्षे भारतात लागतात ह्यातच प्रगतीची आस किती आणि उगाचचे ढोलताशे बडवण्याची ईच्छा किती ते दिसून येतं.

साहना's picture

29 Jan 2021 - 3:34 pm | साहना

+१

कुणाला ठाऊक नसेल म्हणून इथे लिहिते. बांबू हे शास्त्रीय दृष्ट्या गवत आहे. गवत कापून विकायला सरकारी खेचरा कडून परमिशन लागत नाही. बांबू ह्याला भारतीय बाबूंनी झाड ह्या कक्षेंत टाकले त्यामुळे बांबू कापायचा किंवा विकत वगैरे घ्यायचा तर नेहमीपरामें लाँच वगैरे देऊन लायसन घ्यावे लागते. अर्थांत गावांत कुणी त्या भानगडीत पडत नसले तरी मोठ्या प्रमाणावर बांबूची शेती आणि खरेदी विक्री करायला कुठलीही कंपनी गेली नाही. शेवटी ब्रम्हदेवाने साक्षांत स्वप्नात येऊन कुणाला तरी दृष्टांत दिला असेल म्हणून हि पॉलिसी बदलण्यात आली. एका पेनाच्या फाटकाऱ्यांत एक जुनाट सरकारी बंधन गेले आणि बांबू मुले अनेक नवीन उद्योग धंदे निर्माण झाले.

गोव्यांत मध्यन्तरी पार्सेकर नावाचे एक मुख्यमंत्री होते. साक्षांत भाजप कार्यकर्तेच ह्यांची खिल्ली उडवायचे. पार्सेकर ह्यांनी चाणाक्ष पणे नारळ झाड हे झाड नाही असे घोषित केले. सर्वत्र लोक हसायचे. एका अश्याच गोवेकर शेतकऱ्याला मी थोडे फैलावर घेतले होते. आपल्याच घरातील आपल्याच आजोबाने पेरलेला आणि वडिलांनी पाणी घातलेला माड कापण्यासाठी २० किलोमीटर दूर तालुक्याच्या ठिकाणी हात जोडून याचक वृत्तीने कुठल्यातरी सरकारी खेचरा कडे परमिशन मागायला शरम वाटत नाही का ? माड आता झाड नसल्याने त्याची लागवड तसेच माड मारणे फार सोपे झाले आहे. अर्थांत हे समजावून सांगल्यानतंर त्याला पार्सेकरांची बुद्धी पटली.

राघव's picture

29 Jan 2021 - 11:35 pm | राघव

आता हे काम देखील मोदी सरकारनंच केलंय असं म्हटलं की खूप जळजळ वाढते. पण जे आहे ते आहे. लिंक
यातही विरोधी पक्षांनी वॉकआऊट केलेलं होतं. =))

१)कंगना करोडपती आहे.

मुंबई मध्ये साध्या नगरसेवक पासून , बार मध्ये नाचणाऱ्या नर्तकी,भंगार वाले सुद्धा करोड पती अब्जपती आहेत.
2) अर्णव त्याच्या क्षेत्रात प्रगती करत आहे.
Trp च घोटाळा करून चॅनेल ची प्रेक्षक संख्या वाढवून.
पंतप्रधान कार्यालयातून अत्यंत संवेदनशील माहिती मिळवून त्या माहिती च वापर करून .
3) गोवा
गोवा मुक्ती झाली ती नेहरू च्या काळात ज्यांना तुम्ही शिव्या देता त्यांनी च गोवा स्वतंत्र केला आहे नाहीतर आता पर्यंत चर्च मध्ये जावून येशू समोर उभे राहावे लागले असते.
देशाचा स्वतंत्र लढा असू नाही तर आधुनिक भारताची उभारणी ह्या मध्ये ना bjp च सहभाग होता त्यांच्या पितृ संस्थेचा.
आता फक्त आयत्या पिठावर रेगोट्या मारायचे ते काम करत आहेत.
शेती कायद्याचे दुष्परिणाम दिसू लागतील तेव्हा हे BJP samarthak तोंड लपवून फिरतील.घोडे मैदान जवळ च आहे

महाराष्ट्र सरकार तिची माफी मागून नुकसान भरपाई देत आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2021 - 2:16 pm | श्रीगुरुजी

गोवा मुक्ती झाली ती नेहरू च्या काळात ज्यांना तुम्ही शिव्या देता त्यांनी च गोवा स्वतंत्र केला आहे नाहीतर आता पर्यंत चर्च मध्ये जावून येशू समोर उभे राहावे लागले असते.
देशाचा स्वतंत्र लढा असू नाही तर आधुनिक भारताची उभारणी ह्या मध्ये ना bjp च सहभाग होता त्यांच्या पितृ संस्थेचा.

गोवा स्वतंत्र व्हावा अशी नेहरूंची अजिबात इच्छा नव्हती (कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर आफली आक्रमक अशी प्रतिमा निर्माण होऊन शांतीदूत या प्रतिमेला धक्का लागेल अशी त्यांना भीति होती) व गोवा स्वतंत्र करण्याचे त्यांच्यात धाडसही नव्हते. नागरिकांच्या लढ्यामुळे व दबावामुळे शेवटी १९६१ मध्ये पोलिस कारवाई करावी लागली.

तीच गोष्ट दादरा, नगर, हवेली या भागांची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १२५ कार्यकर्त्यांनी (यात सुधीर फडके व बाबासाहेब पुरंदरे सुद्धा होते) १९५४ मध्ये या भागावर सशस्त्र हल्ला करून हे भाग स्वतंत्र केले होते.

> मुंबई मध्ये साध्या नगरसेवक पासून , बार मध्ये नाचणाऱ्या नर्तकी,भंगार वाले सुद्धा करोड पती अब्जपती आहेत.

आणि त्याबद्दल सुद्धा मला त्यांच्याबद्दल आदर आहे. काही तरी उपयोगी काम करून पैसे मिळवले म्हणजे झाले. काँग्रेसी थुंकी चाटून नाही मिळवली म्हणजे झाले.

शरीरविक्रय करून पैसे करणारे सुद्धा बुद्धी विक्रय करून पैसे करणाऱ्या पेक्षा केंव्हाही श्रेष्ठ.

> गोवा मुक्ती झाली ती नेहरू च्या काळात ज्यांना तुम्ही शिव्या देता त्यांनी च गोवा स्वतंत्र केला आहे नाहीतर आता पर्यंत चर्च मध्ये जावून येशू समोर उभे राहावे लागले असते.

अहो नेहरू सारखा गाढव प्रधान मंत्री होता म्हणून गोवा १९६१ साली स्वतंत्र झाला. थोडी जरी लाज आणि शरम होती तर १९४७ मध्येच पोर्तुगीजांचे बँड वाजवायला पाहिजे होते. त्याशिवाय नेहरूंनी स्वार्थासाठी गोव्याचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला होता. आणि गोवा स्वातंत्र्याला त्यांचा प्रचंड विरोध सुद्धा होता. त्यांनी उशीर केला नसता तर शेवटी इतर भारतीयांनी सशस्त्र पणे हल्ला केला असता आणि नेहरूंची अब्रूची लक्तरे टांगली गेली असती म्हणून नाईलाजाने त्यांनी सैन्य गोव्यांत पाठवले.

त्याशिवाय १९११ मध्ये पोर्तुगाल ख्रिस्ती देशापासून सेकुलर (खऱ्या अर्थाने) बनला आणि मुक्त आर्थिक व्यवस्था त्यांनी घेतली. त्याचे फलस्वरूप म्हणून गोव्यांत आर्थिक सुबत्ता आणि जास्त धार्मिक अधिकार आज सुद्धा आहेत. गोव्यांतील मंदिरे लोकांच्या हाती असून गोव्यातील मुलींना कुठेही लग्न केले म्हणून निकाह किंवा हलला ची भीती नाही. नेहरू ह्यांचे घाणेरडे कायदे आणि घटनादुरुस्त्यांपैकी बहुतेक गोव्यांत लागू नसल्याने गोवा सोबीत आहे.

आज पोर्तुगाल मध्ये हिंदू लोकांना भारतात आहे त्या पेक्षा जास्त अधिकार आणि स्वातंत्र्य आहे.

प्रसाद_१९८२'s picture

29 Jan 2021 - 2:38 pm | प्रसाद_१९८२

प्रतिसाद अगदे रोखठोक असतात.

अनन्त अवधुत's picture

29 Jan 2021 - 10:08 am | अनन्त अवधुत

राष्ट्रीय पातळीवरचा नेता म्हणजे एखादा असा पक्ष ज्याला राष्ट्रीय पातळीवर मते मिळतात त्याचा नेता.
आ़ज भाजप आणि, काँग्रेस ह्या पक्षांना बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये लक्षणिय (आमदार\ खासदार निवडून येतील) मते मिळतात. तर कम्युनिस्ट पार्टी काही राज्यांमध्ये प्रभाव राखुन आहे. बसपाचे पंजाब ते आंध्रप्रदेश ह्या राज्यांमध्ये पॉकेटस् आहेत भले त्यांचे आमदार\ खासदार नसोत. ह्या पक्षांकडे राष्ट्रिय नेते असु शकतात.
त्यात भाजप तुर्तास बाजूस ठेवू.

काँग्रेसमध्ये लक्षणिय नेते आहेत उदा. जयराम रमेश, शशि थरूर, मुरली देवरा, कॅ. अमरिंदर सिंग, पॄथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, गहलोत, अगदी आपल्या राजीव सातवांमध्ये पण पोटेन्शिअल आहे. पण काँग्रेसमधल्या बेलगाम सुंदोपसुंदी, आणि घराणेशाहीचा अडसर आहे. काँग्रेसमध्ये कोणा गांधीतराला नेतॄत्व करण्याची संधी नाही.
'गांधी' हा असा एकखांबी तंबू ठरवल्यामुळे नो वन शुल्ड ऑउटपरफॉर्म राहुल गांधी अ‍ॅंण्ड राहुल गांधी डजन्ट परफॉर्म. सध्या नेतॄत्व करणार्‍या राहुल गांधीसाठी राजकारण हे फावल्या वेळातले काम आहे, ही अडचण आहे.

कम्युनिस्ट पार्टी ही खरेतर केडर बेस्ड पार्टी, पण आता दरबारी राजकारणात हरवली (थँक्स टू इंदिरा गांधी). शिवाय ज्यांना कम्युनिस्ट पार्टीत काही मिळाले नाही त्यांनी काँग्रेसची वाट धरली (आणि तिथल्या दरबारी राजकारणात काँग्रेसची वाट लावली). त्यामुळे त्यांच्या कडे जनमानसात लोकप्रिय होईल असा राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही.

बसपा, परत एकखांबी तंबू. मायावती. त्या एक राष्ट्रीय स्तरावर नेतॄत्व करु शकतात, आपला पक्ष मोठा करुन त्यांनी दाखवला आहे. सध्या अडचणीत आहेत, पण त्या कदाचीत पुढील एक-दोन निवडणुकीत परत पुढे येतील. त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आहेतच पण नेतॄत्वावर नाहीत. अर्थात सबकुछ बहेनजी असल्याने, दुसरी फळी वगैरे काही इथे नाही.

आता भाजप, अर्थात भाजप कडे नेत्यांची फळी आहे. पहिली आहे, दुसरी आहे. शिवाय त्यांच्या कडे सतत संघर्ष करण्याच्या अनुभवामुळे नवनवे नेते तयार होत राहतात.

ह्याशिवाय स्थानिक पक्षाचे नेते आहेत जे राष्ट्रीय स्तरावर नेतॄत्व करु शकतात, पण त्यांचा पक्ष एखाद दुसर्‍या राज्यापुरता सिमित असल्याने त्यांच्या पुढे येण्यात अडचणी आहेत. उदा. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, जगमोहन.
उद्या अखिलेश/ ममता कम्युनिस्ट पार्टीत गेले तर त्यांना राष्ट्रीय स्तरावर नेतॄत्व मिळेल.

थोडक्यात भाजप सोडली तर काँग्रेसकडे नेते आहेत पण त्यांना राहुल रेषेची मर्यादा आहे. काही स्थानिक नेते आहेत, पण त्यांना त्यांच्या पक्षाची मर्यादा आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2021 - 10:26 am | श्रीगुरुजी

संपूर्ण भारतात अत्यंत लोकप्रिय व सर्वपक्षीय मान्यता असलेले आदरणीय माननीय श्री. रा. रा. शरदचंद्रजी पवारसााे उपाख्य जाणता राजा यांचा पर्याय म्हणून उल्लेख न केल्याबद्दल तीव्र णिषेद.

सुबोध खरे's picture

29 Jan 2021 - 10:34 am | सुबोध खरे

ते आजन्म भावी पंतप्रधान या स्थानावर अढळ कायम आहेत.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 11:03 am | मुक्त विहारि

सहमत आहे

अनन्त अवधुत's picture

29 Jan 2021 - 1:43 pm | अनन्त अवधुत

तहहयात भावी पंतप्रधान पदावर अढळ राहोत ह्याच शुभेच्छा!

अनन्त अवधुत's picture

29 Jan 2021 - 2:19 pm | अनन्त अवधुत

ते मुख्यमंत्री म्हणुन परत आले (किंवा पाठवले गेले, काय हवे ते म्हणा). तिथे त्यांचा राष्ट्रिय राजकारणातला बराचसा प्रभाव संपला. नंतर काँग्रेस पासुन फारकत घेवून राज्यातल्या सत्तेसाठी पुन्हा एकदा काँग्रेससोबत पाट लावल्यामुळे त्यांचा होता नव्हता तो पण प्रभाव संपला, नंतर राहीला तो फक्त वावर. मग राहुल गांधींचे नेतॄत्व (युपीए सरकार) मान्य करणे आणि आता तर फडणवीस, पाटील अश्या इतर पक्षातील राज्य स्तरीय नेत्यांशी स्पर्धा करुन त्यांनी स्वतःला अधिकच खुजे करुन घेतले.

आता परत राष्ट्रिय राजकारणात गेले तर इकडे सेना, भाजप आणि मुख्यतः काँग्रेस राष्ट्रवादीचे लचके तोडेल, शिवाय जोडीला गॄहकलह आहेच. आयुष्यभर जे पेरले आता त्याचीच परतफेड होतेय. असो.

त्यांना प्रभावशाली नेत्यांमध्ये मोजले नाही कारण ४०हून अधिक वर्षे राजकारणात आहेत म्हणताना, त्यांना एकदाही एकहाती महाराष्ट्र जिंकता आला नाही. त्यामानाने फडणवीस सुद्धा उजवे. ममता, अखिलेश, जगनमोहन हे त्यांच्या नंतर राजकारणात आले आणि मोठमोठी राज्ये त्यांनी कडवट विरोधकांकडुन जिंकली. पवार विरोधकांच्या बाबतीत तसे नशिबवान, त्यांना कडवट विरोधक असा कधी मिळाला नाही. जातीचे राजकारण, मराठी वर्तमानपत्र, साहीत्यीक, वगैरे लिबरल्स हाताशी, आणि काँग्रेसचा वारसा असे सगळे जमुन आलेले असतानाही त्यांना त्यांच्या उमेदीत १४५+ असा विजय कधी मिळाला नाही.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2021 - 2:42 pm | श्रीगुरुजी

ते मुख्यमंत्री म्हणुन परत आले (किंवा पाठवले गेले, काय हवे ते म्हणा). तिथे त्यांचा राष्ट्रिय राजकारणातला बराचसा प्रभाव संपला.

पवारांचा राष्ट्रीय राजकारणात कधीही प्रभाव नव्हता. २-४ जागा मिळविणारे रामविलास पास्वान, शिबू सोरेन इ. चा राष्ट्रीय राजकारणात जेवढा प्रभाव होता/आहे, फार तर तितकाच पवारांचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणात आहे. २-४ खासदार असणाऱ्या छोट्या पक्षाला किंवा पक्षाच्या नेत्याला राष्ट्रीय राजकारणात काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही.

अनन्त अवधुत's picture

29 Jan 2021 - 11:44 pm | अनन्त अवधुत

जेव्हा राज्याच्या राजकारणात परत आले तेव्हा ते केंद्रात संरक्षणमंत्री होते. शिवाय ते काँग्रेसचे नेते होते, २-४ खासदारांचे नाही. म्हणुन त्यांचा राष्ट्रिय राजकारणातला प्रभाव असा उल्लेख केला.

फक्त मोदी मोदी.
सरकार मधील च
बाकी मंत्र्यांना सुद्धा स्वतः च्या विचाराने निर्णय घेण्याचे स्वतंत्र नसावे अशी शंका येतेय.
सर्व गोष्टींचे श्रेय फक्त मोदी ना.
बाकी मंत्री काय फक्त पुतळे आहेत काय.
हा मंत्री लायकीचा नाही तो मंत्री लायकीचा नाही असे bjp samarthak च म्हणतात.
लायकीचे नाहीत तर त्यांना कशाला मंत्री पद दिले आहे

आणि मोदी हे Bjp चा चेहरा आहे,पहिली टर्म कंटाळलेल्या जनतेने नाविन्य आणि उत्साहात स्वीकारली.दूसरी टर्म ठीकठाक चालू होती,कोवीड कडमडल ..त्यात जास्त नाही पण थोडेफार नुकसान झालंच आहे..मोदी चेहरा म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कमी पडत आहेत वा दूर्लक्षित करत आहेत.असे सामान्यांचे प्रश्न टाळू लागले तर पुढची टर्म नाही मिळू शकणार..Bjp चा डेकोरम कमी पडतोय सध्या म्हणून लोकं पर्याय शोधत आहेत.Bjp ने दुसरा चेहरा शोधावा नाहीतर महाराष्ट्रासारखी गत होईल.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 11:17 am | मुक्त विहारि

मी स्वतः, शेती व्यवसायाशी निगडित आहे...

दलाल नसल्याने, शेतकरी वर्गाला, आनंद झाला आहे....