Skip to main content

भाजपा

भाजप शिवाय, इतर पक्षांकडे, राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 27/01/2021 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला तरी, राष्ट्रीय पातळीवर, भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रीय पातळीवर, भाजपमध्ये घराणेशाही नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. आज, भाजपची चौथी फळी पण तयार होत आहे. त्यामुळे, मोदींच्या नंतर कोण? हा प्रश्र्न, भाजपच्या पुढे नाही. अमित शहा, योगी, तेजस्वी सुर्या, इथपर्यंत पंतप्रधान पदासाठी, भाजपचे उमेदवार तयार आहेत. लोकसभेतील, ह्या वरील व्यक्तींची भाषणे ऐकलीत तर, प्रचिती नक्कीच येईल. माझ्या मते, इतर पक्षांकडे इतके सक्षम उमेदवार नाहीत. तुमच्या मते, पुढील निवडणूकीत, इतर पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी, मोदींच्या इतका सक्षम नेता आहे का?

राम माधव आणि त्यांच्या मुलाखती

लेखक माहितगार यांनी बुधवार, 30/12/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
राम माधव हे रा.स्व. संघाचे प्रचारक आणि भा.ज.पा.चे राष्ट्रीय सरचिटणीस (बरोबर ना ?) का कायसे आहेत. टिव्ही बातम्याण्च्या च्यनलांवरून सिताराम येचुरींची बाइट्स जशी मुद्देसूद असतात तसेच राम माधवांची बाइट्स सहसा चपखल असतात. मोदी सरकार स्थापनोत्तर आणि भा.ज.पा.चे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर पडद्या मागच्या काही राजकीय स्ट्रॅटेजी आणि डिप्लोमॅटीक यश राम माधवांचे असल्याची वृत्तपत्रीय वंदता असावी. मोदी सरकारच्या स्थापनेनंतर भा.ज.पा.च्या राष्ट्रीय कार्यकारणीवर राम माधवांना जागा देण्यात संघ-भाजपाची काय राजकीय खेळी असावी याची भाजपाच्या अधिकृत वक्तव्ये आणि आणि भाजपेतर कयासांमध्ये फरक असू शक्तो.