Skip to main content

भाजप शिवाय, इतर पक्षांकडे, राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 27/01/2021 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला तरी, राष्ट्रीय पातळीवर, भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रीय पातळीवर, भाजपमध्ये घराणेशाही नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. आज, भाजपची चौथी फळी पण तयार होत आहे. त्यामुळे, मोदींच्या नंतर कोण? हा प्रश्र्न, भाजपच्या पुढे नाही. अमित शहा, योगी, तेजस्वी सुर्या, इथपर्यंत पंतप्रधान पदासाठी, भाजपचे उमेदवार तयार आहेत. लोकसभेतील, ह्या वरील व्यक्तींची भाषणे ऐकलीत तर, प्रचिती नक्कीच येईल. माझ्या मते, इतर पक्षांकडे इतके सक्षम उमेदवार नाहीत. तुमच्या मते, पुढील निवडणूकीत, इतर पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी, मोदींच्या इतका सक्षम नेता आहे का?

वाचने 61904
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

राजकारण ह्या विषयावरील इतके ओपन एंडेड धागे प्रचंड प्रमाणात वाढत जातात आणि त्यातून काहीही तत्वबोध होत नाही पण मला सर्वप्रथम कमेंट टाकून वादाचा श्रीगणेश करायला मिळत आहे ह्याचा पूर्ण फायदा घेते. स्थानिक पक्षांना नवीन नेते निर्माण करणे जड जाणार नाही. बहुतेक स्थानिक पक्ष हे एक तर काही लोकांची वैयक्तिक संस्थाने आहेत नाहीतर निव्वळ संधीसाधू लोक एकत्र येऊन जमलेला ठगांचा घोळका. एखाद्या गुप्तरोगाप्रमाणे हे पक्ष कधीही नामशेष होतील असे वाटत नाही. राष्ट्रीय स्तरावर तीनच मोठ्या शक्ती आहेत. भाजप, काँग्रेस आणि बिनडोक निर्लज्ज कॅम्युनिस्ट. ह्यातील कम्युनिस्टांचे दिवस संपले असून २० वर्षांत हि मंडळी पूर्ण पणे गायब होईल. काँग्रेस पक्षा ची स्थिती वाईट वाटत असली तरी त्यांची समस्या वेगळी आहे. एखाद्या खोलीत कितीहि अत्तराच्या बाटल्या ठेवल्या पण मध्यभागी जर एक कुसलेले अंडे ठेवले तर लोकांचे लक्ष तिथेच जाईल आणि अत्तराचा वास कुणालाही मिळणार नाही. काँग्रेसची गत तीच आहे. काँग्रेस मध्ये सुद्धा नवीन नेते निर्माण होऊ शकतात पण जो मूर्ख नेता सध्या सुकाणू धरून आहे त्याची उचलबांडगी झाली पाहिजे. नाहीतर त्याच्या दुर्गंधीत नवीन नेते असले तरी दिसणार नाहीत. भाजप ची स्थिती उलटी आहे. सध्या भाजप पक्ष हा दोनच लोकांचा आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी. हे दोघे ठरवतील ती पूर्व दिशा. प्रकाश जावडेकर हा ह्यांचा दरबारांतील विदूषक तर रवी शंकर प्रसाद हे चरवी ढाळणारे नोकर आहेत. संपुन कॅबिनेट मध्ये कर्तबगार अशी एक व्यक्ती सुद्धा नाही. कदाचित नितीन गडकरी हे अपवाद असतील. एका वरिष्ठ सरकारी बाबूशी बोलताना त्यांनी विनोदाने म्हटले कि दिल्लीत असे म्हटले जाते कि पियुष गोयल ह्यांच्याशी मूर्खपणात जर कोणी स्पर्धा करू शकतो तर तो म्हणजे भाजप प्रवक्ता राम माधव. राम माधव हे अमेरिकन रिपब्लिकन पार्टीच्या काही नेत्यांना राम भाऊ म्हाळगी प्रबोधिनी दाखवायला गेले. तिथे त्यांचे वर्तन इतके खराब होते कि तिथे असलेल्या अनेक भारतीयांना मान शरमेने खाली घालावी लागली. दुसरे भाजपचे वरिष्ठ नेते जे राज्यसभेंत खासदार आहेत (पण सुदैवाने मंत्री नाहीत) आणि मोठी मोठी निकृष्ट दर्जाची पुस्तके लिहितात आणि स्वतःला पत्रकार म्हणतात हे एकदा कॅलिफोर्निया मध्ये आले असता येथील भारतीय समुदायाने त्यांना डिनर साठी बोलावले तर रेस्टोरंट मध्ये हि व्यक्ती अश्या पद्धतीने दारू पिऊ लागली कि जणू काही ह्यांनी दारू पहिलीच नव्हती. काही लोक योगी ह्यांचे नाव पुढील नेते म्हणून घेतात आणि योगी कदाचित समर्थ सुद्धा असतील पण योगी ह्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी मोदी आणि शाह ह्यांनी प्रचंड प्रयत्न केले होते. सध्या भाजपच्या शिडांत वारा आहे म्हणून आलबेल वाटते पण हा वारा जेंव्हा कमी होईल तेंव्हा मोदी आणि शहा ह्यांना सर्वांवर अंकुश ठेवणे जड जाणार आहे. बौद्धिक दिवाळखोरी हि भाजप आणि संघ ह्यांची मोठी कमजोरी आहे. आपल्या संपुन अस्तित्वांत कुठल्याही महत्वाच्या विषयावर ह्या मंडळींनी बौद्धिक काम केलेले नाही. आपला कंपू सोडून इतरांचा पूर्वपक्ष केला नाही आणि आपल्या कंपूत सुद्धा जितं मम् म्हणून हि मंडळी खरा वाद टाळतात. आर्थिक नीती असो वर शिक्षण व्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षा किंवा धार्मिक तेढ सर्वत्र ह्यांचा कारभार ऍड हॉक पद्धतीने चालतो. सध्या ह्यांचे ३०३ खासदार आहेत म्हणे पण तरी सुद्धा व्यवहार असा आहे कि ३३ खासदार आहेत. काँग्रेस सरकारने ह्यापेक्षा अर्धे खासदार असून सुद्धा फार दूरगामी कायदे आणि घटना दुरुस्ती भाजपच्या नाकावर टिचून केल्या, भाजप मात्र प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस चीच री ओढत आहे असे वाटते. सध्या मोदी हे सर्वांत लोकप्रिय आणि राष्ट्रीय स्तरावर जबरदस्त शक्ती आणि प्रभाव असलेले नेते आहेत. कुणीही त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही पण समाज उद्या मोदींनी निवृत्ती घेतली तर मला वाटत नाही कि भाजप समर्थ आणि एका आवाजांत दुसऱ्या नेत्याला पुढे आणू शकेल. ज्या पद्धतीने शरद पवार ह्यांनी काँग्रेस फोडली त्या पद्धतीने भाजप चे सुद्धा विभाजन होईल असे मला वाटते.

In reply to by साहना

आपली कुजलेल्या अंडयांची कल्पना आवडली... खरंच काँग्रेस च्या समर्थांककडे एवढी दिवाळखोरी आहे? काँग्रेस मध्ये उत्तम प्रशासक आणि नेते होते आणि आहेत पण गांधी नेहरू परिवारवार एवढा गाढ विश्वास ठेवून त्यांची जनता जी झोपली आहे त्याचा खेद वाटतो... - भारताची आजची परिस्थिती पाहता भाजप आणि काँग्रेस हेच खऱ्या राष्ट्रपातळीवरील पक्ष दिसतात बाकी सगळे प्रत्येक राज्यातील संस्थानिक जणू ... राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांना नेते म्हणून लोक मानतील पण स्वतःचा सवता सुभा काढून ते बसले आणि "राज्यपातळीवर " येऊन बसले .. साधा राज्याचा मुख्यमंत्री पण होता येत नाही स्वबळावर ! असो - मोंदीनंतर कोण हा तात्कालिक प्रश्न आहे ( खरा तर तो नही कारण शाह किंवा गडकरी हा उपाय "तयार" आहे ,, यात बहुतेक गडकरी सरस ठरतील असे वटते कारण जसे बाजपेयी आणि अडववनी तसे गडकरी आणि शहा) .. पण भाजपचा इतिहास बघितला तर भाजप एकापाठोपाठ नेते तयार करण्यात तयार आहे .. संघ जसा आहे तसेच.. संघाचे मूळ किंवा नंतर च्या संस्थपकांना घराणेशाही करता आली असती.. झाली? मुळात बहुतेक अविवाहित पण तरी पुतण्या भाच्या ला पुढे करता आले असते ( लाँच रोहित पवार किंवा युवा सेनापतींना जसे लाँच केले गेले तसे ... असो - मला तरी २-4 गोष्टी काळजीच्या वाटत १) भारतीय जनता व्यक्तिपूजेत वाक्बगार आहे त्यामुळे एखाद्याला राक्षसी मताधिक्य देणे आणि एकदम ते काढून घेणे हे होते ( राजीव ना मिळालेली मते आणि गेली २ निवडणुइक्त काँग्रेस ला भारलेले धुराळा ) यामुळे कदाचित भाजप एकदम १०० war येऊन बसू शकते* ... याला कारण पक्ष तत्व्वर फार कमी चालतात ...भाजप चालते पण त्यांचे तत्व कधी कधी दुधात पाणी मिसळल्या दुधासारखे होते, कम्युनिस्ट त्यामानाने तरी एका तत्व्वर पण जगभर ती विचारसरणी लोकांना पसंद नाही , काँग्रेस चे तत्व स्वान्त्र्य मिळवणे हेच होते त्यानंतर फक्त काँग्रेसचं राज करू शकते हे समीकरण झाले मग कसला तत्व अंडी कसलं काय ! * कदाचित हि भीती अनाठायी असेल सुद्धा ... कदाचित भारतीय जनतेने कॉग्रेस च्या "मध्य डाव्या विचारसरणीला" उत्तर मधून यापुढे "मध्य उजवी " अशी भाजपची विचारसरणी अगदी नेहमीच डोकयावर नाही धरली तरी या मातीत ती आता टिकून राहणार आहे हे स्वीकारले असावे .. असे झाले तर लोकशाही च्या दृष्टीने २ समतोल पक्ष झाले तर चांगलेच आहे २) भाजपत आयाराम गयाराम होऊन त्याचा साचा पार बदलून जाणे याची भीती ... ३) काँग्रेस ने असेच दुर्बल राहणे हे फार चांगले नाही पण घराणेशाही मात्र संपली पाहिजे ४) काँग्रेस वरील अति दवयांचा पगडा आणि भाजप वरील अति उजव्याचा पगडा कमी व्हायला पाहिजे आपल्या संपुन अस्तित्वांत कुठल्याही महत्वाच्या विषयावर ह्या मंडळींनी बौद्धिक काम केलेले नाही. हे विधान मात्र पटले नाही काश्मीर . तीन तलाक सारखया गोष्टीवर बौद्धिक काम केल्यशियवाय त्या झाल्या का? गोव्यात, केरळात आणि आत कदाचित बंगाल मध्ये पाऊलखुणा उमटवला ते बौद्धिक काम ना करता?

नितीन गडकरी सोडल्यास भाजपा मध्ये एकही दुरादृष्टी असणारा मंत्री नाही.. आणि मोदी, अमित शहा असे व्यक्ती केंद्रित राजकारणाचा हव्यास असणारे नेते भाजपा मध्ये असणे हीच भाजपाच्या अस्ताची सुरुवात आहे. भाजपा ला, अटल बिहारी यांच्या सारखा राजाशिष्टाचार पाळणारा नेता पुन्हा पंतप्रधान न लाभणे हे वाईट झाले आहे. अटलबिहारीं च्या वेळेस मी bjp ला त्यांच्या मुळे मतदान केले होते.२०१४ नंतर जे राजकारणाचे जातीय आणि अविकासाचे रूप पाहून खरेच खेद वाटतो. आणि माझ्या पुर्ण जीवनात अजून जरी मी काँग्रेस ला कधीही मतदान केले नसले तरी, लोकसभेला मी काँग्रेस ला मतदान करणार आहे.. जसा तुम्हाला भाजपाला, मोदींना पर्याय दिसत नाही ( तुमचे मत ते काही problem नाही ) तसा मला आताचे भाजपा सरकार निव्वळ ढोंगी सरकार वाटते आहे.. फक्त पुंजीवादाला कवटाळून बसलेले निगरगट्ट, सवाकेंद्री, भुलथापा पसरवून स्वतःची इमेज तयार करणारे सरकार...

In reply to by मुक्त विहारि

पर्याय पर्याय काय लावले आहे.. १३० + करोड लोकसंख्या असणाऱ्या देशात एका माणसाला पर्याय नसणे, असे माणणेच मला कीव करण्या सारखे वाटते. त्यात हि हा काय मसीहा लागून गेलेला नाही, कि याने खूप कल्याण केले आहे.. पर्याय सांगा.. पर्याय सांगा.. मोदी सोडून या देशाला कोणीही पंतप्रधान लाभले तरी ते मोदी यांच्या पेक्षा योग्यच असेल, मग ते भाजपाचे असो नाहीतर भाजपातर..

In reply to by मुक्त विहारि

मोदी यांनी पंतप्रधान पदाची गरिमा इतकी खालची केली आहे कि मला रामदास आठवले पंतप्रधान केले तरी चालतील असे वाटत आहे.. मोदी सोडून कोणी हि म्हणालो तरी तुमच्याकडे पर्याय नाही असे तुम्ही म्हणताय. उलट पर्याय खरे तर तुमच्याकडे नाही..

In reply to by गणेशा

मोदी यांनी पंतप्रधान पदाची गरिमा इतकी खालची केली आहे कि मला रामदास आठवले पंतप्रधान केले तरी चालतील असे वाटत आहे..
हा विनोद आवडला.. आणखी पाठवा.. !!!!

In reply to by गणेशा

मोदी यांनी पंतप्रधान पदाची गरिमा इतकी खालची केली आहे कि मला रामदास आठवले पंतप्रधान केले तरी चालतील असे वाटत आहे. -- याची काही उदाहरणे मिळतील का ? अर्थात असल्यास.

In reply to by गणेशा

रामदास आठवल्यांसारखा आचरट सर्वकालीन विदूषक सुद्धा पंतप्रधान म्हणून मोदींपेक्षा जास्त चांगला वाटत असेल याचा अर्थ मोदी अत्यंत वाईट आहेत व पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत वाईट आहे. अशा व्यक्तीला पुढील निवडणुकीत नक्कीच धडा शिकवून सत्तेवरून पायउतार करेल. परंतु मोदींबद्दल बहुसंख्य जनतेचे मत अजूनही चांगले आहे. बहुमतासाठी जितकी मते आवश्यक असतात, त्याहून जास्त मते त्यांना मिळतात. नुकत्याच जाहीर झालेल्या मतदार सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. पुढील निवडणुकीपर्यंत मोदींनी काही गंभीर चुका केल्या आणि मोदींना सुयोग्य पर्याय निर्माण झाला तर मोदी नक्कीच पराभूत होतील.

In reply to by राज२००९

मनसोक्त भ्रष्टाचार, भ्रष्ट सहकाऱ्यांना संरक्षण, देशाच्या सुरक्षेशी तडजोड, मुस्लिम किंवा तत्सम गटांचे लांगुलचालन व त्यांचे फाजील लाड, देशाच्या शत्रूंसमोर नांगी टाकणे, वरीष्ठांची मर्जी राखण्यासाठी देशहिताशी तडजोड, गुळमुळीत धोरण, निर्णयक्षमतेचा अभाव अशा चुका मी गंभीर समजतो.

सध्या मोदींना एकही पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला हवे असलेले निर्णय गुप्तता राखून अचानक ते उघड करणे व निर्णयांची अंमलबजावणी करणे हे त्यांचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे. निश्चलनीकरण, उरी व बालाकोट येथील अतिरेकी हल्ल्यांनंतर अत्यंत गुप्तता राखून केलेले सर्जिकल हल्ले, अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने कायदेशीर मार्गाने रद्द केलेले कलम ३७०, मुस्लिमातील तात्काळ तोंडी घटस्फोटावर बंदी आणणारा कायदा हे निर्णय त्यांचा निर्धार व योजनाबद्ध आखणीकौशल्य दृग्गोचर करतात. एखादा अपवाद वगळता ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात असे दिसून आले आहे. फार न बोलता व वाच्यता न करता ते निर्णयाच्या दिशेने वाटचाल करतात. परराष्ट्र धोरणासंदर्भात त्यांनी मागील ६-७ वर्षात घेतलेल्या मेहनतीची फळे दिसत आहेत. कोणाच्याही दबावाखाली न येणे व गुळगुळीत आश्वासने ध देता ठाम निर्णय घेऊन ते रेटून नेणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यांनी घेतलेले बहुसंख्य निर्णय दूरगामी परीणाम करणारे आहेत. त्यांचे प्रत्येक निर्णय योग्यच होते असे मी म्हणणार नाही. निश्चलनीकरणाच्या निर्णयाची फारशी अपेक्षित फळे मिळाली नाहीत असे माझे मत आहे. २०२० मधील शाहीनबाग आंदोलन व सध्याचे पंजाबी शेतकऱ्यांचे आंदोलन त्यांनी अत्यंत सोम्यपणे हाताळले असे दिसत आहे. मागील २-३ वर्षांपासून मोदींनी फडणवीस-पाटील या दोघांना मुक्तहस्त देऊन महाराष्ट्रात घेतलेले सर्व निर्णय चुकले आहेत. पंतप्रधान म्हणून मी त्यांना १०० पैकी किमान ८० गुण देईन. किमान २०२९ पर्यंत तेच पंतप्रधान असावे असे माझे मत आह.

In reply to by श्रीगुरुजी

ते शिकल्या सवरलेल्या माणसांना समजत नाही. दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध करू शकत नाहीत. ही वस्तुस्थिति आहे.

भाजपा कडे मोदींशिवाय पर्याय नाही असे मलातरी वाटतं नाही. 1) योगी आदित्यनाथ 2) अमित शाह 3) तेजस्वी सूर्या 4) नितीन गडकरी 5) देवेन्द्र फडणवीस यापैकी कोणत्याही व्यक्तीस पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत असे मला व्यक्तिशः वाटते. तेजस्वी सूर्य अगदीच नवखे आहेत पण जबाबदारी आल्यावर आणि सिनिअर चे योग्य च्या मार्गदर्शनाखाली ते योग्य पद्धतीने हाताळतील असे वाटते. काँग्रेस बाबत बोलायचं झालं तर पंतप्रधान किंवा त्यायोग्य पदाच्या लायक खालील व्यक्ती आहेत 1) राहुल गांधी 2) राहुल गांधी 3) राहुल गांधी . . . Infinity ) राहुल गांधी. इतर पार्टी ( left, NCP, AAP, शिवसेना, tmc, मायावती, अखिलेश इ इ ) यांच्याबाबत न बोललेलेच बरे.

In reply to by बाप्पू

यशवंतराव चव्हाण, यांना पंतप्रधान पदा पासून, आपल्याच मराठी जनतेने दूर ठेवले होते. सुर्याजी पिसाळ यांचा आदर्श ठेवणारे, महाराष्ट्रात कमी नाहीत.

वर म्हंटल्याप्रमाणे '१३० कोटीत देशाची नेत्रुत्व करणारी व्यक्ती असणार नाही" हे शक्यच नाही. ३० कोटीच्या अमेरिकेत ओबामानंतर कोण? हा प्रश्न पडत नाही. ८ कोटीच्या जर्मनीत एंजेला मर्केलनंतर कोण? ह्यावर चर्चा होत नाही. मग १३० कोटीच्या भारतात अशी चर्चा का होते? मोदींचे नाव पंतप्रधानपदी आल्यावर 'त्यानी राज्य सांभाळले आहे. त्याना देश पेलवेल काय?" अशीही चर्चा झाली. असो. राजकीय पदावरील व्यक्ती ही लोकानी लोकशाही व्यवस्थेतून निवडून दिलेली असते म्हणजे ती सक्षम असणारच हे गृहतिक आहे. अध्यक्षपदी/पंतप्रधानपदी असणारी व्यक्ती ही काही विद्वान वगैरे असलीच पाहिजे हा भ्रम गेल्या काही वर्षात अमेरिकेने/ब्रिटनने दूर केला. भारताची स्थिती त्यामानाने बरीच चांगली.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुम्ही फक्त तुमच्या इमारतीच्या अध्यक्ष बना आणि इमारतीचा कारभार उत्तम चालवून दाखवा . बघा जमते आहे का. समाजातील तुम्ही ज्या लोकांना विद्वान समजता त्या लोका मध्ये राजकीय नेत्या एवढी कार्य करण्याची क्षमता नाही.. डिग्री ,शिक्षण आणि राज्य कारभार चालवणे ह्याचा काडी चा संबंध नाही. डिग्री,आणि शिक्षण ह्यांनी फक्त माणसाची लायकी ठरत असते तर कमी शिक्षण असणाऱ्या पण खूप मोठ्या उद्योगाचे मालक असणाऱ्या लोकांच्या हाताखाली खूप साऱ्या degrya घेवून नोकऱ्या करण्याची वेळ आलीच नसती. शिक्षण आणि यश. शिक्षण आणि धडाडी आणि कर्तृत्व. ह्यांचा पण काडीचा पण संबंध नाही.

In reply to by Rajesh188

समाजातील तुम्ही ज्या लोकांना विद्वान समजता त्या लोका मध्ये राजकीय नेत्या एवढी कार्य करण्याची क्षमता नाही.
ही तुलनाच चुकीची आहे. संगणक अभियंत्यामध्ये ह्रुदयाची शस्त्रक्रिया करण्याची क्षमता नाही म्हणण्यासारखे आहे. राजकीय/सामाजिक काम करत असतानाच तुमच्यात क्षमता निर्माण होत असते. राजकीय पद म्हणजे काही क्लिष्ट गणीती प्रमेये सोडवणे नव्हे. सामाजिक्/राजकीय कार्य करण्याची ईच्छा असेल व लोकाना समजून घेणे, त्यांच्या समस्या सोड्वण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतील तर राजकीय पद सांभाळणे कठीण नाही. आम्ही भाजपाचे समर्थक नाही पण गेल्या २०/२५ वर्षात त्यानी विशेष प्रयत्न करूनच त्यांच्या नेत्यांना तशा जबाबदार्या दिल्या आहेत.म्हणूनच मोदींनंतर कोण? शहांनंतर कोण? हे प्रश्न त्यांना पडणार नाहीत असे वाटते.
डिग्री ,शिक्षण आणि राज्य कारभार चालवणे ह्याचा काडी चा संबंध नाही.
तो तसा असावा अशी अपेक्षाही कुणी ठेवत नाही. लोकांमधून निवडून येणे हीच राज्यकारभार करण्यासाठी/सत्तासंपादनासाठी अट ठेवली आहे. सरकारी यंत्रणेत राजकीय नेत्यांना मदतीसाठी आय ए एस्/आय पी एस्/आय एफ एस हे डिग्री/शिक्षण घेतलेले लोक असताच. भारतच नाहे तर बहुतांशी लोकशाही देशांमध्ये हीच पद्धत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

लोकांमधून निवडून येणे हीच राज्यकारभार करण्यासाठी/सत्तासंपादनासाठी अट ठेवली आहे.
असे काही नाही. आपले सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि माजी पं.प्र. मनमोहनसिंग काही लोकांमधुन निवडून आले नाहित. मनमोहनसिंग तर लोकसभा हरले होते. अवांतर: विधानपरिषद, आणि राज्यसभेचे सभासद असलेल्या ह्या दोघांसाठी जितक्या लोकांनी मतदान केले त्याहून अधिक मतदान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी होते. असो.

हे गुजरात चे मुख्यमंत्री होते ते पण यशस्वी मुख्यमंत्री नव्हते. भारतातील बाकी राज्य पेक्षा गुजरात मध्ये वेगळे वातावरण नाही. तिथे भ्रष्ट प्रशासीय व्यवस्था च आहे. तिथे पण प्रचंड बोरोजगरी आहे. तिथे पण सार्वजनिक वाहतुकीचे 12 वाजलेले असतात. तिथे पण सरकारी योजना तळागाळापर्यंत पोचत नाहीत. फक्त आकडेवारी ला कुत्रा पण विचारात नाही . रिअल स्थिती काय आहे हे महत्वाचे. त्या मानाने महाराष्ट्रात अत्यंत चांगली नेतृत्व जन्माला आली आणि त्यांनी मोदी पेक्षा खूप उत्तम राज्य कारभार केला. मोदी ना पर्याय नाही ,bjp ल पर्याय नाही असले प्रश्न फक्त भक्तांना पडतात. इंदिराजी चे व्यक्तिमत्त्व मोदी पेक्षा हजारो पट उत्तुंग होते पण त्यांच्या नंतर नरसिंह सारख्या. व्यक्ती नी सुद्धा उत्तम राज्य कारभार केला. मोदी पेक्षा पण नरसिंह राव,मनमोहन सिंग हे पंतप्रानपदासाठी योग्य होते. भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशात राष्ट्रीय पक्ष हा प्रकार च नष्ट झाला पाहिजे . विविध पक्ष सहभागी असलेले केंद्र सरकार च उत्तम कार्य करेल. राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून त्यांची ताकत कमी केली तर च देश प्रगती करेल आणि सर्वांना न्याय देणारे केंद्र सरकार पण देशाला मिळेल.

In reply to by Rajesh188

नेहरूंनंतर कोण? हा प्रश्न तत्कालिन नेहरू-गांधी घराण्याच्या भक्तांनादेखील पडला होता रे राजेशा. "नेहरूंनंतर काय?" असे विचारल्यावर अत्रे की कुणी म्हणाले होते "नेहरूंनंतर त्यांची अंतयात्रा!" असो आमच्या कुमार केतकरांना तर नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तीच देश उत्तम चालवू शकते असे अजूनही वाटते. "भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशात राष्ट्रीय पक्ष हा प्रकार च नष्ट झाला पाहिजे ." लोकांच्याच हातात आहे ते शेवटी. त्रुणमूल कॉन्ग्रेसचा बंगालमधील कारभार कसा होता ?द्रमुकचा तामिळनाडूतील कारभार कसा होता? यादवांच्या पक्षांबद्दल बोलावे तेवढे कमी आहे. दुकान चालवल्यासारखे पक्ष चालव्णे,अस्मितेचे राजकारण करत स्व्तःच्या तुंबड्या भरणे ह्यापलिकडे बहुतांशी राज्यस्तरीय प़क्षांनी फार काही केले नाही.

In reply to by Rajesh188

हे गुजरात चे मुख्यमंत्री होते ते पण यशस्वी मुख्यमंत्री नव्हते. राजेश १८८ डोक्यावर पडल्यासारखे प्रतिसाद देत आहेत. जो माणूस सलग चार वेळेस मुख्यमंत्री म्हणून निवडून आला तो यशस्वी नाही? तिथे भ्रष्ट प्रशासीय व्यवस्था च आहे. आपल्याला काही अनुभव वगैरे? बाकी कोव्हीड नंतर पुणे महापालिकेतील उंदीर मारायचा विभाग उघडलेला दिसत नाही.

In reply to by सुबोध खरे

मार्मिक.... एवढेच म्हणू शकतो. पण.. उंदीर मारायला देखील काही पात्रता लागत असेल. मिपावर खरडण्यापेक्षा काही अधिक...

व्यक्तीकेंद्रित राजकारण किंवा व्यक्तीपुजा हा भारताला मिळालेला शाप आहे. कुठलीही पार्टी घ्या. जिथे दुसरी पिढी आली तिथे व्यक्तीकेंद्रित राजकारण झाले आहे. मग तिथे डाक्टर चा मुलगा डाक्टर या चालीवर राजकीय वारसा हस्तांतरीत होतो. ज्याने काही काम केले त्याचे श्रेय त्याला मिळणे हे ही होत नाही. आताचे शेतकरी आन्दोलन घ्या. कृषीमंत्री तोमर यांनी ह्या आंदोलनाच्या वाटाघाटी समर्थ पणे हाताळल्या. परंतु "मोदी जी को बात करणी चहिये" हा प्रकार चालु होता. देशात कुठे खुट्ट झाले की "मोदी क्या कर रहे है" वगेरे बाता होतात. मग ते खुट्ट नगर पालिकेचे काम असले तरी .. पियुश गोयल , गडकरी , स्वः सुशमा स्वराज व इतर लोकांनी आपापले काम व्यवस्थीत केले आहे. तरी प्रचार असा केला जातो की .. मोदी किंवा शहा हेच सर्व करत आहेत. याला विपक्ष आणी सत्ताधारी दोघेही जबाबदार आहेत. सक्षम पर्याय सगळी कडे असतात .. फक्त ईच्छाशक्ती असावी लागते. भाजप त्यातल्यात्यात ईतरांपेक्षा थोडी उजवी आहे. कॉन्ग्रेस अजुनही त्या बाबतीत बाल्यावस्थेतच आहे.

In reply to by सुक्या

ज्या पक्षाला असे करणे जमते, तो पक्ष जिवंत राहतो. राहुल गांधी, अपरिपक्व निघाले, म्हणून तर भाजपचे फावले. व्यक्तिपूजा ही राष्ट्राला घातकच असते.... पण, व्यक्तीपूजा करणे, हे अतिशय नैसर्गिक आहे... कळपात राहणार्या सगळ्या प्राण्यांना नेता लागतोच, मग ती माकडे असोत किंवा हत्ती... माणूस हा पण कळपात राहणारा प्राणी आहे, त्यामुळे माणसांना, नेता हवाच.... पण तो नेता लायकी प्रमाणे, निवडून द्यायचे स्वातंत्र्य देखील,लोकशाही राज्य पद्धतित, माणसाला दिले आहे.... भाजप शिवाय, इतर पक्ष, असा लोकमान्य नेता देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिति आहे.

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिपूजा ही राष्ट्राला घातकच असते.... पण, व्यक्तीपूजा करणे, हे अतिशय नैसर्गिक आहे... माझ्या म्हणण्याचा संदर्भ असा कि - भारतीय राजकारणात जी व्यक्तिपूजा चालते ती अति टोकाची असते... त्यामानाने भारतासारख्याच द्विपक्षीय , वेस्टमिनिस्टर पद्धतीवर बेतलेल्या लोकशाही असलेल्या इतर देशात ती फारच कमी प्रमाणात दिसते.. असे का? - येथेही आवडते नेते होऊन गेले पण म्हणून एकतर त्यन्चि जनतेने एवढ्या टोकाची व्यक्तिपूजा केली नाही आणि घराणेशाही नाही ( फर कमि ) (ऑस्ट्रेलिया आणि nueziland चे उदाहरण घेतले तर)

मोदीना भारतात एकच पर्याय आहे तो म्हणजे " शरद पवार साहेब " ! इतके गारूड कुणाकडेही नाही ! पंजाब पुन्हाअस्थिर करण्याचे पातक करू नका असा सल्ला त्यांनी आपल्या दिल्लीतल्या परम शिष्याला दिला आहे ! याचा अर्थ एकच की पंजाब अस्थिर करण्याचे पातक पूर्वीच्या कोणीतरी पी एम नेच केले होते असे पवारांना म्हणायचे आहे ! आज महाआघाडीत " त्या" अस्थिर करणाऱ्या पक्षासह पवार साहेब " सत्तेचे " वाण घेऊन उभे आहेत ! अशी जगलरी ज्यांना जमते असे ते एकमेव नेते ठरावेत ! त्यांच्या पुढे अमेरिका , उत्तर कोरिया ,चीन पाकिस्तान,, तुर्कस्तान सर्वच लोळण घालतील हे नक्की !

In reply to by चौकटराजा

शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यामुळे ते पंतप्रधान होतील असे वाटत नाही.. बजाज म्हणाले तसे, देशाला न मिळालेले ते सर्वोत्तम पंतप्रधान आहेत.

In reply to by गणेशा

ह्यातच, आपल्या विचारांची दिशा समजली .... आता, आपल्या बरोबर संवाद साधणे अशक्य आहे.

In reply to by मुक्त विहारि

मग श्री मोदी, वसंत दादा शुगर च्या येथे, शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत, त्यांचे बोट धरून मी राजकारण शिकलो..असे म्हणाले. त्यावेळेस मोदी तुमची लायकी कळाली असे म्हणण्याची हिम्मत का झाली नाही? कसे आहे, आपले ते विचार आणि दुसऱ्याचे ते अज्ञान हे बंद करा वो, प्रत्येकाचे विचार वेगळे असणारच..

In reply to by गणेशा

त्या वाक्यातील उपरोध तुम्हाला समजलेला दिसत नाही. जेव्हा एखाद्याला आमंत्रण देऊन त्याचा आदरसत्कार केला जातो, तेव्हा यजमानाविषयी वाईट न बोलता उपचार म्हणून चार शब्द बरे बोलले जातात. त्यामुळेच मोदींनी बारामतीत यजमानांची लायकी काढली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सर्व तुम्हालाच कळते का? आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही का? बाकी मोदी जेथे जेथे जातात, तेथे तुम्हीच माझे गुरु तुमच्याच बोटाला धरून राजकारण शिकलो असे प्रत्येक यजमानाला फेकून येतात काय?

In reply to by गणेशा

पवार वगळता मोदींना आजवर किती विरोधी नेत्यांनी स्वतःच्या मतदारसंघात व स्वतःच्या घरी बोलावून त्यांचा आदरसत्कार केला आहे? जे बोलावतील त्यांच्याविषयी मोदी नक्कीच असेच बोलतील. सातत्याने चर्चेत राहण्यासाठी वरीष्ठ नेत्यांना बारामतीस बोलावून त्यांचा आदरसत्कार करणे हे पवारांचे वैशिष्ट्य आहे. त्यातून माध्यमांना जोरदार गॉसिप करता येते व पवार आपोआप चर्चेत राहतात. आलेला पाहुणा यजमान पवारांविषयी चार शब्द बरे बोलतो. पवारांनी पूर्वी चंद्रशेखर, देवेगौडा, प्रणव मुखर्जी अशांना बारामतीत बोलावून आपली पाठ थोपटून घेतली आहे. हे कवित्व त्या भेटीपुरतेच मर्यादीत असते व त्यातून कोणताही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसते.

In reply to by श्रीगुरुजी

आणि लायकी मोदींनी पवारांची नाही, समर्थकांनी मोदींची का काढली नाही असे बोललोय मी..

In reply to by गणेशा

कशाला मोदींची लायकी काढायची? मोदी पवारांना पूर्ण ओळखून आहेत व त्यामुळे ते पवारांच्या धूर्तपणाला फसत नाहीत. २३ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २९ ऑक्टोबरला पवार दिल्लीत जाऊन मोदी व नंतर शहांना डील करण्यासाठी भेटले होते. परंतु दोघांनीही पवारांच्या मागण्या धुडकावून लावल्याने नंतर पवार सेनेबरोबर गेले.

In reply to by श्रीगुरुजी

पंतप्रधान उपरोधिक बोलत आहेत :):) हा हा पंतप्रधान म्हणून नाही मोदी म्हणून तेव्हा ते बोलत होते..ते पण खरं.

In reply to by श्रीगुरुजी

मोदींनी काहीही केले कि "हि त्यांची ५६ मितीतील बुद्धिबळांची जबरदस्त खेळी होती तुम्हा पामरांना समजणार नाही " असा आव भक्त लोक आणतात. मोदींच्या भाषणात उपरोध होता असे वाटत नाही. शरद पवार कितीही भ्रष्ट असले तरी राजकीय दृष्ट्या महत्वाचे आहेत आणि त्यांचा योग्य तो आदर ठेवण्यात शहाणपणा आहे असा विचार करून मोदींनी जाणून बुजून स्तुती केली आहे असे वाटते त्याशिवाय शरद पवार ह्यांचा अनुभव दांडगा आहे आणि काही विषयावर त्यांनी त्यांचा सल्ला घेतला सुद्धा असू शकतो.

In reply to by गणेशा

बजाज यांचे काय मनावर घेता एवढे ? ते पुण्यातूनही निवडून येणार नाहीत ! बजाज चा एकही कामगार वा कुटुंब त्यांना मत देणार नाही ! मग इतर मतदारांची काय कथा ?

In reply to by गणेशा

बजाज म्हणाले तसे, देशाला न मिळालेले ते सर्वोत्तम पंतप्रधान आहेत. हे वाचून खूप हसायला आले.

In reply to by श्रीगुरुजी

शिकला सवरलेला माणूस, एकांगी विचार कसा काय करू शकतो? आपलेच कुठेतरी चुकत आहे. माध्यमांचा इतका पगडा जर, सुशिक्षित माणसांच्या मनावर होत असेल तर, आपलेच चुकत आहे...

In reply to by मुक्त विहारि

तुमचा काही तरी गोंधळ होत आहे . तुमच्या मताशी जे सहमत होत नाहीत. किंवा तुमच्या मनात असलेल्या bjp aani मोदी च्या प्रतीमे विरूद्ध कोणी सत्य मत व्यक्त केले की. एक त्या व्यक्ती ला अडाणी म्हणायचे किंवा शिकला सवरला असून काही कळत नाही अशी कमेंट करायची. ही सर्व मानसिक रोगाची लक्षणे आहेत.

In reply to by मुक्त विहारि

For your kind information, माझ्यावर माध्यम किंवा बातम्यांचा प्रभाव नाहीये, माझे ते मत आहे.. आणि मी कुठलेही it cell च्या मेसेज वर, भडकावू news वर विश्वास ठेवत नाही.. आणि एकांगी विचार तुमचा हि आहेच, फक्त तुम्हाला तो सार्वभौम वाटतो आहे...

In reply to by मुक्त विहारि

तुमचे कसे झाले आहे, पर्याय कुठला हा प्रश्न तुम्ही विचारता, पण पर्याय नाहीयेच हेच मनात बिंबवून ठेवलेले आहे. मग कोणी वेगळे उत्तर दिले कि शिकले सवरलेले आणी फलाना सुरु करायचे..कोणीही इतर म्हणाले तरी नाव सांगा म्हणायचे.. किंवा विनोद फलाना बोलायचे. आणि पुढे काय, कोण? यापेक्षाहि सद्य परिस्थिती मध्ये मोदींना पर्याय नाही असे पाहण्यापेक्षा मला वयक्तिक अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या सारख्या उत्कृष्ट माणसांनंतर असला माणुस पंतप्रधान निवडला गेला आहे त्याचेच जास्त दुःख वाटत आहे... एक जागरूक नागरिक म्हणुन जे चूक ते चूक, असे न म्हणता वेसण घातलेल्या बैला सारखे कोणाला तरी आपला मालक समजुन त्याने म्हणेल ती पूर्व दिशा आणि तोच सर्वात कल्याणकारी असले समजणे मला मुळीच आवडत नाही... प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, तुम्हाला पुढे पर्याय नाही वाटत असेल, तुमच्या मनाने ते योग्य असेल, पण मला हाच पर्याय चूक वाटत आहे, ते माझे मत आहे... आणि त्याच्यावर मला कळत नाही किंवा मीडियाचा प्रभाव असे बोलणे तुम्हाला शोभत नाही.. दुसऱ्यांच्या विचारांचा respect करा.. तर तुमच्या विचारांचा हि विचार केला जाईल.. नाही तर असे १००० धागे रंगवले तरी त्यांचा काडीचाही उपयोग नाही...

In reply to by गणेशा

जातीयवादी शरद पवार हा पर्याय कसा वाटतो ? मला तर अगदी सक्षम पर्याय वाटतो. तुमचे मत काय ?

In reply to by श्रीगुरुजी

आठवले होऊ शकत नाहीत, कारण, तितके खासदार, त्यांना मिळणार नाहीत. राहुल होऊ शकतात .... बटाट्या पासून सोने, अशा अफाट कल्पना ते नक्कीच मांडू शकतात. शिवाय, थायलंड आणि इटली मधून, राष्ट्र कारभार पण हाकू शकतील. गडकरीच कशाला, कुठलाही मराठी माणूस, कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाही.... आपलीच माणसे घात करतात ...

In reply to by मुक्त विहारि

बटाट्या पासून सोने, अशा अफाट कल्पना ते नक्कीच मांडू शकतात. गटारात पाईप टाकून इन्स्टंट गॅस काढणे विसरलात बहुतेक! :) सं - दी - प

In reply to by चौकटराजा

सहमत _/\_ पण त्यांनी एकदा पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं

In reply to by चौकटराजा

त्यांच्या पुढे अमेरिका , उत्तर कोरिया ,चीन पाकिस्तान,, तुर्कस्तान सर्वच लोळण घालतील हे नक्की ! हसून हसून गडबडा लोळायला हवे...

मोदीना भारतात एकच पर्याय आहे तो म्हणजे " शरद पवार साहेब " ! इतके गारूड कुणाकडेही नाही ! हे उपरोधाने लिहिलंय असं मी गृहीत धरतोय. उपरोध नसेल तर हा मोठा विनोद आहे.

In reply to by श्रीगुरुजी

झुकानेवाला चाहिए .... शरद पवार, गेली 35-40 वर्षे राजकारणात आहेत. कधीच एकहाती सत्ता घेऊ शकले नाहीत. फक्त फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत असतात. वसंतराव नाईक ते पृथ्वीराज चव्हाण, ही यादी खूप मोठी आहे. प्रचंड बुद्धीवान माणूस, धरसोड वृत्ती मुळे, लोकांची विश्र्वासार्हता गमावून बसतो.... ह्याचे चपखल उदाहरण म्हणजे, शरद पवार...

मोदी हे उत्तम,सक्षम राज्यकर्ते आहे असे मानले तर मग bjp ची पक्षाची यंत्रणा मोदी विरुद्ध वातावरण निर्माण करत आहेत असे म्हणावे लागेल. कोणतेच तथ्य नसलेले सरकारी कामाविषयी समाज माध्यमावर पोस्ट करणे . हे तर पक्ष च करत आहे ना. नको ते दावे समाज माध्यमावर करणे जे अतिशय निर्बुद्ध असतात. हे पण पक्षाची यंत्रणा च करत आहे. म्हणजे bjp मधूनच मोदी ना विरोध आहे. शक्य होईल तेवढी त्यांची प्रतिमा खराब करण्याचे काम bjp samarthak च करत आहेत. राम मंदिर साठी वर्गणी गोळा करण्याचे अवडंबर माजवणे. पाकिस्तान वर लष्कर नी केलेल्या कारवाई चे अतिशोक्ती युक्त वर्णन करणे. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या हे सत्य असून सुद्धा अर्थव्यवस्था चांगली आहे असे च चुकीचे रेटून बोलणे, कोणत्या ही आंदोलन करणाऱ्या लोकांना पाकिस्तानी हस्तक,किंवा अतिरेकी ठरवणे. Bjp virudh जो बोलेल त्याला देशद्रोही ठरवणे. स्वतंत्र नंतर खडतर स्थिती असताना सुद्धा ज्या विविध राज्यकर्त्या नी देशाला योग्य वळण दिले त्यांचे चरित्र हनन करणे. हे सर्व उद्योग bjp च्या पक्षांची यंत्रणा च करत आहे . आणि ह्या मुळे खरेच मोदी चांगले असले तरी त्यांची प्रतिमा सामान्य लोकांच्या मनातून उतरत आहे. पुढच्या निवडणुकीत यश मिळाले तरी मोदी नको अशी स्थिती निर्माण करण्यासाठी च पक्ष हे करत असेल अशी शंका येते.

In reply to by मुक्त विहारि

130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात खूप पर्याय आहेत. अनेक व्यक्ती आहेत ज्या देश उत्तम चालवू शकतात . तरुण लोकांच्या हातात देश देणे आता गरजेचे आहे. वलय नसलेल्या पण बुद्धिवान नेत्याला पंतप्रधान पद दिले तर ते उत्तम देश चालवतील प्रतेक पक्षात अशी हुशार, तरुण मंडळी आहेत . आणि ती सक्षम पण आहेत. ज्यांच्या भोवती प्रसिध्दी च वलय आहे फक्त त्यांचाच तुम्ही विचार करत आहात. त्या मुळे देशातील सर्व खासदार,आमदार,तुम्हा ला नालायक दिसत आहेत. आणि हे तुमचे मत साफ चुकीचे आहे. स्वतः तुम्हाला पंतप्रधान बनवले तर तुम्ही देश चालवू शकणार नाही का.?