छान आहे लेख. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला इतिहासात रस आहे असे दिसते. आपली आवड मिळतीजुळती आहे बहुतेक.
वरील लेखात एक चूक मात्र सांगविशी आटते, क्षमस्व. 'अप्पर इजिप्त' म्हणजे दक्षिण इजिप्त आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे उत्तर इजिप्त. कारण असे की, नाईल नदी ही जगातिल एकमेव प्रमुख नदी आहे जी उत्तरवाहिनी आहे. आणि म्हणूनच जे नाईलच्या उगमाजवळ ते 'वर' आणि जे शेवटाजवळ ते 'खाली'. हे प्रचिन इजिप्शियन संस्कृति चे एक 'युनिक' असे लक्षण आहे.
'हायरोम्लाइट' हे 'हायरोग्लिफ' असे आहे बहुतेक. 'हिप्पोक्रेटस' ग्रीक होता.
बिपिन.
बिपीन ,
या माहितीबद्दल अनेक धन्यवाद.
दोन्ही बदल लेखात केले आहेत
(अभ्यासपूर्ण मार्गदर्शकांच्या प्रतिसादांमुळे आनंदीत होऊन झालेल्या चुका सुधारण्यास तयार असलेला) सागर
विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच.
अधिक चुका:
तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती.
फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक.
इमोटेस नाही इमहॉटेप
हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो.
हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले.
स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.
प्रियाली ताई ,
सर्वप्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद की हा लेख वाचून त्यांतील नेमक्या उणीवा तुम्ही दाखवून दिल्या.
बर्याच दिवसांपूर्वी (खरे तर अनेक वर्षांपूर्वी ) लिहिलेल्या लेखात चुका असू शकतील याचा विचार न करताच हा लेख प्रकाशित केला होता.
असो.
विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच.
माझा विरस करायचा नाही ही तुमची भावना मला कळाली. आणि मोठ्या मनाने चुका दाखवून देत आहात याबद्दल आपला आभारी आहे.
अधिक चुका:
तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती.
हा बदल केला आहे. आणि अधिक माहितीसाठी एक संदर्भाची लिंक देखील दिली आहे.
फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक.
इमोटेस नाही इमहॉटेप
चुकीची दुरुस्ती केली आहे
हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो.
मी खूप वर्षांपूर्वी एका पुस्तकात ही माहिती वाचली होती. दुर्दैवाने पुस्तकाचे नावही आठवत नाही आणि कोठे याबद्दल संदर्भही सापडत नाहीये. या कारणाने ही अर्थहीन माहिती लेखातून काढून टाकली .
हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले.
चूक एकदम मान्य. माझ्या ग्रीक संस्कृतीच्या लेखनातील हा भाग अनावधानाने कॉपी पेस्ट झाला होता. तो नष्ट केला आहे.
स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.
प्रियालीताई स्पष्ट आणि परखड मतांबद्दल राग का यावा? उलट तुमच्या या स्पष्ट मतांमुळे मलाच हा लेख अचूक करण्यास मदत झाली आहे.
तेव्हा राग तर अजिबात नाही, तुम्ही जेवढ्या अधिक चुका दाखवाल, सूचना कराल तेवढा माझ्यातही बदल हा होणार आहेच. आणि तुमचा हेतु निखळ आणि प्रामाणिक आहे तेव्हा वेळोवेळी यापुढेही तुम्ही तुमची मते सांगून मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती.
धन्यवाद
सागर
इतक्या मोठ्या संस्कृतीचा हा परिचय बर्याच अंगाने तुटपुंजा वाटला. प्रियालीताईंशी सहमत.. लेख बाळबोध आहे. माहितीपर लेख नीट संशोधन करून लिहिल्यास वाचणार्यास वेगळाच आनंद मिळतो.
तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे)
वाईट मानू नका पण पुराणकथांमधे ढोबळपणा चालतो, पण अश्या लेखांत बारिकसा तपशीलही अचुक असण्याची अपेक्षा आहे. असो, आवड आहे तेव्हा तुम्ही अधिक अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास वाटतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
-ऋषिकेश
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश,
तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे)
खरेतर हा लेख मी बर्याच वर्षांपूर्वी लिहिला होता आणि त्यावेळी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला होता.त्यामुळे शैली विस्कळीत वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व आहे. पण हा लेख मी सर्वस्वी माझ्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केला होता.
आणि भाषांतर असावे असा भास जो तुम्हाला झाला त्याकरितादेखील क्षमस्व. पण हा लेख म्हणजे कोणत्याही उतार्याचे भाषांतर नक्कीच नाही हे मात्र मी सांगू शकतो. कदाचित अनेक संदर्भ घेतल्यामुळे त्या त्या ठिकाणी मूळ संदर्भाचा भाव उमटला असेन.
अशाच चुका दाखवून देत रहावे म्हणजे यांपुढील लेखांत अशा चुका टाळता येतील
धन्यवाद
सागर
२००१ साली वडाळा येथील आयमॅक्क्स मध्ये याच विषयावरील एक दोनएक तासांचा लघुपट पाहिला. त्याच्या स्मृति जाग्या झाल्या. जास्त संदर्भ हाताळून विशेष़द्नांच्या मार्गदर्शनाने लिहिले तर मजा येईल. पुलेशु.
त्यामुळे विरस करत नाही पण खूपच सुधारणा हवी. फक्त माहिती व अभ्यासपूर्ण लेख ह्यात फार फरक आहे.
असो.
संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे.
चतुरंग
चतुरंग (हे नाव चतुरस्त्र बुद्धी असल्याचे द्योतक असल्याने आवडले.)
खूपच सुधारणा हवी.
या लेखाकरिता मिळालेल्या तुमच्यासकट अनेक हितचिंतकांचे प्रतिसाद पाहून माझीही अशीच भावना झाली आहे.
आणि यापुढे असे लेखन करताना नक्कीच आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहिन.
संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे.
हा बदल केला आहे.
पुनश्च धन्यवाद
सागर
यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.)
>>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>>
यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही.
>>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>>
इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात.
प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा.
पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या.
पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुष्कर,
यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.)
मान्य, पण ज्ञात असलेली (म्हणजे जिचे पुरावे उपलब्ध आहेत अशी) सुमेरियन संस्कृती ही पहिली मानवी संस्कृती मानली जाते. तसे माया , मायसिनियन आणि मिनोअन या संस्कृतींच्या कालखंडाबद्दलही पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत आहेच.
>>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>>
यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही.
पुष्कर , येथे एक विनंती करावीशी वाटते की , तुमच्याकडे ही माहिती असेल तर कृपया ती द्यावी. कारण माझ्या माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी पुन्हा सूर्यग्रहण होण्यासाठी आजच्या कालमानाप्रमाणे २२ वर्षे लागतात. आणि ६०००-६५०० वर्षांपूर्वी हा काल १८ वर्षांचा असणे अशक्य नाहिये. माहिती अभावी अजून हा बदल मी लेखात केला नाहिये. तुम्ही संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे ही देखील माहिती अद्ययावत करता येईल.
>>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>>
इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात.
येथे गणितच काय पण डोके पण चक्रावले माझे. असो, या.सहज लक्षात येणार्या (खरे तर सहज टाळता येणार्या) चुकीबद्दल क्षमस्व.
प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा.
प्रियालीताई आणि बिपीनरावांचे अनेक धन्यवाद आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत.
पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या.
पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.
या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दबून आणि निराश न होता अधिक जोमाने लेखन करेन. खरे सांगायचे तर तुम्हा सर्व टीकाकारांचा मी आभारी आहे. कारण टीका झाली तरच चुकांत सुधारणा होते. नवीन विषयांवर लेखन करण्याचा मानस नक्की आहे. आणि सुमेरियन , मायसिनियन आणि मिनोअन संस्कृतीवर एका लेखात माहिती देण्याचा विचार आहेच.पाहूयात कसे जमते ते...
धन्यवाद
सागर
ग्रीक समजला जाणारा टॉलेमी ही तत्त्ववेत्ता मुळात इजिप्शियन होता असे वाचले होते. अशी आणखीही काही उदाहरणे असू शकतील.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
टोलेमी हा अलेक्झांडरचा मित्र ज्याने इजिप्तची सत्ता ग्रहण केली तो ग्रीक. तत्ववेत्ता टोलेमी हा नाही. तत्त्ववेत्ता टोलेमी जो इसवी सनानंतर झाला तो रक्ताने ग्रीक पण नागरिकत्वाने इजिप्शियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अभ्यास करून चुका सुधारण्याची तुमची वृत्ती स्तुत्य आहे.
> इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते
> 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे.
यात तुम्हाला त्या राजाचे "दफनगृह" असे तर म्हणायचे नाही? पिरॅमिड या विशिष्ट आकाराच्या इमारती आहेत. त्या वेगळ्या. "राजांच्या दरीत" खडकाळ टेकड्यांत लेण्या कोरून दफनगृहे बांधली गेलीत. पैकी एका लेणीत 'तुतनखामुन' सापडला. तो प्रसिद्ध आहे, कारण ते दफनगृह जवळजवळ परिपूर्ण सापडले, लुटलेले नव्हते. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच होती. पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता.
असो. या निमित्ताने तुमच्या आवडीचा अभ्यास तुमच्याकडून होतो आहे. शुभेच्छा!
>>पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता.
हो आणि किंचित नाही असे म्हणता येईल. महत्त्वाचा राजा नव्हता कारण त्याने ९ व्या वर्षी सत्ताग्रहण केले आणि १८ वर्षी तो मारला गेला त्यामुळे त्याचे राज्य आय/ अय या त्याच्या वजिरामार्फत चालवले गेल्याची शक्यता अधिक पण अगदीच महत्त्वाचा नव्हता असे नाही.
तुतनखामुनचे वडिल आंखनेतन यांनी वेगळा धर्म/ पंथ स्थापन करून मूळ इजिप्शियन धर्म आणि देवता यांवर बंदी घातली. प्रजेत यामुळे प्रचंड असंतोष होता. राज्यात बंड होण्याची चिन्हे होती. तुतनखामुनच्या राज्यात प्रजेला मूळ धर्म पाळायची परवानगी मिळाली. या काळात काही युद्धे लढली जाऊन राज्यात शांतताही प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात तरूण किंग टट युद्ध लढायला गेला नसावा.
पण अर्थातच तुतनखामुन म्हणजे खुफु, रामसीस किंवा क्लिओपात्रा नाही.
भारतीय पुराणकथांकडे बाष्कळ कथा म्हणुन त्यांची अवहेलना करणारे
भारतीय इतिहासाला पराभुतांचा इतिहास म्हणुन हिणवणारे
जे जे भारतीय ते ते त्याज्य मानणारे
सुशिक्षीत लोक इतर देशांच्या इतिहासाविषयी इतके आपुलकिने बोलतात व माहिती ठेवतात हे पाहुन आनंद वाटलाओ
अवांतरः रक्त रक्ताकडे धाव घेते
नाना
प्रतिक्रिया
छान...
दोन्ही बदल लेखात केले आहेत
लेख बराच बाळबोध आहे.
प्रियाली
एकदम हात राखून
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश,
जास्त व्यासंगाची जरूर आहे.
व्यासंग अधिक हवा हे खरे आहे
वाहवा श्री सागर. षटकारच मारलात.
उत्साहाने लिहिले आहेत
यापुढे असे लेखन करताना आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहीन...
उत्साही लेख
धन्यवाद पुष्कर,
टॉलेमी..
मूळ टोलेमी
शिकण्याची हौस स्तुत्य
तुतनखामुन महत्त्वाचा राजा
भारतीय