Work with बाळ
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आजकाल बहुतेकजणांच Work from Home जोरात आहे. त्या वर गाजलेला कुकर शिट्टीचा विनोद आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तुमच्या घरात जर बालमंडळी असतील तर बघायलाच नको. हि बालमंडळी आपल Work कधी, कुठे आणि कस वाढवून ठेवतील ते सांगायलाच नको. वानगी दाखल आमच्या बालाचे काही किस्से इथे नमूद करत आहे.
आमच्या घरातल बाल (वय वर्ष अडीच) Tinker category मधल आहे. म्हणजेच आम्हाला खेळणी खेळायला नको असतात. तर ती उघडून बघणे / खेळणे हाच आमचा सगळ्यात आवडता उद्योग आहे. त्यात सध्या आम्हाला अभ्यासाचे वेड लागले आहे, चुकून जरी ताईची वही किंवा बाबाच्या कामाचे कागद यापैकी कोणतीही गोष्ट दिसली आणि त्यात त्याच्या जोडीला एखाद पेन असल कि मग जमेल तितक्या पानांवर विश्वाची निर्मिती करायची हे आमचे आवडते काम. बरं ते झाल्यावर ताई ज्याप्रमाणे बाबाला किंवा आईला आपला अभ्यास दाखवते, त्याप्रमाणे तिचा अभ्यास घेऊन जेव्हा आमच्या समोर उभी राहते, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून, आता हिला ओरडाव तरी कसं? हा प्रश्न पडतो.
एक दिवस तिने किबोर्डवरच्या Windows Key बरोबर ओळख बरोबर करून घेतली. आता बाबा जेव्हा आपल काम उरकत असतो तेव्हा तिथे जाऊन हळूच Windows Key दाबून पळून जाणे हा एक नवीन उद्योग आहे.
पूर्वी जेव्हा कामाचे फोन येत तेव्हा तिच्या उनाडक्यांना ऊत येत असे. पण, एक दिवस जेव्हा तिच्या आजीने तिला हाताची घडी तोंडावर बोट शिकवले, तेव्हापासून आता कधीही माझा फोन वाजला कि ती सगळ्यात आधी इतरांना तोंडावर बोट ठेवून गप्प करते आणि Complain ची “मै बढ राही हुं बाबा” जाहिरात इथे हमखास आठवते.
खरच पु ल देशपांडेंची काही वाक्ये उचलून म्हणावस वाटत कि “सध्याच्या रणरणत्या आयुष्यात हि बालमंडळीच आपले खरे-खुरे Stress Busters आहेत, हे मात्र खर!!!”
तुमच्या Work from Home मधले बाळांचे असेच काही किस्से असतील तर नक्की सांगा.......
प्रतिक्रिया
हा हा..
Sleep बटणाचा उपयोग
माझी मुलगीपण(वय वर्ष १.५,
खूपच गोड आणि मजेदार अनुभव !
नक्कीच
ही मुलगी पहा. दो अडीच वर्षाची