Work with बाळ

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
20 Oct 2020 - 6:29 pm

आजकाल बहुतेकजणांच Work from Home जोरात आहे. त्या वर गाजलेला कुकर शिट्टीचा विनोद आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तुमच्या घरात जर बालमंडळी असतील तर बघायलाच नको. हि बालमंडळी आपल Work कधी, कुठे आणि कस वाढवून ठेवतील ते सांगायलाच नको. वानगी दाखल आमच्या बालाचे काही किस्से इथे नमूद करत आहे.

आमच्या घरातल बाल (वय वर्ष अडीच) Tinker category मधल आहे. म्हणजेच आम्हाला खेळणी खेळायला नको असतात. तर ती उघडून बघणे / खेळणे हाच आमचा सगळ्यात आवडता उद्योग आहे. त्यात सध्या आम्हाला अभ्यासाचे वेड लागले आहे, चुकून जरी ताईची वही किंवा बाबाच्या कामाचे कागद यापैकी कोणतीही गोष्ट दिसली आणि त्यात त्याच्या जोडीला एखाद पेन असल कि मग जमेल तितक्या पानांवर विश्वाची निर्मिती करायची हे आमचे आवडते काम. बरं ते झाल्यावर ताई ज्याप्रमाणे बाबाला किंवा आईला आपला अभ्यास दाखवते, त्याप्रमाणे तिचा अभ्यास घेऊन जेव्हा आमच्या समोर उभी राहते, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून, आता हिला ओरडाव तरी कसं? हा प्रश्न पडतो.

एक दिवस तिने किबोर्डवरच्या Windows Key बरोबर ओळख बरोबर करून घेतली. आता बाबा जेव्हा आपल काम उरकत असतो तेव्हा तिथे जाऊन हळूच Windows Key दाबून पळून जाणे हा एक नवीन उद्योग आहे.

पूर्वी जेव्हा कामाचे फोन येत तेव्हा तिच्या उनाडक्यांना ऊत येत असे. पण, एक दिवस जेव्हा तिच्या आजीने तिला हाताची घडी तोंडावर बोट शिकवले, तेव्हापासून आता कधीही माझा फोन वाजला कि ती सगळ्यात आधी इतरांना तोंडावर बोट ठेवून गप्प करते आणि Complain ची “मै बढ राही हुं बाबा” जाहिरात इथे हमखास आठवते.

खरच पु ल देशपांडेंची काही वाक्ये उचलून म्हणावस वाटत कि “सध्याच्या रणरणत्या आयुष्यात हि बालमंडळीच आपले खरे-खुरे Stress Busters आहेत, हे मात्र खर!!!”

तुमच्या Work from Home मधले बाळांचे असेच काही किस्से असतील तर नक्की सांगा.......

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

20 Oct 2020 - 7:35 pm | योगी९००

हा हा.. फार क्युट..

माझी मुलगी लहान असतानाचे किस्से आठवले. फार पुर्वी माझ्याकडे नॉर्मल कंप्युटर होता आणि त्याचा सिपीयू जमीनीलगत ठेवला होता. माझी मुलगी रांगत यायची व बरोबर सिपीयूचे पॉवर बटन दाबायची. असे तीन चार वेळा तरी तिने माझे काम बंद पाडले असेल. तिला घट्ट धरून ठेवले तर आरडा ओरडा करायची नाहीतर पायाने का होईना बटण दाबायचीच. नंतर मला यातून बाहेर पडण्यासाठी स्पेशल टेबल आणुन सिपीयू मॉनिटरच्या बाजूला ठेवावा लागला.

शेर भाई's picture

20 Oct 2020 - 11:58 pm | शेर भाई

मोठीसाठी जेव्हा नवीन कॉम्पुटर आणला, तर छोटीने त्याच्या किबोर्ड वरील Sleep बटणाचा उपयोग कसा असतो याचा प्रत्यय दिला. तिच्या भात्यात अजून एक नवीन शस्त्र वाढल आहे.

नचिकेत जवखेडकर's picture

22 Oct 2020 - 6:31 am | नचिकेत जवखेडकर

माझी मुलगीपण(वय वर्ष १.५, जेव्हा तिचं पाळणाघर बंद होतं तेव्हा ) मी फोनवर बोलत असताना मी जे काय बोलीन त्याची नक्कल करायची. समोरचा माणूस हसून हसून वेडा व्हायचा :) पण यातून ती बरेचसे मराठी, इंग्रजी, जपानी शब्द शिकली.

दुर्गविहारी's picture

22 Oct 2020 - 11:05 am | दुर्गविहारी

खूपच गोड आणि मजेदार अनुभव ! घरात लहान मुलं असलं की मजा असते. या सर्व प्रसंगाचे व्हिडीओ शूटिंग करून ठेवा. मुलं मोठी झाली की आठवणी फार मजा आणतात.

शेर भाई's picture

22 Oct 2020 - 3:27 pm | शेर भाई

पण गंमत अशी आहे कि आजकालच्या लेकरांना कॅमेरा भान जरा लवकरच उमगू लागलय.............

ही मुलगी पहा. दो अडीच वर्षाची असेल
समिरा थापा. नेपाळची आहे. तीचे एक्स्प्रेशन्स म्स्तच आहेत.