जीवघेणी खळी
जीवघेणी खळी
नसे गुलाबाचे ओठ कुठे नाक चाफेकळी
तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी .....
नाही नाजूक साजूक दोन हात राबणारे
कसे चंचल म्हणावे, नैन रात जागणारे
असे भाळावरी तेज की चांदण्याचा सडा
किती मधाळ बोलणे, जणू साखरेचा खडा
रानातल्या फुलामध्ये तू ग हासणारी कळी
तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी ........
तुझे पाऊल बघोनी शेती शिवार फुलते
जशी चाहूल लागता, रातराणी ग फुलते
चार मण्यांचा दागिना पुरे गळ्यात डोरले
तुझ्या हाताची ही चव गोड लागते कारले
तप्त उन्हातली गोडी तू ग करवंदी जाळी
तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी ........
किती जिभेला ग धार जशी तलवारी पाती
तुझ्या शब्दाचाही मार घट्ट रोवतात नाती
कधी मनाचा रुसवा शेंडी नाकातून झुरे
उरे गालावर हसू , तूला शृंगार तो पुरे
तू बेभान ग वारा फिरे डोंगराचे घळी
तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी .......
- किरण कुमार
तू बेभान ग वारा फिरे डोंगराचे
अहाहा
अहाहा
सुंदर कविता.
@किरणकुमार
@किरणकुमार
'जीवघेणी खळी'
ही कविता आवडली 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@किरणकुमार
'जीवघेणी खळी'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
वाह! किती सुंदर उपमा आहेत.
धन्यवाद मिपाकरांनो
सुंदर कविता
क्या बात हैं ! सुंदर कविता !
अभिमानास्पद!!
अभिनंदन..!
सुंदरच!
अभिनंदन
हार्दीक अभिनंदन.
हार्दीक अभिनंदन.