Skip to main content

जीवघेणी खळी

लेखक किरणकुमार यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

जीवघेणी खळी

नसे गुलाबाचे ओठ कुठे नाक चाफेकळी तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी ..... नाही नाजूक साजूक दोन हात राबणारे कसे चंचल म्हणावे, नैन रात जागणारे असे भाळावरी तेज की चांदण्याचा सडा किती मधाळ बोलणे, जणू साखरेचा खडा रानातल्या फुलामध्ये तू ग हासणारी कळी तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी ........ तुझे पाऊल बघोनी शेती शिवार फुलते जशी चाहूल लागता, रातराणी ग फुलते चार मण्यांचा दागिना पुरे गळ्यात डोरले तुझ्या हाताची ही चव गोड लागते कारले तप्त उन्हातली गोडी तू ग करवंदी जाळी तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी ........ किती जिभेला ग धार जशी तलवारी पाती तुझ्या शब्दाचाही मार घट्ट रोवतात नाती कधी मनाचा रुसवा शेंडी नाकातून झुरे उरे गालावर हसू , तूला शृंगार तो पुरे तू बेभान ग वारा फिरे डोंगराचे घळी तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी .......
- किरण कुमार



वाचने 11474
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

तू बेभान ग वारा फिरे डोंगराचे घळी तुझ्या सावळ्या गालात सखे जीवघेणी खळी ....... वाह... सखीचे वर्णन निसर्ग अप्रतिम सांगड...

अहाहा

अहाहा


@किरणकुमार

'जीवघेणी खळी'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


अतिशय आवडली लिहित रहा पैजारबुवा,

नाशिक येथील महाकवी कालिदास महोत्सवात किरणकुमार यांच्या जीवघेणी खळी या कवितेला पारितोषिक मिळालं आहे.

अभिनंदन..!


हार्दीक अभिनंदन आणि तुषार सर बातमी करता धन्यवाद पैजारबुवा,