Skip to main content

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 22/11/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती. भन्नाड वारं सुटलं होतं. चमकत्या वीजेच्या प्रकाशात जेव्हा त्याना नाव दिसली तेव्हा केव्हा एकदा नावेत बसून नदी ओलांडून मुलाना भेटू अशी राणीला उत्कंठा लागली होती. हे चित्र मनात आलं जेव्हा, (हंसर्‍या)मुमुक्षुने एक ओळ दिली. "खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव" आणि दुसरी ओळच काय ती लिहायला सांगितलं. पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार?.शेवटी कविताच जन्माला आली. खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड घन घन घटा जमूनी कोसळतील धारा सजणा बिलगू देईना हा खट्याळ वारा नको रे चंद्रा! लपू तू ढगा मागे पडू दे लख्ख चांदणे अमुच्या मार्गे आवर ग! सरिते आता तुझी खळखळ होईना सहन अमुच्या बछड्यांची हळहळ दिसू लागले अमुचे घरटे वटवृक्षा खाली पिल्लाना गोंजारण्याची वेळ आता आली श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2158
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार?.शेवटी कविताच जन्माला आली. काका, कविता छान जन्माला आली आहे. हॉस्पिटलातून घरी आलात का ? ;-) काळजी घ्या. सुरुवातीचे काही दिवस तरी ;-) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

काय बाबा ?काका नको झालाय का?कुठल्या हॉस्पिटलची गोष्ट करतोयस? तुझी तब्यत ठिक आहे ना? अरे विम्याचे पैसे(हाप्ते) फुकट जात आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार?.शेवटी कविताच जन्माला आली. कोणी कवितेला जन्म दिला. मला भलतेच काही संदर्भ आठवले सध्याच्या मिपावरच्या चर्चांवरुन! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती, जो तो आपआपल्या अक्कलेप्रमाणे चर्चा करतो. तुझ्या प्रतिक्रिये बद्दल अभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

आबा, ही कविता म्हणत होतात होय? छान झालीये! मुमुक्षु

In reply to by राघव

हीच कविता मी म्हणत होतो.आणि तुझीच ती कवितेतली पहिली ओळ जीने मला उरलेली कविता लिहायला प्रेरणा दिली. तुला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं.प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com