माझी जॉब चेंज कथा आणि नोटीस पिरियड मध्ये तुम्ही काय करता?

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
9 Jun 2020 - 12:18 am
गाभा: 

जानेवारी 2020 मध्ये मी बेंच वर आलो, नवीन वर्ष्याची सुरवातीलाच पनवती लागली. मी ज्या सर्विस प्रोव्हायडर कंपनीत काम करतो त्यांचा आणि क्लायंट चा करार dec 2019 मध्ये संपुष्टात येणार होता आणि क्लायंट ने तो रिन्यू करणार नव्हता हे जवळपास निश्चित होते. त्यामुळे मी आणि माझ्यासोबत अजुन काही लोकं आम्ही सगळेच बेंच वर येणार असा अंदाज होता.
पण नंतर क्लायंट ने आमच्यातल्या 3-4 जणांना स्वतः च्या पेरोल वर घेऊन भरगोस पगारवाढ देखील दिली.
मी आणि अजुन 2 जणांना आमच्या मुळ कंपनी ने NOC न दिल्याने आम्हाला क्लायंट च्या पेरोल वर जाणे आणि काहीही विशेष कष्ट न घेता 30-40% हाईक घेणे शक्य झाले नाही.
आमच्या प्रोजेक्ट हेडला NOC न देण्याचं कारण विचारले असता त्यांनी टिपिकल मॅनेजर देतात तशी गुळगुळीत आणि गोडगोड उत्तरे दिली.. अरे तुम्ही आपल्या कंपनीचे असेट्स आहात. तुमच्यासारखे टॅलेंटेड रिसोर्सेस आपल्या कंपनीला पाहिजे आहेत.. तुमच्यासाठी कंपनीत खूप नव्या आणि चॅलेंजिंग ऑपॉर्च्युनिटी पाईपलाईन मध्ये आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. Etc etc... हे सर्व ऐकल्यावर आम्ही सर्व खूप खुश झालो.. म्हणलं चला.. कंपनीला आमच्या टॅलेंट ची कदर आहे तर..

याच काळात पर्सनल ई-मेल बॉक्स मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी साठी काही इमेल येत होते. त्यातल्या एका ई-मेल वर ओझरती नजर टाकली.. छान वाटत होता. म्हणजे कंपनी, तिचे रेप्युटेशन, जॉब प्रोफाइल, शिफ्ट टायमिंग हे सर्व मस्त वाटत होत पण त्या इमेलकडे मी दुर्लक्ष केले. सध्या तरी आहे याच कंपनीसोबत लॉयल राहुयात काही ना काही नक्कीच चांगले होईल. आत्ताशी तर 1.5 वर्षे झालेत एवढ्यात कंपनी स्विच करणे हे चांगले नाही आणि रेझूम वर देखील परिणाम होईल.. त्यापेक्षा इथे च थांबू. आपल्याला इतके महत्व दिले जातेय म्हणजे नक्कीच काहीतरी योजना असेल. कदाचित एखादा ऑनसाईट चा प्रोजेक्टही मिळेल.. अशी अनेक स्वप्न पाहत पाहत शेवटी मी आणि माझे 2 सहकारी बेंच वर आलो जिथे बरंच काही शिकायला मिळालं.

1 जानेवारी 2020 पासून मग ऑफिस मध्ये काही काम नसल्याने 8 तास काय करायचे हा प्रश्न होता. पण आम्ही ट्रेनिंग आणि सेल्फ डेव्हलोपमेंट वर ध्यान द्यायला सुरवात केली. 5-6 दिवसांनी आम्ही आमच्या जुन्या प्रोजेक्ट हेड ला कॉन्टॅक्ट करायला सुरवात केली कि बाबा आता सांग तुझे ते कोणते चॅलेंजिंग काम होते ज्यासाठी तू आम्हाला कंपनी त ठेवून घेतलेस. असे नेमके कोणते प्लॅन आहेत आमच्यासाठी, ज्यामुळे तू NOC दिली नाही आमची.
पण कश्याचे काय त्याने आमच्याशी बोलणे तर दूर आमचे फोन उचलणे पण बंद केले. च्यायला कालपर्यंत गोडी गोडी बोलणारा प्रोजेक्ट हेड आता साधा फोन पण रिसिव्ह करायला मागेना.. एखाद्याला उल्लू बनवणे म्हणजे काय हे तेव्हा समजले.

कसाबसा तो धक्का पचवला आणि आम्ही समजून घेतले कि आता हा बेंच च आपला साथी आहे..
जाऊदे.. झालं गेल गंगेला मिळालं आणि पुनःश्च हरिओम म्हणून नवा प्रोजेक्ट शोधायला सुरवात केली. नवा प्रोजेक्ट शोधताना मनावर दडपण देखील होते कि आपल्या स्किलसेटशी मिळता जुळता प्रोजेक्ट नाही भेटला तर लवकरच म्हणजे (3-4 महिन्यात ) हकालपट्टी निश्चित.. म्हणजे एकूणच भविष्य अधांतरी होत. आणि नोकरी जाण्याची तलवार कायम डोक्यावर लटकत असताना स्वतःला upskill करण्यावर देखील लक्ष केंद्रित होत नव्हते. कुठल्यातरी प्रोजेक्ट ला टॅग होऊन सेफ होने पण तितकेच आवश्यक होते.

मग recruitment HR ला कॉन्टॅक्ट करून त्याच्या मागे लागून कसाबसा एक प्रोजेक्ट मिळाला. ( अवांतर - HR हा कोणत्याही कंपनीत काहीही प्रोडक्टीव्ह काम न करता पैसा लुटणारा प्राणी आहे असं माझं स्पष्ट मत आहे.. त्याबद्दल नंतर कधीतरी ). मी नवीन शिकायला मिळेल आणि ज्या स्किल ची सध्या इंडस्ट्रीत मागणी आहे असा प्रोजेक्ट शोधत होतो, आणि मिळालेला प्रोजेक्ट काहीसा तसाच वाटला. म्हणलं चला.. बाकी काही नाही निदान इथे काहीतरी नवीन शिकून थोडं स्वतःला upskill करता येईल एकदा का या नवीन टेकनॉलॉजि शिकलो कि मग वर्षभरानी नवीन जॉब बघू म्हणजे पैसा ही चांगला भेटेल..
HR आणि नवीन मॅनेजर यांनी दोघांनीही मला सांगितले कि अरे अगदी तुला पाहिजे तसा प्रोजेक्ट आहे. तूला ज्या ज्या स्किल वर काम करणे शिकायचे आहे ते सगळे इथे मिळेल. बिंदास जॉईन कर..

आता एवढं सगळं सांगितल्यावर मग मी ही विचार केला. म्हणलं जाऊदेत बेंच वर जास्त काळ राहून नोकरी संकटात घालण्यापेक्षा आलेली संधी निवडावी.. काय जाणो पुन्हा असा प्रोजेक्ट नाही भेटला तर मग एक्सेल आणि वर्ड वरची कामे करायला लावतील किंवा काही महिन्यात नारळ देतील त्यापेक्षा मिळतोय तो प्रोजेक्ट घेऊ..

Feb 2020 पासून नव्या प्रोजेक्ट वर रुजू झालो. सुरवातीला सर्व काही ठीक वाटले पण हळू हळू त्या कामातील फोलपणा लक्षात आला. जे काम 1 दिवसात व्हायला हवे ते इथे 7-8 दिवस करायचे. अगदी सरकारी काम असल्यासारखं. फक्त फॉर्मसोबत खेळायचे..
इथे कामापेक्षा प्रोसेस ला अधिक महत्व दिले जात होते.. तुमचे कोणतेही काम असुद्या तुम्ही पोर्टल वर जा एक फॉर्म भरा आणि सबमिट करा.. मग तो तुमच्या मॅनेजरकडे अप्रूव्हल ला जाईल मग तिथून अजुन एक अप्रूव्हल आणि मग सगळ्यात शेवटी त्या त्या प्रकारची काम करणार्यां टीम ला एक तिकिट assign होणार आणि मग ते त्या तिकिटावर काम करणार त्यांनी काम केले कि मग ती request कंप्लीट झाली.
या सगळ्यात 8-10 दिवस जाणार. समजा एखादा फॉर्म मी चुकीचा भरला तरीही तो फॉर्म सर्व approval प्रोसेस पार करून शेवटच्या टीम पर्यंत जाणार आणि ती टीम तिकिट रिजेक्ट करणार कारण फॉर्म मध्ये काहीतरी चुकीचं आहे. मग पुन्हा नवीन फॉर्म भरायचा.
आपण भरलेला फॉर्म चुकीचा आहे हे समजायला सुद्धा 7-8 दिवस लागणार.. या सर्व कामात माझी जबाबदारी एवढीच होती कि रिक्व्वयरमेंट समजून त्याचा फॉर्म भरून देणे आणि फॉलो अप घेणे.
उदाहरणार्थ, आमच्या अप्लिकेशन साठी जर एखादा नवीन डेटाबेस लागणार असेल तर त्यासाठी लागणारा फॉर्म भरून देणे. त्यात पुन्हा प्रोडक्शन आणि UAT साठी वेगवेगळी फॉर्म्स.
एखाद्याने मिटिंग मध्ये विचारले तर मी सांगणार कि मी नवीन डेटाबेस तयार करतोय. पण खरं तर मी फक्त त्यासाठी लागणारे फॉर्म भरत होतो अक्चुअल काम हे शेवटी DBA टीमच करणार होती ज्यांना सगळ्यात शेवटी त्यासंबंधीचे तिकीट असाइन होईल.

सगळेच काही असे काम नव्हते. काही काम इंट्रेसिंग आणि चांगले देखील होते पण हे प्रमाण 70:30 ase होते. म्हणजे 70 टक्के रद्दड काम आणि 30% डोक्याचे ( IT इंजिनीअर चे काम ).

परिस्थिती सुधारेल या आशेवर कसाबसा एक दीड महिना काढला. मी काम पण चांगले करत होतो तसे क्लायंट कडून फीडबॅक पण येत होते पण मी स्वतः मनातून खुश नव्हतो.. मी खूप अपेक्षा आणि शिकण्याची जिद्द घेऊन या प्रोजेक्ट मध्ये आलेलो पण इथली प्रोसेस आणि काम करण्याची पद्धत पाहून हळू हळू सगळा इंटरेस्ट संपू लागला. तेवढ्यात मार्च महिना उजाडला आणि कोरोना चे संकट दाटु लागले. देशाची अर्थव्यवस्था आणि खूप लोकांच्या नोकऱ्या खड्यात जाणार असा अंदाज येऊ लागला. त्यामुळे आता नवीन जॉबसाठी दुसरी कंपनी शोधणे, त्याठिकाणी हाईक मिळवणे हे सर्वच अशक्य वाटू लागले. त्यामुळे आवडत नसले तरी कसेबसे दिवस ढकलु असा विचार करून रोज वीकएंड ची वाट पाहत दिवस रेटत होतो. पण नंतर लौकडाऊन मुळे घरून काम करत असल्याने घरी चीड चीड होऊ लागली.. तेच तेच रटाळ काम करण्यात मन रमेना. कोणतेही नवीन काम आले कि तोंडातून पहिल्यांदा शिव्या निघायच्या. एखादा फॉर्म भरला आणि तो चुकीचा आहे हे 5-6 दिवसांनी समजले कि आदळआपट करायचो. आणि ज्या व्यक्तीच्या कामासाठी तो फॉर्म भरण्याचे काम करायचो ती व्यक्ती इकडे रोज रोज झाले का काम असा फॉलो अप घ्यायची. मदत करणारे देखील कोणी नव्हते आणि घरातून काम करताना तर ते अशक्य च होत. ऑफिस मध्ये असल्यावर पटकन एखाद्याच्या डेस्क वर जाऊन लगेच विचारता यायचे पण घरून काम करताना ते शक्य नव्हते. दिवसाला 100 एक शिव्या आणि 1-2 वेळेला आदळआपट करून 9 तास कसेतरी पूर्ण करत करत दीड दोन महिने काढले. पण एप्रिल च्या शेवटी शेवटी असह्य होऊ लागले. माझ्या अडचणी बाबत मी डायरेक्ट क्लायंट शी बोलू शकत नव्हतो कारण कितीही झाले तरी ते क्लायंट होते त्यांना मला काम जमत नाही असं म्हणणे म्हणजे माझी आणि कंपनी ची प्रतिमा खराब करणे असे वाटायचे.

इकडे हळूहळू कोरोना चे संकट दिवसेंदिवस वाढतच होते. काय करावे दुसरीकडे जॉब पाहावा का? मिळेल का? असे प्रश्न डोक्यात वारंवार यायचे. एकदा मी आणि बायको बोलत असताना तिला सगळी परिस्थिती सांगितली. पुरुषापेक्षा बायकांमध्ये पेशंन्स आणि प्रॉब्लेम सॉल्विग स्किल चांगले असते असा माझा समज (कि गैरसमज??
:D ) आहे. तिने सगळी गोष्ट शांतपणे ऐकून सल्ला दिला कि तुम्ही दोन ऑप्शनसं एकाच वेळी ट्राय करा.
1) आत्ताच्या कंपनीकडे प्रोजेक्ट मधून रिलीज मागा आणि दुसरा एखादा प्रोजेक्ट देण्याची विनंती करा. कदाचित 1-2 महिन्यात तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट मिळून जाईल.

2) हे करत असतानाच दुसरीकडे जॉब शोधा. कदाचित तुम्हाला थोड्या दिवसांनी किंवा महिन्यांनी चांगला जॉब मिळेलही. प्रयत्न करायला काय हरकत आहे. नौकरी, मॉन्स्टर अपडेट करून टाका.

या दोन्हीपैकी जिकडे पहिल्यांदा यश मिळेल तिकडे जा. प्रॉब्लेम सॉल्व.

बायको IT क्षेत्रात नसून सुद्धा तिचा सल्ला खूपच प्रॅक्टिकल वाटला..

त्याच दिवशी मॅनेजर ला आणि PMO ला एक ई-मेल टाकला ज्यात मी कोणत्या परिस्थितीतुन जात आहे ते सगळं लिहिले आणि प्रोजेक्ट बदलून मिळण्याबाबत विनंती केली.
तसेच त्याच दिवशी नौकरी वर रेझूम अपडेट केला.
आता मी दोन्हीपैकी एकाकडून तरी मार्ग निघायची वाट पाहू लागलो.
लकीली दुसऱ्याच दिवशी मला एका जॉब रिक्वारमेन्ट साठी कॉल आला. समोरची HR आजच interview दया म्हणत होते होते. पाहिला राउंड क्लिअर झाला तर मग उद्या एक आणि परवा दिवशी एक असे अजुन 2 interview होतील. 2 वर्ष्यानंतर हा पहिलाच interview आणि तो ही बिना तयारी कसा द्यायचा.. पण पर्याय नव्हता. मी आज जमणार नाही म्हणालो आणि ती संधीच निघून गेली तर??
मी interview साठी होकर दिला.. पाहिला दुसरा आणि तिसरा असे तीनही राऊंड क्लिअर झालो. कंपनी बाबत थोडा रिसर्च केला. जॉब प्रोफाइल नीट समजून घेतली आणि जॉब ऑफर आली तर accept करायची हे निःश्चित केले.
अजुन पॅकेज चे डिस्कशन व्हायचे बाकी होते. मी अश्या परिस्थितीत होतो कि अगदी 5-10 टक्के हाईक जरी भेटली तरी चालेल पण आत्ता जो काही हूतीयापा करतोय त्यातून बाहेर निघू. लकीली त्यांनी चक्क 50% पगारवाढ दिली. सॅलरी ब्रेकअप पाठवून तुमचे ऑफर लेटर 1आठवड्यात पाठवू असा ई-मेल आला.
हे सर्व अगदी 5 च दिवसातच पार पडले. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे ही तीच जॉब ऑपर्च्युनिटी होती जी मला जानेवारी महिन्यात आवडलेली असून सुद्धा दुर्लक्षित केला होती. .
मी HR राऊंड मध्ये मी थोडे धाडस करून हा प्रश्न विचारला कि ही पोजिशन तुम्ही किती दिवसापासून शोधताय?
उत्तर फारच इंटरेस्टिंग होते.
" गेले 6-7 महिने आम्ही या पोझिशन साठी लायक व्यक्ती शोधतोय पण अजूनपर्यंत कोणी मिळाले नाही. 2 लोकांना सिलेक्ट केले होते पण नंतर त्यांना इतरत्र जास्त पैसे मिळाले त्यामुळे त्यांनी जॉईन करण्यास नकार दिला. आम्ही आशा करतो कि तुम्ही आमची ऑफर accept कराल. "

मी फक्त.. Yes. Its my pleasure to accept this wonderful job opportunity. एवढंच म्हणालो...

पण त्यादिवशी हे समजले कि नशिबात काही गोष्टी अश्या असतात ज्या फक्त आपल्या असतात. कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कदाचित ही जॉब ऑपॉर्च्युनिटी देखील इतके दिवस माझ्यासाठीच थांबली होती...

इकडे 5 दिवस (म्हणजे 1 आठवडा ) झाला तरी माझ्या मॅनेजर ने किंवा PMO ने रिप्लाय दिलेला नव्हता. तो सुट्टीवर होता असे देखील म्हणायला वाव नव्हता. कारण 2 च दिवसापूर्वीच त्याने नियमावर बोट ठेवून माझा शिफ्ट अलोवंस अँप्रोव्ह करता येणार नाही असा ई-मेल पाठवला होता. म्हणजे तो सुट्टीवर नव्हता, त्याने माझे इमेल वाचून सुद्धा रिप्लाय दिला नव्हता. प्रोजेक्ट चेंज करणे हे काही 1-2 दिवसात होणारे काम नाहीये हे मी देखील समजू शकत होतो पण माझ्या विनंतीवजा इमेल ला एक्नॉलेज करणे अपेक्षित होते. जसे कि मला कॉल करून एकंदर परिस्थिती आणि माझ्या अडचणी समजून घेणे, येणाऱ्या काही आठवड्यात किंवा काही महिन्यात काहीतरी मार्ग काढण्याचे आश्वासन देणे किंवा कोरोना असल्याने सध्या काहीच करता येत नाहीये कोरोना संपल्यानंतर एखाद्या नवीन प्रोजेक्ट मध्ये अड्जस्ट करणे असं काहीतरी मार्ग निघू शकत होते पण मॅनेजर ने माझ्या इमेल ला पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.

आता बास.. समजली आपली इथली किंमत. च्यायला याला शिफ्ट अलोवंस सारख्या फुटकळ इमेल ला रिप्लाय करायला वेळ आहे आणि एप्लॉईज च्या अडचणी समजवून घ्यायला साधा एक कॉल पण करता येत नाही. भोxxxत गेला असला मॅनेजर आणि कंपनी. नवीन कंपनी मधुन अजुन ऑफर लेटर यायचे बाकी होते पण बाकी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या होत्या त्यामुळे 99.99% काम झालेलं होते. पुढे काय होईल ते होईल असा विचार करून कंपनी च्या पोर्टल वर login केले. आणि resign टाकून दिले..
आणि काय तो चमत्कार...!!! दुसऱ्याच दिवशी मॅनेजर चा रिप्लाय आला.

"" तुमचे reisgnation काल पाहिले. तुझी अडचण समजली आहे पण प्रोजेक्ट चेंज करण्यासाठी काही प्लॅनिंग करावे लागते आणि ते वेळखाऊ काम आहे. तुम्हाला कंपनी सोडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करता येईल का? ""

अरे भोसxx च्या तुझे डोळे फुटले होते इतके दिवस. 5 दिवसानंतर तू इमेल ला रिप्लाय करतोयस आणि तेसुद्धा माझे resignation पाहिल्यानंतर. मी जर अजुन 1 महिना resign टाकले नसते तर तू तोपर्यत माझ्या ई-मेल कडे ढुंकून सुद्धा पाहिले नसतेस. आता मी मुळावर घाव घातला तर आलास ना गुढघ्यावर. ??

मी देखील आता त्याच्या इमेल ला रिप्लाय नाही द्यायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी मला त्याचा स्वतःहून कॉल आला. त्या कॉल मध्ये त्याने मला माझी अडचण विचारली नाही. त्याचा पाहिला प्रश्न होता कि तुझ्याकडे जॉब ऑफर आहे का? मी म्हणालो कि आहे.
" तो फिर ठीक है. मै थोडा surprise हुआ के कोरोना के समय तुमने resign कैसे डाल दिया? मतलब तुमने बोहोत पेहले से सोच राखा था कि ये जॉब छोडना ही है. तो वो वाला ई-मेल क्यूँ डाला? "

मी त्याला पूर्ण स्पष्टीकरण दिले कि नेमक्या माझ्या काय अडचणी होत्या. आणि ही जॉब ऑफर 5 दिवसांमध्येच मिळालेय. मी गेल्या 5 -6 दिवसापासून च जॉब शोधतोय हे सांगितले.

" कम ऑन, तुम भी और मै भी इस इंडस्ट्री मे इतने सालो से है. इतने जल्दी कोई जॉब ऑफर मिलता है क्या. ऐसा सिर्फ कॅम्पस ड्राईव्ह मे ही होता है कि आप सुबेह जाओ और शामतक या दुसरे दिन जॉब ऑफर लेके आओ. "

हे वाक्य ऐकल्यावर माझा पारा चढला. अरे तुझा संबंध काय मला असले प्रश्न विचारून माझ्यावर संशय घ्यायचा.?? मला दुसरीकडे जॉब ऑफर 1 दिवसात मिळो अथवा 100 दिवसात त्या सगळ्याचा आत्ताच्या आपल्या डिस्कशनशी काय संबंध.
मी किंचितश्या श्या चढ्या आवाजात त्याला म्हणालो कि
" देखो सर. मैने जो भी कहा है वो सच है. आपको यकीन नही हो रहा है तो उसमे मै क्या कर सकता हूं ?? मै मेरे सारे ई-मेल कॉम्युनिकेशन के प्रूफ दिखा सकता हूं. लेकिन ये सब करने का क्या फायदा.. जब आपको doubt ही करना है. "

मॅनेजर थोडासा गडबडला..
" this is not the right tone of talking. Let it be. It is fine. I am happy that you got new job. I wish you a best luck. और आपका सिस्टीम मे जो लास्ट डे है वो वही रहेगा. आप क्लायंट को अपने resignation के बारे मे मत बताना. Ideally you should not disclose this to client. "

मी ओके सर म्हणालो आणि फोन ठेवून दिला. ज्याला रिसोर्सेस च्या अडचणी समजून घेण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये त्याला अजुन काही बोलण्यात किंवा फीडबॅक देण्यात काही अर्थ नव्हता.

त्यानंतर परत माझ्या मॅनेजर शी बोलणे नाही झाले. आता resign टाकून 1महिना उलटून गेलाय. माझी रिप्लेसमेंट म्हणून अजूनतरी कोणी आलेले नाहीये. क्लायंट कडून मिळालेल्या माहितीनुसार माझ्या जागी कोणी नवीन रिसोर्स येणार नाहीये त्यामुळे माझे बिलिंग जे कंपनी ला भेटत होते ते बंद होणार आहे . असो.

आता या अनुषंगाने काही प्रश्न
1) IT मध्ये विशेषतः सर्विस provider कंपन्यांमध्ये असे अनुभव कोणाला आलेयत का? तुम्ही अश्या मॅनेजर सोबत कसे वागता ज्याला फक्त तुमच्यामुळे मिळणाऱ्या बिलिंगशी देणेघेणे आहे. बाकी तुम्ही जगला मेला काहीही फरक पडत नाही.

2) मी अजूनही त्याच प्रोजेक्ट मध्ये तेच रटाळ काम करतोय. अजुन 3 आठवडे आहेत. या दरम्यान मी स्वतः फ्रस्ट्रेट होऊ नये यासाठी काय करू.

3) मला माझा नोटीस पिरियड 7-8 दिवसांनी कमी करायचाय. ( करायचाच आहे असं काही नाही. पण झाला तर चांगलेच आहे ) त्यासाठी या सिच्युएशन मध्ये मला काय करता येईल?

4) तुम्ही तुमच्या नोटीस पिरेड मध्ये काय करता? नोटीस पिरेड मध्ये आपण कसे काम करावे?
याआधीच्या 4 कंपन्यांमध्ये मी अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत मन लावून काम केलेय पण इथे काम ही त्या लायकीचे नाहीये आणि कंपनीने आणि माझ्या मॅनेजरने दिलेल्या वागणुकीमुळे इथे काम करायला मन तयार होत नाहीये. तर IT वाले मिपाकर काय सल्ला देतील??

प्रतिक्रिया

Q १ - हि परिस्थिती बऱ्यापैकी कॉमन आहे. स्वतःवर अली कि पहिल्यांदी वाईट वाटतं, नंतर लक्षात येतं कि बरीच माणसं पाट्या टाकणारी असतात, त्यामुळे जास्त विचार करू नका.
Q२ - तुमच्या नवीन जॉबच्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये "येत असल्यास उत्तम (nice to have skills )" असे काही स्किल्स असतील आणि तुम्हाला ते येत नसेल तर जमल्यास एखादा ऑनलाईन कोर्स करा. Lynda.com वर udemy.com वर तुम्हाला तुमच्या फील्ड मधले बरेच कोर्सेस मिळतील. ह्या साईट्स नंतर सर्टिफिकेट पण देतात. माझ्या माहिती प्रमाणे १०००-५००० Rs मध्ये बरेच कोर्सेस मिळू शकतील. जर पैसे जास्त वाटत असतील तर youtube वर सुद्धा बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत, पण सर्टिफिकेट मिळणार नाही. घरून काम करताय आणि काम कमी आहे त्यामुळे हे ३ आठवडे जास्तीत जास्त शिकण्यासाठी वापरू शकता.

Q ३ - माझ्या एका कलीगच्या नवीन कंपनी ला त्याला लवकर हायर करायचं होतं, पण इकडचा नोटीस पिरियड आड येत होता. नोटीस पिरियड च्या आधी सोडली तर पगार + काही दंड द्यावा लागणार होता. त्याने नवीन कंपनीला सांगितलं कि मी लवकर यायला हवं असेल तर नोटीस पिरियड + दंड चे पैसे भरा, मी येतो. तो खूपच हुशार होता + नवीन कंपनी मध्ये त्याची गरज होती (क्लायंट ला दाखवायला माणसं लागतात त्याप्रमाणे पैसे मिळतात). त्यामुळे त्यांनी पैसे दिले. आणि तो नवीन कंपनी मध्ये लवकर रुजू झाला. असं काही करता आलं तर बघा. नाहीतर ७-८ दिवस जास्त नाहीयेत.

Q ४ - मी शक्यतो माझे काही राहिलेले टास्क नाहीयेत ना ते बघते. जमल्यास माझ्या कामाचे स्क्रीन शॉट सकट डोकमेंट्स बनवून मॅनेजर ला फॉरवर्ड करत राहते, त्यामुळे जॉब सोडल्यावर मला जुन्या कंपनी मधून कामासाठी फोन यायची शक्यता कमी होते.

याआधीच्या 4 कंपन्यांमध्ये मी अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत मन लावून काम केलेय पण इथे काम ही त्या लायकीचे नाहीये आणि कंपनीने आणि माझ्या मॅनेजरने दिलेल्या वागणुकीमुळे इथे काम करायला मन तयार होत नाहीये. तर IT वाले मिपाकर काय सल्ला देतील??

आपला काम आपल्यानंतर येणार प्रत्येक जण बघतो, त्यामुळे ते चांगलाच करा, मॅनेजर पण उद्या जाईल कंपनी मधून पण तुमचं काम तिथेच राहिलं. त्यामुळे ते चांगलंच करा. माझ्याकडून एका ठिकाणी टीम मधल्या लोकांच्या वागण्यामुळे काम करताना चुका झाल्या त्या अजूनही आठवतात. तेव्हा लहान होते म्हणून चिडून बसले होते, आता लोकांच्या वागण्यामुळे कामाकडे दुर्लक्ष अजिबात करत नाही.

बाप्पू's picture

9 Jun 2020 - 8:05 pm | बाप्पू

प्रतिसादाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सध्या तरी नीट काम करतोय. अगदी आवडत नसले तरी फॉर्मॅलिटी म्हणून का असेना पण करतोय.

तुर्रमखान's picture

9 Jun 2020 - 2:54 am | तुर्रमखान

पण ज्युनिअर स्टाफची पेपर टाकल्यावर मॅनेजरची कशी जिरवली? अशी जी कल्पना असते त्यात शष्प तथ्य नसतं. तो ते सगळं एक शुल्लक फॉरमॅलिटी म्हणून करत असतो.

कानडाऊ योगेशु's picture

9 Jun 2020 - 9:36 am | कानडाऊ योगेशु

1) IT मध्ये विशेषतः सर्विस provider कंपन्यांमध्ये असे अनुभव कोणाला आलेयत का? तुम्ही अश्या मॅनेजर सोबत कसे वागता ज्याला फक्त तुमच्यामुळे मिळणाऱ्या बिलिंगशी देणेघेणे आहे. बाकी तुम्ही जगला मेला काहीही फरक पडत नाही.

मॅनेजर साठी तुम्ही एक बिलेबल रिसोर्सेस आहात अन्य काही नाही आणि हे आय.टी मधले त्रिकालाबाधित सत्य आहे. मॅनेजर चांगला जरी असला असता तरी त्याचा दृष्टीकोन हाच असला असता. किंबहुन तुम्हीही जेव्हा मॅनेजर व्हाल तेव्हाही तुम्हाला असेच वागावे लागेल.

2) मी अजूनही त्याच प्रोजेक्ट मध्ये तेच रटाळ काम करतोय. अजुन 3 आठवडे आहेत. या दरम्यान मी स्वतः फ्रस्ट्रेट होऊ नये यासाठी काय करू.

हा काळ एरवी खरेतर हनिमून पिरिएड समजला जातो पण लॉकडाऊन मुळे कदाचित सगळाच गोंधळ होऊन बसला आहे म्हणुन तुम्ही फ्रस्टेट झाला असावा.एक सल्ला हा देऊ इच्छितो कि जॉबच्या अजुन चांगल्या संधीच्या शोधात राहा.तुम्ही तेवढेच अ‍ॅक्टीव राहाल.सध्या जी ऑफर हातात आहे ती स्वीकारणे अथवा नाकारणे सर्वस्वी तुमचा निर्णय आहे पण प्लॅन बी पण हाताशी असु द्या.

3) मला माझा नोटीस पिरियड 7-8 दिवसांनी कमी करायचाय. ( करायचाच आहे असं काही नाही. पण झाला तर चांगलेच आहे ) त्यासाठी या सिच्युएशन मध्ये मला काय करता येईल?

एच.आर शी बोलुन पाहा. काम झाले असल्यास तसे कळवा. ह्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल. मॅनेजरशी बोलुन पाहा कि जर तुमच्यावर काही डिपेन्डन्सी नसेल तर लवकर रिलिव करण्यात काय अडचणी आहेत वगैरे.

4) तुम्ही तुमच्या नोटीस पिरेड मध्ये काय करता? नोटीस पिरेड मध्ये आपण कसे काम करावे?

वर उल्लेखिलेल्या प्रमाणे करोनापूर्व काळात हा पिरेड हनिमून पिरेड असायचा त्यामूळे असा प्रश्न कधी पडल्याचे आठवत नाही.पण मुद्दा क्र. २ मध्ये म्हटल्याप्रमाणे गो फॉर बेटर ऑपोर्टुनिटिज.( हे संधीखोर होण्यासाठी म्हणत नाही आहे पण प्लॅन बी हाताशी असु द्या.)
बाकी नवीन जॉब बद्दल शुभेच्छा.

शेवटच्या दिवसापर्यंत मन लावून काम करा (इच्छा असो नसो),
कंपनी ऍडरेस प्रूफ , इन्कम प्रूफ, लास्ट सॅलरी स्लिप्स वैगरे डॉक्युमेंट चा एक सेट तयार करून घरी पर्सनल दफ्तारात असू दे.
मान खाली घालून काम करा, एक्सपेरिअन्स लेटर व फुल्ल अँड फायनल मिळे पर्यंत पंगे घेऊ नका (ई-मेल लेखी तर अजिबात नक्को)
कुठल्याही सोशल मीडियावर कुठलेही कॉमेंट (कंपनीबाबत इ ) टाकू नका.
स्वाईप इन स्वाईप आउट मधील किमान अंतरापेक्षा १० मिनिटे जास्त अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा..

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2020 - 12:36 pm | टवाळ कार्टा

+1

मोदक's picture

9 Jun 2020 - 8:57 pm | मोदक

एक सुचवू का..?

प्रॉडक्ट बेस्ड कंपनीत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा. फालतू गोष्टींमध्ये डोक्याला होणारा त्रास सर्विस बेस्ड कंपनीपेक्षा हजार पटीने कमी असतो असा अनुभव आहे.

...आणि कितीही नाकारले तरी, अनेक गोष्टी मॅनेजरच्या मतानुसार चालतात त्यामुळे डोक्यावर बसलेला मॅनेजर येडा असेल तर गुगल असो की मायक्रोसॉफ्ट; आपण घरी जाताना त्याला शिव्या देतच जाणार हे नक्की. (मॅनेजर येडा आहे असे आपल्याला नेहमी वाटते पण तसे प्रत्येकवेळी नसते)

बाकी तुमचे स्किलसेट आणि बाकी गोष्टी लिहिणे शक्य असेल तर जरूर लिहा.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मोदक.
हो. जिथली ऑफर आहे ती एक प्रॉडक्ट बेस कंपनी च आहे.
माझ्या 8-9 वर्ष्यापैकी जवळपास नेहमीच मी सर्विस बेस्ड कंपनी मध्ये. काम केलेय..
आता जिथे जातोय तिथले reviews चांगले आहेत. बघुयात काय काय होतायेत ते..

मोदक's picture

9 Jun 2020 - 9:13 pm | मोदक

>>> 1) IT मध्ये विशेषतः सर्विस provider कंपन्यांमध्ये असे अनुभव कोणाला आलेयत का? तुम्ही अश्या मॅनेजर सोबत कसे वागता ज्याला फक्त तुमच्यामुळे मिळणाऱ्या बिलिंगशी देणेघेणे आहे. बाकी तुम्ही जगला मेला काहीही फरक पडत नाही.

अशा वेळी तुम्ही पण "मिळणारा पगार भागिले ३०" हे गणित करून आज किती पैसे बँकेत आले असतील असा हिशेब करा आणि जितक्यास तितके संबंध ठेवा. मात्र हे करताना सेल्फ डेव्हलपमेंट आणि लर्निंग कडे आजिबात दुर्लक्ष करू नका. हे ठरवा की कामात चुका आजिबात करायच्या नाहीत जेणेकरून त्याला कांही बोलायची संधी मिळेल. वेळेवर निघणे, सुट्ट्या घेणे वगैरे गोष्टी नियमीतपणे सुरू ठेवा. घरी जाऊन काय करतोस वगैरे प्रश्न आलेच तर व्यायाम, स्वयंपाक अशी उत्तरे बिन्धास्त द्या. "आजचे काम झाले आहे, मी निघतो आहे" असे निघताना आठवणीने सांगा. हे ऐकल्यावर तो आणखी कांहीतरी काम काढून देईल. एक दोन वेळा ते करा आणि तिसर्‍या वेळेस सकाळीच जाऊन विचारा की आज काय अ‍ॅड-हॉक काम आहे.. थोडक्यात तेल लावलेल्या पैलवानासारखे धोरण अवलंबा.

>>>2) मी अजूनही त्याच प्रोजेक्ट मध्ये तेच रटाळ काम करतोय. अजुन 3 आठवडे आहेत. या दरम्यान मी स्वतः फ्रस्ट्रेट होऊ नये यासाठी काय करू.

कंपनीच्या इंट्रानेटवर अनेक उपयोगी पाने असतात. बर्‍यापैकी आकाराची कंपनी असेल तर "जपानमध्ये गेल्यावर लोकांशी कसे वागाल.. जर्मनीत कसे वागावे.. कुठे काय गोष्टी निषिद्ध आहेत" वगैरे ढिगभर माहिती असते, ते वाचा. दीड वर्षात तुम्हाला मिळालेले अ‍ॅप्रिसिएशन्स शोधून शक्य झाले तर स्वत:च्या पर्सनल मेल आयडीवर पाठवून ठेवा. नाहीतर सरळ प्रिंट काढा.

>>> 3) मला माझा नोटीस पिरियड 7-8 दिवसांनी कमी करायचाय. ( करायचाच आहे असं काही नाही. पण झाला तर चांगलेच आहे ) त्यासाठी या सिच्युएशन मध्ये मला काय करता येईल?

बिलेबर रिसोर्स साठी असे शक्यतो कोणी करत नाही आणि पुरेसे बफर रिसोर्स नसतील तर मी ही असा नोटिस पिरीयड कमी केला नसता. नोटिस पिरियडमध्ये दर महिना १ किंवा २ सुट्ट्या घेण्याची परवानगी असते. ती पॉलिसी शोधून काढा आणि त्या सुट्ट्या घ्या हव्या तर.

>>> 4) तुम्ही तुमच्या नोटीस पिरेड मध्ये काय करता? नोटीस पिरेड मध्ये आपण कसे काम करावे?
याआधीच्या 4 कंपन्यांमध्ये मी अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत मन लावून काम केलेय पण इथे काम ही त्या लायकीचे नाहीये आणि कंपनीने आणि माझ्या मॅनेजरने दिलेल्या वागणुकीमुळे इथे काम करायला मन तयार होत नाहीये. तर IT वाले मिपाकर काय सल्ला देतील??

वर दिले तेच उत्तर. पगार भागिले ३०.

आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट - जर तुमचा वैयक्तिक विमा नसेल तर एक कंपनी सोडल्यानंतर आणि दुसरी जॉईन करण्यापूर्वी तुम्ही "कोणत्याही विम्याशिवाय जगणार आहात" याची खूणगाठ बांधून ठेवा.

एकदा नवीन कंपनी जॉईन केली की तुम्हाला आपोआप विमा मिळतो. जॉईन करण्यापूर्वी तसे नसते.

हे अत्यंत साहजिक आहे पण अनेक लोकं हे विसरतात - म्हणून मुद्दाम सांगितले आहे.

बाप्पू's picture

10 Jun 2020 - 12:04 pm | बाप्पू

कुठेतरी ऐकलं होत कि कंपनी मध्यावर सोडली तरी पूर्ण वर्ष्यासाठी चा इन्शुरन्स असतो म्हणून.

HR ला विचारून पाहतो.

नोकरीचा शेवटचा दिवस, कंपनी कॅम्पस बाहेर पडलात ... की संपला इन्शुरन्स ...

बाप्पू's picture

10 Jun 2020 - 7:25 pm | बाप्पू

ओके..

ढब्ब्या's picture

9 Jun 2020 - 11:36 pm | ढब्ब्या

अगदी अशाच अनुभवातून गेलेलो आहे.

आता एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे everyone is replaceable. तोंडावर कितिही 'तु लै भारी' असे म्हणले तरी खरे असेलच असे नाही.

Stay updated, Stay informed and Stay true and keep communicating एवढं तत्व नेहमी वापराल तर पुढे वाटचाल सुकर होते, असा स्वानुभव आहे.

====

आता या अनुषंगाने काही प्रश्न
1) IT मध्ये विशेषतः सर्विस provider कंपन्यांमध्ये असे अनुभव कोणाला आलेयत का? तुम्ही अश्या मॅनेजर सोबत कसे वागता ज्याला फक्त तुमच्यामुळे मिळणाऱ्या बिलिंगशी देणेघेणे आहे. बाकी तुम्ही जगला मेला काहीही फरक पडत नाही. => अगदी अशाच अनुभवातून गेलेलो आहे. स्वतःला अनुभवस्म्रूध्ध झालो असे समजावे.

2) मी अजूनही त्याच प्रोजेक्ट मध्ये तेच रटाळ काम करतोय. अजुन 3 आठवडे आहेत. या दरम्यान मी स्वतः फ्रस्ट्रेट होऊ नये यासाठी काय करू. => तुमचा मॅनेजर फरच कुशल दिसतोय, नोटीस पिरियड वर असलेल्या कडुन काम करुन घेतोय :)
फ्रस्ट्रेट होऊ नये म्हणून सेल्फ लर्निंग चालू करा.

3) मला माझा नोटीस पिरियड 7-8 दिवसांनी कमी करायचाय. ( करायचाच आहे असं काही नाही. पण झाला तर चांगलेच आहे ) त्यासाठी या सिच्युएशन मध्ये मला काय करता येईल?
विचारून बघा. पूछने मे क्या जाता है?

4) तुम्ही तुमच्या नोटीस पिरेड मध्ये काय करता? नोटीस पिरेड मध्ये आपण कसे काम करावे? => नविन जॉब साठी सेल्फ लर्निंग, आराम आणी केटी प्लान पूर्ण केला हे दाखवणे.

विचारून बघा. पूछने मे क्या जाता है?

विचारून पहिले.. नाही म्हणाले..
त्यामुळे आता राहिलेल्या सुट्ट्या आणि comp ऑफ संपवेन म्हणतो..

कोणती कंपनी हे व्यनि करून सांगू शकाल ?मी अशीच कंपनी शोधतोय जिथे काम कमी ,बाकी वेळ मी फ्रीलान्स करत असतो

पहाटवारा's picture

11 Jun 2020 - 1:53 am | पहाटवारा

डोंट बर्न द ब्रिजेस - अर्थात - पूर्वाश्रमींच्या लोकांशी सम्बंध बिघडवून जाऊ नका !
कधी तुम्हाला अशा पूलावरुन परत जायची वेळ येउ शकते .. तर कधी तिकडचे कुणी त्याच पूलावरून तुमच्याकडे येउ शकतात :)
डोक्यावर बर्फ अन तोंडात साखर हा फोर्मुला सगळिकडे कामाला येतो.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jun 2020 - 9:24 pm | प्रसाद गोडबोले

मला माझ्या जॉब चेंज कथेची आठवण झाली !

1) IT मध्ये विशेषतः सर्विस provider कंपन्यांमध्ये असे अनुभव कोणाला आलेयत का? तुम्ही अश्या मॅनेजर सोबत कसे वागता ज्याला फक्त तुमच्यामुळे मिळणाऱ्या बिलिंगशी देणेघेणे आहे. बाकी तुम्ही जगला मेला काहीही फरक पडत नाही.

>>> येस , एक्षच्टली असेच असते . मॅनेजर ला त्याची फायनान्शियल टर्गेट्स अचिव्ह करयचीच असतात नाहीतर त्याच्या बोनस वर परिणाम होणार असतो . मी तर बर्‍याच हुच्च पदावर असुनही कंपनीचे डायरेक्टर आपल्याला केवळ एक बिलेबल रिसोर्स समजतात हे लक्षात आल्यावर मी एका महिन्यात जॉब सोडलेला !
पण ह्याला पर्याय नाही . आपण स्वतः डायरेच्टर लेव्हल ला पोहचत नाही तोवर हे असेच रहाणार !

2) मी अजूनही त्याच प्रोजेक्ट मध्ये तेच रटाळ काम करतोय. अजुन 3 आठवडे आहेत. या दरम्यान मी स्वतः फ्रस्ट्रेट होऊ नये यासाठी काय करू.

प्रचंड करण्यासारखे असते ! सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे पर्सनल रिल्शन्स डेव्हलप करा कलीग्स सोबत. समान लेव्हल च्या अन ज्युनियर सुध्धा ! जास्तीत जास्त टी ब्रेक्स घ्या लोकाशी चर्चा करा . त्यातीक अन्य कोणी कंटाळले आहे का ह्यचा शोध घ्या . हे तुमचे भविष्यत उत्तम कलीग्स होऊ शकतात आणि विशेष म्हणाजे तुम्ही आपुलकीने आणि निस्वार्थीपणाअने डेव्हलप केलेले रिलेशन्स भविष्यात नक्कीच फायदा देतात. मी माझी जुनी कंपनी सोडुन दीद वर्ष झालं आहे तरीही कित्येक कलीग्स माझा कॉन्टॅक्ट मध्ये आहेत , कित्येकांचे सीव्ही मी पुढे ढकलले आहेत आणि कित्येकांनी माझा सीव्ही पुढे ढकला आहे !!

3) मला माझा नोटीस पिरियड 7-8 दिवसांनी कमी करायचाय. ( करायचाच आहे असं काही नाही. पण झाला तर चांगलेच आहे ) त्यासाठी या सिच्युएशन मध्ये मला काय करता येईल?

हे तर अगदीच सोप्पे आहे . तुमची न्युसन्स पावर लक्षात आली तर मॅनेजमेंट स्वतःहुन तुम्हाला लवकर रिलिज करेल. आमच्या कंपनीत २ महिने नोटीस पिरीयड होता , अन बर्‍याच सीनीयर लेव्हल ला असल्याने पर्यायी रोसोर्स शोधणेही अवघड होते पण तरीही मी ८ जानेवारीला रेजिगनेशन टाकुन ३१ ला रीलीज झालेलो !!! फक्त ३ आठवड्यात ! मी फक्त एकच काम केले की प्रॉजेक्ट , क्लायंट , ऑन शोअर पार्टनर्स, लोकल डायरेक्ट्र्स विषयी माझ्या टीम मध्ये आणि अन्य टीम मध्येही एकदम मोकळे पणाने आणि १००% खरे खरे "पुराव्याने शाबीत करता येईल" असे स्पष्ट बोलायला सुरुवात केली ! ( इथे सर्वात मोठ्ठा कॉषन म्हणजे अजिबात ०.००१% सुध्दा अतिषयोक्ती करायची नाही , पुराव्याने सिध्द करता येईल तितकेच बोलायचे . ) त्याचा परिणाम इतका झाला की लोकं सरळ सरळ त्या प्रोजेच्ट वर काम करायला नकार द्यायला लागली, ज्यांना सक्तीने त्या प्रोजेक्ट मध्ये टाकले ते ओपनली क्रिब करायला लागली , बाहेर जॉब शोधायला लागली ( मला सगळं टी ब्रेक्स मध्ये वन ऑन वन चॅट्स मध्ये , वॉक अँड टॉक मीटिंग्स मध्ये कळत होतेच.)
शेवटी माझ्या डायरेक्टर चा मला फोन आला की देअर इज नो पॉईंट इन होल्डिंग यु बॅक!!

4) तुम्ही तुमच्या नोटीस पिरेड मध्ये काय करता? नोटीस पिरेड मध्ये आपण कसे काम करावे?
याआधीच्या 4 कंपन्यांमध्ये मी अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत मन लावून काम केलेय पण इथे काम ही त्या लायकीचे नाहीये आणि कंपनीने आणि माझ्या मॅनेजरने दिलेल्या वागणुकीमुळे इथे काम करायला मन तयार होत नाहीये. तर IT वाले मिपाकर काय सल्ला देतील??

काम टाळु नका पण उलट जास्तीत जास्त लोकाना तुमचे काम कसे महत्वाचे असुनही मॅनेजरच्या लेखी किंमत नाहीये हे दाखवत रहा . जास्तीत जास्त कलीग्स शी वन ऑन वन चर्चा करा , पर्सनल कॉन्टॅक्स बिल्ड करा .
Break only those bridges which you have no intentions to walk ever again.

एन्जोय द नोटीस पीरीयड !!