माझी जॉब चेंज कथा आणि नोटीस पिरियड मध्ये तुम्ही काय करता?
जानेवारी 2020 मध्ये मी बेंच वर आलो, नवीन वर्ष्याची सुरवातीलाच पनवती लागली. मी ज्या सर्विस प्रोव्हायडर कंपनीत काम करतो त्यांचा आणि क्लायंट चा करार dec 2019 मध्ये संपुष्टात येणार होता आणि क्लायंट ने तो रिन्यू करणार नव्हता हे जवळपास निश्चित होते. त्यामुळे मी आणि माझ्यासोबत अजुन काही लोकं आम्ही सगळेच बेंच वर येणार असा अंदाज होता.
पण नंतर क्लायंट ने आमच्यातल्या 3-4 जणांना स्वतः च्या पेरोल वर घेऊन भरगोस पगारवाढ देखील दिली.
मी आणि अजुन 2 जणांना आमच्या मुळ कंपनी ने NOC न दिल्याने आम्हाला क्लायंट च्या पेरोल वर जाणे आणि काहीही विशेष कष्ट न घेता 30-40% हाईक घेणे शक्य झाले नाही.
आमच्या प्रोजेक्ट हेडला NOC न देण्याचं कारण विचारले असता त्यांनी टिपिकल मॅनेजर देतात तशी गुळगुळीत आणि गोडगोड उत्तरे दिली.. अरे तुम्ही आपल्या कंपनीचे असेट्स आहात. तुमच्यासारखे टॅलेंटेड रिसोर्सेस आपल्या कंपनीला पाहिजे आहेत.. तुमच्यासाठी कंपनीत खूप नव्या आणि चॅलेंजिंग ऑपॉर्च्युनिटी पाईपलाईन मध्ये आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. Etc etc... हे सर्व ऐकल्यावर आम्ही सर्व खूप खुश झालो.. म्हणलं चला.. कंपनीला आमच्या टॅलेंट ची कदर आहे तर..
याच काळात पर्सनल ई-मेल बॉक्स मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी साठी काही इमेल येत होते. त्यातल्या एका ई-मेल वर ओझरती नजर टाकली.. छान वाटत होता. म्हणजे कंपनी, तिचे रेप्युटेशन, जॉब प्रोफाइल, शिफ्ट टायमिंग हे सर्व मस्त वाटत होत पण त्या इमेलकडे मी दुर्लक्ष केले. सध्या तरी आहे याच कंपनीसोबत लॉयल राहुयात काही ना काही नक्कीच चांगले होईल. आत्ताशी तर 1.5 वर्षे झालेत एवढ्यात कंपनी स्विच करणे हे चांगले नाही आणि रेझूम वर देखील परिणाम होईल.. त्यापेक्षा इथे च थांबू. आपल्याला इतके महत्व दिले जातेय म्हणजे नक्कीच काहीतरी योजना असेल. कदाचित एखादा ऑनसाईट चा प्रोजेक्टही मिळेल.. अशी अनेक स्वप्न पाहत पाहत शेवटी मी आणि माझे 2 सहकारी बेंच वर आलो जिथे बरंच काही शिकायला मिळालं.
1 जानेवारी 2020 पासून मग ऑफिस मध्ये काही काम नसल्याने 8 तास काय करायचे हा प्रश्न होता. पण आम्ही ट्रेनिंग आणि सेल्फ डेव्हलोपमेंट वर ध्यान द्यायला सुरवात केली. 5-6 दिवसांनी आम्ही आमच्या जुन्या प्रोजेक्ट हेड ला कॉन्टॅक्ट करायला सुरवात केली कि बाबा आता सांग तुझे ते कोणते चॅलेंजिंग काम होते ज्यासाठी तू आम्हाला कंपनी त ठेवून घेतलेस. असे नेमके कोणते प्लॅन आहेत आमच्यासाठी, ज्यामुळे तू NOC दिली नाही आमची.
पण कश्याचे काय त्याने आमच्याशी बोलणे तर दूर आमचे फोन उचलणे पण बंद केले. च्यायला कालपर्यंत गोडी गोडी बोलणारा प्रोजेक्ट हेड आता साधा फोन पण रिसिव्ह करायला मागेना.. एखाद्याला उल्लू बनवणे म्हणजे काय हे तेव्हा समजले.
कसाबसा तो धक्का पचवला आणि आम्ही समजून घेतले कि आता हा बेंच च आपला साथी आहे..
जाऊदे.. झालं गेल गंगेला मिळालं आणि पुनःश्च हरिओम म्हणून नवा प्रोजेक्ट शोधायला सुरवात केली. नवा प्रोजेक्ट शोधताना मनावर दडपण देखील होते कि आपल्या स्किलसेटशी मिळता जुळता प्रोजेक्ट नाही भेटला तर लवकरच म्हणजे (3-4 महिन्यात ) हकालपट्टी निश्चित.. म्हणजे एकूणच भविष्य अधांतरी होत. आणि नोकरी जाण्याची तलवार कायम डोक्यावर लटकत असताना स्वतःला upskill करण्यावर देखील लक्ष केंद्रित होत नव्हते. कुठल्यातरी प्रोजेक्ट ला टॅग होऊन सेफ होने पण तितकेच आवश्यक होते.
मग recruitment HR ला कॉन्टॅक्ट करून त्याच्या मागे लागून कसाबसा एक प्रोजेक्ट मिळाला. ( अवांतर - HR हा कोणत्याही कंपनीत काहीही प्रोडक्टीव्ह काम न करता पैसा लुटणारा प्राणी आहे असं माझं स्पष्ट मत आहे.. त्याबद्दल नंतर कधीतरी ). मी नवीन शिकायला मिळेल आणि ज्या स्किल ची सध्या इंडस्ट्रीत मागणी आहे असा प्रोजेक्ट शोधत होतो, आणि मिळालेला प्रोजेक्ट काहीसा तसाच वाटला. म्हणलं चला.. बाकी काही नाही निदान इथे काहीतरी नवीन शिकून थोडं स्वतःला upskill करता येईल एकदा का या नवीन टेकनॉलॉजि शिकलो कि मग वर्षभरानी नवीन जॉब बघू म्हणजे पैसा ही चांगला भेटेल..
HR आणि नवीन मॅनेजर यांनी दोघांनीही मला सांगितले कि अरे अगदी तुला पाहिजे तसा प्रोजेक्ट आहे. तूला ज्या ज्या स्किल वर काम करणे शिकायचे आहे ते सगळे इथे मिळेल. बिंदास जॉईन कर..
आता एवढं सगळं सांगितल्यावर मग मी ही विचार केला. म्हणलं जाऊदेत बेंच वर जास्त काळ राहून नोकरी संकटात घालण्यापेक्षा आलेली संधी निवडावी.. काय जाणो पुन्हा असा प्रोजेक्ट नाही भेटला तर मग एक्सेल आणि वर्ड वरची कामे करायला लावतील किंवा काही महिन्यात नारळ देतील त्यापेक्षा मिळतोय तो प्रोजेक्ट घेऊ..
Feb 2020 पासून नव्या प्रोजेक्ट वर रुजू झालो. सुरवातीला सर्व काही ठीक वाटले पण हळू हळू त्या कामातील फोलपणा लक्षात आला. जे काम 1 दिवसात व्हायला हवे ते इथे 7-8 दिवस करायचे. अगदी सरकारी काम असल्यासारखं. फक्त फॉर्मसोबत खेळायचे..
इथे कामापेक्षा प्रोसेस ला अधिक महत्व दिले जात होते.. तुमचे कोणतेही काम असुद्या तुम्ही पोर्टल वर जा एक फॉर्म भरा आणि सबमिट करा.. मग तो तुमच्या मॅनेजरकडे अप्रूव्हल ला जाईल मग तिथून अजुन एक अप्रूव्हल आणि मग सगळ्यात शेवटी त्या त्या प्रकारची काम करणार्यां टीम ला एक तिकिट assign होणार आणि मग ते त्या तिकिटावर काम करणार त्यांनी काम केले कि मग ती request कंप्लीट झाली.
या सगळ्यात 8-10 दिवस जाणार. समजा एखादा फॉर्म मी चुकीचा भरला तरीही तो फॉर्म सर्व approval प्रोसेस पार करून शेवटच्या टीम पर्यंत जाणार आणि ती टीम तिकिट रिजेक्ट करणार कारण फॉर्म मध्ये काहीतरी चुकीचं आहे. मग पुन्हा नवीन फॉर्म भरायचा.
आपण भरलेला फॉर्म चुकीचा आहे हे समजायला सुद्धा 7-8 दिवस लागणार.. या सर्व कामात माझी जबाबदारी एवढीच होती कि रिक्व्वयरमेंट समजून त्याचा फॉर्म भरून देणे आणि फॉलो अप घेणे.
उदाहरणार्थ, आमच्या अप्लिकेशन साठी जर एखादा नवीन डेटाबेस लागणार असेल तर त्यासाठी लागणारा फॉर्म भरून देणे. त्यात पुन्हा प्रोडक्शन आणि UAT साठी वेगवेगळी फॉर्म्स.
एखाद्याने मिटिंग मध्ये विचारले तर मी सांगणार कि मी नवीन डेटाबेस तयार करतोय. पण खरं तर मी फक्त त्यासाठी लागणारे फॉर्म भरत होतो अक्चुअल काम हे शेवटी DBA टीमच करणार होती ज्यांना सगळ्यात शेवटी त्यासंबंधीचे तिकीट असाइन होईल.
सगळेच काही असे काम नव्हते. काही काम इंट्रेसिंग आणि चांगले देखील होते पण हे प्रमाण 70:30 ase होते. म्हणजे 70 टक्के रद्दड काम आणि 30% डोक्याचे ( IT इंजिनीअर चे काम ).
परिस्थिती सुधारेल या आशेवर कसाबसा एक दीड महिना काढला. मी काम पण चांगले करत होतो तसे क्लायंट कडून फीडबॅक पण येत होते पण मी स्वतः मनातून खुश नव्हतो.. मी खूप अपेक्षा आणि शिकण्याची जिद्द घेऊन या प्रोजेक्ट मध्ये आलेलो पण इथली प्रोसेस आणि काम करण्याची पद्धत पाहून हळू हळू सगळा इंटरेस्ट संपू लागला. तेवढ्यात मार्च महिना उजाडला आणि कोरोना चे संकट दाटु लागले. देशाची अर्थव्यवस्था आणि खूप लोकांच्या नोकऱ्या खड्यात जाणार असा अंदाज येऊ लागला. त्यामुळे आता नवीन जॉबसाठी दुसरी कंपनी शोधणे, त्याठिकाणी हाईक मिळवणे हे सर्वच अशक्य वाटू लागले. त्यामुळे आवडत नसले तरी कसेबसे दिवस ढकलु असा विचार करून रोज वीकएंड ची वाट पाहत दिवस रेटत होतो. पण नंतर लौकडाऊन मुळे घरून काम करत असल्याने घरी चीड चीड होऊ लागली.. तेच तेच रटाळ काम करण्यात मन रमेना. कोणतेही नवीन काम आले कि तोंडातून पहिल्यांदा शिव्या निघायच्या. एखादा फॉर्म भरला आणि तो चुकीचा आहे हे 5-6 दिवसांनी समजले कि आदळआपट करायचो. आणि ज्या व्यक्तीच्या कामासाठी तो फॉर्म भरण्याचे काम करायचो ती व्यक्ती इकडे रोज रोज झाले का काम असा फॉलो अप घ्यायची. मदत करणारे देखील कोणी नव्हते आणि घरातून काम करताना तर ते अशक्य च होत. ऑफिस मध्ये असल्यावर पटकन एखाद्याच्या डेस्क वर जाऊन लगेच विचारता यायचे पण घरून काम करताना ते शक्य नव्हते. दिवसाला 100 एक शिव्या आणि 1-2 वेळेला आदळआपट करून 9 तास कसेतरी पूर्ण करत करत दीड दोन महिने काढले. पण एप्रिल च्या शेवटी शेवटी असह्य होऊ लागले. माझ्या अडचणी बाबत मी डायरेक्ट क्लायंट शी बोलू शकत नव्हतो कारण कितीही झाले तरी ते क्लायंट होते त्यांना मला काम जमत नाही असं म्हणणे म्हणजे माझी आणि कंपनी ची प्रतिमा खराब करणे असे वाटायचे.
इकडे हळूहळू कोरोना चे संकट दिवसेंदिवस वाढतच होते. काय करावे दुसरीकडे जॉब पाहावा का? मिळेल का? असे प्रश्न डोक्यात वारंवार यायचे. एकदा मी आणि बायको बोलत असताना तिला सगळी परिस्थिती सांगितली. पुरुषापेक्षा बायकांमध्ये पेशंन्स आणि प्रॉब्लेम सॉल्विग स्किल चांगले असते असा माझा समज (कि गैरसमज??
:D ) आहे. तिने सगळी गोष्ट शांतपणे ऐकून सल्ला दिला कि तुम्ही दोन ऑप्शनसं एकाच वेळी ट्राय करा.
1) आत्ताच्या कंपनीकडे प्रोजेक्ट मधून रिलीज मागा आणि दुसरा एखादा प्रोजेक्ट देण्याची विनंती करा. कदाचित 1-2 महिन्यात तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट मिळून जाईल.
2) हे करत असतानाच दुसरीकडे जॉब शोधा. कदाचित तुम्हाला थोड्या दिवसांनी किंवा महिन्यांनी चांगला जॉब मिळेलही. प्रयत्न करायला काय हरकत आहे. नौकरी, मॉन्स्टर अपडेट करून टाका.
या दोन्हीपैकी जिकडे पहिल्यांदा यश मिळेल तिकडे जा. प्रॉब्लेम सॉल्व.
बायको IT क्षेत्रात नसून सुद्धा तिचा सल्ला खूपच प्रॅक्टिकल वाटला..
त्याच दिवशी मॅनेजर ला आणि PMO ला एक ई-मेल टाकला ज्यात मी कोणत्या परिस्थितीतुन जात आहे ते सगळं लिहिले आणि प्रोजेक्ट बदलून मिळण्याबाबत विनंती केली.
तसेच त्याच दिवशी नौकरी वर रेझूम अपडेट केला.
आता मी दोन्हीपैकी एकाकडून तरी मार्ग निघायची वाट पाहू लागलो.
लकीली दुसऱ्याच दिवशी मला एका जॉब रिक्वारमेन्ट साठी कॉल आला. समोरची HR आजच interview दया म्हणत होते होते. पाहिला राउंड क्लिअर झाला तर मग उद्या एक आणि परवा दिवशी एक असे अजुन 2 interview होतील. 2 वर्ष्यानंतर हा पहिलाच interview आणि तो ही बिना तयारी कसा द्यायचा.. पण पर्याय नव्हता. मी आज जमणार नाही म्हणालो आणि ती संधीच निघून गेली तर??
मी interview साठी होकर दिला.. पाहिला दुसरा आणि तिसरा असे तीनही राऊंड क्लिअर झालो. कंपनी बाबत थोडा रिसर्च केला. जॉब प्रोफाइल नीट समजून घेतली आणि जॉब ऑफर आली तर accept करायची हे निःश्चित केले.
अजुन पॅकेज चे डिस्कशन व्हायचे बाकी होते. मी अश्या परिस्थितीत होतो कि अगदी 5-10 टक्के हाईक जरी भेटली तरी चालेल पण आत्ता जो काही हूतीयापा करतोय त्यातून बाहेर निघू. लकीली त्यांनी चक्क 50% पगारवाढ दिली. सॅलरी ब्रेकअप पाठवून तुमचे ऑफर लेटर 1आठवड्यात पाठवू असा ई-मेल आला.
हे सर्व अगदी 5 च दिवसातच पार पडले. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे ही तीच जॉब ऑपर्च्युनिटी होती जी मला जानेवारी महिन्यात आवडलेली असून सुद्धा दुर्लक्षित केला होती. .
मी HR राऊंड मध्ये मी थोडे धाडस करून हा प्रश्न विचारला कि ही पोजिशन तुम्ही किती दिवसापासून शोधताय?
उत्तर फारच इंटरेस्टिंग होते.
" गेले 6-7 महिने आम्ही या पोझिशन साठी लायक व्यक्ती शोधतोय पण अजूनपर्यंत कोणी मिळाले नाही. 2 लोकांना सिलेक्ट केले होते पण नंतर त्यांना इतरत्र जास्त पैसे मिळाले त्यामुळे त्यांनी जॉईन करण्यास नकार दिला. आम्ही आशा करतो कि तुम्ही आमची ऑफर accept कराल. "
मी फक्त.. Yes. Its my pleasure to accept this wonderful job opportunity. एवढंच म्हणालो...
पण त्यादिवशी हे समजले कि नशिबात काही गोष्टी अश्या असतात ज्या फक्त आपल्या असतात. कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कदाचित ही जॉब ऑपॉर्च्युनिटी देखील इतके दिवस माझ्यासाठीच थांबली होती...
इकडे 5 दिवस (म्हणजे 1 आठवडा ) झाला तरी माझ्या मॅनेजर ने किंवा PMO ने रिप्लाय दिलेला नव्हता. तो सुट्टीवर होता असे देखील म्हणायला वाव नव्हता. कारण 2 च दिवसापूर्वीच त्याने नियमावर बोट ठेवून माझा शिफ्ट अलोवंस अँप्रोव्ह करता येणार नाही असा ई-मेल पाठवला होता. म्हणजे तो सुट्टीवर नव्हता, त्याने माझे इमेल वाचून सुद्धा रिप्लाय दिला नव्हता. प्रोजेक्ट चेंज करणे हे काही 1-2 दिवसात होणारे काम नाहीये हे मी देखील समजू शकत होतो पण माझ्या विनंतीवजा इमेल ला एक्नॉलेज करणे अपेक्षित होते. जसे कि मला कॉल करून एकंदर परिस्थिती आणि माझ्या अडचणी समजून घेणे, येणाऱ्या काही आठवड्यात किंवा काही महिन्यात काहीतरी मार्ग काढण्याचे आश्वासन देणे किंवा कोरोना असल्याने सध्या काहीच करता येत नाहीये कोरोना संपल्यानंतर एखाद्या नवीन प्रोजेक्ट मध्ये अड्जस्ट करणे असं काहीतरी मार्ग निघू शकत होते पण मॅनेजर ने माझ्या इमेल ला पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.
आता बास.. समजली आपली इथली किंमत. च्यायला याला शिफ्ट अलोवंस सारख्या फुटकळ इमेल ला रिप्लाय करायला वेळ आहे आणि एप्लॉईज च्या अडचणी समजवून घ्यायला साधा एक कॉल पण करता येत नाही. भोxxxत गेला असला मॅनेजर आणि कंपनी. नवीन कंपनी मधुन अजुन ऑफर लेटर यायचे बाकी होते पण बाकी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या होत्या त्यामुळे 99.99% काम झालेलं होते. पुढे काय होईल ते होईल असा विचार करून कंपनी च्या पोर्टल वर login केले. आणि resign टाकून दिले..
आणि काय तो चमत्कार...!!! दुसऱ्याच दिवशी मॅनेजर चा रिप्लाय आला.
"" तुमचे reisgnation काल पाहिले. तुझी अडचण समजली आहे पण प्रोजेक्ट चेंज करण्यासाठी काही प्लॅनिंग करावे लागते आणि ते वेळखाऊ काम आहे. तुम्हाला कंपनी सोडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करता येईल का? ""
अरे भोसxx च्या तुझे डोळे फुटले होते इतके दिवस. 5 दिवसानंतर तू इमेल ला रिप्लाय करतोयस आणि तेसुद्धा माझे resignation पाहिल्यानंतर. मी जर अजुन 1 महिना resign टाकले नसते तर तू तोपर्यत माझ्या ई-मेल कडे ढुंकून सुद्धा पाहिले नसतेस. आता मी मुळावर घाव घातला तर आलास ना गुढघ्यावर. ??
मी देखील आता त्याच्या इमेल ला रिप्लाय नाही द्यायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी मला त्याचा स्वतःहून कॉल आला. त्या कॉल मध्ये त्याने मला माझी अडचण विचारली नाही. त्याचा पाहिला प्रश्न होता कि तुझ्याकडे जॉब ऑफर आहे का? मी म्हणालो कि आहे.
" तो फिर ठीक है. मै थोडा surprise हुआ के कोरोना के समय तुमने resign कैसे डाल दिया? मतलब तुमने बोहोत पेहले से सोच राखा था कि ये जॉब छोडना ही है. तो वो वाला ई-मेल क्यूँ डाला? "
मी त्याला पूर्ण स्पष्टीकरण दिले कि नेमक्या माझ्या काय अडचणी होत्या. आणि ही जॉब ऑफर 5 दिवसांमध्येच मिळालेय. मी गेल्या 5 -6 दिवसापासून च जॉब शोधतोय हे सांगितले.
" कम ऑन, तुम भी और मै भी इस इंडस्ट्री मे इतने सालो से है. इतने जल्दी कोई जॉब ऑफर मिलता है क्या. ऐसा सिर्फ कॅम्पस ड्राईव्ह मे ही होता है कि आप सुबेह जाओ और शामतक या दुसरे दिन जॉब ऑफर लेके आओ. "
हे वाक्य ऐकल्यावर माझा पारा चढला. अरे तुझा संबंध काय मला असले प्रश्न विचारून माझ्यावर संशय घ्यायचा.?? मला दुसरीकडे जॉब ऑफर 1 दिवसात मिळो अथवा 100 दिवसात त्या सगळ्याचा आत्ताच्या आपल्या डिस्कशनशी काय संबंध.
मी किंचितश्या श्या चढ्या आवाजात त्याला म्हणालो कि
" देखो सर. मैने जो भी कहा है वो सच है. आपको यकीन नही हो रहा है तो उसमे मै क्या कर सकता हूं ?? मै मेरे सारे ई-मेल कॉम्युनिकेशन के प्रूफ दिखा सकता हूं. लेकिन ये सब करने का क्या फायदा.. जब आपको doubt ही करना है. "
मॅनेजर थोडासा गडबडला..
" this is not the right tone of talking. Let it be. It is fine. I am happy that you got new job. I wish you a best luck. और आपका सिस्टीम मे जो लास्ट डे है वो वही रहेगा. आप क्लायंट को अपने resignation के बारे मे मत बताना. Ideally you should not disclose this to client. "
मी ओके सर म्हणालो आणि फोन ठेवून दिला. ज्याला रिसोर्सेस च्या अडचणी समजून घेण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये त्याला अजुन काही बोलण्यात किंवा फीडबॅक देण्यात काही अर्थ नव्हता.
त्यानंतर परत माझ्या मॅनेजर शी बोलणे नाही झाले. आता resign टाकून 1महिना उलटून गेलाय. माझी रिप्लेसमेंट म्हणून अजूनतरी कोणी आलेले नाहीये. क्लायंट कडून मिळालेल्या माहितीनुसार माझ्या जागी कोणी नवीन रिसोर्स येणार नाहीये त्यामुळे माझे बिलिंग जे कंपनी ला भेटत होते ते बंद होणार आहे . असो.
आता या अनुषंगाने काही प्रश्न
1) IT मध्ये विशेषतः सर्विस provider कंपन्यांमध्ये असे अनुभव कोणाला आलेयत का? तुम्ही अश्या मॅनेजर सोबत कसे वागता ज्याला फक्त तुमच्यामुळे मिळणाऱ्या बिलिंगशी देणेघेणे आहे. बाकी तुम्ही जगला मेला काहीही फरक पडत नाही.
2) मी अजूनही त्याच प्रोजेक्ट मध्ये तेच रटाळ काम करतोय. अजुन 3 आठवडे आहेत. या दरम्यान मी स्वतः फ्रस्ट्रेट होऊ नये यासाठी काय करू.
3) मला माझा नोटीस पिरियड 7-8 दिवसांनी कमी करायचाय. ( करायचाच आहे असं काही नाही. पण झाला तर चांगलेच आहे ) त्यासाठी या सिच्युएशन मध्ये मला काय करता येईल?
4) तुम्ही तुमच्या नोटीस पिरेड मध्ये काय करता? नोटीस पिरेड मध्ये आपण कसे काम करावे?
याआधीच्या 4 कंपन्यांमध्ये मी अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत मन लावून काम केलेय पण इथे काम ही त्या लायकीचे नाहीये आणि कंपनीने आणि माझ्या मॅनेजरने दिलेल्या वागणुकीमुळे इथे काम करायला मन तयार होत नाहीये. तर IT वाले मिपाकर काय सल्ला देतील??
वर्गीकरण
वाचने
10388
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
Q १ - हि परिस्थिती बऱ्यापैकी
In reply to Q १ - हि परिस्थिती बऱ्यापैकी by वीणा३
प्रतिसादाबद्दल आणि
छान निर्णय!
1) IT मध्ये विशेषतः सर्विस
शेवटच्या दिवसापर्यंत मन लावून
In reply to शेवटच्या दिवसापर्यंत मन लावून by mrcoolguynice
+1
एक सुचवू का..?
In reply to एक सुचवू का..? by मोदक
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मोदक.
>>> 1) IT मध्ये विशेषतः
आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट
In reply to आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट by मोदक
कुठेतरी ऐकलं होत कि कंपनी
In reply to कुठेतरी ऐकलं होत कि कंपनी by बाप्पू
नोकरीचा शेवटचा दिवस, कंपनी
In reply to नोकरीचा शेवटचा दिवस, कंपनी by mrcoolguynice
ओके..
अगदी
In reply to अगदी by ढब्ब्या
विचारून बघा. पूछने मे क्या
कोणती कंपनी हे व्यनि करून
डोंट बर्न द ब्रिजेस !
अप्रतिम लेख !