✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नक्की प्रॉब्लम काये ?

स
संजय क्षीरसागर यांनी
Sun, 05/31/2020 - 16:08  ·  लेख
लेख
एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्‍याशी आंतरजालीय ओळख आहे. सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे. कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही. ____________________________________________ १. देवभोळे लोक : जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे. देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे. थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही. देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात. त्यांना वाटतं आपण इतके दिवस काय झक मारली की काय ? पण वरकरणी ते दाखवतात की हा श्रद्धेचा प्रष्ण आहे. श्रद्धा म्ह्टल्यावर लॉजिक खलास, विषय संपला ! वास्तविकात देव या कल्पनेमुळे मानवता अनेकानेक धर्मात विभागली गेली आहे. आणि ती कल्पनाच धर्मविस्तार आणि परिणामी अनेक युद्धांचं कारण आहे. अशा युद्धांमुळे मानवतेचं अतोनात नुकसान झालं आहे. देवभोळ्यांना ही उघड गोष्ट मंजूर नाही. आपली ती खरी श्रद्धा आणि दुसर्‍याची ती अंधश्रद्धा ही प्रत्येकाची धारणा आहे. प्रत्येक धर्म ही खरं तर स्वरुपाचा उलगडा करण्याची प्रणाली आहे. तस्मात, वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे. सांगायचं कारण असं की वरची एकही गोष्ट लक्षात न घेता देवभोळे लेखनावर तुटून पडतात. अर्थात, कल्पनेचा वास्तविकतेपुढे काय पाड लागणार ? परिणामी ते निरुत्तर होतात. मग हेकेखोर, पढत मूर्ख, स्वतःला शहाणा समजणारा... अशा बिरुदावली लावल्या जातात. थोडक्यात, जिथे फोरमवर वस्तुनिष्ठ चर्चा व्हायला हवी तिथे आखाडा तयार होतो. ____________________________________________ २. नाम, जप, परिक्रमा......... एकदा देव ही कल्पना आहे म्हटल्यावर तदनुषंगिक सर्व गोष्टी केवळ टाईमपास होतात. पण वर्षानुवर्षे या गोष्टीत रमलेले तंद्रीतून बाहेर पडायला राजी होत नाहीत. इथे पोथ्याच्या पोथ्या, परिक्रमेच्या लेखमाला आणि भक्तीमार्गियांचे भावूक लेख आणि कविता टाकल्या जातात. त्यावर भाविकांचे भावविभोर प्रतिसाद चालू होतात. आता जरा काही वास्तववादी बोललं की येळकोट सुरु होतो. कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ? का त्याची देशाला गरजच नाही ? ___________________________________________ ३. राजकारण सरकार ही एक सर्विस प्रोवायडर संस्था आहे. प्रत्येक सेवा आणि वस्तुवर जनता जो कर देते त्यातून जनहीताची कामं करणं हे सरकारचं एकमेव काम आहे. फक्त इन्कम टॅक्स भरणारे देशसेवा करतात आणि इतरांना जाब विचारण्याचा अधिकार नाही हा गैरसमज आहे. सामान्यांचं जीवनमान उंचावलं जाणं आणि नागरिकांचं जगणं सुखाचं होणं हा सरकारच्या यशस्वीतेचा एकमेव मानक आहे. सरकारच्या निर्णयाबद्दल चर्चा म्हणजे देशद्रोह अशी जर नागरिकांची समजूत असेल तर लोकशाहीला अर्थच उरत नाही. पंतप्रधानासकट प्रत्येक लोकप्रतिनीधी हा जनतेचा नोकर आहे. पगार घेत नाही म्हणून कुणीही देशाचा मालक होत नाही. पदावर असेपर्यंत तो जनतेचा नोकर आहे आणि सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा जाब विचारायचा हक्क नागरिकांना आहे. थोडक्यात, नेत्याला डोक्यावर घेणं गैर आहे. सव्वाशे कोटींच्या देशात कुणाला ऐकमेव समजणं हा देशाच्या बुद्धीमत्तेचा अपमान आहे. तस्मात, सरकारी निर्णयावर भक्त आणि विरोधक असे तट सुशिक्षितातच पडले, तर देशाला प्रो-पब्लिक पॉलिटिक्स करणारं नेतृत्व लाभण्याची शक्यता शून्य ! ______________________________________ ४. अध्यात्म सर्व चराचर, सत्यानं अंतर्बाह्य व्याप्त आहे हा अध्यात्माचा साधा अर्थ आहे. त्याचा व्यत्त्यास म्हणजे सत्यापरता इथे काहीही नाही. तरीही "मी सत्य आहे" म्हटलं की...... लोक जाम पिसाटतात. जर सर्वच सत्य आहे तर इथला प्रत्येक जण, त्याला तो उलगडा होवो किंवा न होवो, सत्यच आहे. पण आपल्याला उलगडा होत नाही याचा अर्थ लोक, आपण चुतिया आहोत असा काढतात ! मग ज्याला उलगडा झाला त्याचं काही ऐकण्यापेक्षा; तोच कसा मूर्ख आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते. परिणामी लोकांना आपणही सत्य आहोत हे समजण्याची शक्यता मावळते. संकेतस्थळावर अध्यात्मिक लेखनाची अशी वाट लागते म्हटल्यावर, इथे ते लेखन बंद करण्यापरता पर्याय राहिला नाही. ______________________________________ ५. स्वरुपाचा उलगडा आणि जीवनविषयीक आकलन स्वरुपाचा उलगडा मनाच्या सर्व पैलूंचं ज्ञान आपसूक घडवतो प्राणायाम आणि योगामुळे शारिरिक कार्यप्रणालीचं व्यावहारिक ज्ञान उपलब्ध होतं. स्वरुपाचा उलगडा कार्यकौशल्य आणि कार्य सहज करण्याला सहाय्यभूत होतो. परिणामी समस्येचं त्वरित आकलन आणि सोडवणूकीचा सोपा मार्ग दिसतो. स्वरुपाचा उलगडा वक्तव्यात ठामपणा आणतो. कोणत्याही विषयावर काहीही लिहीलं की लोक सुरु : मीच शहाणा, मलाच सगळं कळतं, मी म्हणतो तेच खरं..... मग अशा वेगळ्या विषयांवर चर्चा कशी होणार ? मन हा बायोकंप्युटर नाही का ? नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ? त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ? असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी. यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ? ___________________________________________________ ६. व्यावसाय : पैसा हा जीवनाचा एक महत्तम पैलू आहे. व्यावसायिक अनुभवामुळे त्याच्या सर्वप्रकारे अभ्यास झाला आहे. अध्यात्मामुळे पैशामागच्या सर्व मानसिकतेची उकल झाली आहे. जुगारा पासून ते बजेटपर्यंत सगळ्या बाबींचा यथोचित विचार झाला आहे. सांगायचं कारण असं की जे लिहीतो ते अनुभवातून आलेलं आहे आणि सर्वांना उपयोगी व्हावं म्हणून लिहीतो. तरीही लोक लपाछपीचे धंदे बंद होणार, अमक्या अ‍ॅक्टमुळे दुकान बंद होणार.... जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच तुम्हाला भरपूर वेळ दिसतो. काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ? अशा काहीही कमेंटस मारतात. मग मनात नसतांना बखेडा सुरु होतो. __________________________________________ ७. भग्व्दगीता : हा ग्रंथ भारतीय अध्यात्मात मानदंड मानला गेला आहे. पण कृष्णाचं मूळ प्रयोजन साधकांना मार्गदर्शन नसून अर्जुनाला युद्धप्रवण करणं आहे. त्यामुळे संसारी किंवा सामान्य साधकाला खरं तर याचा उपयोग नाही. थोडक्यात, तो सर्वांना दिशादर्शक ठरेल असा, अध्यात्मिक ग्रंथ नाही. सांख्ययोगातले दोन श्लोक; नैनं च्छिंदंती शस्त्राणी, आणि या निशा सर्व भूतानां, सोडले तर, सामान्य साधकाला उपयोगी होतील, असे कोणतेही श्लोक यात नाहीत. यातल्या कर्मयोगानं तर भारतीय मानसिकतेचा कर्माप्रती पुरता गोंधळ उडवून दिला आहे. फलाकांक्षारहित कर्म, इश्वरसमर्पित कर्म.... अशा अव्यवार्ह कल्पनांमुळे बहुतेकांचा कल, सचोटी आणि तन्मयतेनं काम करण्याऐवजी; नाईलाज म्हणून काम आणि शक्यतो कर्ममुक्तीकडे वळला आहे. गीतेचे वेगवेगळे अर्थ काढण्याचं काम भारतात गेली हजारो वर्ष चालू आहे. या निरर्थक प्रयासाबद्दल, जरा कुठे वस्तुनिष्ठ विचार मांडला की गीताप्रेमी हुल्लड चालू करतात. नक्की काय संदेश दिलायं या ग्रंथानं, ज्यानं देशाचं भलं झालं ? कोणती साधनाप्रणाली साधकांना स्वरुपाचा उलगडा घडवू शकली ? यावर वस्तुनिष्ठ आणि खुल्या चर्चा, पब्लिक फोरमवर घडायला काय हरकत आहे ? _________________________ तर अशी सगळी परिस्थिती आहे. मग कुणी खरडफळा रगडतोयं, अचानक भूछत्रीसारखे ट्रोलर्स प्रकट होतायंत ज्यांना दोन ओळी धड लिहीता येत नाही ते मला विचारतात तीन वर्ष झक मारली का ? आत्मपूजा उपनिषदावर आख्खी सिरीज मनोगतवर प्रकाशित झाली आहे. अष्टावक्राच्या सांख्ययोगावर लेखमाला लिहीली आहे. निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीवर लेख प्रकाशित झाले आहेत. बुद्ध, ओशो, विविध ध्यान प्रणाली यांचावर तिथे लिहीलं आहे. कर्मयोगासारख्या रोजच्या विषयावर लोकोपयोगी भाष्य केलंय. विवाह, उत्सव, भय, सजगता अशा अनेकविध विषयांवर लेखन केलंय.... कुणी तद्दन कविता टाकतो. कुणी भंकस लेख लिहीतो.... गप्प करणारं उत्तर दिलं की मग वातावरण बिघडल्याचा कांगावा होतो ! काय साधतो आपण या सगळ्यातून ? -----–---------------------–----------------------------------- ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असल्याने आणि बरेच वैयक्तिक आणि आक्षेपार्ह प्रतिसाद वाढत असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत. -मिपा व्यवस्थापन ----------------------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
77660 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

लिहिलेले बरोबर आहे..

गणेशा
Sun, 05/31/2020 - 17:39 नवीन
लिहिलेले बरोबर आहे.. तसे मी तुम्हाला ओळखत नाही.. पण माझे स्पष्ट मत आहे, प्रत्येक लिखान हे कोणी लिहिले या पेक्षा काय लिहिले आणि का लिहिले हेच महत्वाचे आहे.. दुसरे असे की.. प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे की आपली सगळीच मते बरोबर नसतात, एका घरात चार लोकांच्यात आपल्या मतांना न मानणारे असतात.. मग तर हे सोशल जग आहे.. हा लोकांचा समुद्र आहे.. कधी कधी त्याला कळातच नाही की कधी लाटा उडवाव्यावत आणि कधी शांत व्हावे... माझे स्पष्ट मत आहे की आपली मते वेगळी असतील.. तरी ती बिंधास्त मांडावीत.. मग ती राजकिय असुद्या, किंवा इतर.. मत असणे हेच चांगल्या मनाचे लक्षण आहे.. फक्त सोशल मेडिया वर, आपल्या विरुद्ध मत असले तरी त्याचा आदर करणे सोडु नये.. मते ही वेगळी असणारच.. सर्वांची मते एकच असती तर निवडनुका तरी का झाल्या असत्या ? सगळे एकसारखे नाहीच .. ज्याला दुसर्‍याचा आदर करणे जमत नसेल अश्या माणसांशी बोलण्यात काय अर्थ उरतो मग ? आणि आपण त्याला काय समजावतो ? समजावयाचे असल्यास आधी दुसरा पण माणुस आहे हे समजवावे लागेल, मग बाकीचे ...

मी कधीही आणि कुणाचीही

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 19:27 नवीन
खोडी काढत नाही. लेखात लिहील्याप्रमाणे, कोणताही हेतू नसतांना केलेलं व्यक्तीनिरपेक्ष लेखन, भावना दुखावल्या गेलेले लोक वस्तुनिष्ठपणे वाचण्याऐवजी पर्सनल करुन घेतात. त्यांना चालू लेखावर प्रतिवाद करता येत नाही. परिणामी > खरडफळा, ट्रोलींग, फालतू कविता, भिकार लेख, माझ्या मागच्या पोस्ट उचकणे असे कारभार करून > कुठे फट मिळतेयं का ते बघतात. ती मिळत नाहीच ! पण या भानगडीत वाद वाढत जातो. त्यामुळे या संकेतस्थळासारख्या एका चांगल्या सुविधेचा उपयोग योग्य कारणासाठी होत नाही.
↩ प्रतिसाद: गणेशा

सर, मागे मी राजकीय लिहिले

गणेशा
Sun, 05/31/2020 - 19:43 नवीन
सर, मागे मी राजकीय लिहिले होते, india deserves better तेंव्हाचा अनुभव आहे.. पण त्यात विरोधात बोललेले लोक यांचा ना मी उद्धार केला ना त्यांनी माझा... त्यामुळे विरोधक जर लायकीचा असेल तर बोलण्यात अर्थ... लायकीच नसेल तर उगा का लक्ष द्यायचे... असे माझे मत.. आपण आपल्याला समजावू शकतो.. जगाला समजावणे अवघड.. तसेच कोणी जुणे खुसपट काढले आणि दुर्लक्ष करायचे असेल तर तू बरोबर.. जिंकला म्हणायचे आणि आपला वेळ वाचवायचा बस.. -- अवांतर :- मी तुम्हाला ओळखत नाही... उदा देतो... तुम्ही सशक कथे ला जे रिप्लाय दिले ते मला आवडले होते.. जरी माझ्याच 'इच्छा' कथेला तुम्ही निगेटिव्ह रिप्लाय दिले तरी त्यात वावगे काय होते.. तुम्ही बरोबर बोलत होता.. ते धरून जर मी तुमच्याशी भांडत किंवा विरोधाला विरोध करत असेल तर ते चूक.. मग अश्या माणसाला तुम्ही जवळ येऊच का देताल? विचार करणारा हा, त्याच्या अनुभवा वर विचारांवर बोलत असतो.. respect him.. ज्याला विचारावर विचारांनी बोलता येत नसेल त्याच्यावर विचारच का करावा असे माझे मत..
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जबाबदार आपण हि

चौकस२१२
Mon, 06/01/2020 - 05:11 नवीन
आपला वरील लेख वाचला रोख सगळा आपण स्वतः किती बरोबर आणि इतर कसे चुकीचे आणि काही ना कळणारे असाच दिसतोय आपले पुनरागमन आधीचे लेख माहित नाहीत पण सध्या जे चालू आहे त्यात सगळं हाच कारभार "त्यामुळे या संकेतस्थळासारख्या एका चांगल्या सुविधेचा उपयोग योग्य कारणासाठी होत नाही." याला जबाबदार आपण हि आहात हे विसरू नका मग लोकांना ट्रोल म्हणा नाहीतर मिपामालकानं दोष द्या काय फरक पडतो...
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बील्ली हजको चली...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/01/2020 - 15:23 नवीन
आपलेही प्रतिसाद असेच असतात स्वतः किती बरोबर आणि इतर कसे चुकीचे. सरकारच्या वतीने काही नियुक्त मानधनावर काम करत असल्यासारखे निरर्थक, प्रतिसाद. भाषेच्या बाबतीत तोल गेलेले आणि प्रतिसादाचे निरर्थक शेपूट. संस्थळावर हेल्दी वातावरणासाठी काही समजही आवश्यक असते. दुसर्‍याला सांगण्याअगोदर स्वतःकडेही पाहिले पाहिजे असे वाटते. हल्ली आपले प्रतिसाद वाचतही नाही. पण इथे ज्ञान देतांना दिसले म्हणून सांगावे वाटले. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: चौकस२१२

चोराच्या उलट्या..?

मोदक
Mon, 06/01/2020 - 16:11 नवीन
आपलेही प्रतिसाद असेच असतात स्वतः किती बरोबर आणि इतर कसे चुकीचे. सरकारच्या वतीने काही नियुक्त मानधनावर काम करत असल्यासारखे निरर्थक, प्रतिसाद. भाषेच्या बाबतीत तोल गेलेले आणि प्रतिसादाचे निरर्थक शेपूट. तुमचे प्रतिसादही असेच असतात, फक्त "तुम्हाला सरकार विरोध करण्यासाठी मानधनावर नियुक्त केले असावे" इतकाच बदल आहे. संस्थळावर हेल्दी वातावरणासाठी काही समजही आवश्यक असते. दुसर्‍याला सांगण्याअगोदर स्वतःकडेही पाहिले पाहिजे असे वाटते. लॉकडाऊनच्या धाग्यात इमानेइतबारे मोदींवर वाट्टेल ते लॉजिक वापरून टीका केल्यावर आता मानभावीपणे हेल्दी वातावरणाची अपेक्षा बाळगणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. "तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या रोजगाराची सोय समाजाने / सरकारने करावी" अशी अपेक्षा असलेले तुमचे प्रतिसाद वाचून तुमच्याकडेही दुर्लक्ष केले होते, पण इथे ज्ञान देतांना दिसलात म्हणून सांगावेसे वाटले.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपेक्षित प्रतिसाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/01/2020 - 16:17 नवीन
आम्ही तरी आमचे विचार आम्ही प्रतिसाद मांडतो. आपले प्रतिसाद तर आमच्याच आलेल्या प्रतिसादाचे नेहमी कॉपी पेष्ट असतात शब्दांना नुसते उलट-पालट केलेले आमचेच शब्द. शब्दांचे फेरफार. निव्वळ. थोडेफार शिकला असाल तर स्वतःचे विचार करुन लिहायला शिका. चालु द्या.....!
↩ प्रतिसाद: मोदक

अरेच्चा.. मला वाटले होते

मोदक
Mon, 06/01/2020 - 16:35 नवीन
अरेच्चा.. मला वाटले होते तुमच्या समजण्याच्या क्षमतेत घोटाळा आहे, त्यामुळे सतत असे होत आहे. आता तर वाचनक्षमतेचा घोटाळा पण अधोरेखीत होत आहे. असो.. मी लिहितो ते वाचायला इतकेही अवघड जाऊ नये.. शक्य झाल्यास लक्ष देऊन वाचा. पूर्वग्रहाचे चष्मे घातले आहेत ते काढणे थोडे अवघड जाईल कदाचित पण ते चष्मे काढून वाचायचा प्रयत्न करून बघा..
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधारणा:

mayu4u
Wed, 06/03/2020 - 21:49 नवीन
शब्दांना नुसते उलट-पालट केलेले आमचेच निरर्थक शब्द
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपेक्षा

चौकस२१२
Mon, 06/01/2020 - 18:37 नवीन
""तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या रोजगाराची सोय समाजाने / सरकारने करावी" अशी अपेक्षा असलेले " मस्त .. हसुन हसुन पोट दुखले मोदक राव ..
↩ प्रतिसाद: मोदक

एक वेगळ्या विषयावरील धागा.

mrcoolguynice
Sun, 05/31/2020 - 17:39 नवीन
एक वेगळ्या विषयावरील धागा. जर ट्रोलभैरवांनी येथे उच्छाद मांडला नाही तरकाही वेगळे वाचायला मिळेल अशी अपेक्षा.

मन हा बायोकंप्युटर नाही का ?

सतिश गावडे
Sun, 05/31/2020 - 18:01 नवीन
मन हा बायोकंप्युटर नाही का ? नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ? त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ? असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी. यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ?
तुम्ही खरडफळ्यावर मान्य केल्याप्रमाणे हा तुमचा दृष्टीकोन किंवा तुमची मांडणी आहे. पुराव्याने सिद्ध झालेलं सत्य नाही. :)

हीच पुनर्जन्माच्या रहस्याची उकल आहे

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 18:05 नवीन
असं म्हणणं आहे
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुमच्या म्हणण्याचा आदर आहे.

सतिश गावडे
Sun, 05/31/2020 - 18:12 नवीन
तुमच्या म्हणण्याचा आदर आहे. आपल्याला आपली मते असण्याचा आणि ती मांडण्याचा अधिकार आहे, असला पाहीजे.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

का कोणास ठाऊक, पण माझा

mrcoolguynice
Sun, 05/31/2020 - 18:24 नवीन
का कोणास ठाऊक, पण माझा पुनर्जन्म "थियरीवर" विश्वास नाहीये. नही कुछ हैं होता । और कुछभी होना ।। तो गाओ खुषीसे, बजा कर के विन ।।

का कोणास ठाऊक, पण माझा

सतिश गावडे
Sun, 05/31/2020 - 18:39 नवीन
का कोणास ठाऊक, पण माझा पुनर्जन्म "थियरीवर" विश्वास नाहीये.
आपण भारतीय पुनर्जन्म या संकल्पनेकडे पाप-पुण्य आणि कर्मविपाक सिद्धांत यांच्या परीप्रेक्ष्यातून पाहतो. त्यामुळे विवेकी विचार करणारे असे काही असण्याची शक्यता स्विकारत नाहीत. उत्सुकता असल्यास या विषयावरील पाश्चिमात्यांचे विशेषतः Dr Ian Stevenson, Jim Tucker संशोधन/लेखन वाचा. या विषयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळू शकेल.
↩ प्रतिसाद: mrcoolguynice

मेंदूशिवाय

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 18:54 नवीन
व्यक्तीच्या कर्मचा डेटा कुठेही नसतो. निधनानंतर तो सगळा वॉश आऊट होतो. थोडक्यात, एका मृत्यूबरोबर एक कहाणी पूर्णपणे संपते. तस्मात, कर्मविपाक सिद्धांत फक्त मॉरल पोलीसिंग आहे.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

त्या संशोधकांचं

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 18:56 नवीन
काय म्हणणं आहे ?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बाय द वे,

mrcoolguynice
Sun, 05/31/2020 - 19:00 नवीन
बाय द वे, तुमच्या मते, प्राचीन सोशल ओपिनियन मेकर्स वर अकौंटींग समकक्ष विचारसरणीचा कितपत प्रभाव असु शकतो ? नाही म्हणजे, मला.. कधी कधी... पाप व पुण्य आणि डेबिट व क्रेडिट हे कुंभ के मेले मे बिछडे हुय भाई लगते हैं । ;)
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पाप - पुण्य या

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 19:04 नवीन
मानवी कल्पना आहेत डेबिट - क्रेडीट चा उपयोग अकाऊंटींगसाठी होतो. पाप- पुण्याचा उपयोग समाज सुरळीत चालावा म्हणून होतो
↩ प्रतिसाद: mrcoolguynice

ज्या प्रमाणे , ऑलिव्ह रिडले

mrcoolguynice
Sun, 05/31/2020 - 21:00 नवीन
ज्या प्रमाणे , ऑलिव्ह रिडले कासव, अंड्यातून बाहेर पडण्याच्या क्षणाच्या पुढच्याच क्षणाला , उपजत ज्ञानाने समुद्राच्या दिशेला जाऊन समुद्रात मिसळतो.... त्याच प्रमाणे मनुष्य जन्मतः त्याला पाप पुण्य, पुनर्जन्म यांचे उपजत ज्ञान प्राप्त होते ? की कोणी त्या मनुष्याला या संकल्पना ची माहिती देतो....?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>>पाप- पुण्याचा उपयोग समाज

मोदक
Sun, 05/31/2020 - 21:20 नवीन
>>>पाप- पुण्याचा उपयोग समाज सुरळीत चालावा म्हणून होतो मग समाजाची बॅलन्स शीट साधारणपणे किती वर्षांनी टॅली होते..?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी पुनर्जन्म या संकल्पनेकडे,

mrcoolguynice
Sun, 05/31/2020 - 18:55 नवीन
मी पुनर्जन्म या संकल्पनेकडे, (तुम्हाला कदाचित कल्पना असल्याने ), ऑब्जेट्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग समकक्ष थियरीवर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

काये हे

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 19:01 नवीन
ऑब्जेक्ट ओरियंटेड प्रोग्रामिंग ? कारण अस्तित्व स्वयंभू आहे. त्याचा प्रोग्रामर कुणीही नाही
↩ प्रतिसाद: mrcoolguynice

सर, अहो मी, "पुनर्जन्म " या

mrcoolguynice
Sun, 05/31/2020 - 19:08 नवीन
सर, अहो मी, "पुनर्जन्म " या गहन, अदृश्य व ऍबस्त्र्याकट्ट संकल्पनेला उमजण्यासाठी , माझ्यापरीने समांतर आकलन करत आहे.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पुनर्जन्म मी तेंव्हा मानेल

गणेशा
Sun, 05/31/2020 - 19:52 नवीन
पुनर्जन्म मी तेंव्हा मानेल जेंव्हा मी स्वतः माझा आधीचा जन्म पाहू शकेल.. जर असे होत नसेल तर मी पुनःजन्म मानत नाही हे चूकच म्हणताना कुठले ही उदा. कोणी ही दिली तरी ती त्यांनी ती मानावीत.. मी तीच मानवीत हा आग्रह कोणीच करू शकत नाही.. तुम्ही इतरांनी सांगितलेले शास्त्र मानत असला तरी मी मला झाला तोच साक्षात्कार मानेल.. ... तुम्ही तुमच्या विचाराशी.. मी माझ्या विचाराशी प्रामणिक.. संजय सर - (येथे जर मी माझेच कसे बरोबर आणि तुम्ही कसे चूक हे सांगितले तर खुप रिप्लाय वाढतात.. म्हणून हा मार्ग, विषय क्लोज येथे.. ) मला असे म्हणायचे होते.. respect other but आपली बाजू सोडायचीच नाही
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पुनर्जन्म मी तेंव्हा मानेल जेंव्हा

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 20:44 नवीन
स्वतः माझा आधीचा जन्म पाहू शकेल.. हे बरोबर आहे. यात वादाचा मुद्दाच नाही. आता हीच थियरी देवाला पण लावा !
↩ प्रतिसाद: गणेशा

बरोबर, मला जोपर्यंत देवाचा

गणेशा
Sun, 05/31/2020 - 21:07 नवीन
बरोबर, मला जोपर्यंत देवाचा साक्षात्कार होणार नाही तो पर्यंत मी तो मानणार नाही.. कोणाला काही अद्भुत तो करतो असे वाटते तो त्याला मानतो.. मला तर निसर्ग अद्भुत वाटतो, मी त्याला देवच मानेल.. पण ते माझे मत आहे.. काहींना मेंदू सगळे करतो म्हणून मेंदू देव वाट्टेल ते मानु शकतात.. पण कोणी शंकर, पैंगबर, येशू ह्यांना आता ही देव मानत असेल तर मी ते मानत नाही.. हे माझे मत.. हा, हे लोक इतिहासात असतील आणि त्यांच्या परोपकारी वृत्ती ने त्यांना माणुस नसून मसीहा म्हणाले असेल आणि नंतर देव मानले गेले असेल तर ठीक आहे.. पण मी त्यांना माणुस मानतो..
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हे बरोबरे !

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 22:12 नवीन
लोकांच्या धरणा त्यांच्याकडे ! पण इथे नामस्मरणावरचा ग्रंथ अपलोड होतो. नामस्मरणाबद्दल शंकराचार्य नक्की काय म्हणतात ? तीन श्लोक सांगा असा प्रष्ण होता. सदस्याला कदाचित वादविवादात धोका वाटला असेल किंवा तंद्रीतून बाहेर पडू असं वाटलं असेल. त्यानी उत्तर टाळलं. काही हरकत नाही. मी मुद्दासोडून दिला. सदस्यानं खरडफळ्यावर दंगा सुरु केला ! मग तिथे मला परत आठवण करुन द्यावी लागली. तेंव्हा सूं बाल्या केला ! असा प्रकार आहे.
↩ प्रतिसाद: गणेशा

हाहाहा.

शाम भागवत
Sun, 05/31/2020 - 23:56 नवीन
हाहाहा. मजा आली. :) तर..... शेवटी विजय तुमचाच झाला तर. अभिनंदन. :)
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मानव एक प्राणी आहे

Rajesh188
Sun, 05/31/2020 - 19:48 नवीन
मानव एक प्राणी आहे आणि त्याच्या मेंदू ला मर्यादा आहे त्या मर्यादे बाहेर जावून ती बघू शकत नाही,विचार करू शकत नाही आणि अनुभव सुधा घेवू शकत नाही. त्या माणसाला वाटत म्हणजे ते तसेच आहे असं काही नाही. देव शक्ती आहे ह्या वर माझा पूर्ण विश्वास आहे तो आहे हे अनुभवता येते पण सिद्ध करता येत नाही कारण ते मानवी बुद्धीच्या पलीकडले आहे. तसेच देव नाही असे पण सिद्ध करता येत नाही. कारण ब्रह्मांड सोडा तो विषय खूप मोठा आहे . पृथ्वी वरील पण किती तरी घटना कशा घडतात ह्याचे स्पष्टीकरण देता येत नाही.

बरोबर,

गणेशा
Sun, 05/31/2020 - 19:57 नवीन
बरोबर, त्यामुळे जे देव आहे हे मानतात ते पण बरोबर त्यांच्या जागेवर आणि जे देव नाही, हे मानतात ते पण बरोबर.. त्यांच्या जागेवर.. काहींना शक्ती निसर्ग वाटतो, काहींना शक्ती देव वाटतो, काहींना शक्ती चमत्कार वाटतो.. प्रत्येक जण बरोबरच.. देव आहे की नाही सिद्ध करता येत नसेल तर लॉजिकली सगळे बरोबर..
↩ प्रतिसाद: Rajesh188

तर्कवादाच्या नियमानुसार

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 20:39 नवीन
एखादी गोष्ट आहे असं म्हणणार्‍यावर ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे. सिद्धत्वाचे तीन नियम आहेत : स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता आणि वारंवारिता. उदा. गुरुत्वाकर्षण : कुठेही, केंव्हाही, कुणीही हाततली वस्तु सोडा ती कायम खालीच येणार. देवाच्याबाबतीत सगळे अनुभव व्यक्तिगत, स्थल-काल सापेक्ष आणि सातत्यहीन आहेत.
↩ प्रतिसाद: गणेशा

एखादी गोष्ट आहे असं म्हणणार्

सुबोध खरे
Sun, 05/31/2020 - 20:59 नवीन
एखादी गोष्ट आहे असं म्हणणार्‍यावर ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे. काय सांगताय? एखादी गोष्ट नाही असं म्हणणार्‍यावर ते सिद्ध करण्याची जास्त जवाबदारी आहे. उदा. पुण्यात हिरव्या चाफ्याचं झाड नाहीच म्हणणार्याला अख्ख्या पुण्यातील झाडे शोधून त्यात हिरवा चाफा नाहीच हे सिद्ध करावे लागेल. या उलट एक जरी झाड दाखवले तरी पुण्यात हिरवा चाफा आहे हे सिद्ध होते.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ सुबोध खरे> एखादी गोष्ट नाही असं म्हणणार्‍यावर ते सिद्ध

संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 00:42 नवीन
> करण्याची जास्त जवाबदारी आहे ? तुमच्या दवाखान्यात तुम्ही स्वतःच सर्टीफिकेट लावलायं ते कशासाठी आहे ? तुम्ही डॉक्टर आहात हे सिद्ध करायची जवाबदारी कुणाची आहे ?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते सर्टिफिकेट लावलं पाहिजे

सुबोध खरे
Mon, 06/01/2020 - 00:46 नवीन
ते सर्टिफिकेट लावलं पाहिजे असा कायदा आहे म्हणून. अन्यथा मी सहाय्यक प्राध्यापक पण आहे ते कुठे लिहिलेलं नाही. आणि मी निवृत्त लष्करी अधिकारी आहे हा भारताच्या राष्ट्रपतींनी दिलेला मान आहे आणि मी तो अभिमानाने मिरवतो. मला काही सिद्ध करण्याची गरज नाही.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

?

संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 00:58 नवीन
तुम्ही डॉक्टर आहात हे सिद्ध करायची जवाबदारी तुमची आहे. तद्वत, "देव आहे" असं म्हणणाण्यावर ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मला तर्कवादच मान्य नाही..

गणेशा
Sun, 05/31/2020 - 21:18 नवीन
मला तर्कवादच मान्य नाही.. देव दिसत नाही तरी ते मानणारे मला बरोबर वाटतात.. देव दिसत नाही म्हणून ते न मानणारे ही मला बरोबर वाटतात.. मला वयक्तिक ती माणसे बरोबर वाटतात.. मला देव ही संकल्पनाच व्यक्ती सापेक्ष वाटते.. कोणाला काय वाटावे.. कोणाची कोणावर भक्ती हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यामुळे मला देव मानायचा की नाही हा माझा वयक्तिक प्रश्न.. देव आहे तर दाखव हे म्हणणे पण चूक.. आणि देव नाही हे सिद्ध कर हे म्हणणे पण मला चूकच वाटते.. देव आहे मानणारा, चमत्कार म्हणजे देव माणू शकतो.. अलोंकीक शक्ती म्हणजे जसे साईबाबा यांना देव माणू शकतो.. तसेच देव नाही असे माणणारा, ह्या सगळ्या घटना म्हणजे शास्त्रीय, मानवीय, मनाची शक्ती असे मानून देव नाही म्हणू शकतो.. Prove करायचेच का?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तर्कवाद

शा वि कु
Wed, 06/03/2020 - 19:04 नवीन
सिद्ध करण्याच्या चढाओढीत काही अर्थ नाही हा तुमचा मुद्दा पटला. आणि कोणी काय मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न हेही अगदी खरे. पण आपले विश्वास परिस्थितीशी सुसंगत आहेत का, हा प्रश्न पडणाऱ्या माणसाला तर्कवादाशिवाय काय पर्याय ? उदा- एखादा व्यक्ती ड्रॅगनवर विश्वास ठेवू शकतो/किंवा हत्ती नावाचा प्राणी एक कल्पना आहे असेही म्हणू शकतो. हे दोनही विश्वास त्यात्या माणसाने ठेवण्यात काही वाईट नाहीच. पण ड्रॅगन आहे/नाही आणि हत्ती असतो/नसतो दोन्ही प्रश्नांना दोन पूर्णपणे बरोबर आणि दोन पूर्णपणे चुकीची उत्तरे आहेत. हे शोधणे कुणी कुणावर थोपवू नये, पण जर उत्तर शोधणे हे ध्येय असेल, तर तर्कवादाला पर्यायच नाही.
↩ प्रतिसाद: गणेशा

स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता..बरोबर नाही

रविकिरण फडके
Sun, 05/31/2020 - 22:01 नवीन
माझी खात्री आहे, की तुम्हालाही माहिती असणार. तरीही, for the sake of completion सांगतो. Euclidean geometry त्रिमितीत लागू पडत नाही पण द्विमितीत ती खरी असतेच. आईन्स्टाईनने सिद्ध केलंच, की स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता अशी काही नसते.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आईन्स्टाईनने सिद्ध केलंच,

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 22:18 नवीन
की स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता अशी काही नसते. तुम्ही त्याच्या थिअरी ऑफ रिलेटिवीटीबद्दल बोलतायं का ? ______________________________________ स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता आणि वारंवारिता हे सर्व वैज्ञानिक सिद्धतेचे प्रमाण निकष आहेत.
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके

राज्यकर्ते हे मालकच असतात देशाचे

Rajesh188
Sun, 05/31/2020 - 20:02 नवीन
राज्य करते हे मालक च असतात देशाचे. देशाची सर्व जबाबदारी त्यांच्या वर सोपवलेली असते म्हणजे ते मालक च. वाईट गोष्टीला जबाबदार सरकार आणि चांगल्या घडणाऱ्या गोष्टीत त्यांना श्रेय नाही हे पटत नाही. देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर अवलंबून आहे म्हणजे ते मालकच. फक्त मालक निवडण्याचे अधिकार जनतेला आहे. समाज जसा अधिकाराची भाषा बोलतो तशी त्याला कर्तव्याची पण जाणीव असली पाहिजे. देशाप्रती कोणतीच कर्तव्य पार पाडायची नाहीत आणि अधिकार साठी भांडायचे हा स्वार्थी पना झाला. मी तर म्हणतो जो व्यक्ती नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडत नसेल तर त्याला राज्यकर्त्या वर टीका करण्याचा बिलकुल हक्क नाही. कर चुकवणारे,कायदे मोडणार,गैर मार्गांनी पैसे मिळवून सरकार आणि देशाचे नुकसान करणार त्या लोकांना सरकारी सोयी सुविधा च उपयोग का करून द्यावा. रस्ता पासून वीज,पाणी पर्यंत सर्व सुविधा त्यांना नाकारायचा सरकार ला पूर्ण अधिकार असावा

सांगायचं कारण असं की फोकस

सुबोध खरे
Sun, 05/31/2020 - 20:09 नवीन
सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे. कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही. जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच तुम्हाला भरपूर वेळ दिसतो. काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ? असं आहे का? चालू द्या.

सांगायचं कारण असं की फोकस

सुबोध खरे
Sun, 05/31/2020 - 20:09 नवीन
सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे. कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही. जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच तुम्हाला भरपूर वेळ दिसतो. काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ? असं आहे का? चालू द्या.

ती उदाहरणं आहेत

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 20:21 नवीन
आणि जी आठवली ती दिली आहेत. पैकी एक जिएसटीच्या पोस्टवरचं आहे. दुसरं काल या लेखावरचं आहे. तिसरं डिबींच्या कवितेवरचं आहे. एका सदस्यानं "तुमच्यासारखे सिए बेरोजगार करतो" वगैरे म्हटलं होतं. "बँकीग क्षेत्रात तुम्ही कोणत्या कार्यप्रणाली विकसित केल्यात ?" यावर त्यानं आवरतं घेतलं. त्यात व्यक्तिगत रोख नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यात व्यक्तिगत रोख नाही.

सुबोध खरे
Sun, 05/31/2020 - 20:31 नवीन
त्यात व्यक्तिगत रोख नाही. असं आहे का? मग ते सोनोग्राफीच्या रिटर्न्स चं कुठून आठवलं तुम्हाला? काय आहे की मला असे कुठले रिटर्न भरल्याचे आठवत नाहीये म्हणून विचारलं. म्हणजे माझा कर सल्लागार (सी ए च्या परीक्षेत नंबर काढलेला आहे) त्याने असे काही रिटर्न असतात असेही गेल्या 10 वर्षात सांगितले नाही. म्हणजे राहून गेले असतील तर दंडासहित भरून टाकावेत म्हणतोय.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही हट्ट सोडायला तयार नाही

संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 23:25 नवीन
आणि माझी स्मृती मला सहसा दगा देत नाही ! हे घ्या : एकदा तुम्ही ऑनलाईन रिटर्न भरू लागलात तर यात काहीही कठीण नाही. सर्व केमिस्ट आज हे करत आहेत. मी माझ्याकडे होणाऱ्या सोनोग्राफीचे रिटर्न रोजच्या रोज सरकारला अपलोड गेली चार वर्षे करत आहे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यात व्यक्तिगत रोख नाही

सुबोध खरे
Mon, 06/01/2020 - 00:52 नवीन
त्यात व्यक्तिगत रोख नाही. हंगाशशी आता कसं? जाता जाता:-- ते सामान्य माणसांना कळण्यासाठी आहे. त्याला रिटर्न म्हणत नाहीत किंवा त्याचा कर किंवा पैशाशी काहीही संबंध नाही. तो एक रोजचा अहवाल असतो. मुलगा किंवा मुलगी ही तपासणी करु नये म्हणून आम्ही केलेल्या सोनोग्राफीचा पाठपुरावा सरकार करतं आणि दुसरीकडे केलेल्या गर्भपाताचे त्याच्याशी ताडून पाहिले जाते की स्त्री गर्भाचा गर्भपात केला आहे का?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्याला रिटर्न म्हणत नाहीत ?

संजय क्षीरसागर
Mon, 06/01/2020 - 01:05 नवीन
मी माझ्याकडे होणाऱ्या सोनोग्राफीचे रिटर्न रोजच्या रोज सरकारला अपलोड गेली चार वर्षे करत आहे हे कुणी लिहीलं आहे ? पुढे लिहीलंय : गावागावात जर साधी माणसं व्हॉटस ऍप वापरू शकतात तर रिटर्न भरायला काहीही प्रश्न नाही जिएसटी रिटर्न भरणं म्हणजे वॉटस अ‍ॅपवर पोस्टीटाकणं आहे का ?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यात व्यक्तिगत रोख नाही.

सुबोध खरे
Mon, 06/01/2020 - 01:16 नवीन
त्यात व्यक्तिगत रोख नाही. तुमचं पितळ उघडं पाडणं हा हेतू होता. बाकी त्या धाग्यावरचं धुणं इथे कशाला धुताय? पडलो तरी नाक वर सिद्ध करायला? ते धुणं त्या धाग्यावर धुवू या हवं तर बाकी चालू द्या तुमचं प्रथम पुरुषी मी वचनी
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा