एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्याशी आंतरजालीय ओळख आहे.
सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे.
कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही.
____________________________________________
१. देवभोळे लोक :
जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे.
देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे.
थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही.
देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात.
त्यांना वाटतं आपण इतके दिवस काय झक मारली की काय ?
पण वरकरणी ते दाखवतात की हा श्रद्धेचा प्रष्ण आहे.
श्रद्धा म्ह्टल्यावर लॉजिक खलास, विषय संपला !
वास्तविकात देव या कल्पनेमुळे मानवता अनेकानेक धर्मात विभागली गेली आहे.
आणि ती कल्पनाच धर्मविस्तार आणि परिणामी अनेक युद्धांचं कारण आहे.
अशा युद्धांमुळे मानवतेचं अतोनात नुकसान झालं आहे.
देवभोळ्यांना ही उघड गोष्ट मंजूर नाही.
आपली ती खरी श्रद्धा आणि दुसर्याची ती अंधश्रद्धा ही प्रत्येकाची धारणा आहे.
प्रत्येक धर्म ही खरं तर स्वरुपाचा उलगडा करण्याची प्रणाली आहे.
तस्मात, वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे.
सांगायचं कारण असं की वरची एकही गोष्ट लक्षात न घेता देवभोळे लेखनावर तुटून पडतात.
अर्थात, कल्पनेचा वास्तविकतेपुढे काय पाड लागणार ?
परिणामी ते निरुत्तर होतात.
मग हेकेखोर, पढत मूर्ख, स्वतःला शहाणा समजणारा... अशा बिरुदावली लावल्या जातात.
थोडक्यात, जिथे फोरमवर वस्तुनिष्ठ चर्चा व्हायला हवी तिथे आखाडा तयार होतो.
____________________________________________
२. नाम, जप, परिक्रमा.........
एकदा देव ही कल्पना आहे म्हटल्यावर तदनुषंगिक सर्व गोष्टी केवळ टाईमपास होतात.
पण वर्षानुवर्षे या गोष्टीत रमलेले तंद्रीतून बाहेर पडायला राजी होत नाहीत.
इथे पोथ्याच्या पोथ्या, परिक्रमेच्या लेखमाला आणि भक्तीमार्गियांचे भावूक लेख आणि कविता टाकल्या जातात.
त्यावर भाविकांचे भावविभोर प्रतिसाद चालू होतात.
आता जरा काही वास्तववादी बोललं की येळकोट सुरु होतो.
कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ?
का त्याची देशाला गरजच नाही ?
___________________________________________
३. राजकारण
सरकार ही एक सर्विस प्रोवायडर संस्था आहे.
प्रत्येक सेवा आणि वस्तुवर जनता जो कर देते त्यातून जनहीताची कामं करणं हे सरकारचं एकमेव काम आहे.
फक्त इन्कम टॅक्स भरणारे देशसेवा करतात आणि इतरांना जाब विचारण्याचा अधिकार नाही हा गैरसमज आहे.
सामान्यांचं जीवनमान उंचावलं जाणं आणि नागरिकांचं जगणं सुखाचं होणं हा सरकारच्या यशस्वीतेचा एकमेव मानक आहे.
सरकारच्या निर्णयाबद्दल चर्चा म्हणजे देशद्रोह अशी जर नागरिकांची समजूत असेल तर लोकशाहीला अर्थच उरत नाही.
पंतप्रधानासकट प्रत्येक लोकप्रतिनीधी हा जनतेचा नोकर आहे.
पगार घेत नाही म्हणून कुणीही देशाचा मालक होत नाही.
पदावर असेपर्यंत तो जनतेचा नोकर आहे आणि
सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा जाब विचारायचा हक्क नागरिकांना आहे.
थोडक्यात, नेत्याला डोक्यावर घेणं गैर आहे.
सव्वाशे कोटींच्या देशात कुणाला ऐकमेव समजणं हा देशाच्या बुद्धीमत्तेचा अपमान आहे.
तस्मात, सरकारी निर्णयावर भक्त आणि विरोधक असे तट सुशिक्षितातच पडले,
तर देशाला प्रो-पब्लिक पॉलिटिक्स करणारं नेतृत्व लाभण्याची शक्यता शून्य !
______________________________________
४. अध्यात्म
सर्व चराचर, सत्यानं अंतर्बाह्य व्याप्त आहे
हा अध्यात्माचा साधा अर्थ आहे.
त्याचा व्यत्त्यास म्हणजे सत्यापरता इथे काहीही नाही.
तरीही "मी सत्य आहे" म्हटलं की......
लोक जाम पिसाटतात.
जर सर्वच सत्य आहे तर
इथला प्रत्येक जण, त्याला तो उलगडा होवो किंवा न होवो,
सत्यच आहे.
पण आपल्याला उलगडा होत नाही याचा अर्थ लोक,
आपण चुतिया आहोत असा काढतात !
मग ज्याला उलगडा झाला त्याचं काही ऐकण्यापेक्षा;
तोच कसा मूर्ख आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते.
परिणामी लोकांना आपणही सत्य आहोत हे समजण्याची शक्यता मावळते.
संकेतस्थळावर अध्यात्मिक लेखनाची अशी वाट लागते म्हटल्यावर,
इथे ते लेखन बंद करण्यापरता पर्याय राहिला नाही.
______________________________________
५. स्वरुपाचा उलगडा आणि जीवनविषयीक आकलन
स्वरुपाचा उलगडा मनाच्या सर्व पैलूंचं ज्ञान आपसूक घडवतो
प्राणायाम आणि योगामुळे शारिरिक कार्यप्रणालीचं व्यावहारिक ज्ञान उपलब्ध होतं.
स्वरुपाचा उलगडा कार्यकौशल्य आणि कार्य सहज करण्याला सहाय्यभूत होतो.
परिणामी समस्येचं त्वरित आकलन आणि सोडवणूकीचा सोपा मार्ग दिसतो.
स्वरुपाचा उलगडा वक्तव्यात ठामपणा आणतो.
कोणत्याही विषयावर काहीही लिहीलं की लोक सुरु :
मीच शहाणा, मलाच सगळं कळतं, मी म्हणतो तेच खरं.....
मग अशा वेगळ्या विषयांवर चर्चा कशी होणार ?
मन हा बायोकंप्युटर नाही का ?
नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ?
त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ?
असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी.
यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ?
___________________________________________________
६. व्यावसाय :
पैसा हा जीवनाचा एक महत्तम पैलू आहे.
व्यावसायिक अनुभवामुळे त्याच्या सर्वप्रकारे अभ्यास झाला आहे.
अध्यात्मामुळे पैशामागच्या सर्व मानसिकतेची उकल झाली आहे.
जुगारा पासून ते बजेटपर्यंत सगळ्या बाबींचा यथोचित विचार झाला आहे.
सांगायचं कारण असं की जे लिहीतो ते अनुभवातून आलेलं आहे
आणि सर्वांना उपयोगी व्हावं म्हणून लिहीतो.
तरीही लोक लपाछपीचे धंदे बंद होणार,
अमक्या अॅक्टमुळे दुकान बंद होणार....
जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच
तुम्हाला भरपूर वेळ दिसतो.
काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ?
अशा काहीही कमेंटस मारतात.
मग मनात नसतांना बखेडा सुरु होतो.
__________________________________________
७. भग्व्दगीता :
हा ग्रंथ भारतीय अध्यात्मात मानदंड मानला गेला आहे.
पण कृष्णाचं मूळ प्रयोजन साधकांना मार्गदर्शन नसून
अर्जुनाला युद्धप्रवण करणं आहे.
त्यामुळे संसारी किंवा सामान्य साधकाला खरं तर याचा उपयोग नाही.
थोडक्यात, तो सर्वांना दिशादर्शक ठरेल असा,
अध्यात्मिक ग्रंथ नाही.
सांख्ययोगातले दोन श्लोक;
नैनं च्छिंदंती शस्त्राणी, आणि
या निशा सर्व भूतानां, सोडले तर,
सामान्य साधकाला उपयोगी होतील,
असे कोणतेही श्लोक यात नाहीत.
यातल्या कर्मयोगानं तर भारतीय मानसिकतेचा
कर्माप्रती पुरता गोंधळ उडवून दिला आहे.
फलाकांक्षारहित कर्म, इश्वरसमर्पित कर्म....
अशा अव्यवार्ह कल्पनांमुळे
बहुतेकांचा कल,
सचोटी आणि तन्मयतेनं काम करण्याऐवजी;
नाईलाज म्हणून काम आणि
शक्यतो कर्ममुक्तीकडे वळला आहे.
गीतेचे वेगवेगळे अर्थ काढण्याचं काम
भारतात गेली हजारो वर्ष चालू आहे.
या निरर्थक प्रयासाबद्दल,
जरा कुठे वस्तुनिष्ठ विचार मांडला
की गीताप्रेमी हुल्लड चालू करतात.
नक्की काय संदेश दिलायं या ग्रंथानं,
ज्यानं देशाचं भलं झालं ?
कोणती साधनाप्रणाली साधकांना स्वरुपाचा उलगडा घडवू शकली ?
यावर वस्तुनिष्ठ आणि खुल्या चर्चा,
पब्लिक फोरमवर घडायला काय हरकत आहे ?
_________________________
तर अशी सगळी परिस्थिती आहे.
मग कुणी खरडफळा रगडतोयं,
अचानक भूछत्रीसारखे ट्रोलर्स प्रकट होतायंत
ज्यांना दोन ओळी धड लिहीता येत नाही
ते मला विचारतात
तीन वर्ष झक मारली का ?
आत्मपूजा उपनिषदावर आख्खी सिरीज
मनोगतवर प्रकाशित झाली आहे.
अष्टावक्राच्या सांख्ययोगावर
लेखमाला लिहीली आहे.
निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीवर
लेख प्रकाशित झाले आहेत.
बुद्ध, ओशो, विविध ध्यान प्रणाली
यांचावर तिथे लिहीलं आहे.
कर्मयोगासारख्या रोजच्या विषयावर
लोकोपयोगी भाष्य केलंय.
विवाह, उत्सव, भय, सजगता
अशा अनेकविध विषयांवर
लेखन केलंय....
कुणी तद्दन कविता टाकतो.
कुणी भंकस लेख लिहीतो....
गप्प करणारं उत्तर दिलं की मग
वातावरण बिघडल्याचा कांगावा होतो !
काय साधतो आपण या सगळ्यातून ?
-----–---------------------–-----------------------------------
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असल्याने आणि बरेच वैयक्तिक आणि आक्षेपार्ह प्रतिसाद वाढत असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.
-मिपा व्यवस्थापन
----------------------------------------------------------------
वाचने
78328
प्रतिक्रिया
222
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिहिलेले बरोबर आहे..
मी कधीही आणि कुणाचीही
In reply to लिहिलेले बरोबर आहे.. by गणेशा
सर, मागे मी राजकीय लिहिले
In reply to मी कधीही आणि कुणाचीही by संजय क्षीरसागर
जबाबदार आपण हि
In reply to मी कधीही आणि कुणाचीही by संजय क्षीरसागर
बील्ली हजको चली...
In reply to जबाबदार आपण हि by चौकस२१२
चोराच्या उलट्या..?
In reply to बील्ली हजको चली... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलेही प्रतिसाद असेच असतात स्वतः किती बरोबर आणि इतर कसे चुकीचे. सरकारच्या वतीने काही नियुक्त मानधनावर काम करत असल्यासारखे निरर्थक, प्रतिसाद. भाषेच्या बाबतीत तोल गेलेले आणि प्रतिसादाचे निरर्थक शेपूट.तुमचे प्रतिसादही असेच असतात, फक्त "तुम्हाला सरकार विरोध करण्यासाठी मानधनावर नियुक्त केले असावे" इतकाच बदल आहे.संस्थळावर हेल्दी वातावरणासाठी काही समजही आवश्यक असते. दुसर्याला सांगण्याअगोदर स्वतःकडेही पाहिले पाहिजे असे वाटते.लॉकडाऊनच्या धाग्यात इमानेइतबारे मोदींवर वाट्टेल ते लॉजिक वापरून टीका केल्यावर आता मानभावीपणे हेल्दी वातावरणाची अपेक्षा बाळगणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. "तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या रोजगाराची सोय समाजाने / सरकारने करावी" अशी अपेक्षा असलेले तुमचे प्रतिसाद वाचून तुमच्याकडेही दुर्लक्ष केले होते, पण इथे ज्ञान देतांना दिसलात म्हणून सांगावेसे वाटले.अपेक्षित प्रतिसाद
In reply to चोराच्या उलट्या..? by मोदक
अरेच्चा.. मला वाटले होते
In reply to अपेक्षित प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुधारणा:
In reply to अपेक्षित प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अपेक्षा
In reply to चोराच्या उलट्या..? by मोदक
एक वेगळ्या विषयावरील धागा.
मन हा बायोकंप्युटर नाही का ?
हीच पुनर्जन्माच्या रहस्याची उकल आहे
In reply to मन हा बायोकंप्युटर नाही का ? by सतिश गावडे
तुमच्या म्हणण्याचा आदर आहे.
In reply to हीच पुनर्जन्माच्या रहस्याची उकल आहे by संजय क्षीरसागर
का कोणास ठाऊक, पण माझा
का कोणास ठाऊक, पण माझा
In reply to का कोणास ठाऊक, पण माझा by mrcoolguynice
मेंदूशिवाय
In reply to का कोणास ठाऊक, पण माझा by सतिश गावडे
त्या संशोधकांचं
In reply to मेंदूशिवाय by संजय क्षीरसागर
बाय द वे,
In reply to मेंदूशिवाय by संजय क्षीरसागर
पाप - पुण्य या
In reply to बाय द वे, by mrcoolguynice
ज्या प्रमाणे , ऑलिव्ह रिडले
In reply to पाप - पुण्य या by संजय क्षीरसागर
>>>पाप- पुण्याचा उपयोग समाज
In reply to पाप - पुण्य या by संजय क्षीरसागर
मी पुनर्जन्म या संकल्पनेकडे,
In reply to का कोणास ठाऊक, पण माझा by सतिश गावडे
काये हे
In reply to मी पुनर्जन्म या संकल्पनेकडे, by mrcoolguynice
सर, अहो मी, "पुनर्जन्म " या
In reply to काये हे by संजय क्षीरसागर
पुनर्जन्म मी तेंव्हा मानेल
In reply to का कोणास ठाऊक, पण माझा by सतिश गावडे
पुनर्जन्म मी तेंव्हा मानेल जेंव्हा
In reply to पुनर्जन्म मी तेंव्हा मानेल by गणेशा
बरोबर, मला जोपर्यंत देवाचा
In reply to पुनर्जन्म मी तेंव्हा मानेल जेंव्हा by संजय क्षीरसागर
हे बरोबरे !
In reply to बरोबर, मला जोपर्यंत देवाचा by गणेशा
हाहाहा.
In reply to हे बरोबरे ! by संजय क्षीरसागर
मानव एक प्राणी आहे
बरोबर,
In reply to मानव एक प्राणी आहे by Rajesh188
तर्कवादाच्या नियमानुसार
In reply to बरोबर, by गणेशा
एखादी गोष्ट आहे असं म्हणणार्
In reply to तर्कवादाच्या नियमानुसार by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे> एखादी गोष्ट नाही असं म्हणणार्यावर ते सिद्ध
In reply to एखादी गोष्ट आहे असं म्हणणार् by सुबोध खरे
ते सर्टिफिकेट लावलं पाहिजे
In reply to @ सुबोध खरे> एखादी गोष्ट नाही असं म्हणणार्यावर ते सिद्ध by संजय क्षीरसागर
?
In reply to ते सर्टिफिकेट लावलं पाहिजे by सुबोध खरे
मला तर्कवादच मान्य नाही..
In reply to तर्कवादाच्या नियमानुसार by संजय क्षीरसागर
तर्कवाद
In reply to मला तर्कवादच मान्य नाही.. by गणेशा
स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता..बरोबर नाही
In reply to तर्कवादाच्या नियमानुसार by संजय क्षीरसागर
आईन्स्टाईनने सिद्ध केलंच,
In reply to स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता..बरोबर नाही by रविकिरण फडके
राज्यकर्ते हे मालकच असतात देशाचे
सांगायचं कारण असं की फोकस
सांगायचं कारण असं की फोकस
ती उदाहरणं आहेत
In reply to सांगायचं कारण असं की फोकस by सुबोध खरे
त्यात व्यक्तिगत रोख नाही.
In reply to ती उदाहरणं आहेत by संजय क्षीरसागर
तुम्ही हट्ट सोडायला तयार नाही
In reply to त्यात व्यक्तिगत रोख नाही. by सुबोध खरे
त्यात व्यक्तिगत रोख नाही
In reply to तुम्ही हट्ट सोडायला तयार नाही by संजय क्षीरसागर
त्याला रिटर्न म्हणत नाहीत ?
In reply to त्यात व्यक्तिगत रोख नाही by सुबोध खरे
त्यात व्यक्तिगत रोख नाही.
In reply to त्याला रिटर्न म्हणत नाहीत ? by संजय क्षीरसागर
लेखकाचे मस्त
कंप्युटर ही मनाच्या कार्यप्रणाली सदृश
In reply to लेखकाचे मस्त by Rajesh188
संक्षी साहेब थोडे स्पष्ट
?
In reply to संक्षी साहेब थोडे स्पष्ट by मामाजी
आणखी लेटेस्ट हवं असेल तर
In reply to ? by संजय क्षीरसागर
बौद्धमतवादी पंडीत
In reply to संक्षी साहेब थोडे स्पष्ट by मामाजी
प्राब्लेम काहीच नाही. कुणी
हा 'भरकटलेला' प्रतिसाद आहेच
मोकाशींची 'कल्पान्त' ही अप्रतिम सुंदर कथा
In reply to हा 'भरकटलेला' प्रतिसाद आहेच by रविकिरण फडके
अगदी थोडक्यात सांगतो
In reply to मोकाशींची 'कल्पान्त' ही अप्रतिम सुंदर कथा by संजय क्षीरसागर
अत्यंत सुरेख कथा !
In reply to अगदी थोडक्यात सांगतो by रविकिरण फडके
देव ही संकल्पना
In reply to अत्यंत सुरेख कथा ! by संजय क्षीरसागर
स्टिफन हॉकींगनी
In reply to देव ही संकल्पना by Rajesh188
नक्कि प्रोब्लेम काये ?
थँक्स !
In reply to नक्कि प्रोब्लेम काये ? by प्रसाद गोडबोले
निरीक्षणाशी मी सहमत आहे
In reply to नक्कि प्रोब्लेम काये ? by प्रसाद गोडबोले
संजय सर लेख उत्तम आहे. मी
कोणत्या प्रेक्षकांसमोर काय सादर करायचं
In reply to संजय सर लेख उत्तम आहे. मी by बोलघेवडा
तुमची मार्केटिंग स्किल्स
तेच तेच