भारतातील घरकामे आणि परदेशातील घरकामे

जेडी's picture
जेडी in काथ्याकूट
30 May 2020 - 4:39 pm
गाभा: 

मी असे ऐकलंय कि परदेशी राहणारे त्यांच्या घरची कामे स्वतःच करतात कारण तिकडे कामवाल्या बाया मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांचे चार्जेसही खूप आहेत . नोकरी करणाऱ्या स्त्रिया कसे म्यानेज करतात ? लॉकडाऊन चालू झाल्यापासून तर हे प्रकर्षाने जाणवत आहे. सर्व कामे घरीच करावी लागत असल्याने सकाळची ऑफिसची वेळ साधायला खूपच कसरत करावी लागत आहे. तरी ऑफिस असताना रोजचं साधं जेवणच करत आहे पण त्यातही किमान चार पदार्थ (भाजी , भाकरी , भात, आमटी ) करावेच लागत आहेत . परदेशी राहणारे भारतीय हे सर्व जर करू शकत असतील तर मलाच टाइम मॅनॅजमेण्ट जमेना का काय असे वाटून राहिले आहे . मी असेही ऐकलंय कि परदेशी राहणारे रोज स्वयंपाक करत नाहीत पण असं ब्रेड पावावर महिनोनमहीने कोणी काढत नसावेत. शिवाय त्यांची घरेही मोठाली असतात. इथे २ बीचके चा फ्लॅट स्वच्छ ठेवायला नाकी नऊ यायला लागली आहे .भाज्या आणा, भिजत ठेवा , धुवा , निवडा ... पूर्वी हे होतेच पण पण तेंव्हा इतर कामासाठी बाई असल्याने त्याचे काही वाटायचे नाही पण आता मात्र सर्व घरातच करून नोकरी करणे दिव्य वाटू लागलय. पण परदेशी राहणारे मात्र हे लीलया कसे काय पार पाडत असावेत ह्यावर विचार करूसा वाटत आहे.

तर परदेशी मिपाकर हे कसे म्यानेज करतात किंवा भारतात राहणारेही सदया कसे जमवत आहेत ह्यावर चर्चा व्हावी .

प्रतिक्रिया

भुजंग पाटील's picture

1 Jun 2020 - 12:42 pm | भुजंग पाटील

माझे निरिक्षण + अनुभवः (यूएसए मध्ये २० वर्षे)

  • हेल्प: इथे मेड ठेवणे बरेच खर्चिक आहे. माझ्या एका दोघा परिचितांकडे पुर्णवेळ लॅटीना मेड आहे. त्यांना खाणे पिणे, आणि ६० डॉलर च्या आसपास रोज द्यावा लागतो.
  • कपडे: कपडे खूप काही मळत नाहीत, त्यामुळे वॉशर आणि ड्रायर वर काम भागते. हाताने घासावे / धुवावे लागत नाही. लौंड्री फोल्ड करणे थोडे वेळखाऊ आहे, पण गप्पा टाकत नेटफ्लीक्स बघत करता येते.
  • केरः घरात धूळ येत नाही, त्यामुळे बेडरूम्स आठवड्यातून एकदा ; लॉफ्ट आणि बेसमेन्ट २ ते ३ आठवड्यातून एकदा व्हॅक्युम केलेले चालते. फॅमिली रूम आणि लिव्हींग रूम हे वर्दळीचे भाग २-३ दिवसात व्हॅक्युम होतात, किचन चा ओटा आणि फरशी आम्ही रोज पुसतो.
  • रूम्बा (रोबोट व्हॅक्युम क्लिनर) घेतला आहे. रात्री ऑन केला की मुलांनी सांडलेले क्रम्ब्स वगैरे साफ करून ठेवतो.
  • भांडी: डिशवॉशर मध्ये बर्यापैकी निघतात. खूपच तेलकट झाली असतील तर मात्र एकदा हाताने साबण लावून डिशवॉशर मध्ये ठेवावी लागतात.
  • स्वयंपाकः आम्ही आता शक्यतो रोज ताजा करतो. हिचा जॉब पार्टटाईम आहे, आणि लॉकडाऊन आहे म्हणून शक्य होते. एरवी आठवड्यातून एक दोनदा सलाड+ इटालियन किंवा मेक्सिकन (कसेडीया/बरीतो) किंवा टेकाअऊट मुळे थोडाफार वेळ वाचतो.
    भाज्या एखाद्या शनिवारी धुवून, चिरून, फोडण्या देऊन डीप फ्रीझर मध्ये ठेवल्या तर २-३ आठवडे छान टिकतात.

इतर:

  • दुध तापवावे लागत नाही
  • तांदूळ, डाळी निवडाव्या लागत नाहीत.
  • चांगले सूप आणि बिन्स कॅन मध्ये प्रिकूक्ड मिळतात. ते उकळायचा / उकडायचा वेळ वाचतो. मायक्रोवेव्ह मध्ये ३० सेकंदात होते.
  • लॉकडाऊन पासून बहुतेक स्टोअर्स ( कॉस्टको , ऍमेझॉन ) ग्रोसरी २ तासात घरपोच देतात
  • गॅरेज मध्ये दुसरा फ्रीज किंवा डीप फ्रीझर असतो बहुतेक घरांत. त्यात चिकन / मासे / भाज्या तारीखवार ठेवतो. लाईट सहसा जात नाहीत (२०१२ च्या सँडी स्टॉर्म नंतर एकदाही गेले नाहीत), त्यामुळे हे शक्य होते.
  • लॉन मोविंग आणि बागकाम थोडे वेळखाऊ आहे, पण वीकएंड ला करता येते किंवा कोणाला तरी हायर करता येते .

खरा पिट्ट्या पडतो तो हिवाळ्यात; ड्राइव्ह वे आणि साईड वॉक वर साठलेला फूट - दोन फूट बर्फ काढतांना. चांगल्या क्वलिटीचा स्नो ब्लोवर नसेल तर शवल करून करून पाठ मोडते आणि अर्धा दिवस जातो. टाऊनशीपच्या मालकीचा साईड वॉक (फूटपाथ) जरी असला तरी बर्फ काढण्याची जबाबदारी त्या लगतच्या घराची असते. आळस केला तर नोटिस आणि तिकीट येते घरी. असोसिएशन (सोसायटी) मध्ये घर असेल तर हे काम कॉन्ट्राक्ट ने देता येते.

धन्यवाद हो.. नेमकी माहिती दिली आहे.

गाड्यांसंदर्भात एक प्रश्न. तुम्ही कारसाठी ऑटोमेटेड कार वॉश निवडता की गाड्यांची देखभाल स्वत: करता..?
गाडीचे डिटेलिंग वगैरे करून घेता का..?

>>>भांडी: डिशवॉशर मध्ये बर्यापैकी निघतात. खूपच तेलकट झाली असतील तर मात्र एकदा हाताने साबण लावून डिशवॉशर मध्ये ठेवावी लागतात.
म्हणजे एकदा विसळून डिशवॉशरमध्ये ठेवता की साबण लावूनच डिशवॉशरमध्ये ठेवायचे..?

आणखी बरेच प्रश्न आहेत - सुचतील तसे विचारत जाईन.

भुजंग पाटील's picture

2 Jun 2020 - 12:53 am | भुजंग पाटील

गाड्या: ऑटोमेटेड कार वॉश सुटसुटीत वाटतो. गाडीतून उतरावे लागत नाही. तिथेच व्हॅक्युम पम्प पण असतात.
घरात ग्यरेज आणि पॉवर वॉश आहे, त्या मुळे घरी करतो अधुनमधून. पण गाडीच्या खालचे नीट स्वच्छ व्ह्यायला ऑटोमेटेड कार वॉश च बरा.
हिवळ्यात रस्त्यांवर मीठ टाकलेले असते, त्यामुळे अवस्था वाईट होते गाड्यांची..तेव्हा वरचेवर वॉश करावे लागते. बाकी २-३ महिन्यातून एखाद वेळी करतो.
डिटेलींग आणि सर्व्हिसींग लाँग ट्रीप नंतर एकदा करतो.. ऑईल चेंज करायचा घरी प्रयत्न केला होता, पण झेपले नाही. :)

डिशवॉशर : फक्त साबण लावून आणि घासून..न विसळता.

मोदक's picture

2 Jun 2020 - 3:32 pm | मोदक

धन्यवाद हो..!

पाषाणभेद's picture

1 Jun 2020 - 7:43 pm | पाषाणभेद

व्वा वा. परदेश म्हणजे अजूनही आमेरीका का.
बाकी चालू द्या.

भुजंग पाटील's picture

1 Jun 2020 - 9:21 pm | भुजंग पाटील

इतके डिप्रेस होऊ नका..

हे असले "बाकी चालू द्या" सारखे खोचक प्रतिसाद लिहिण्यापेक्षा पोस्ट इग्नोर करत जा. सकारात्मक बदल दिसतील स्वतःमध्ये.
ह्या सारखी पोस्ट आधी रवंथ करून झाली असेल तर वाटल्यास लिन्क द्या आणि विषय संपवा.

आणि "अजूनही अमेरिका" म्हणजे नेमके कधी पर्यंत अमेरिके बद्दल बोललेले ओके होते?
असे काय घडले ज्यामुळे कोणी प्रामाणिकपणे विचारलेला परदेशा बद्दलचा प्रश्न अन अमेरिकेतून आलेले उत्तर तुमच्या डोक्यात जातेय?

तसेही ऑस्ट्रेलिया, युके, न्यूझीलंड मध्ये थोड्या फार फरकाने हेच असते. गल्फ चे मिपाकर असतील तर लिहीतील.

बाकी रवांडा / बुरुंडी / झांबिया चे प्रतिसाद आल्यावर करा कौतूक. तोवर "अजूनही आमेरीका" वर भागवा ;) .

आंबट चिंच's picture

2 Jun 2020 - 12:28 pm | आंबट चिंच

खुप छान जिरवलीत तुम्ही पाटील साहेब.
हाच तो आत्मघातकी भोचकपणा…
स्वतः तर काही मदत करायचीच नाही आणि दुसर्याने केली तरी त्याला नावे ठेवायची...

पाषाणभेद's picture

5 Jun 2020 - 12:26 am | पाषाणभेद

डिप्रेस होण्याचे कारणच काय? मी ना परदेशी राहत अन ना मला तेथे असले कामे करावे लागत अन ना मला प्रश्न पडत.

अन भोचकपणा कसला त्यात?
एकदा का आंतरजालावर आलात तर सगळे उघडे असते. मग झाकणार काय? अन जिरवली वगैरे बोलणे अन ते मला लागणे हे काही होत नाही. असले बोलणे करून 'थर्मास मात्र अमेरीकन दिसतोय' चा वार लागलेला दिसतो.

धाग्यात जे प्रश्न विचारले आहेत ते अमेरीका अन तत्सम विकसनशील देशातलेच आहे. इतरही देश आहेत. असो.

बाकी चालू द्या.

असहमत पाभे.. धागा एकदा नीट वाचा आणि भुजंगरावांच्या प्रतिसादावरचा तुमचा प्रतिसाद वाचा.

विशेषतः परदेशी मिपाकर हे कसे म्यानेज करतात किंवा भारतात राहणारेही सदया कसे जमवत आहेत ह्यावर चर्चा व्हावी . हे जर धागालेखकाने स्पष्ट लिहिले असेल तर "परदेश म्हणजे अजूनही आमेरीका का. बाकी चालू द्या." हे लिहिण्याची काय आवश्यकता होती..?

सध्या तुम्ही भारतात घरीच आहात ना..? मग घरकामे कशी मॅनेज करत आहात..? हा साधा सोपा प्रश्न धागालेखकाने विचारला आहे.

पाषाणभेद's picture

5 Jun 2020 - 12:52 am | पाषाणभेद

भुजंगरावांसाठी माझ्या प्रतिसादाची पहिली ओळ आहे.
आणि आंबंट चिंचसाठी बाकीची प्रतिक्रिया आहे. गोड चिंचदेखील असते.

आणि धागालेखकाने परदेशी मिपाकरांसाठी जरी लिहीले आहे तरी धाग्यातले उल्लेख हे विकसनशील देशातले आहे हे नक्की. मग मी आमेरीका का असा उल्लेख केला. बाकी अमेरीका काय किंवा तत्सम देश काय किंवा अविकसीत परदेश काय, माणूस म्हटला की त्याचे सर्व स्वभाव वागणूक सर्वसाधारणपणे सारखीच होत जाते. प्रत्येक देशात (अमेरीकाही आलीच) आपल्यासारखा माणूस भेटतो, आपल्यापेक्षा उच्च दर्जाचा भेटतो, निम्न दर्जाचा भेटतो. परत एक, एकाच माणसाचे वागणे मला वेगळे अन दुसर्‍याला वेगळे वाटू शकते.
असो.

नित्यानंदांचे भक्त का हो तुम्ही..? =))

चौकस२१२'s picture

5 Jun 2020 - 4:58 am | चौकस२१२

"परदेश म्हणजे अजूनही आमेरीका का. बाकी चालू द्या." हे लिहिण्याची काय आवश्यकता होती..?
सहमत .. मूळ धागाकर्त्याने स्पष्ट त्यांच्या मनातील कुतूहल हे सुरवातीला आणि पुढेही सांगितले आहे ,, त्यावर वेगवेगळ्या भारताबाहेरील देशातील लोकांनी अनुभव / कल्पना दिली .. त्यात आपली वाढ करा हवे तर पाषाणभेद.. उगाच असली खोचक टीका टिप्पणी कशाला?
"नेहमीच येतो मग पावसाळा" या नात्याने .. वर्तमान पात्रात वर्षातून एकदा तरी " अमेरिकेत कसे बेकार आहे .." या ढंगाचा एक तरी लेख यायचा त्याच्यात पण हाच कुजके पण असायचा ..अर्थात हे हि मान्य कि पूर्वी "बघा अमेरिकेत कसे गुळगुळीत अशी टिमकी वाजवणारे लेख पण यायचे काही एन आर आय महाभागांकडून .."
आता एकतर राहणीमानात काही गोष्टीत साम्य आले आहे आणि जगप्रवास सगळ्यांचाच वाढला आहे त्या मुळे नावीन्य कमी झाले... आता अशी सकारात्मक देवाण घेवाण कार्यायची कि तेच तेच "अमेरिकेत वाटतं .." असला कुजके पण करायचा ?

घरकाम करणारी बाई अमेरिकेत सुद्धा मिळतात पण त्यांचे पगार परवडत नाहीत..
म्हणून स्वतःची कामे स्वतः करणे ह्याला पर्याय नाही.
तिथे घरकाम करणारी बाई आहे म्हणून तिला कमी पगारात राबवून घेईन,कसे ही राबवून घेईल हे शक्य नाही शिक्षा होईल.
ही भीती असतेच.
भारता मधून जे भारतीय (अर्थातच अती श्रीमंत ज्यांची अमेरिकेत पण घर असतात.)
सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेत जातात तेव्हा मुल सांभाळणाऱ्या मोलकरणी,स्वयंपाक करणाऱ्या कुक येथून बरोबर घेवून जातात तेव्हा तेथील सरकार च्या सर्व अटी मान्य असल्याचे लेखी करार द्वारे मान्य करावे लागते.
त्या मध्ये मोलकरणी का तासाला किती पैसे द्यावे लागतील
तिच्या कडून फक्त 8 की सहा तासाच्या वर काम करून घेता येणार नाही.
तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली द्यावी लागेल.
तिच्या आजार पणाचा सर्व खर्च मालकाला करावा लागेल अशा सर्व अटी मान्य असल्याचे लेखी द्यावे लागते.
ह्या अटीचे उलखन झाले आणि तशी तक्रार मोलकरणी नी केली तर मालकाला शिक्षा होवू शकते.
खोब्रागडे प्रकरण सर्वांना माहीतच असेल.

हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे का..?

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 9:55 am | चौकस२१२

मोदक जी आपण प्रश्न राजेश यानं विचारला आहेत पण मी उत्तर देतो.. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांची परिस्थिती साधारण सारखी आहे या बाबतीत ( परदेशातून कामासाठी माणसे स्वत्तात आणणे) यावर मी सिंगापोरे , ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथे निरीक्षण केले त्यावरून
ऑस्त्राएलीया आणि अमेरिकेत असे कोणाला आणणे फार सोपे नाहीये खास करून ऑस्ट्रेलियात तर जास्ती अवघड आणि कमीत कमी पगार वैगरे नियम कडक आहेत ( येथे ऑस्ट्रेलियन डॉलर कमीत कमी १९ प्रति ताशी ++)

माझ्य एका मैत्रिणीने जेव्हा येथे इमिग्रेशन कन्सल्टन्ट चा व्यवसाय सुरु केला होता तेव्हा पहिली कल्पना तीच होती पण १ तासात चौकशी केल्यावर कळलं कि अधिकृत रित्या असे करणे फार अवघड आहे ..
अमेरिकेतील ऐकीव माहिती अशी कि तिथे बरेच लॅटिन अमेरिकन बेकायदेशीर आहेत आणि म्हणून ते मिळेल त्या दारात घरकामे करतात .. ( खरे आहे कि नाही माहित नाही )
तसे इथे तसे फार थोडे आहे ..
सिंगापोर आणि दुबईत हे सरळ सोपे आणि परवडणारे आहे

शेखरमोघे's picture

2 Jun 2020 - 8:45 am | शेखरमोघे

या सन्दर्भातली एक बरीच (कु)प्रसिद्ध कथा इथे वाचता येईल

https://en.wikipedia.org/wiki/Devyani_Khobragade_incident

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 11:15 am | चौकस२१२

अरे बापरे केवढ नाट्य आहे या घटनेत आणि त्यानंतर घडलेल्या सगळ्या महाभारतात.. पुढे काय झाले कोण जाणे
अजून यावर चित्रपट कोणी कसा काढला नाही कोण जाणे?
- मालक मजूर अंघर्ष
- दोन धर्माची लोक/ खोब्रागडेंना बसपा कडून पाठिंबा वगैरे !
- दोन देश त्यांची इज्जत वैगरे
- विभागलेलं कुटुंब ( खोब्रागडे यांचे पती आणि मुलं अमेरिकेचे नागरिक आणि तिकडेच राहतात ...आणि त्यांना देश सोडावा लागतो )
- आरोप केला गेलेला गुन्हा हा " सर्वात निर्घृण गुन्हा नव्हतं याची कबुली खुद्द आरोपी सरकारने करणे पण त्यासाठी खोब्रागाना दिलेली वागणूक..)
नोकरांचे शोषण हि आग असणारच म्हणून धूर निघाला ..
हे शोषण करण्यात भारतीय चिनी पटाईत आहेत दुर्दैवाने
https://www.smh.com.au/interactive/2015/7-eleven-revealed/
यात बरेच फ्रँचाइज घेणारे भारतीय वंशाचे होते आणि बरेच शोषण झालेलं कामगार हि भारतीय होते...

पुढे काय झाले कोण जाणे

खोब्रागडे बाईंना त्रास देऊ नका असे सांगायला इकडच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे तिकडच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते (आणि अमेरिकन प्रेसिडेंट) डोनाल्ड ट्रंप यांना भेटायला जाणार होते.

म्हणजे आठवलेंनी तेंव्हा न्युज चॅनलना तसे सांगितले होते.

खोब्रागडे प्रकरण - डिसेंबर २०१३
ट्रम्प ने आपण जुने २०१५ मध्ये निवडणुकीस उभे रहाणार हे सांगितले.
पण आठवले याना हे माहीत होते ?
पण दोन वर्षे आधी ट्रम्प काय करू शकत होते ?

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2020 - 11:10 pm | मराठी कथालेखक

कार्पेटचा वापर जास्त असल्याने रोज झाडणे , फरशी पुसणे हि कामे करावी लागत नाहीत. डिशवॉशरचा वापरहि मोठ्या प्रमाणात होत असावा. नाहीतरी आपल्याकडेही बहुधा ह्याच तीन गोष्टींकरिता कामवाली असते (झाडणे, फरशी पुसणे आणि भांडी घासणे)
आणखी एक ऐकीव माहिती म्हणजे घरात धूळ खूप कमी येते. आता हा फरक नेमका कशामुळे मला हे अद्याप कळाले नाही (कळायला मी कधी परदेशी गेलो नाही म्हणा). धूळ कमी यावी म्हणून घराच्या दारे-खिडक्या यात काय खास व्यवस्था असते का ? आपण तर भारतात तर चपला बूट घालून घरात वावरत नाही तरी खूप धूळ येते.

भुजंग पाटील's picture

1 Jun 2020 - 11:51 pm | भुजंग पाटील

काही कारणे:

  • बारा महिने पडणारा पाऊस
  • काँक्रिट रस्ते आणि फुटपाथ नसेल तिथे हिरवळ जोपासण्याचे आणि उघडी माती दिसू न देण्याचे प्रयत्न.
  • बागांमध्ये, झाडांभोवती ओल धरून ठेवणार्या मल्च (लाकडाचा भुसा आणि कपचे) चा मुक्तहस्ताने वापर
  • टाऊनशिपला आणि हायवेला तयार हिरवळ (सॉड) पुरवठा करणार्या कंपन्यांची लॉबी
चिगो's picture

2 Jun 2020 - 1:55 pm | चिगो

आमच्या मेघालयातपण जास्त धूळ नसते हो दमटपणा आणि हिरवळीमुळे..

मोदक's picture

2 Jun 2020 - 1:36 am | मोदक

भारतातला अनुभव

सर्वप्रथम - "जी कामे बाईकडून रोज करून घेतली जातात ती कामे आपण रोज करण्याची आवश्यकता आहेच" अशी समजूत असेल तर पुन्हा विचार करा.

१) घराचा वापर मर्यादित करावा - दोन / तीन टॉयलेट / बाथरूम असतील तर एखादी बाथरूम वापरणे बंद करावे - स्वच्छतेचा एक मुद्दा कमी झाला.
२) उगाचच न वापरता जपून ठेवलेले कोरल्स, लाओपालाचे डिनरसेट रोजच्या वापरासाठी बाहेर काढावेत - काचेची भांडी घासताना तुलेनेने कमी त्रास होतो.
३) वापरलेली भांडी किचन सिंकमध्ये घासण्यासाठी ठेवताना लगेच विसळून मगच ठेवावीत - तेल आणि अन्नपदार्थ थोड्या प्रमाणात धुवून जातात व नंतर घासताना कमी त्रास होतो.
४) अनावश्यक खिडक्या बंद करणे - घरात येणार्‍या धूळीमध्ये तितकीच घट.
५) लॉकडाऊन ही सुवर्णसंधी समजून वर्षानुवर्षे न वापरलेल्या आणि फार जिव्हाळ्याच्या नसलेल्या वस्तूंना घराबाहेरचा रस्ता दाखवणे शक्य असेल तर फार विचार न करता अंमलबजावणी करा.

वरती भुजंग पाटील यांनी बरीच कारण लिहिलेच आहेत, माझी थोडीशी भर:

मुळात मोठ्या साईझ च्या वॉशिंग मशीन मुले कपडे रोज धुवायचे नाहीत , त्यामुळे, कपडे भिजवा, धुवा, वाळत घाला आणि नंतर घड्या घाला हि कामं रोज नसतात. विकांताला कपडे वॉशर ड्रायर मध्ये टाकले कि चुरचुरीत वाळून निघतात, त्यामुळे वाळत घालायला पण लागत नाहीत. त्यात इथे एकूणच धूळ कमी असल्यामुळे कपडे खराब पण कमी होतात. मला आठवतंय बाबांचे शर्ट पायाला , मनगटावर आणि मानेपाशी धुवून टाकायला लागायचे आईला, कारण त्या फोल्ड्स मध्ये धूळ साठून काळे व्हायचे स्कूटर वरूनच्या प्रवासामुळे .

एकूणच धूळ कमी असल्यामुळे, घर रोज साफ करायला लागत नाही. फक्त स्वयंपाकघर आणि लहान मुलं असल्यामुळे बेसिन साफ करत राहायला लागतं (किंवा त्यांच्या मागे जरा साफसफाई करत राहायला लागतं)

भांडी डिशवॉशमुळे खूप सोपी होऊन जातात, फक्त भाताचं भांडं जरा धुवून टाकायला लागतं. बाकीच्या भांड्यात काही चिकटलं नसेल तर तशीच टाकून चालतात. डिशवॉशर मधून चांगली निघतात. आणि जर नवरा बायको दोघंही नोकरी करत असतील तर (माझ्या माहितीच्या घरामध्ये) सकाळी एकदाच ब्रेकफास्ट (काहीतरी पटकन होणारा, अंड, ओट्स इ ) आणि दिवसातून एकदा स्वयंपाक दोन्ही वेळचा स्वयंपाक होतो.

(माझ्या माहितीतल्या) प्रत्येक भारतातल्या जवळपास घरामध्ये चहा दिवसभर (कमीत कमी ४-५ वेळा तरी) चालू असतो, आणि इथल्या (माझ्या माहितीच्या) प्रत्येक घरात जास्तीत जास्त २ वेळा चहा होतो. ती भांडी पण कमी पडतात त्यामुळे. दूध तापवायचं नसल्यामुळे ती भांडी पण कमी पडतात.

कडधान्य, तांदूळ इ ला निवड खरंच नसते. माझ्या आठवणीत आई महिन्याचा किराणा आणायची, आणि तो आला कि दुपारी जेवण झाल्यावर, ते सगळं निवडून पाखडून भरून ठेवणं हे एक काम असायचं.

बरेचदा पालेभाज्या सुद्धा जास्त धुवून घ्यायची गरज नसते, कारण माती लागलेली नसते अजिबात (अपवाद मेथी, तिला असते कधी कधी माती).

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 5:39 am | चौकस२१२

काम तर येथे ( अमेरिका. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया नु झीलंड , कॅनडा) खूप असते काही गोष्टी सोप्या असल्या तरी एकूण बोजा असतोच कारण भारतासारखे नोकर परवडत नाहीत ( खूप श्रीमंत सोडले तर)
मग कसे काय बुवा जमते
विना, भुजंग आणि राजेश यांनी बहुतेक सर्व लिहिले आहे , बहुतांशी इतर पाश्चिमात्य देशात साधारण अमेरिके सारखेच आहे हवामानाप्रमाणे बर्फ वैगरे हे मुद्दे सर्वत्र नसतील म्हणा आणि स्थानिक नियमनप्रमाणे पूर्ण वेळ नोकर घरी ठेवणे ( साधारण येथील मध्यमवर्गीयला) यात बदल आहेत उदाहरणार्थ अमेरिकेत दिवसाला ( ८ तास) जर नोकर $६० मध्ये मिळत असेल तर इथे ऑस्ट्रेलियात त्याबाबतीत महागही आहे अमेरिकेनं डॉलर मध्ये सांगायाच तर ८ तासाला कमीत कमी १०५ द्व्यावे लागतील तेच पूर्ण वेळ ( ६ दिवस ) घरी राहणारी नोकर सिंगापुर मध्ये महिन्याला १,५०० अमेरिकन मध्ये मिळू शकते... (सिंगापुर इतर बाबतीत ऑस्ट्रेलिया एवढे / जास्त सधन आहे )
आखाती देशातील परिस्थिती अजून वेगळी कदाचित आज दुबई मधील जीवन म्हणजे मुंबई आणि पाश्चिमात्य जीवन याचे मिश्रण आहे ३०
तेव्हा "कोणतया परदेशात" यावर पण काही गोष्टी अवलंबून आहेत
काही ठळक कारणे
- स्वयंपाक सूटूसुटीत करण्याची लागलेली सवय
- पदार्थ गोठवून ठेवून मग वापरणे ( रोजचा रोज ताजा नसला तरी चालेल ) याची सवय झालेली
- ओव्हन जा वापर काम सूटूसुटीत करतो ( भाज्या + मास मसाल्यात बुडवलाय १२ तास आणि डायल ढकलून ओव्हन मध्ये कि काम भागते )
- मोठ्या प्रमाणात चिरलेले, साफ केलेले आणि साहित्य सहज मिळते
- घरकामात पुरुषाला सुद्धा आणि एरवी "पुरुष फक्त" करणाऱ्या कामात स्त्री ला असे सर्वांना मिळून काम करावे लागते
अर्थात हे परत कोणत्या देशात यावर पण खूप अवलंबून आहे सिंगापुर किंवा हाँग कोन्ग मधेय जेवढए बाहेर खायची सोया आणि सवय आहे त्या मानाने ऑस्ट्रेलियात बाहेर खाणे महाग आहे त्यामुळे घरी करण्याचे प्रमाण जास्त
बाकी श्री पाषाणभेद आपण जे विचारले ते खोचक आहे , भुजंग यांनी अगदी समर्पक उत्तर दिलेले आहे
मूल प्रशा कर्त्याने "परदेशातील भारतीय कामाचे काय करतात" ते विचारले अम्हणून ३-४ जणांनी आपले अनुभव सांगितले मग त्यात अमेरिका आली तर त्यात काय आश्यर्य
प्रदेशातील भारतीय बद्दल उगाचच अनेक गैरसमज असतात त्यातील काही
- परदेशात गेले म्हणजे भारताबद्दल चे प्रेम संपले
- भारताचं सरकारी खर्चावर शिकलात आणि तिकडे गेल्यावर इकडे काय दिलात? सर्वसाधारण अपने १.५ वर्षातून एकदा भारतीय भारतात सुट्टीला येतो आणि अश्या अनेक वाऱ्यातून भारतीय अर्थव्यवशेल हातभार लावतो .. ते कोणी लक्षात घेत नाही
- भारतातील गोष्टींची तुम्हाला काय कल्पना आहे ! कित्येकांना आम्हाला कल्पना असते, संबंध असतो ,, त्यात १.५ वर्षात तुन आम्ही "फॉरीन" म्हणजे भारताला "ट्रिप" करीत असतो ,, आपण किती वेळा अशी फॉरीन ट्रिप करून अमेरिकेला किंवा नु झीलंड ला जात असता भाऊ !
असो उगाचच विषयांतर झाले

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 5:50 am | चौकस२१२

किमान चार पदार्थ (भाजी , भाकरी , भात, आमटी ) करावेच लागत आहेत
यातून थोडी सुटका करता येते का पहा आणि त्यासाठी ब्रेड च असे करावे लागणार नाही..
फक्त पास्ता आणि सॅलड करा ( पास्ता हा चक्क भारतीय मसाला पास्ता हि होऊ शकतो कि )
एकच धक्कल भाजी करा! उसळ,
पोळ्या करून फ्रीझ करा ( परदेशातील भारतीय विकांताला भरपूर करून ठेवतात आणि फ्रीझ करतात )

निनाद's picture

3 Jun 2020 - 4:13 am | निनाद

ताज्या पोळ्या कोल्स मध्ये मिळतात हल्ली. त्यांना फ्लॅट ब्रेड किंवा रॅप म्हणतात. मैदा आणि पूर्ण पीठाच्या अशा दोन्ही असतात. बेकरी जेथे असते त्या कोल्स मध्ये बहुदा असतात. पण त्या घडीच्या नसल्याने मजा नाही वाटत खायला. शिवाय लेबनिज ब्रेड किंवा पिटा ब्रेड पण असतात भाकरी सारखे पण गव्हाच्या पीठाचे. त्यामुळे घरीच पोळ्या केल्या असल्या पाहिजेत या वर भर राहत नाही :)

वरच्या प्रतिसादांमध्ये बरेच मुद्दे आलेत, त्यामुळे फार काही वेगळे नाही. पण तरी काही मुद्दे:

१. दुधाच्या भांड्यांबद्दल सहमत. फक्त दूधच नाही, तर सायीचे, दह्याचे, तुपाचे अशी सगळीच भांडी कमी होऊन जातात. मी विकतचे लोणी आणून महिन्यातून एकदा तूप बनवते तेच एक भांडे असते.
२. भांडी स्वतःच धुवायची आहेत हे माहीत असल्यामुळे वापतानाच कमी घासावी लागतील अश्या बेताने वापरली जातात असा स्वानुभव आहे. म्हणजे भारतातून कुणी इथे आले तेव्हा त्यांच्याकडून पातेली, कढया जास्त जळायची, त्यामुळे घासायला जास्त वेळ लागतो.
३. सतत गरम पाण्याची सोय असल्यामुळे चिकट, तेलकट भांडी घासायला सोपे जाते.
४. धुळीबाबत वर आलेच आहे. पण इतर आवश्यक कामे आधी करायची, पसारा (खास करुन घरात मुले असल्यावर) रोजच आवरायला जमणार नाही ही मनाची तयारी आता झाली आहे.
५. माझाही रोज ताजा स्वयंपाक असतो, पण किती वेळ हाताशी आहे, त्याप्रमाणे मेनू प्लॅन केला तर वेळ वाचू शकतो. शिवाय, छोले, पावभाजी असे वेळ्खाऊ पदार्थ केले तर शक्यतो दोन जेवणांत खाता येतील एवढे बनवते.
रोजच पोळी, भाजी, भात, आमटी असं बनवण्यापेक्षा - कधी भरपूर भाज्या घालून पुलाव आणि कढी/ रायता, वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे, कुकरला डाळ लावली तर दोन वेळा पुरेल एवढी शिजवून अर्धी अशीच फ्रीजमध्ये ठेवणे, कधी छोले उकडले तर एकदा भाजीसाठी आणि १-२ वेळा सॅलडसाठी एवढे उकडून ठेवणे, सूप-सॅलड घरी बनवून त्याबरोबर विकतचा गार्लिक ब्रेड असे काही काही मी अध्ये-मध्ये करते.
थोडक्यात, रोजच साग्रसंगीत स्वयंपाक करण्यापेक्षा कमी पदार्थ पण त्यात भाज्या, प्रोटीन, कार्ब्स असं सगळं मिळेल त्यावर जास्त भर देते.
६. बाकी टीव्ही पाहता पाहता भाज्या निवडणे, कपड्यांच्या घड्या घालणे (इस्त्री लागणारे कपडे शक्यतो खूप कमी घेतलेत), फोनवर बोलता बोलता झाडू काढणे असं चालू असतं.

कामे वयानुसार सर्वांमध्ये वाटून घेतली तर खरंच त्याचाही फायदा होतोच.

निनाद's picture

3 Jun 2020 - 4:09 am | निनाद

कामे वयानुसार सर्वांमध्ये वाटून घेतली तर खरंच त्याचाही फायदा होतोच. हेच म्हणणार होतो.

उज्वल कुमार's picture

2 Jun 2020 - 11:22 am | उज्वल कुमार

छान एक्सप्लेनेशन ..डिशवॉशर अजून हि आपल्या देशात एवढा रुजला नाही आता होईल असं वाटतय थोडा customisation करायला पाहिजे.. शेवटी कामे वाटून घेतली कि आपला देश काय किंवा विदेश काय lockdown मध्ये याचा बहुतेक सगळ्यांना अनुभव आलाच असेल.. असो लोकडोवन चा एक चांगला side इफेक्ट भारत मधील लोकांना आला असेल

डिशवॉशर मुळे पाणी ही वाचते. डिशवॉशर सुमारे अकरा लिटर एक बादली पाण्यात सगळी भांडी धुतो. तीच भांडी हाताने घासली तर सुमारे ३० लिटर पाणी लागते.
काही नवीन डिशवॉशर तर यापेक्षा ही कमी पाण्यात एक भांडी धुवून देतात असे ऐकले आहे. पण पाणी किती वापरले जाणार हे कोणते वॉश सायकल लावले आहे त्यावरही अवलंबून असते.

वॉशिंग मशीन च्या मानाने डिश वॉशर मध्ये एक गोष्ट चांगली असते कि त्याला फक्त थंड पाणी लागते , अंतर्गत पाणी गरम केले जाते
अर्थात जिथे पाण्याचा दबाव कमी आहे तिथे त्या यंत्रात बदल लागणार ... कदाचित एक वेगळी टाकी आधीच भरून तयार असले तर ?
.. भारतात फारसे प्रसिद्ध ना होण्यामागचे हे कारण असू शकेल किंवा दुसरे कारण म्हणजे फूड प्रोसेसर सारखे आहे .. कुठे ती भांडी आधी खरकटे काढून तयार ठेवा! असे काहीसे
वॉशिंग मशीन सारखे नाही हि टाकले एकदम कपडे घातला साबण .. झाले

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 12:28 pm | चौकस२१२

अजून एक म्हणजे या देशात अनेकविधी प्रकारचे खाद्य प्रकार मिळत असल्याने आणि ते सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात ( उदाहरणार्थ अर्धे शिजवलेले ब्रेड रोल जे घरी आणून आपण पूर्ण शिजवयाचे )
कंटाळा येत नाही .. भात भाजी पोळी हि आवडतेच पण त्यातच अडकवून राहायला लागत नाही ...
असो यावरून आठवले.. http://puranquick.com/
या सर्व वर्णनातून कोणी म्हणले कदाचित के एकूण परदेशात "प्रोसेस्ड फूड" जास्त वापरले जाते.. तर टक्केवारी पहिली तर हो म्हणावे लागेल..
परंतु या सगळ्यात समतोल कसा साधणार .. आज परदेशातील प्रिसर्वाटीव्ह असलेले खाद्य सेवन करण्यातील धोके आहेत तसेच दुसऱ्या टोकाला ताजे असले तरी भारतात आणि चीन मध्ये भेसळ हे धोके आहेत .. याला जीवन ऐसे नाव

प्रक्रिया केलेले अन्न सेवन केले की कोणकोणते रोग होतात ह्या विषयावर वाचनात आले किंवा टीव्ही वर पाहण्यात आले तर मेंदूत विचाराचे वादळ निर्माण होते का.
ताज्या भाज्या,ताजे ,अन्न,ज्वारी सारख्या glutin फ्री धान्याच्या भाकऱ्या शरीराला कसा फायदा पोचवतात आणि कोण कोणत्या रोग पासून रक्षण करतात हे वाचल्यावर किंवा टीव्ही वर बघितल्यावर विचाराचे वादळ निर्माण होते का.
फ्रीज केलेले पदार्थ किती विषाणू,जिवाणू (रोग कारक) नी समृध्द असतात हे वाचल्यावर किंवा टीव्ही वर बघितल्यावर विचाराचे वादळ निर्माण होते का.
की अन्न ग्रहण करणे हे फक्त एक रूटीन काम आहे ते कसे तरी पार पाडायचे हाच फक्त विचार केला जातो.

Rajesh188
आपण चांगले प्रश्न विचारले आहेत , खरे तर यांची उत्तरे एखादा आहारतद्न्य किंवा शास्त्रज्ञ जास्त चांगली देऊ शकेल
तरी पण प्रयत्न करतो
प्रक्रिया केलेले अन्न सेवन केले की कोणकोणते रोग होतात ह्या विषयावर वाचनात आले किंवा टीव्ही वर पाहण्यात आले तर मेंदूत विचाराचे वादळ निर्माण होते का.
होते ना ... पण निर्णय घेताना येथील काही गोष्टींचा उपयोग होतो तो म्हणजे ..१) स्पष्ट आणि पारदर्शी अन्न उत्पादन याची माहिती ग्राहकाला उपलब्ध असते ,
आता प्रश्न असाही हि मनात येईल कि इथे जर एवढी माहिती मिळत असेल तर त्यामुळे चिंता वाढते का त्यापेक्षा जिथे माहिती एवढी दिली जात नाही तेथिल जीवन बरे !
२) एकूण भेसळीचे प्रमाण फारच कमी आणि विश्वासहर्ता जास्त त्यामुळे जे सेवन करतोय ते तेच आहे असे असते
३) टीव्ही वर सामाजिक स्वास्थ्य , अन्न उत्पादन उत्पादन याबाबत सनसनाटी पणा कमी असल्यामुळे नको ती चिंता कमी होते

ताज्या भाज्या,ताजे ,अन्न,ज्वारी सारख्या glutin फ्री धान्याच्या भाकऱ्या शरीराला कसा फायदा पोचवतात आणि कोण कोणत्या रोग पासून रक्षण करतात हे वाचल्यावर किंवा टीव्ही वर बघितल्यावर विचाराचे वादळ निर्माण होते का
- जेवढी जास्त माहिती गोळा करू तेवढे विचार वाढणारच ना! मग जगात कुठेही असा ... अगदी शुद्ध खावे हे सगळ्यांनाच वाटते ,, तश्या गोष्टी हि खूप मिळतात सहज मिळतात, महाग असतात.. तेवहा काय जमेल आणि परवडेल हे प्रश्न येथे आहेत आणि तिथेही
४-५ जणांचह्य प्रतिसादातून असे लक्षात येईल कि जरी इथे प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त असले तरी ताजे खाण्याचाच प्रयत्न असतो
याशिवाय तेलकट खाणे खूप मसालेदार आणि ते सुद्धा सतत याचे प्रमाण जरा कमी होते .. ( अपवाद आहेत येथे चरबी युक्त खाऊन जाड पण वाढणे आहे प्रमाण आहेच )
संध्याकाळी लवकर जेवण्याची सवय येथे जास्त सहज लागते त्याचा उपयोग होतो
सकाळचं जेवणात सुद्धा फक्त फळ आणि दही खायला कंटाळा येत नाही
-फ्रीज केलेले पदार्थ किती विषाणू,जिवाणू (रोग कारक) नी समृध्द असतात हे वाचल्यावर किंवा टीव्ही वर बघितल्यावर विचाराचे वादळ निर्माण होते का.
की अन्न ग्रहण करणे हे फक्त एक रूटीन काम आहे ते कसे तरी पार पाडायचे हाच फक्त विचार केला जातो.

येथे एक खुलासा जरुरीचा आहे "फ्रिज" chayaa ऐवजी "डीप फ्रिज" असे वाचावे ..
वीकांतात करून ठेवतो ते डीप फ्रिज साठी, भुजंग यांनी यावर सविस्तर लिहिले आहेच
एकूण "वर्क लाईफ बॅलन्स " चांगला आणि चांगली हवा असल्यामुळे कदाचित या खाण्याच्या काळज्या आपण उदृत केलेल्या जरा कमी असाव्यात

बेकार तरुण's picture

2 Jun 2020 - 1:02 pm | बेकार तरुण

माझे सिंगापूर अन आता दुबई मधील अनुभव -
१. सिंगापूर मधे हाऊस मेड हा परवडण्यासारखा प्रकार असतो. जास्ती करुन फिलिपिनो मुली हे काम करतात (काही प्रमाणात भारतीय व नेपाळीही). साधारण $७०० - ८०० प्रति महा खर्च असतो ज्यात काही सरकारी टॅक्स व ईंन्सुरंन्स वगैरे ही येते. ह्या मेड २४ तास आपल्याच घरातील एक सदस्य बनुन राहतात व स्वयंपाक, धुणी (वॉशिंग मशिन), भांडी तसेच बेबी सिंटिग वगैरे कामे करतात. त्यांना रविवारी मात्र सुट्टी असते आणि त्या दिवशी सकाळी ८ ते रात्री ९ (बहुधा) त्या बाहेर भटकतात. जनरली नवरा बायको दोघेही नोकरी करणारे आणि लहान मूल ... अशी कुटूंबे जास्ती करुन २४ तास मेड असण्याला प्राधान्य देतात.

हा ऑप्शन नको असेल तर काही लीगल अ‍ॅजन्सीज असतात. साधारण $१५० - ३०० घेउन आठवड्यात एकदा येउन पूर्ण घर साफ करुन देतात (हा ऑप्शन फारसे देसी निवडत नसावेत.... मी तरी कधीच निवडला नाही).

तिसरा देशी ऑप्शन म्हणजे (हा ऑप्शन इल्लिगल आहे, सर्व व्यवहार कॅश) - जेव्हा ह्या मेड ना रविवारी सुट्टी असते, तेव्हा त्या ताशी $ १० - १५ घेउन तुमच्या घरी काम करतात. धुणी, भांडी, साफ सफाइ अन ईस्त्री वगैरे.जनरली मुले नसणार्‍या कुटुंबे अश्या मेडना रविवारी बोलवुन ३ - ४ तासात सर्व आठवड्याची कामे उरकुन घेतात.

तसेच बरीच कुटुंबे घरातील सर्व कामे वाटणी करुन स्वतःच करतातही.

२. दुबई म्हणजे आळशी लोकांचे नंदनवन आहे. ईथे भारतीय, नेपाळी, बांग्लादेशी मनुष्यबळ मुबलक उपलब्ध आहे. घरातील सर्व कामे अतिशय वाजवी दरात (विकसीत देशांच्या तुलनेत) करुन देणारे लोक मिळतात. जेवण बनवायला महाराज (राजस्थानी पुरुष) तसेच नेपाळी स्त्रिया ... साफ सफाईला तेलगु अन्ना जनरली सहज मिळुन जातात. दररोज येउन ते ही सर्व कामे करुन जातात. लाँड्री वाला फोन केला की घरी येऊन कपडे घेउन जातो....

ईथे घरातील सर्व कामे स्वतः करणारे कुटूंब मला वर्षभरात तरी भेटलेले नाही.

चौकस२१२'s picture

2 Jun 2020 - 1:25 pm | चौकस२१२

बेकार तरुणा वाह देतोस का बाबा दुबईस काम .. कंटाळलो घरची कामे करून इकडे नशीब त्यात बर्फ वैगरे भानगड नाही ते ..
सिंगापुर पण चालेल ..
"तिसरा देशी ऑप्शन म्हणजे" हे मात्र करूच नये ,,, इथे ऑस्ट्रेलियात हि काही मंडळी हा उपद्व्याप करतात फक्त मेड नाही तर बहुतेक परदेशी विद्यार्थी असतात ..एक दिवस सरकारी पोपल बांबू चे फटके बसले म्हणजे कळणार या लोकांना . किंवा असे काम करणाऱ्याला लागले तर .. ना इन्शुरन्स ना काही ..

जेडी's picture

3 Jun 2020 - 12:10 am | जेडी

धन्यवाद हो मिपाकर मंडळी. दोन दिवस काहीच रिप्लाय आला नव्हता म्हणून मी खरेतर हा धागा डिलीट करा अशी विनंती साहित्य संपादकांना केली होती . नंतर कामात दोन दिवस मिपावर यायला जमलेच नाही .

अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेत सर्वानी . सर्वांचे आभार .

भारतीय लोक डीप फ्रिज वापरतच नाहीत बहुदा. फक्त आईस्क्रीम वैगेरे करायलाच वापरतात . निदान मी तरी तसेच वापरते. दूध का गरम करत नाही ते मात्र कळले नाही . मी रोज ताजे दही , चितळ्यांचे दूध आणून साय काढणे , आठवड्याला तूप बनवणे असले उद्योग करतीय. तिकडचे फ्रिज जास्त चांगले असतात काय? कारण इकडे डीप फ्रिज नाही केले तर २ दिवस पण भाजी (शिजवलेली) टिकत नाही . आणि हिरवी भाजी आठवड्याच्या वर टिकत नाही. जास्त चिल केले तर भाज्या जास्त पाणीही धरून ठेवतात .

डिश वॉशर खरे तर मी पण घ्यायचा म्हणतोय पण अल्युमिनियम , तांबे , लोखंड, लाकूड , नॉनस्टिक असले काहीच चालत नाही म्हणजे कढई , नॉनस्टिक पातेली , पोळपाट , कॉपर बेस्ड पातेली असले काहीच चालणार नाही म्हणून घेतला नव्हता पण आता तो आवर्जून घेणार आहे आणि त्यासाठी लागणारी भांडी सुद्धा .

अजून एक प्रश्न - भाज्या कशात करता? स्टील च्या कढईत ? सर्जिकल स्टील च्या जाड बुडाच्या कढाया सुद्धा थोड्या लागतात .

रोजच्या कुकर चे पण डबे , कुकर अशी जादाची भांडी पडतात , त्यावर मात्र काहीतरी उपाय काढावा लागणार आहे .

बाकी वॉशिंग मशीन , वेट आणि ड्राय दोन्ही vacuum क्लिनर असले तरी भारतात ते काढा रे, पाईप जोड रे, आणि सर्व साफ करत रोज बसा रे हे काही जमणार नाही त्यामुळे ते तसेच बॉक्स मध्ये , सणासुदीलाच निघतात बाहेर .

भारतात मात्र स्वयंपाक घर आणि सर्वच खोल्या रोजच झाडलोट कराव्या लागणार .

भुजंग पाटील , विना , रुपी, चोकशी, मोदक आणि बाकी सर्वांचेच आभार .

भारतात दूध तापवणे आणि बाकी पुढची कामे करणे भागच आहे. इथे दुधाला शेल्फ लाइफ जास्त आहे म्हणून करावे लागत नाही.
फ्रीज मोठे आहेत. तापमान, humidity वगैरे गोष्टी बदलता येतात त्यामुळेही पदार्थ जास्त टिकतात. पण सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे बाहेरचे तापमान आणि दमटपणा बराच कमी आहे. कडधान्य वगैरे खराब न होण्याचे तेही मुख्य कारण आहे.

अल्युमिनियम, नॉनस्टिक असंही वापरु नयेच शक्यतो म्हणून मी सगळी स्टीलची पातेली, कढया वापरते. कॉपर बॉटम का चालणार नाही हे कळले नाही पण. कारण मी माझी रोजच टाकते. अगदीच हौस आली तर महिन्या-दोन महिन्यातून मीठ-लिंबू वापरुन त्यांना घासते. लाकूड - लाटणे, पोळपाट हातानेच धुते; पण लाकडी उलथने वगैरे टाकले तर फार काही बिघडत नाही.

निनाद's picture

3 Jun 2020 - 4:07 am | निनाद

आम्ही साध्या भाजी साठी लोखंडी कढया वापरतो - गंजणार्‍या. लोह रोज पोटात जावे म्हणून. अशा लोखंडी कढईत भाजी केली तर चव निराळीच लागते.

चौकस२१२'s picture

3 Jun 2020 - 5:37 am | चौकस२१२

" इथे दुधाला शेल्फ लाइफ जास्त आहे "
हा.. हा मुद्दा लक्षात आलं नवहता .. याला कारण काय असेल पण? कदाचित पुरवठा साखळीत येथे जे सातत्य आहे त्यामुळे ? मध्येच कुठे गरम गार होणार नाही म्हणून?
बाहेरचे तापमान आणि दमटपणा बराच कमी आहे. हे खरे असले तरी तरी या देशात थंडी आणि उन्हाळा यात तापमानात खूप फरक असतोच कि तेवहा पुरवठा साखळीत परिणाम होत असणारच कि?
दामटपणाचा मात्र निश्चित परिणाम होतो सिंगापुरात कढधान्य पण फ्रिज ( फ्रीझर नाही ) ठेवलेली मी बघितली आहेत ती ऑस्ट्रेलियात तशी नाही ठेवावी लागत
यावरून आठवले कि सिंगापुरात "कॉफी विथ सुसु" ( मले भाषेत दूध ) मागितले तर कडक काळी कॉफी आणि त्यात गोड आटवलेलं डब्यातले दूध घालतात ...म्हणजे गोड पण पण आलं आणि दूध नासले हा प्रकार नको... कोण काय शोध लावेल ..

चोकशी च्या ऐवजी चौकस२१२ असे वाचावे .
बेकार तरुण यांचेही आभार

चौकस२१२'s picture

3 Jun 2020 - 4:18 am | चौकस२१२

दूध का गरम करत नाही ते मात्र कळले नाही
- ते पाश्चरीज्ड केलेले असते ( भारतात पण) गरज नसते आणि त्यापासून साय काढणे , आठवड्याला तूप बनवणे असले उद्योग करण्यापेक्षा तयार लोणी मिळते , दही मिळते किंवा दही घरी लावतो ..तयार लोण्यापासून तूप मात्र करावे लागते आणि त्याचे भांडे घासणे !, तयार तूप मिळते (भारतातून आयात केलेलं आणि स्थानिक ... पण त्यात मजा नाही )
"दूध गरम कर " भारतात हि प्रथा पडली ( उकळून ठेवलेले बरे) याचे कारण पूर्वी शीतकपाट नवहती तेव्हा पासून ची सवय असावी..!
तिकडचे फ्रिज जास्त चांगले असतात काय?
माहित नाही पण ४ अंश वर असावे आणि डीप फ्रीजर -१९ वर
- भाज्या कशात करता? भारतीय स्टील च्या भांड्यात शक्यतो दाली वगैरे इतर भाज्या नॉन स्टिक ( परंतु नॉन स्टिक मध्ये इतर रसायने असतात म्हणून आज काळ नवीन प्रकारची अनेक भांडी असतात )
-रोजच्या कुकर चे पण डबे: .. राईस कुकर असतो पण जर एकावेळी ४ गोष्टी उकडायच्या तर भारतीय कुकर लागतोच
एकूण काय भांडी धुणे हे आलेच ...भारतात काय किंवा इथे काय
डिश वॉशर खरे तर मी पण घ्यायचा म्हणतोय
कोणती भांडी हा प्रश्न असतोच पण तो फारसा कधी पडला नाही...भांडे डिशवॉशर सेफ आहे कि नाही हे लिहिलेले असते स्पष्ट ,, म्हणजे परत ग्राहकाला पुरेशी माहिती मिळत असल्यामुळे निर्णय सोप्पे होतात एकदा चुकून तांब्याची पाण्याची बाटली भारतातील आणि ऍनोडईज्ड अलुमिनिमयम चे चहा चे भांडे (काळे दिसणारे होते म्हणून कळले नाही ) डिशवॉशर ला टाकले आणि पस्तवालो... त्यावर डिशवॉशर संबंधी काह्ही लिहिले नवहते कसे असणार मूळ भारतीय बाजारात हा प्रश्नाचं नाही .. असो
येथील अजून एक अडचण सांगतो काही घरात गॅस असतो तर काही घरात इलेकट्रीक होत प्लेट त्यामुळे भांडी सपाट बुडाची नसेल तर पंचाईत होते.. थोडक्यात काय देश तसे प्रश्न आणि उत्तरे !
बाकी वॉशिंग मशीन ,...सणासुदीलाच निघतात बाहेर"
हे काही कळले नाही ,, vacuum क्लिनर चे कळले असे का होऊ शकते ते पण वॉशिंग मशीन तर भारतात आत सर्रास रुळले आहे कि ! फक्त प्रश्न गरम पाण्याचं असेल!
मुख्य गोष्ट आहे ती
१)स्वयंपाक सुटसुटीत करणे
२) डीप फ्रीझर/ओवन चा वापर
३) इलेक्ट्रिसिटी जाईल हि भीती नाही
४) घर कामासाठी वर्क लाईफ बॅलन्स मुले मिळणार वेळ
बाकी सगळं भारतासारखा
एकूण खरे तर भारतात सोपे आहे नोकर परवडतात .. येथे घरची कामे + बाग गवत कापणे बर्फ काढे हे अजून जास्तीचे याशिवाय घरातील दुरुस्तीची कामे असतातच
भारतीयाला आवडणारे चक्का , खवा, पनीर हे भारतात ताजे आणि तयार मिळतात येथे ते करावे लागतात ( पनीर मिळतो पण तेवढा चांगलं नाही अर्थात हे ऑस्ट्रेलिया चे कालफोर्नियात तर येथल्यापेक्षा जास्त चांगल्या भारतीय गोष्टीत मिळतात, दुबईत तर काय चंगळ )

वॉशिंग मशीन आहे. ते रोज वापरते. वॉक्युम क्लीनर वेट ड्राय ते मात्र दोन्ही बॉक्सात पडुन आहेत.

Rajesh188's picture

3 Jun 2020 - 11:48 am | Rajesh188

अमेरिकेचे पारंपरिक अन्न पदार्थ कोणते आहेत.
आपल्याकडे कसं सातारा मध्ये घेवड्याच्या डाळीची आमटी आणि भाकरी,पोहे इत्यादी.
गुजरात मध्ये ढोकळा,मद्रास मध्ये इडली.
तसे अमेरिकन काय खातात

चौकस२१२'s picture

3 Jun 2020 - 1:16 pm | चौकस२१२

मूळ पारंपरिक म्हणाल तर जुने इंग्लिश म्हणजे काय तर भाजलेले मास आणि ३ उकडलेल्या भाज्या .. पण आता वसुधैवक कुटुंब झाले आहे हे देश खाण्याच्याबाबतीत
काही खास पदार्थ
-अमेरिकेतील दक्षिण राज्यातील फ्राईड चिकन
- हिरव्या टोमॅटो ची तळलेली चकती
- ब्रिस्केट ( बहुतेक बीफ ) चे मोठे भाग १६-२० तास ध्रुर देऊन शिजवयाचे अमेरिकेतील BARBEQ ( ऑस्ट्रेलियात BBQ वेगळा असतो )

घरकाम हे घर कामच असते भारतातील आणि परदेशातील असा फरक नसतो.
कपडे,भांडी इथे पण धुवावी लागतात आणि परदेशात पण धुवावी च लागतात.
घर इथे पण स्वच्छ करावे लागते आणि परदेशात पण करावे लागते.
फक्त ही काम करताना मशीन ची मदत कोण किती घेतो ह्या मध्ये फरक असतो.
कपडे धुणे.
वॉशिंग मशीन इथे पण सर्रास आहेत.
भांडी धुणे.
डिश washer इथे तुरळक वापरले जातात.
विदेशात सर्रास वापरले जातात(इथे परदेशी राहणाऱ्या लोकांनी त्याचा उल्लेख केला आहे)
भांडी कशा साठी वापरली जातात.
जेवण बनवण्यासाठी.
जेवण घेण्यासाठी.
भारतात प्रक्रिया केलेले अन्न रोज वापरले जात नाही कधी तरी वापरले जाते.
भारतात भांडी जास्त निघतात.
विदेशात प्रक्रिया केलेले अन्न सर्रास वापरले जाते(, शुध्द असते असे ते त्याचे समर्थन करतात पण ते खरे कारण नाही बनवायचा कंटाळा किंवा जेवण बनवता च येत नाही हे खरे कारण आहे),त्या मुळे भांडी जास्त लागताच नाहीत.
परिसर साफ करणे.
फ्लॅट मध्ये परिसर हा प्रकारच नसतो.
बंगलो असेल तर रोज साफ करणे गरजेचे आहे.
त्या साठी अजुन तरी मशीन उपलब्ध नाही.
त्या देश विदेश काही फरक नाही.

राजेशजी मी तेच विचारलय हो, दोन्हीकडे सारखेच काम असायला हवे, तिकडे नोकर चाकरही कमी तरी कसे काय साध्य होते. तिकडे जाऊन ते नवे काय शिकले? त्यांच्या युक्त्या इकडे वापरता येतील का? काय नवीन करता येईल म्हणजे त्यांच्यासारखे साध्य होईल.

शिर्षक कदाचित चुकले असेल पण खरा हेतु ते कसे सर्व साध्य करतात हे पाहायचे होते.

भारतात पण आजकाल निवडुन भाजी मिळते पण त्यात सातत्य नाही.भाज्या निवडणं अत्यंत वेळखाऊ काम आहे. खासकरुन मेथी, गवार, वाल, श्रावण घेवडा, पावटे, तुर,हरभरे,चवळी सोलणे.

चौरस आहार करायलाही वेळ लागतो.
धुळीमुळे झाडलोट. डिशवॉशर नसल्याने भांडी घासैयलाही प्रचंड वेळ जातो.
भारतातील पुरुषांना घरकाम करता येत नाही, करत नाही. अपवाद असतीलही पण तुरळक.
आजकाल भारतातही सॉर्टेड धान्य मिळते, दर खुप जास्त असतो. बाणोर च्या फार्मस ग्रोसर्स मध्ये निवडलेले धान्य मिळते पण दर जास्त असतो.

चौकस२१२'s picture

4 Jun 2020 - 4:12 am | चौकस२१२

तिकडे जाऊन ते नवे काय शिकले? त्यांच्या युक्त्या इकडे वापरता येतील का?
पुर्विचया मानाने आता भारतात आणि (पाश्चिमात्य) परदेश यातील साधारण मध्यम वर्गीयाला मिळणाऱ्या / परवडणारी गोष्टी यात खूप अंतर राहिलेले नाहीये ( काही गोष्टी सोडल्या तर)
मुख्य फरक असेल तर हाच कि
- स्वयंपाक सुटसुटि , जेवणात ४ पदार्थ रोज असलेच पाहिजेत , किंवा सकाळचे संध्यकाळी खाणार नाही हे विचार जर बदलले तर आपले भारतीय जीवन पण सोप्पे होईल
पण तसा आहारात बदल करणे भारतात सहज शक्य आहे असे वाटत नाही ..आणि घरातील पुरुषाने पण घर कामात थोडा सह भाग वाढवला तर कदाचित सोप्पे होईल
उलट असे मी आपल्याला चर्चा देवाणघेवाण म्हणून प्रश्न विचारतो ..
कि भारतात खालील गोष्टीत उपलब्ध आणि परडवणाऱ्या असताना आपली दमछाक कशी काय होते?
- अर्ध पूर्ण वेळ नोकर मिळणे
- परीट स्वस्त
- तयार बाहेरचे खाणे स्वस्त आणि सहज आणि जवळच उपलब्ध
- रात्री उशीरा पर्यंत दुकाने उघडे असणे
- किराणा माल छोट्या प्रमाणात घेता येणे आणि साठवण्याची जरुरी नसणे
- मुलानं आणि मोठ्यांना खाजगी वाहतूक सेवा उपलब्ध
- पूर्ण वेळ ड्राईव्हवर ठेवणे या साठी "प्रचंड श्रीमंत"असावे लागत नाही
- पटकन छोट्या अंतरावर जायला स्कुटर किंवा
खार सांगू का इथे जी लोक २०-३० वर्षे राहिली आहेत ना त्यांना आता असा वाटतंय येथील कामे आणि भरपूर टॅक्स भरताना कंटाळा आलाय तर आता काही वर्षे जर एक्स पॅट पॅकेज मिळाले तर जरी भारतात नाही तरी भारताच्या जवळ तरी ( युएई वैगरे ) तर काय मज्जा येईल ..
तुमही भारतात सुख आहेत एक प्रकारे निदान घर कामाच्या बाबतीत !

पुर्विचया मानाने आता भारतात आणि (पाश्चिमात्य) परदेश यातील साधारण मध्यम वर्गीयाला मिळणाऱ्या / परवडणारी गोष्टी यात खूप अंतर राहिलेले नाहीये ( काही गोष्टी सोडल्या तर) सहमत! गेल्या दशकात तर खुपच फरक पडला असे जाणवते आहे.

भारतात खालील गोष्टीत उपलब्ध आणि परडवणाऱ्या असताना आपली दमछाक कशी काय होते? मला सापडलेले उत्तर म्हणजे भारतात स्टँडर्डायझेशन चा अभाव आहे. त्यासाठी लागणारा कौशल्य विकास केला केला जात नाही. किमान पद्धती एकसारख्या नाहीत.
स्टँडर्डायझेशन असेल तर त्याचा प्रसार केला जात नाही. त्यामुळे दिलेले काम योग्य प्रकारे होईल की नाही होणार असे प्रश्न कायम भेडसावतात. मग त्या कामावर लक्ष ठेवणे आले.

मराठी कथालेखक's picture

11 Jun 2020 - 12:10 pm | मराठी कथालेखक

आजकाल भारतातही सॉर्टेड धान्य मिळते, दर खुप जास्त असतो

नाही ओ.. आजकाल धान्य फारसं निवडावं लागत नाहीच ...डी मार्ट किंवा चांगल्या स्टोरमधून आणलेले गहू ज्वारी ई फारसे निवडत नाही, एकदा चटकन बघून दळणाला पाठवता येतात.

चामुंडराय's picture

3 Jun 2020 - 5:29 pm | चामुंडराय

पृथ्वी वर सतत कॉस्मिक डस्ट चा वर्षाव होत असतो असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

असे असून देखील परदेशात धूळ कशी नसते?

चौकस२१२'s picture

4 Jun 2020 - 4:23 am | चौकस२१२

भुजंग पाटील यांनी याची काही कारणे दिली आहेत तीच येथे परत चिकटवतो
बारा महिने पडणारा पाऊस
काँक्रिट रस्ते आणि फुटपाथ नसेल तिथे हिरवळ जोपासण्याचे आणि उघडी माती दिसू न देण्याचे प्रयत्न.
बागांमध्ये, झाडांभोवती ओल धरून ठेवणार्या मल्च (लाकडाचा भुसा आणि कपचे) चा मुक्तहस्ताने वापर
टाऊनशिपला आणि हायवेला तयार हिरवळ (सॉड) पुरवठा करणार्या कंपन्यांची लॉबी

निनाद's picture

4 Jun 2020 - 4:27 am | निनाद

वर भुजंगरावांनी दिली आहे ना माहिती. बहुतेक मोकळ्या जमीनी नगरपालिका हिरवळीने झाकतात. त्या खाली ठिबक सिंचन बसवलेले असते. त्यामुळे गवत कायम हिरवे दिसते. या हिरवळीवर कायम लक्ष ठेवले जाते, निगराणी केली जाते. तसेच दर महिन्याला एकदा तरी रस्स्ते साफ करणारा भला मोठा वॅक्युम क्लिनर ट्रक येऊन जातो. तो धूळ शोषून घेतो. (इतके असले तरी काही धूळ शिल्लक असतेच. जेथे पाऊस कमी आहे अथवा पाण्याची उपलब्धता नाही तेथे भरपूर धूळ दिसते. काही नगरपालिका तूलनेने गरीब असतात. वॅक्युम क्लिनर ट्रक चालवू शकत नाहीत ते फक्त वर्षातून एकदाच रस्ते साफ करतात. यातही अनेक प्रश्न असतात.)

स्मिता.'s picture

3 Jun 2020 - 7:21 pm | स्मिता.

परदेशात सगळेच लोक गोठवलेले अन्न किंवा ब्रेड वगैरे खातात आणि सगळी कामं यंत्रांनीच करतात असंही नाही. प्रत्येकाकडे परिस्थिती वेगवेगळी असते. फक्त कामं करण्याची आपली मानसीक तयारी किती आणि कशी यावर ताण अवलंबून असतो. आपल्या घरातली कामं ही आपलीच आहेत याची जाणीव झाली की कामांचा ताण बराच कमी वाटतो. शिवाय कामांचं नियोजनही महत्त्वाचं आहेच.

माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी आठवड्यातले ६ दिवस तरी ताजा स्वयंपाक करते (सध्या रोजच), भांडी घासणे पण हातानेच असते कारण घरात डिशवॉशरच नाही. भांडी आपणच घासायची आहेत हे माहिती असल्याने उगाच जास्तीची भांडी धुवायला टाकली जात नाही, बरीचशी हातसरशीच विसळून घेतली जातात. (परदेशात प्रत्येक घरात डिशवॉशर असतोच असे नाही, नवरा जमेल तशी मदत करतो) घराची साफसफाई, वॉशिंगमशिनमधे कपडे धुणे, त्यांना वाळत घालणे, घड्या-इस्त्री करणे, मोठी किराणा खरेदी, इ. कामे शनिवार-रविवारी करते. संध्याकाळी स्वयंपाक करताना मुलाचा अभ्यास घेते. बाकी दूध-दह्याचा कमी मेंटेनन्स, रोज झाड-पूस नसणे, पदार्थ फक्त गरम करण्यासाठी मायक्रोवेव ओव्हन, इ. काही सुविधांमुळे रोजच्या कामांना वेळही थोडा कमीच लागतो.

थोडक्यात काय, तर भारतात आणि परदेशात पडणार्‍या कामात घराची सफाई वगळता फारसा फरक नाही. कोणतं काम केव्हा करायचं याचं नियोजन केलं तर फारशी तारंबळ उडत नाही.

भारतात रोजच्या झाडण्या-पुसण्याला पर्याय नाही पण टेट्रा-पॅकमधले दूध फ्रिजमधे दीर्घकाळ टिकते, मायक्रोवेव वापरून पदार्थ गरम करण्यासाठीचा वेळ आणि भांडी वाचवू शकता. शक्य असल्यास रोजच्या कपड्यांचे जास्त जोड आणून वॉशिंगमशिन आठवड्यातून २-३ वेळाच लावावे.

चौकस२१२'s picture

4 Jun 2020 - 3:58 am | चौकस२१२

परदेशात सगळेच लोक गोठवलेले अन्न किंवा ब्रेड वगैरे खातात आणि सगळी कामं यंत्रांनीच करतात असंही नाही.
सहमत

चौकस२१२'s picture

4 Jun 2020 - 3:56 am | चौकस२१२

"विदेशात प्रक्रिया केलेले अन्न सर्रास वापरले जाते(, शुध्द असते असे ते त्याचे समर्थन करतात पण ते खरे कारण नाही बनवायचा कंटाळा किंवा जेवण बनवता च येत नाही हे खरे कारण आहे),
राजेशजी , "सर्व देशात घरकाम ते घरकाम" आणि ते सर्वसामान्य माणसाला असतेच हा आपला मुद्दा बरोबर आहे,
कोणते काम, आणि कुठे/ कसे आणि ते करताना काय सोपे होते आणि काय अडचणी येतात हे त्या त्या समाजरचनेवर अवलंबून असते हे बहुतेकांच्या प्रतिसादातून सिद्ध झाले आहेच..
परंतु आपण हे जे विधान केलं आहे ते मात्र पटत नाही आणि नुसतेच पटत नाही असे नाही तर आपण कोणत्या आधारावर / अनुभवावर लिहिले आहेत हे विचारावेसे वाटते...
आपण हे परदेशात ( कानडा वैगरे ४ देश किंवा यूरोप ) दीर्घ काळ राहून केले आहे का?
होतंय काय कि "परदेशात असे असते आणि तसे असते" हे भारतात बसून फारसा प्रदेशात राहण्याचाच अनुभव नसलेले खूप बोलतात,, याउलट येथे राहणार भारतीय हा बहुतेकदा वयाची २०२५ वर्षे भारतात राहिलेला असतो आणि भारताच्या संपर्कात असतो..आणि त्याला दोन्ही बाजूंची बऱ्यापकी माहिती असते ..
आधी हा खुलासा करतो कि यांनी कुतुहलाले विचारले म्हणून इतरांनी त्याल अप्पपल्या परीने माहिती दिली .. त्यात कुणाचा हा हेतू हा नव्हतं कि "बघा इकडे कसे छान छान आणि भारतातात कसे विचित्र, अवघड वैगरे .." उलट आम्ही असे म्हणत आहोत कि भारतात काही गोष्टी सोप्य्या आहेत
तर इकडची लोक "कंटाळा किंवा जेवण बनवता च येत नाही" हे खरे आहे का
काय वाटेल ते लिहिलंय तुम्ही... आणि भारताच्या मानाने ( खास करून पुरुष) येथे जास्त प्रमाणात स्वयंपाक तर करतातच पण याशिवाय इतर कामे हि... तसेच येथील स्त्रिया पण घरातील इतर "पुरुषी" कामे करतात ... त्यामानाने भारतातील पुरुष खास करून स्वयंपाक आणि घरकामे कमी करतात.. अर्थात याचा अर्थ जर आम्ही लावावा का कि भारतीय पुरुष आळशी आहेत? तर ते यौग्य होईल का? एकांगी विधान होईल ते. तसेच काहीसे आपले वरील विधान वाटत्ते
आठवड्यात एवढी कामे असतात अधिक विकांताला मुलांसाठी टॅक्सी बनणे यात येते आळशी बनायला फुरसत कमीच
परदेशातील (सर्व वंशाचे ) नागरिक स्वहस्ते काम करण्यात आळशी असते तर हे देश आज उबघे राहिले नसते.. साधा उदाहरण देतो येथील हार्डवेर दुकानांचे आकार बघा येथे तुम्हाला फक्त अधिकृत प्लम्बर / गवंडी आणि माळी सामान घेताना दिसणार नाहीत तर सर्वसामान्य लोक पण ( पुरुष आणि स्त्रिया सुद्धा )
रंगकाम, बागेचे काम, छोटी नाळ दुरुस्ती , हौसेने मुलांसाठी खेळणी बनवणे , छोटे डेक बनवण्यासारखे घरातील सजावटीचे काम इत्यादी .. मग हे आळशी?
जरा विचार करा

निनाद's picture

4 Jun 2020 - 4:20 am | निनाद

सहमत आहे.
प्रत्येकाला 'आपल्या प्रकारे ' खायला बनवता येतेच.
आळशी बनायला फुरसत कमीच अगदी अगदी!
हार्डवेर दुकानांचे आकार बघा येथे तुम्हाला फक्त अधिकृत प्लम्बर / गवंडी आणि माळी सामान घेताना दिसणार नाहीत तर सर्वसामान्य लोक पण ( पुरुष आणि स्त्रिया सुद्धा ) हो बहुदा सगळी कामे आपली आपण करून घेण्याकडे कल असतो. काम येत नसेल तर ते कसे करायचे याचे प्राथमिक मार्गदर्शन पण येथे करून मिळते. असा एखादा प्रोजेक्ट चालला असेल तर वेळ अजिबातच मिळत नाही.

परंतु आपण हे जे विधान केलं आहे ते मात्र पटत नाही आणि नुसतेच पटत नाही असे नाही तर आपण कोणत्या आधारावर / अनुभवावर लिहिले आहेत हे विचारावेसे वाटते...

म्हणूनच वरती सुरुवातीलाच त्यांचा अनुभव विचारला होता.

एखादी गोष्ट त्यांना परवडत नाही म्हणजे सरसकट सर्वांना परवडत नसेल असे नाहीये ना..

चौकस२१२'s picture

4 Jun 2020 - 6:02 am | चौकस२१२

जेडी आपली १२ एप्रिल ची व्यथा ( घरातील स्त्रीला करावे लागणारे काम.. पूर्वी सध्या वैगरे ) आणि सध्याची व्यथा वाचली.. यावर एक उपाय आहे नवऱ्याला घरकामात जास्त सहभाग घ्यायला लावा...
एक आवडीचे काम सांगतो...( मजा म्हणून सांगतोय हा... रागावू नका आणि भलता अर्थ काढू नका ) नवरोजी ना हा प्रकल्प घरी करायला सांगा... आवड असेल तर करील आवडीने
"डू युअर ओन" प्रकार चे बियर चे किट मिळते का भारतात आणि नियमात बसते का ? ( त्याची जी काय भांडी होतील ती त्याने घासायची )
रिकाम्या बियर चाय बाटल्या आणि बुचे मिळत असतील .. यीस्ट मिळत असेल, बाकीचे मात्र माहित नाही
आत्मनिर्भय व्हा असे पंतप्रधांनी सांगितले आहेच ना

(खुलासा: दारू पिणे याचे समर्थन नाही )

घरातील काम पुरुषांचा सहभाग असावा असे विचार आता व्यक्त होत आहेत त्याला बादलीत परिस्थिती कारणीभूत आहे.
पाहिले काम वाटली होती घरकाम स्त्री नी करायचे आणि पैसे कमविण्याची काम पुरुषांनी करायची.
जबाबदारी विभागली होती.
हे नोकरी करणाऱ्या पुरुषानं विषयी झाले.
पण शेती करणाऱ्या मध्ये शेतात पण स्त्री नी पुरुष बरोबर जायचे आणि घरचे पण काम करायचे अशी दुहेरी जबाबदारी पडत असे.
पण अती कष्टाची कामे हे पुरुषांनीच करायची असा पण नियम होता.
आता नवरा बायको दोघे नोकरी करणारे असतात तेव्हा घरकाम दोघांनी मिळून करावी हा विचार रास्त आहे.
मी तर म्हणतो घरातील प्रत्येक व्यक्ती नी स्वतःचे काम स्वतः केले तरी खूप फरक पडेल.
मुलांवर सुद्धा जबाबदारी देणे गरजेचे आहे.
स्वतः ची plate स्वतः धुणे,स्वतःची कपडे स्वतः धुणे.
स्वतःचा पसारा स्वतः उचलणे..
प्रतेक जन स्वतःची कामे स्वतः करू लागला तर कोणत्याच एका व्यक्ती वर कामाचा बोजा येणार नाही.
स्वयंपाक करताना सुधा सर्वांनी मिळून करावा.

कपिलमुनी's picture

5 Jun 2020 - 5:02 am | कपिलमुनी

युगांडामध्ये लेबर स्वस्त आहे पण काम करत नाहीत , वस्तू चोरून नेतात ,
काय करावे बरं?

भुजंग पाटील's picture

5 Jun 2020 - 9:51 am | भुजंग पाटील

यु गांडा भाई, मी तर ऐकले होते की भारतीयांना तिथे ट्रायबल स्टेटस हवा आहे म्हणून.
https://www.youtube.com/watch?v=lj7cTYP3Df8

तसे झालेच तर मग चिंताच मिटली, घरात लुंगी म्हणून केळीच्या पाना शिवाय दुसरे काही ठेऊच नका कोणी चोरुन नेण्या सारखे.

Rajesh188's picture

5 Jun 2020 - 11:06 am | Rajesh188

लेबर स्वस्त आहेत म्हणजे ह्याची दुसरी काळी बाजू ही असते की बेकारी खूप असल्या मुळे त्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला दिला जात नाही.
त्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला नाही तर त्यांच्या बेसिक गरजा भागवण्यासठी ते चोरी करणारच ना.
चोरी चे समर्थन नाही ,पण खरी स्थिती कडे डोळेझाक पण नाही.

Rajesh188's picture

5 Jun 2020 - 11:11 am | Rajesh188

भारत असू नाही तर परदेश लोक हौस मौज करण्यासाठी भरपूर पैसा उडवतात पण त्यांची च सेवा करत असलेल्या मोलकरणी ना ,साफसफाई कर्मचारी,सुरक्षा रक्षक ह्यांना कमीत कमी पगारात राबवून घेतात.
अंबानी च्या घरी काम करणारी मोलकरीण आणि सामान्य कुटुंबात काम करणारी मोलकरीण आर्थिक बाबतीत एकाच स्तरावर असते.
पंच तरंकित हॉटेल मध्ये हजारात टीप देणारे गॅस घेवून येणाऱ्या कामगाराला दहा रुपये पण देत नाहीत.
हा विरोधाभास आहेच.

मोदक's picture

5 Jun 2020 - 5:51 pm | मोदक

सरसकटीकरण टाळा हो.

खोब्रागडे प्रकरण हे कमीत कमी पगारात मोलकरणीला राबवून घेण्याच्या मुद्यावरून उद्भवलेले प्रकरण आहे - कोण खरे कोण खोटे माहिती नाही पण मूळ मुद्दा तोच.

जिथे मिनिमम वेज चे नियम असतात आणि भ्रष्ट्राचार त्या तळापर्यंत पोहोचलेला नसतो तिथे नोकरांना दिला जाणारा पगार त्या मिनिमम वेज रेट पेक्षा खाली जाऊ शकत नाही - आणि मिनीमम वेजचे रेट चालू काळाशी सुसंगत असतात, बाब आदमच्या जमान्यातले नसतात.

त्यामुळे कोणत्याही मुद्द्याचे सरसकटीकरण न करता तुमचा जो असेल तो नेमका अनुभव मांडता आला तर बघा..

चौकस२१२'s picture

6 Jun 2020 - 6:55 am | चौकस२१२

मोदक अगदी बरोबर बोललात...

कोणत्याही मुद्द्याचे सरसकटीकरण न करता...

बरोबर आहे.

भारत असू नाही तर परदेश लोक हौस मौज करण्यासाठी भरपूर पैसा उडवतात पण त्यांची च सेवा करत असलेल्या मोलकरणी ना ,साफसफाई कर्मचारी,सुरक्षा रक्षक ह्यांना कमीत कमी पगारात राबवून घेतात.
अति श्रीमंत लोकांचे सोडून द्या सर्वसाधारण माध्यम वर्गीययाचे बघितले तर
कोणतया "परदेशात" हे नमूद केल्याशिवाय ह्या विधानाला अर्थ नाही
कारण काही "परदेशात" नियमच असे कडक असतात कि असे करणे फार अवघड असते आणि उघडकीला आले तर अवघड असते ,आणि बहुतेकांना तसे करण्याची इच्छा पण नसते.. आपल्या भोवती एक संतुलित समाज ( egalatarian ) अशी श्रद्धा असणारे पण "परदेश "असतात .

टक्केवारी चा हिशोब केला तर हे पाह्यलं लागेल कि "मिळणार ताशी दर आणि त्या देशातील/ शहरातील राहण्याचा खर्च " याचे गणित काय आहे ते
हे फार वेगवेगळे असू शकते त्यामुळे सर्वच "परदेशानं" एक झोळीत बांधू नका
उदाहरण:
येथे पगार (कमीत कमी दर) ताशी ऑस्ट्रेलियन डॉलर १९.५० आहे आणि कोंबडी (सोललेली ) दर किलो मागे ४ पासून १२ डॉलर पर्यंत मिळते .. सरासरी ८ डॉलर किलो धरा ,दूध १.५० डॉलर प्रती लिटर धरा

आता, भारत , युगांडा, अमेरिका, दुबई, सिंगापोर येथील दर जर कळले तर कोठे काय हे ठरवता येईल.
थोडक्यात काय कमीत कमी मिळकत असलेला कामगार काय दर्जाचे आयुष्य जगू शकतो हे त्या त्या देशातील आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे

मुंबई मध्ये
24 तास नोकर चा पगार 8 ते 15 हजार पर्यंत आहे.
नोकर म्हणजे साफसफाई करणे,इस्त्री करणे, सर्व्हिस देणे(जेवण वाढणे इत्यादी)भांडी साफ करणे हा प्रकार.
जेवण बनवणारे.
त्यांचा पगार 15 हजार ते जास्तीतजास्त 25 हजार पर्यंत असतो.
वरील सर्व गरीब बिहारी असतात.
राहणे,जेवण,आणि बाकी सुविधा दिल्या जातात.
मालक नुसार सुविधा बदलतात.
जास्त करून सरासरी जेवण म्हणजे डाळ आणि भात दोन वेळ फक्त.
झोपण्याची सुविधा शिडी वर किंवा छोट्या खोलीत ,
मुल सांभाळणाऱ्या बायका ह्या सर्व बंगाली आणि झारखंड च्या असतात.
पगार तोच 8 ते 12 हजार.
24 तास duty जेवण डाळ, भात.
नुकतेच झालेलं मुल सांभाळणाऱ्या पारंपरिक ज्ञान असणाऱ्या बायकांना मात्र जास्त पगार असतो 40 ते पन्नास हजार पर्यंत .
पण ही नोकरी सहा सात महिन्यांची च असते.
Driver 15 te 20 hajar.

चौकस२१२'s picture

7 Jun 2020 - 4:06 pm | चौकस२१२

राजेश आपण एक गृहीत धरा आणि मग माहिती द्या म्हणजे आपल्याला तुलना करता येईल
- दोन्ही ऑस्ट्रेलियातील आणि भारतातील नोकर हा बाहेर राहून घरी काम करायला येणार आहे असे धरा ८ तास दिवसाचे फक्त ५ दिवस आठवड्याचे
- त्यामुळे त्याला फक्त पगार आणि जे काही प्रॉव्हिडंट वैगरे दिले जाईल ( येथे ९.५% सक्तीचाच आहे भारतात माहित नाही )असे धरा जेवण खान वैग्रे नाही.

आणि मग हे बघू कि ताशी जर पगार काढला तर पगाराच्या किती % पैसे , १ लिटर दुधास लागतात आणि १ किलो चिकन ला
अप्लायला % फक्त काढ्याची आहे $ रुपये दर वैग्रे जाऊद्या

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 Jul 2020 - 3:22 pm | हणमंतअण्णा शंकर...

मलाही स्वयंपाकाला पूर्ण वेळ मिळत नसल्यामुळे मी खालील गोष्टी करतो -
१. ज्या पालेभाज्या निवडायला जास्त वेळ लागत नाही त्या पालेभाज्या करणे. उदा पालक, चुका, करडई, शेपू इत्यादी
२. आमटी व भाजी एकत्र करणे - सांबार जास्तीत जास्त वेळ करणे, उसळी/डाळी एकत्र करणे. रोज रात्री झोपताना एखादीतरी डाळ भिजवतो. सोयाबीन, मूग, राजमे, कुळीथ, मसूर, हुलगे, सुके वाटाणे, क्वचित हरभरा इत्यादी.
३. गहू/बाजरी/ज्वारी भिजवून त्या शिजवून उसळी करणे. (संदर्भ खमंग-दुर्गाभागवत) चपाती/भाकरी करण्याला पर्याय म्हणून जे करता येईल ते करावे. उदा - गव्हाची खीर, दलिया उकडून, गव्हा/ज्वारी/नाचणीच्या पीठाचे मुटके ( हे चविष्ट लागतात आणि मला भाताच्या वाफेवर पटकन शिजवता येतात ), गव्हा/ज्वारी चे न आंबवता केलेले डोसे, शेवया. हे सर्व आलटून पालटून केले तर आठवड्यात एकही दिवस चपाती/भाकरी न खाता ही तृणधान्ये खाता येतील.
४. सकाळ-संध्याकाळचे जेवळ एकत्रच शिजवणे. पण अन्न नेहमी गरम करून खातो.
५. काकड्या, मुळे, गाजरं, लेट्यूस, कोबी, वांगी कच्ची किंवा भातावर वाफवून मऊ करून खातो.
६. तीन चार प्रकारचे भाजायचे पापड तोंडी लावायला जेणेकरून अन्नावर रूची राहील.
७. कापायला, निवडायला सोप्या भाज्या ( बटाटा, ढोबळी, फ्लॉवर, वांगी, भोपळे, दोडकी, मुळा इत्यादी). गवार, हिरवे मूग, घेवडा इत्यादी भाज्या सध्या खात नाही.

त्यामुळे भात + भाजी + आमटी + चपाती असा चौरंगी आहार न घेता

तृणधान्ये + कडधान्ये +/ भाजी( पटकन कच्ची/वाफवलेली/शिजवलेली) असा दुरंगी/तिरंगी आहार घेतो. तोंडी लावायला मग सत्राशेसाठ लोणची/सुक्या चटण्या/कैर्‍या/पापड/मुरांबे असतातच.

नचिकेत जवखेडकर's picture

4 Aug 2020 - 6:43 am | नचिकेत जवखेडकर

मी सध्या कुटुंबासहित (पत्नी व १.५ वर्षाची मुलगी) जपानमध्ये राहतो. इथेही तशीच परिस्थिती आहे. एकदा एका इंडियन स्टोरमध्ये आम्ही विचारलं तेव्हा ती बाई म्हणाली की मी रोज येऊन २ तास थांबून पोळी भाजी करण्याचे(मग त्यात बाकीची पण कामं जसं की कणिक मळणे वगैरे) ३००० येन घेईन. ते अर्थातच आम्हाला परवडणारं नव्हतं. त्यामुळे तो पर्याय बाद झाला.
इकडे कोरोनामुळे पूर्ण लॉकडाऊन नव्हता पण स्टेट ऑफ इमर्जन्सी लागू केली होती. तेव्हा मुलीचं पाळणाघर पण साधारण २.५ महिने बंद होतं . मी व माझी पत्नी देखील पूर्णवेळ नोकरी करत असल्यामुळे ऑफिसचं काम आणि दिवसभर मुलीला सांभाळणे आणि घरातील कामं यात खूप तारांबळ उडायची. पण मग मी व पत्नी २ २ तासांच्या शिफ्ट मध्ये ऑफिसचं काम करू लागलो. सकाळी लवकर उठून पत्नी नाश्ता, पोळ्या वगैरे करून कामाला बसली की मी बाकीची सगळी कामं बघणार मग त्यात भात लावणं असो, भाजी करणं असो, मुलीकडे बघणं असो, असं सगळंच आलं. किंवा माझ्या काही मिटींग्स असतील तेव्हा ती तो सगळा वेळ मुलीकडे बघणे, मधल्या वेळचं खाणं बनवणे अशी कामं करायची. मुलगी रात्री साधारण ८.३० ला वगैरे झोपली की जरा निवांत वेळ मिळायचा :) पण ते २.५ ते ३ महिने आम्ही मुलीबरोबर पण खूप वेळ घालवला की जो एरवी नाही मिळू शकत नाही. मी स्वतः पत्नीच्या मार्गदर्शनाखाली बरेच पदार्थ करायला शिकलो, की जे एरवी कधीच माझ्याकडून व्हायचं नाही. त्यामुळे एका अर्थी इथे भारतात मिळते तेवढी मदत नाही मिळाली हेही बरंच झालं!