मी असे ऐकलंय कि परदेशी राहणारे त्यांच्या घरची कामे स्वतःच करतात कारण तिकडे कामवाल्या बाया मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांचे चार्जेसही खूप आहेत . नोकरी करणाऱ्या स्त्रिया कसे म्यानेज करतात ? लॉकडाऊन चालू झाल्यापासून तर हे प्रकर्षाने जाणवत आहे. सर्व कामे घरीच करावी लागत असल्याने सकाळची ऑफिसची वेळ साधायला खूपच कसरत करावी लागत आहे. तरी ऑफिस असताना रोजचं साधं जेवणच करत आहे पण त्यातही किमान चार पदार्थ (भाजी , भाकरी , भात, आमटी ) करावेच लागत आहेत . परदेशी राहणारे भारतीय हे सर्व जर करू शकत असतील तर मलाच टाइम मॅनॅजमेण्ट जमेना का काय असे वाटून राहिले आहे . मी असेही ऐकलंय कि परदेशी राहणारे रोज स्वयंपाक करत नाहीत पण असं ब्रेड पावावर महिनोनमहीने कोणी काढत नसावेत. शिवाय त्यांची घरेही मोठाली असतात. इथे २ बीचके चा फ्लॅट स्वच्छ ठेवायला नाकी नऊ यायला लागली आहे .भाज्या आणा, भिजत ठेवा , धुवा , निवडा ... पूर्वी हे होतेच पण पण तेंव्हा इतर कामासाठी बाई असल्याने त्याचे काही वाटायचे नाही पण आता मात्र सर्व घरातच करून नोकरी करणे दिव्य वाटू लागलय. पण परदेशी राहणारे मात्र हे लीलया कसे काय पार पाडत असावेत ह्यावर विचार करूसा वाटत आहे.
तर परदेशी मिपाकर हे कसे म्यानेज करतात किंवा भारतात राहणारेही सदया कसे जमवत आहेत ह्यावर चर्चा व्हावी .
वाचने
40837
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे निरिक्षण + अनुभव
- हेल्प: इथे मेड ठेवणे बरेच खर्चिक आहे. माझ्या एका दोघा परिचितांकडे पुर्णवेळ लॅटीना मेड आहे. त्यांना खाणे पिणे, आणि ६० डॉलर च्या आसपास रोज द्यावा लागतो.
- कपडे: कपडे खूप काही मळत नाहीत, त्यामुळे वॉशर आणि ड्रायर वर काम भागते. हाताने घासावे / धुवावे लागत नाही. लौंड्री फोल्ड करणे थोडे वेळखाऊ आहे, पण गप्पा टाकत नेटफ्लीक्स बघत करता येते.
- केरः घरात धूळ येत नाही, त्यामुळे बेडरूम्स आठवड्यातून एकदा ; लॉफ्ट आणि बेसमेन्ट २ ते ३ आठवड्यातून एकदा व्हॅक्युम केलेले चालते. फॅमिली रूम आणि लिव्हींग रूम हे वर्दळीचे भाग २-३ दिवसात व्हॅक्युम होतात, किचन चा ओटा आणि फरशी आम्ही रोज पुसतो.
- रूम्बा (रोबोट व्हॅक्युम क्लिनर) घेतला आहे. रात्री ऑन केला की मुलांनी सांडलेले क्रम्ब्स वगैरे साफ करून ठेवतो.
- भांडी: डिशवॉशर मध्ये बर्यापैकी निघतात. खूपच तेलकट झाली असतील तर मात्र एकदा हाताने साबण लावून डिशवॉशर मध्ये ठेवावी लागतात.
- स्वयंपाकः आम्ही आता शक्यतो रोज ताजा करतो. हिचा जॉब पार्टटाईम आहे, आणि लॉकडाऊन आहे म्हणून शक्य होते. एरवी आठवड्यातून एक दोनदा सलाड+ इटालियन किंवा मेक्सिकन (कसेडीया/बरीतो) किंवा टेकाअऊट मुळे थोडाफार वेळ वाचतो.
भाज्या एखाद्या शनिवारी धुवून, चिरून, फोडण्या देऊन डीप फ्रीझर मध्ये ठेवल्या तर २-३ आठवडे छान टिकतात.
इतर:- दुध तापवावे लागत नाही
- तांदूळ, डाळी निवडाव्या लागत नाहीत.
- चांगले सूप आणि बिन्स कॅन मध्ये प्रिकूक्ड मिळतात. ते उकळायचा / उकडायचा वेळ वाचतो. मायक्रोवेव्ह मध्ये ३० सेकंदात होते.
- लॉकडाऊन पासून बहुतेक स्टोअर्स ( कॉस्टको , ऍमेझॉन ) ग्रोसरी २ तासात घरपोच देतात
- गॅरेज मध्ये दुसरा फ्रीज किंवा डीप फ्रीझर असतो बहुतेक घरांत. त्यात चिकन / मासे / भाज्या तारीखवार ठेवतो. लाईट सहसा जात नाहीत (२०१२ च्या सँडी स्टॉर्म नंतर एकदाही गेले नाहीत), त्यामुळे हे शक्य होते.
- लॉन मोविंग आणि बागकाम थोडे वेळखाऊ आहे, पण वीकएंड ला करता येते किंवा कोणाला तरी हायर करता येते .
खरा पिट्ट्या पडतो तो हिवाळ्यात; ड्राइव्ह वे आणि साईड वॉक वर साठलेला फूट - दोन फूट बर्फ काढतांना. चांगल्या क्वलिटीचा स्नो ब्लोवर नसेल तर शवल करून करून पाठ मोडते आणि अर्धा दिवस जातो. टाऊनशीपच्या मालकीचा साईड वॉक (फूटपाथ) जरी असला तरी बर्फ काढण्याची जबाबदारी त्या लगतच्या घराची असते. आळस केला तर नोटिस आणि तिकीट येते घरी. असोसिएशन (सोसायटी) मध्ये घर असेल तर हे काम कॉन्ट्राक्ट ने देता येते.धन्यवाद हो.. नेमकी माहिती
In reply to माझे निरिक्षण + अनुभव by भुजंग पाटील
धन्यवाद
In reply to धन्यवाद हो.. नेमकी माहिती by मोदक
धन्यवाद हो..!
In reply to धन्यवाद by भुजंग पाटील
व्वा वा. परदेश म्हणजे अजूनही
वाटलेच..
In reply to व्वा वा. परदेश म्हणजे अजूनही by पाषाणभेद
खुप छान जिरवलीत तुम्ही पाटील
In reply to वाटलेच.. by भुजंग पाटील
डिप्रेस होण्याचे कारणच काय?
In reply to खुप छान जिरवलीत तुम्ही पाटील by आंबट चिंच
असहमत पाभे.. धागा एकदा नीट
In reply to डिप्रेस होण्याचे कारणच काय? by पाषाणभेद
भुजंगरावांसाठी माझ्या
In reply to असहमत पाभे.. धागा एकदा नीट by मोदक
नित्यानंदांचे भक्त का हो
In reply to भुजंगरावांसाठी माझ्या by पाषाणभेद
सहमत
In reply to असहमत पाभे.. धागा एकदा नीट by मोदक
घरकाम करणारी बाई ठेवणे परवडत नाही
हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे का
In reply to घरकाम करणारी बाई ठेवणे परवडत नाही by Rajesh188
परदेशी नोकर आणणे अनुभव
In reply to हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे का by मोदक
या सन्दर्भातली एक बरीच (कु
In reply to घरकाम करणारी बाई ठेवणे परवडत नाही by Rajesh188
केवढ नाट्य!
In reply to या सन्दर्भातली एक बरीच (कु by शेखरमोघे
पुढे काय झाले कोण जाणे
In reply to केवढ नाट्य! by चौकस२१२
पुढे काय झाले कोण जाणेखोब्रागडे बाईंना त्रास देऊ नका असे सांगायला इकडच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे तिकडच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते (आणि अमेरिकन प्रेसिडेंट) डोनाल्ड ट्रंप यांना भेटायला जाणार होते. म्हणजे आठवलेंनी तेंव्हा न्युज चॅनलना तसे सांगितले होते.रामदास आठवले भविष्य जाणत होते ?
In reply to पुढे काय झाले कोण जाणे by मोदक
ऐकीव माहितीप्रमाणे
धूळ
In reply to ऐकीव माहितीप्रमाणे by मराठी कथालेखक
भारतातपण..
In reply to ऐकीव माहितीप्रमाणे by मराठी कथालेखक
भारतातला अनुभव
वरती भुजंग पाटील यांनी बरीच
काम तर येथे
किमान चार पदार्थ
पोळ्या
In reply to किमान चार पदार्थ by चौकस२१२
वरच्या प्रतिसादांमध्ये बरेच
+१
In reply to वरच्या प्रतिसादांमध्ये बरेच by रुपी
डिशवॉशर
डिशवॉशर मुळे पाणी ही वाचते
In reply to डिशवॉशर by उज्वल कुमार
डिशवॉशर अजून हि आपल्या देशात एवढा रुजला नाही
In reply to डिशवॉशर by उज्वल कुमार
याला जीवन ऐसे नाव
मेंदूत विचाराचे वादळ निर्माण होते का
In reply to याला जीवन ऐसे नाव by चौकस२१२
आहारतद्न्य किंवा शास्त्रज्ञ
In reply to मेंदूत विचाराचे वादळ निर्माण होते का by Rajesh188
माझे सिंगापूर अन आता दुबई
बेकार तरुणा
In reply to माझे सिंगापूर अन आता दुबई by बेकार तरुण
धन्यवाद!
भारतात दूध तापवणे आणि बाकी
In reply to धन्यवाद! by जेडी
साध्या लोखंडी
In reply to भारतात दूध तापवणे आणि बाकी by रुपी
शेल्फ लाइफ
In reply to भारतात दूध तापवणे आणि बाकी by रुपी
चोकशी च्या ऐवजी चौकस२१२ असे
दूध गरम कर!
वॉशिंग मशीन आहे. ते रोज
In reply to दूध गरम कर! by चौकस२१२
अवांतर
हिरव्या
घरकाम हे घरकाम च असते
राजेशजी मी तेच विचारलय हो,
In reply to घरकाम हे घरकाम च असते by Rajesh188
त्यांच्या युक्त्या इकडे
In reply to राजेशजी मी तेच विचारलय हो, by जेडी
पुर्विचया मानाने आता भारतात
In reply to त्यांच्या युक्त्या इकडे by चौकस२१२
आजकाल भारतातही सॉर्टेड धान्य
In reply to राजेशजी मी तेच विचारलय हो, by जेडी
परदेशात धूळ कशी नसते?
परदेशात धूळ कशी नसते?
In reply to परदेशात धूळ कशी नसते? by चामुंडराय
वर
In reply to परदेशात धूळ कशी नसते? by चामुंडराय
परदेश
सहमत
In reply to परदेश by स्मिता.
आळशी बनायला फुरसत कमीच
सहमत आहे
In reply to आळशी बनायला फुरसत कमीच by चौकस२१२
परंतु आपण हे जे विधान केलं
In reply to आळशी बनायला फुरसत कमीच by चौकस२१२
परंतु आपण हे जे विधान केलं आहे ते मात्र पटत नाही आणि नुसतेच पटत नाही असे नाही तर आपण कोणत्या आधारावर / अनुभवावर लिहिले आहेत हे विचारावेसे वाटते...म्हणूनच वरती सुरुवातीलाच त्यांचा अनुभव विचारला होता. एखादी गोष्ट त्यांना परवडत नाही म्हणजे सरसकट सर्वांना परवडत नसेल असे नाहीये ना..डू युअर ओन
घरातील कामात पुरुषांचा सहभाग असावा
युगांडा
हो?
In reply to युगांडा by कपिलमुनी
लेबर स्वस्त आहेत
In reply to युगांडा by कपिलमुनी
आणि हे सर्रास दिसते
सरसकटीकरण टाळा हो.
In reply to आणि हे सर्रास दिसते by Rajesh188
बरोबर
In reply to सरसकटीकरण टाळा हो. by मोदक
कोणत्याही मुद्द्याचे सरसकटीकरण न करता...
In reply to सरसकटीकरण टाळा हो. by मोदक
सर्वच "परदेशानं" एक झोळीत बांधू नका
मुंबई चा विचार केला तर