बायका...

Primary tabs

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जे न देखे रवी...
27 May 2020 - 12:44 pm

काल ते म्हणाले,
सगळ्याच बायका
तशा असतात.

तशा म्हणजे नेमके कशा,
म्हणून शोधु लागलो,
बायका.

पुराणात, प्राचीन ग्रंथात,
ऑफिसात, समोर- मागे,
इथे तिथे.
गुगलवर.
अगदी मिपावरही.

असतात बायका,
हळव्या, खंबीर,धीट
आणि तितक्याच
कर्तबागरही.

बायका असतात,
पुरुषां प्रमाणेच.
सोशिक, शोषित
आणि बंडखोरही

काहींनाच जाणवतात,
खोल-खोल श्वास,
अन् ते शब्द.
काहींना नाही इतकाच,
फरक असतो त्या,
मुक-संवादाचा.

बायकात असते एक बाई,
अन आईही.
बायको- प्रेयसी,
मैत्रीण आणि एक मुलगीही.

आदिम काळापासून
सोबत आणि शिवाय,
सुरु असलेल्या
बायकांचा समर्थ प्रवास
अव्याहतपणे.

बायका म्हणजे
अस्वस्थ तगमग.
लिहिता येत नाही त्यावर
कविता, लेख.
आणि वैचारिकही.

बायका असतात
समुद्रगाज.
निळा अथांग सागर
अन,
हळूवार पणे हृदयावर
धडकणा-या
लाटा.

बायका असतात,
काळजी-आधाराचा
आधारवड.
गूढ़ महाकाव्य.
आणि
एक नवा अंकुर
सुष्टीतला.

बायका असतात ....

शांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 May 2020 - 12:47 pm | प्रचेतस

क्या बात है...!!
खूप सुरेख कविता.

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 12:57 pm | संजय क्षीरसागर

बायकात असते एक बाई,
अन आईही.
बायको- प्रेयसी,
मैत्रीण आणि एक मुलगीही.

हे ज्याला कळलं त्याला सगळ्या स्त्रीयासारख्या वाटत नाहीत.

त्याला एकच स्त्री, प्रत्येक वेळी, हरेक प्रसंगात, दररोज, वेगवेगळी दिसते आणि मग जगण्याची मजाच काही और होते !

चांदणे संदीप's picture

27 May 2020 - 1:10 pm | चांदणे संदीप

आपल्या काव्यलेखनाला जेवढी दाद द्यावी तेवढी ती कमीच आहे पण आपण मिपाबायकांनाही ज्या खुबीने या काव्यात स्थान दिले त्याबद्दल आपल्याला एक कडक सॅल्यूट!
(सर्वांनी ह. घ्या. माझेही घर काचेचे आहे ;) )

सं - दी - प

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 May 2020 - 1:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

परंतू पाशवी शक्तीचा उल्लेख नसल्यामुळे णिषेढ!!!

बाकी कविता मस्तच..

कविता म्हणजे रचना या दृष्टीने चांगली असली तरी खूप काळ प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार स्त्रीला चांगलं, (कधीकधी आवश्यकतेनुसार उदात्त, शक्तिमानही) विविध रूपांत वगैरे दाखवून नकळतपणे स्टीरिओटाईप करून ठेवण्याची बेमालूम पद्धत इथेही जाणवते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 May 2020 - 1:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

सहमत
कविता म्हणून आवडली
पैजारबुवा,

बायकात असते एक बाई,
अन आईही.
बायको- प्रेयसी,
मैत्रीण आणि एक मुलगीही.

हा सर्वस्वी नवा दृष्टीकोन आहे.

नवा वाटला नाही हा दृष्टिकोन

या ठराविक भूमिकाच आहेत. सोयीच्या आणि आसपासच्या.

"बायकांत असते" यापुढे,

एक व्यसनी, एक स्पर्शाला आसुसलेली, वासनेला न नाकारणारी, समाजाची चौकट झुगारु पाहणारी, आत्मपूजक..

बायकांत असते एक धंदेवाईक बनिया लपलेली, विवाहबंधन झुगारून आपला मोस्ट सुटेबल नर शोधू पाहणारी..

असं समजा म्हटलं की बरेचसे लोक स्कॅन्डलाईझ होतील आणि स्त्रीविषयी काय हे वैट्ट वैट्ट लिहिलं आहे असं म्हणतील. त्यातून वरीलपैकी भावना / जीवनपद्धती स्त्रीसाठी आपोआप अवैध ठरत जातील.

प्रचेतस's picture

27 May 2020 - 2:03 pm | प्रचेतस

हा खरा नवा दृष्टीकोन.

अर्थात, लेखन ही अनुभव आणि कल्पनेची अभिव्यक्ती आहे. पण मुळाशी अनुभव काय आहे ते महत्त्वाचं.

ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी असेल त्याला तिचे तरल पैलू दिसणार नाहीत आणि ज्यानं स्त्री सहवास सर्वांगानं एंजॉय केलायं त्याला तिच्या कपटीपणाची, जरी ती कधी तशी वागली असली तरी, फारशी दखल घ्यावी असं वाटणार नाही.

ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी असेल त्याला तिचे तरल पैलू दिसणार नाहीत

वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास वर मी वापरलेल्या विशेषणांपैकी क्लेशदायी किंवा अबसोल्यूटली निगेटिव्ह अशी कोणतीच नाहीत. कदाचित त्यातली अनेक पुरुषांच्या बाबतीत सहज मान्य होतील.

माझा मुद्दा फक्त स्टीरिओटायपिंगपुरता आहे. किती कपटी स्त्रिया आणि किती एन्जॉयेबल स्त्रिया कोणाकोणाला भेटल्या याबद्दल नाही.

एकूण स्त्रीबाबत उदात्त भूमिका जास्त घेतली जाऊन अन्य भूमिकेत तिला मांडणे हे खुद्द एक दुरित मानलं जातं, आणि त्यातून समाज स्त्रीसाठी भूमिका अधिकाधिक पक्की करत जातो असा मुद्दा होता.

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 3:55 pm | संजय क्षीरसागर

> मी वापरलेल्या विशेषणांपैकी क्लेशदायी किंवा अबसोल्यूटली निगेटिव्ह अशी कोणतीच नाहीत. कदाचित त्यातली अनेक पुरुषांच्या बाबतीत सहज मान्य होतील.

स्त्री हे तिच्या सर्व गुणावगुणासकट पुरुषाला लाभलेलं एक पॅकेज आहे.
त्यामुळे पुरुषाला स्त्रीची स्वभावदर्शनं हरघडी वेगवेगळी होत राहणार.
त्यात ती प्रकृतीचं प्रगट स्वरुप आहे त्यामुळे जसं जीवन कोणत्याही वेळी काहीही रुप घेऊ शकतं तशी ती कायम अनप्रेडिक्टबल राहणार.

पण ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.
कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत.

------------------------------------

सुनीताबाईंनी जीवनाच्या ऐन संध्याकाळी "आहे मनोहर तरी..." हे पुस्तक लिहीलं.

वरुन लोभस वाटणारं पुलंचं वैवाहिक जीवन त्यांच्या अर्धांगिनीच्या दृष्टीनं कसं आहे याचा तो परखड वेध होता.

पुलंना त्या बद्दल विचारलं गेलं तेंव्हा ते मोठ्या मिस्कीलपणे म्हणाले " ते सुनीताचे विचार आहेत !"

थोडक्यात, " स्त्री ऑबजेक्टीवली काय आहे ?" हा प्रश्न नाही, तुम्ही तिच्याशी काय अनुबंध साधला यावर सगळं आहे.

त्या दृष्टीनं मला डिबींचं ते कडवं आवडलं.

> एकूण स्त्रीबाबत उदात्त भूमिका जास्त घेतली जाऊन अन्य भूमिकेत तिला मांडणे हे खुद्द एक दुरित मानलं जातं,

हे मान्य आहे.

मनिष's picture

27 May 2020 - 3:59 pm | मनिष

बायका असतात,
पुरुषां प्रमाणेच.
सोशिक, शोषित
आणि बंडखोरही

अगदी, अगदी!!! आवडली कविता....

सस्नेह's picture

27 May 2020 - 4:20 pm | सस्नेह

बर्याच दिवसांनी भिडली लेखणी, सर !
लिखते रहिये जनाब...

चांदणे संदीप's picture

27 May 2020 - 8:23 pm | चांदणे संदीप

उत्तम रचनेचा आस्वाद घ्यायचा सोडून ही मंडळी कुठला विषय कुठे घेऊन जातील याचा नेम नाही. याला मिपाप्रंप्रा म्हणावे का? नको, मिपाला स्टिरिओटाईप केल्यासारखे होईल. असो, आता आलोच आहोत सारे पारावर तर मलाही एक पिंक टाकायचीच आहे.

गविकाकांंना काव्यरचनासौंदर्याव्यतिरिक्त जो मुद्दा दिसला तो तसा तिथे नसावा. उद्या पुरूषांबद्द्ल काही लिहिले तरी त्याला स्टिरिओटाईप म्हणावे का? कदाचित पुरूषांवर तितकेसे लिहिले/चर्चिले जात नसावे म्हणून तसे असेल आणी स्रिया/बायकांवर लिहिले जाते म्हणून. संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत. एकसंध कविता उत्तम आहे त्यासाठी.

माझ्या मते, निसर्गतःच स्त्री आणि पुरूष हा भेद झालेला आहे. आणि स्त्रियांच्या वाटेला जो निसर्गकृत गुणधर्म/स्वभाव आलेला आहे त्याच्याशी निगडीत सर्व गोष्टींना त्यांच्याशी पुन्हापुन्हा जोडून पाहिलं तरी त्यात चूक काहीच नाही. उलट त्याचा आनंदच असला पाहिजे. आता जर कुणाला त्यांच्यावरचा स्टिरिओटाईप शिक्का पुसायचाच असेल तर आधी त्यासाठी पुरूषांना गर्भ धारण करता यायला हवा इथून सुरूवात आहे. अन्यथा, जे आहे ते आहे.

सं - दी - प

> प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत ?

ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.
कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत.

याचा प्रतिवाद तुम्ही करु शकाल का ?

चांदणे संदीप's picture

28 May 2020 - 1:26 pm | चांदणे संदीप

ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.

शोधणं म्हणजे अपेक्षा केल्यासारखे होईल. पुन्हा अपेक्षाभंग आला. मग काहीच एंजॉएबल नाही होणार. :)

सं - दी - प

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 1:28 pm | संजय क्षीरसागर

ती अपेक्षा नाही, घडलेली वस्तुस्थिती आहे

मला तुमची रसग्रहणं आवडतात. 'कधीकधी' वाद प्रतिवादही आवडतात. कधीकधी मात्र आपलंच रेटायचं हे आवडत नाही. तसं मी कधी बोलल्याचे आठवत नाही पण आत्ता इथे चालू आहे म्हणून बोललो. 'शोधली' हा तुमच्या मते, "प्रेझंट पर्फेक्ट" असेलही, पण शोधली म्हणजे सापडली हे कसे ते सांगा. आणि सापडली नाही तर त्या न सापडलेल्याचे दु:ख होईल की नाही हेही सांगा.

सं - दी - प

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 2:28 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही इथे काय करता ?

> कधीकधी मात्र आपलंच रेटायचं हे आवडत नाही.

हा प्रत्येक प्रतिवाद न करु शकणार्‍याचा स्टँड आहे !

इतरांची मतं सरसकट मान्य करणं हे स्वतःचा काहीही विचार नसल्याचं लक्षण आहे.

> 'शोधली' हा तुमच्या मते, "प्रेझंट पर्फेक्ट" असेलही, पण शोधली म्हणजे सापडली हे कसे ते सांगा.

"कोलंबसनं अमेरिका शोधली " याचा अर्थ काय होतो ?

___________________________

तुम्ही व्यक्तीगत झालात तर मला त्याचप्रकारे प्रतिवाद करावा लागतो.
तस्मात, ते टाळा.

चांदणे संदीप's picture

28 May 2020 - 2:57 pm | चांदणे संदीप

तुम्ही इथे काय करता ?

मी इथे वाचायला येतो आणी जमलंच तर काहीबाही लिहितोही.

हा प्रत्येक प्रतिवाद न करु शकणार्‍याचा स्टँड आहे !

हे तुमचे मत आहे. इतरांना तसे वाटेलच असे नाही. मलाही तसे वाटले नाही. मला वाटलं ते मी बोललो.

इतरांची मतं सरसकट मान्य करणं हे स्वतःचा काहीही विचार नसल्याचं लक्षण आहे.

हेही तुमचेच मत आहे. हे म्हणजे असं झालं की, गाववाले सांगत होते, तुमचा कोंबडा आरवला नाही तरी सूर्य उगवतोच! पण हा फक्त आपला स्वतःचा विचार नाही म्हणून ते मान्य करायचे नाही. शेवटी काय होतं हे मी सांगायची गरज नसावी.

"कोलंबसनं अमेरिका शोधली " याचा अर्थ काय होतो ?

कोलंबसने अमेरिका शोधली नाही, ती त्याला सापडली. तो दुसर्‍या शोधात होता. कधीकधी ते आवडू शकत पण बर्‍याचदा जे शोधत होतो ते सापडलं नाही म्हणून अपेक्षाभंग होतोच. कोलंबसला आनंद झाला का त्याचा अपेक्षाभंग झाला हा वेगळा विषय आहे.
मग शोधली म्हणजे सापडली'च' असं होतं नाही आणी न शोधताही सापडू शकतं हेही तितकंच खरं आहे!

तस्मात, ते टाळा.

ओके, नोटेड सर! :)

सं - दी - प

याचा अर्थ तुम्हालाही भरपूर वेळ असतो असा होतो !

> हे तुमचे मत आहे. इतरांना तसे वाटेलच असे नाही. मलाही तसे वाटले नाही. मला वाटलं ते मी बोललो.

दुसर्‍याच्या मताला हेकेखोरपणा म्हणणं हे कितपत सभ्यतेचं लक्षण आहे ?

> कोलंबसने अमेरिका शोधली नाही, ती त्याला सापडली.

विषय पर्फेक्ट प्रेझंटेन्सचा आहे.

सापडली हे शोधल्याशिवाय होणार नाही पण एकदा शोधल्यावर.....
शोधली आणि सापडली हे समानार्थी आहेत.

> गाववाले सांगत होते, तुमचा कोंबडा आरवला नाही तरी सूर्य उगवतोच!

माझ्या विधानाचा या वाक्याशी सुतराम संबंध नाही !

चांदणे संदीप's picture

28 May 2020 - 4:08 pm | चांदणे संदीप

याचा अर्थ तुम्हालाही भरपूर वेळ असतो असा होतो !

योगायोगाने तुमच्याकडे आहे तितकाच आजतरी माझ्याकडे आहे.

दुसर्‍याच्या मताला हेकेखोरपणा म्हणणं हे कितपत सभ्यतेचं लक्षण आहे ?

'कधीकधी' हे जोडून होतं बर्का सर ते! आणि तसं मत असणे म्हणजे लगेचच असभ्य होतो असं कुठं लिहिलंय?

विषय पर्फेक्ट प्रेझंटेन्सचा आहे.

आजीबात नाही. विषय...

ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.
कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत.

हा आहे. आणि त्याला धरूनच शोधली/सापडली इथपर्यंत आपण आलो होतो. आता, शोधली - सापडली हे समानार्थी आहे ही नवीन माहिती कळाली सर. धन्यवाद!

माझ्या विधानाचा या वाक्याशी सुतराम संबंध नाही !

नाही कसा? आपले त्याच्या आधीचे हे विधान...

इतरांची मतं सरसकट मान्य करणं हे स्वतःचा काहीही विचार नसल्याचं लक्षण आहे.

या संदर्भात ती कोंबड्याची कथा सांगितली होती. आता तुम्हाला विस्कटून सांगावं लागत असेल तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होत आहे. तरीही, इतरांची मतं बरोबर असतील तरीही केवळ आपला स्वतःचा विचार हवा म्हणून ती अमान्य करणं यासंदर्भात कोंबड्याला आणून पहा सर. :)

सं - दी - प

याचा अर्थ तुमच्या पहिल्या प्रतिसादातली पहिली कमेंट निरर्थक होती.

> तसं मत असणे म्हणजे लगेचच असभ्य होतो असं कुठं लिहिलंय ?

दुसर्‍या विषयी जजमेंटल कमेंट करणं हा असभ्यपणा आहे हे तुम्हाला लिहून शिकवावं लागतंय हे आश्चर्य आहे.

> शोधली - सापडली हे समानार्थी आहे ही नवीन माहिती कळाली सर

ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली आणि
ज्या पुरुषाला एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी सापडली

याचा मराठीत एकच अर्थ होतो.

> इतरांची मतं बरोबर असतील तरीही केवळ आपला स्वतःचा विचार हवा म्हणून ती अमान्य करणं ?

तुम्हाला एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी सापडली आहे का ?

तुमचा स्वतःचा काही अनुभव असेल तर तो मान्य किंवा अमान्य होईल.

स्वतःचा काहीही अनुभव न लिहीता तुम्ही मुद्दासोडून उगाच काहीही चालवलंय

चांदणे संदीप's picture

28 May 2020 - 4:44 pm | चांदणे संदीप

एकूणाएक वाक्याला क्वोट करून मुद्दा भरकटवत न्यायची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
त्यामुळे इतर सर्व राहू द्या, फक्त...

तुम्हाला एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी सापडली आहे का ?

हा प्रतिप्रश्न कशासाठी? तरीही मी सांगतोच, याच्यासाठी माझं उत्तर 'नाही' असं आहे.
आता, तुम्हीही मूळ मुद्दा न सोडता प्रश्नाला प्रतिप्रश्न न करता सरळसरळ सांगा बरं, शोधणे म्हणजे 'अपेक्षा' (सापडण्याची) धरणे कसे होत नाही? आणि त्याला कृपया तुम्ही शोधली-सापडली-सामानार्थी-मराठीत असा अर्थ होतो वगैरे निव्वळ मेगाबायटी (अरे, बर्‍याच दिवसांनी हा शब्द मिपावर आला!) प्रतिसाद देऊ नका ही विनंती.

सं - दी - प

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 5:17 pm | संजय क्षीरसागर

> तरीही मी सांगतोच, याच्यासाठी माझं उत्तर 'नाही' असं आहे.

हाच तर मुद्दाये !

त्यामुळे तुमच्या या विधानाला :

> संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत

काहीही अर्थ उरत नाही . शून्य अनुभव असतांना काहीही कमेंट मारली आहे असा त्याचा अर्थ आहे.

> शोधणे म्हणजे 'अपेक्षा' (सापडण्याची) धरणे कसे होत नाही

शोधणे आणि शोधली यातला फरक तुम्हाला अजून समजू नये हे पण आश्चर्य आहे.

माझं वाक्य पुन्हा वाचा :

ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.

चांदणे संदीप's picture

28 May 2020 - 6:04 pm | चांदणे संदीप

हाच तर मुद्दाये !

हा तुमचा नवीन मुद्दा आहे.

संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत

हा खरा मुद्दा आहे.

शून्य अनुभव असतांना काहीही कमेंट मारली आहे असा त्याचा अर्थ आहे.

मी उत्तरात फक्त 'नाही' म्हटले सर. माझ्या उत्तराचे स्पष्टीकरण मी दिले नाही आणि तुम्ही विचारले नाही. मग, माझ्या शून्य अनुभवाच्या निष्कर्षापर्यंत यायची एवढी कसली घाई आहे?

शोधणे आणि शोधली यातला फरक तुम्हाला अजून समजू नये हे पण आश्चर्य आहे.

शब्दांचे काढावे तसे अर्थ निघतात सर. शोधली म्हणजेच सापडली अशाच अर्थाला तुम्ही चिकटून बसणार असेल तर मी आधिक सांगणे व्यर्थ आहे. शोधली/शोधणे मध्ये क्रिया आहे आणि सापडण्यामध्ये फलश्रुती, असे नव्हे का?

सं - दी - प

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 9:53 pm | संजय क्षीरसागर

> ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.
कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत

हा माझा दावा आहे.

तुम्हाला याचा अनुभव नाही.

काहीही अनुभव नसतांना तुम्ही " संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत" अशी कमेंट मारली आहे.

थोडक्यात, ओळी लंगड्या वगैरे काही नाहीत.

शिवाय तुम्हाला त्या अनुभवाच्या प्रचितीपेक्षा शब्दच्छलात रस आहे. त्यामुळे तुम्हाला उलगडा होण्याची शक्यता नाही.

जव्हेरगंज's picture

27 May 2020 - 9:02 pm | जव्हेरगंज

बऱ्याच दिवसांनी एक कुरकुरीत जिलबी आली म्हणायची ;)

गणेशा's picture

27 May 2020 - 9:14 pm | गणेशा

मस्त एकदम

किसन शिंदे's picture

27 May 2020 - 11:30 pm | किसन शिंदे

कडक लिहलंय सर.

प्रशांत's picture

28 May 2020 - 10:33 am | प्रशांत

+१

mrcoolguynice's picture

27 May 2020 - 11:49 pm | mrcoolguynice

काल ते म्हणाले,
सगळ्याच बायका
तशा असतात.

"ते" म्हणजे कोण ? मोदीजी का ?

मन्या ऽ's picture

28 May 2020 - 12:23 am | मन्या ऽ

कविता मस्तच!
पण स्त्रीला त्याच चौकटीतुन बघितलं गेलंय..

मन्या ऽ's picture

28 May 2020 - 12:56 am | मन्या ऽ

साळसुदपणे!
अगदी थेट बोललात. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2020 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस, संक्षीसेठ, कवीमित्र संदीप, मिका, गविसेठ, पैजारबुवा, मनीषसेठ, स्नेहांकिता, गणेशा, किसन्देव, प्रशांतसेठ, मन्या, जव्हेरजंग आणि आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभार. कोणाची नावे राहीली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. ;)

कवितेच्या निमित्ताने आशयाबद्दलची उत्तम चर्चा करणा-या मित्रवर्यांचे आभार. वाचकांचे आभार. उडालेल्या आयडींचेही आभार. आपल्या सर्वांचे प्रतिसाद मिपावर लिहायला प्रवृत्त करतात, असेच प्रेम राहू द्या.

-दिलीप बिरुटे
(आभारी)

रातराणी's picture

28 May 2020 - 11:30 am | रातराणी

सुरेख!!

सतिश गावडे's picture

28 May 2020 - 2:20 pm | सतिश गावडे

सुंदर आहे कविता.
गवि म्हणतात तसे इतरही अनेक कंगोरे असतात मात्र कवीला जे स्फुरतं ते तो कागदावर उतरवतो किंवा टंकतो. जे नाही नाही स्फुरलं त्यासाठी त्याला धोपटणं बरं नाही :)

प्रचेतस's picture

28 May 2020 - 2:39 pm | प्रचेतस

कवीने त्याचे लिखित जगासमोर उपडे केले की ते त्याचे राहत नाही. :)

धागा तापलाय ... पाणी ओता आता बदाबदा ...

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 5:23 pm | संजय क्षीरसागर

तेही लेखावर लिहीतांना बघून आनंद वाटला.
__________________________________

सर्वांना आयुष्यभर उपयोगी होईल असा हा मुद्दा आहे.

> ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.
कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत
______________________________________________________

पण सदस्य तो लक्षात न घेता, व्यक्तिगत कमेंटस आणि अनुभव शून्य शेरेबाजी करतायंत; त्याला माझा इलाज नाही.

मग स्त्रीनेही का एकाच पुरूषात सखा, बाप आणि मुलगा शोधू नये?

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 5:57 pm | संजय क्षीरसागर

ज्या स्त्रीला एकाच पुरूषात सखा, बाप आणि मुलगा सापडला तर तीचं ही जीवन बहारदार होईल.

पण दुसर्‍यानं काय करावं हे आपण ठरवू शकत नाही.

कोंबडा's picture

28 May 2020 - 6:04 pm | कोंबडा

पण ही शोधाशोधी का करायची कशाला?
जीवन बहारदार होण्यासाठी हा केवळ एकच मार्ग शिल्लक आहे का?

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 10:07 pm | संजय क्षीरसागर

> जीवन बहारदार होण्यासाठी हा केवळ एकच मार्ग शिल्लक आहे का?

सहजीवनात स्त्रीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर तिच्या सहवासात मजा आली तर जीवन बहारदार होईल यात शंका नाही.

वास्तविकात सर्व नाती मान्यता आहेत कारण विवाह या मुळ मान्यतेतून ती निर्माण होतात.

विवाह ही वास्तविकता नसून मान्यता आहे या उलगड्यामुळे त्या नात्याला नवं परिमाण लाभतं. एकाच स्त्रीमधे तुम्हाला सखी, आई आणि मुलगी सापडते. ती शोधाशोध नाही. तो एकाच स्त्रीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन आहे.

हा दृष्टीकोन बलता क्षणी ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत.

हा माझा गेल्या कित्येक दशकांचा अनुभव आहे आणि सर्वांना उपयोगी व्हावा म्हणून इथे मांडला आहे.

कोंबडा's picture

28 May 2020 - 10:37 pm | कोंबडा

म्हणजे ते 'मित्रो' वगैरे म्हणतात त्या शेटचं जीवन बहारदार नाही असं तुम्हाला म्हणायचंय का?

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 10:48 pm | संजय क्षीरसागर

पण या पोस्टवर ती चर्चा उचित होणार नाही.

मी एक साधारण मनुष्य आहे. हे मला माहिती आहे. मला ब्रम्हज्ञान जरी प्राप्त झाले नसले आणि 'स्व'पणाची जाणीव जरी झाली नसली तरीही काही गोष्टी ठाम कळाल्यात. त्या अर्थात ह्याच आहेत. ;)

मग साधारण म्हटले की, सर्वसाधारण मनुष्यांत जे किमान गुण-अवगुण असतात ते तसे माझ्यातही आहेत. गुण वाढवायचे/अवगुण कमी करायचे ह्या फंदातही मी पडत नाही. कारण अश्वत्थामा म्हटल्याप्रमाणे, एक जीव एकाच आयुष्यात सर्व रसांचा स्वाद नाही घेऊ शकत. हेही मला पटते. सगळ्यांचे सगळे पटत नाही आणि सगळ्यांचे सगळेच पटत नाही असेही नाही कारण मी आहे साधारण मनुष्य. मग एक साधारण मनुष्य, एका स्त्रीमध्ये, आई, बहिण, बायको, आजी, काकी, मामी, चुलती, मावशी, चुलतबाया, मावसबाया झालंच तर शेजारीण, एवढं सगळं नाही बघू शकत कारण एवढ्या खंडीभर बायका अगोदरच त्याच्या अवतीभवती वावरत असतात. आता मला सांगा, बायकांना हे असे बघताना स्टिरिओटाईप केल्यासारखे वाटत नाही का? म्हणूनच, फक्त 'त्या' ओळी लंगड्या आहेत असे मी म्हणालो. गविकाकांनीही नेमके कवितेतले तेच घेतले. म्हणूनच मला, फक्त 'त्या' ओळी नव्हे तर एकसंध कविता त्यावर चांगले उत्तर आहे असे वाटते.

प्रा.डॉ. सर सॉरी बर्का! मला कविता अतिशय आवडलेली आहे. पण त्यावर असा वाद-प्रतिवाद व्हावा आणि त्यात कधी नाही ते माझा सहभाग असावा याबद्दल मला खेद आहे. :(

सं - दी - प

कोंबडा's picture

28 May 2020 - 9:36 pm | कोंबडा

आजची मॅच संपली का?
संजूबाबा इज विन्नर.. ?

चांदणे संदीप's picture

28 May 2020 - 9:46 pm | चांदणे संदीप

माई मोड ऑन.
अरे कोंबड्या, ही इज बॉर्न टू विन रे बाबा. इतके तुला ठाऊक नसावे! ;)

माई मोड ऑफ.

(बाजीगर)
सं - दी - प

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2020 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ. सर सॉरी बर्का!

नै नै, तसं कै नै. वाटलं की बोलत राह्यचं माणसानं.

मरने के बाद आदमी कुछ नही बोलता, मरने के बाद आदमी कुछ नही सोचता.
जब आदमी कुछ नही बोलता, जब आदमी कुछ नही सोचता तब आदमी मर जाता है.

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

29 May 2020 - 11:58 am | कानडाऊ योगेशु

चांदणे भौंना क्षीरसागरात तारे दिसले म्हणायचे का?
कृ.ह.घे. ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2020 - 9:43 am | ज्ञानोबाचे पैजार

च्यायला एवढे सगळे रामायण वाचून सुध्दा रामाची सीता कोण हे समजलेच नाही.

या विद्वत्जनांच्या मांदियाळीत माझ्या सारख्या अतिसामान्य बुद्धीच्या जीवाचे मडके कोरडेच राहिले. जन्मजातच पालथे असावे कदाचित.

चला उठा मंडळी, तुमचे सगळ्यांचे झाले असेल तर सतरंज्या उचलायला लागू का? पुढचा कार्यक्रम कधी सुरु होईल काही सांगता येत नाही. तुम्ही लोकच परत सतरंजी साठी झुंबड उठवता नव्या ठिकाणी.

आणि हो उठल्यावर ते जमिनिवर सांडलेले पॉपकॉर्न जमतील तेवढे गोळा करा, पुढच्या कार्यक्रमाला उपयोगी पडतील.

पैजारबुवा,

अनन्त्_यात्री's picture

29 May 2020 - 10:45 am | अनन्त्_यात्री

एकच मार्‍या, लेकिन क्या मार्‍या ! :)