बायका...
काल ते म्हणाले,
सगळ्याच बायका
तशा असतात.
तशा म्हणजे नेमके कशा,
म्हणून शोधु लागलो,
बायका.
पुराणात, प्राचीन ग्रंथात,
ऑफिसात, समोर- मागे,
इथे तिथे.
गुगलवर.
अगदी मिपावरही.
असतात बायका,
हळव्या, खंबीर,धीट
आणि तितक्याच
कर्तबागरही.
बायका असतात,
पुरुषां प्रमाणेच.
सोशिक, शोषित
आणि बंडखोरही
काहींनाच जाणवतात,
खोल-खोल श्वास,
अन् ते शब्द.
काहींना नाही इतकाच,
फरक असतो त्या,
मुक-संवादाचा.
बायकात असते एक बाई,
अन आईही.
बायको- प्रेयसी,
मैत्रीण आणि एक मुलगीही.
आदिम काळापासून
सोबत आणि शिवाय,
सुरु असलेल्या
बायकांचा समर्थ प्रवास
अव्याहतपणे.
बायका म्हणजे
अस्वस्थ तगमग.
लिहिता येत नाही त्यावर
कविता, लेख.
आणि वैचारिकही.
बायका असतात
समुद्रगाज.
निळा अथांग सागर
अन,
हळूवार पणे हृदयावर
धडकणा-या
लाटा.
बायका असतात,
काळजी-आधाराचा
आधारवड.
गूढ़ महाकाव्य.
आणि
एक नवा अंकुर
सुष्टीतला.
बायका असतात ....
क्या बात है...!!
डिबी, भारीच !
सर भारीच की वो
हा हा हा
कविता म्हणजे रचना या दृष्टीने
+१
स्टीरिओटाईप करून ठेवण्याची बेमालूम पद्धत ?
नवा वाटला नाही हा दृष्टिकोन
हा खरा नवा दृष्टीकोन.
बायकांत असते एक धंदेवाईक बनिया लपलेली !
ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी
उलट आहे !
बायका असतात,
क्या बात है !
बापरे!
संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय
सर
शोधली हा "प्रेझंट पर्फेक्ट" आहे !
सर, तुमच्याकडे खूपच वेळ असतो बहुधा...
सर, तुमच्याकडे खूपच वेळ असतो बहुधा... ?
हम्म
मी इथे वाचायला येतो आणी जमलंच तर काहीबाही लिहितोही.
.
योगायोगाने तुमच्याकडे आहे तितकाच आजतरी माझ्याकडे आहे.
ओके
सुरुवात तुम्ही केली आहे !
.
मुळ मुद्दा काये ?
बऱ्याच दिवसांनी एक कुरकुरीत
मस्त एकदम
कडक लिहलंय सर.
+१
काल ते म्हणाले,
कविता मस्तच!
साळसुदपणे!
आभार...
सुरेख!!
सुंदर आहे कविता.
कवीने त्याचे लिखित जगासमोर
धागा तापलाय ... पाणी ओता आता
तुम्हाला मराठीत आणि
मग स्त्रीनेही का एकाच पुरूषात
अर्थात !
पण ही शोधाशोधी का करायची
चांगला प्रश्न !
म्हणजे ते 'मित्रो' वगैरे
पुन्हा सुरेख प्रश्न !
माझ्या ढीगभर प्रतिसादांचे स्पष्टीकरण
आजची मॅच संपली का?
अरे कोंबड्या
Pagination