कोंकणची वेदना..
करोनाचा हा रोग, त्यावर अनेक प्रयोग!
काय भोग आहेत भाळी, याच काळी, काही कळेना !
हरेक समजतो इथं मीच अाहे बरोबर!
सैनिक तरी कोविडचे आहेत का सुरक्षित खरोखर ?
रेड आणि कंटेनमेंट झोनमधून
बाहेर जायलाही नाही परवानगी..
पण सरकारच्या चातुर्यामुळे
कोंकणात मात्र होऊ शकते रवानगी..
बाटलीतील राक्षसाला प्लीज सोडू नका बेलगाम..
कोविड बियाणं नाही संपवलं तर होतील गंभीर परिणाम..
राजधानीत नाही झेपलं, मग ही असुरक्षित घिसाडघाई इथे कशाला?
कोरोनाचा भस्मासूर कोकणच्या का उशाला?
कोरोनाचा भस्मासूर कोकणच्या का
+१
या कवितेच्या निमित्ताने