[कविता' २०२०] - एकटीच राधिका...
एकटीच राधिका...

एकटीच राधिका द्वारकेस चालली
श्यामध्यास, श्यामस्वप्न, श्यामरंग ल्यायली...
चांदणे तनावरी, चांदणे मनातही
चंद्रिकाच राधिका चांदण्यात नाहली...
श्याम हीच प्रेरणा, श्याम धारणा तिची
प्रेमिकाच राधिका कल्पनेत दंगली...
शब्द-श्याम, धून-श्याम, गीत-श्याम ऐकुनी
नर्तिकाच राधिका, नाच नाच नाचली...
ध्येय श्याम, वाट श्याम, श्वास श्याम, प्राणही
रान श्याम, ऊन श्याम आणि श्याम सावली...

वाचने
11148
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
+1
+१
+१ वाह वा! अप्रतिम रचना!
वाह!+१
सुरेख.....!
+1
+१
+१
सुंदरच...
छान
+१
+१
श्याममय राधा होणे हेच तिचे
श्याममय झालेली सुंदर भक्ती