Skip to main content

[कविता' २०२०] - एकटीच राधिका...

Published on बुधवार, 13/05/2020

एकटीच राधिका...




एकटीच राधिका द्वारकेस चालली श्यामध्यास, श्यामस्वप्न, श्यामरंग ल्यायली... चांदणे तनावरी, चांदणे मनातही चंद्रिकाच राधिका चांदण्यात नाहली... श्याम हीच प्रेरणा, श्याम धारणा तिची प्रेमिकाच राधिका कल्पनेत दंगली... शब्द-श्याम, धून-श्याम, गीत-श्याम ऐकुनी नर्तिकाच राधिका, नाच नाच नाचली... ध्येय श्याम, वाट श्याम, श्वास श्याम, प्राणही रान श्याम, ऊन श्याम आणि श्याम सावली...


याद्या 11156
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

कविता खुप आवडली.. भक्तीरस.. जाता जाता सहज कवितेचे नाव, श्यामरंग हवे होते असे वाटले.. जर शब्द-श्याम, धून-श्याम, गीत-श्याम ध्येय श्याम, वाट श्याम, श्वास श्याम, प्राणही श्याम रान श्याम, ऊन श्याम आणि श्याम सावली तर ती एकटी नाहीच... कविता सुंदरच

आवडली रचना. पुलेशु.

वाह!+१

+1

+१ चाल लावून गाणे होईल अशी सुरेख कविता!

+१

राधा आणि कृष्ण आले की ती रचना सुंदर होणार यात शंका नसते. कवितेला + १ सं - दी - प

+1 पट्कन संपली, मस्त एक नाद तयार झाला होता वाचताना

+१

+१ श्यामवेडी राधा खूप आवडली.