चिश्ती रेषा

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
11 May 2020 - 11:09 am

अंधार गवसला मागे
तू पुढे रात्र उसवली.
होती नव्हती पणती
मी हळूवारपणे विझवली.

पहाडा मागून आल्या
कोर्‍या चिश्ती रेषा.
केसरी हिरवा रंग
नेसून बसली वेश्या.

मुंग्यांचे फूटले वारूळ
अलवार धुक्याच्या वेळी.
सख्याचं उमटलं गोंदण
क्षितीजाच्या अलगद भाळी.

-कौस्तुभ

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

16 May 2020 - 10:15 pm | जव्हेरगंज

तुमच्या कविता अत्यंत वेगळ्या दर्जेदार आहेत.

लिहीत राहा! शुभेच्छा!!

कौस्तुभ भोसले's picture

18 May 2020 - 5:24 pm | कौस्तुभ भोसले

खूप खूप आभार