✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कविता आणि गजल दोन वेगवेगळे प्रकार आहेत.

प
पाषाणभेद यांनी
Sat, 05/09/2020 - 22:10  ·  लेख
लेख
मिपावर काव्यलेखन स्पर्धा २०२० आयोजीत केली आहे. हे वाचून मनापासून आनंद आला. सांप्रत काळात कवी आणि कवितांना इतर साहित्यप्रकारापेक्षा कमीपणाचे लेखले जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. "मला कवीता समजत नाही तरीपण वाचून मी प्रतिसाद दिला" - असे लिहीणे एकप्रकारे उपकार केल्यासारखे वाटते. या पार्श्वभुमीवर मिपाने कवितांची स्पर्धा आयोजीत करणे अभिमानास्पद आहे. सदर स्पर्धेतल्या कविता वाचल्या. त्यात कवितांचे सर्व प्रकार आहेतच पण गजल देखील समाविष्ट आहे. माझ्या मते गजल हा काव्यप्रकार इतर काव्यप्रकारांपासून निराळा आहे. गजल ही तिच्या प्रकृतीनुसार अधीक अचूक आणि व्याकरणातील सक्षम असावी लागते. ( असे गजल अभ्यासकांचे मत आहे.) त्यामुळेच गजल लिहीणे आणि समजणे, चर्चा करणे जास्त प्रतिष्ठेचे समजले जाते. कला शाखा आणि विज्ञान शाखेत जी चढाओढ असते तेच येथे अपेक्षीत आहे. अनेक काव्यवाचन स्पर्धांत गजला या गावून सादर केल्या जातात. त्यातील शेर मनाला भिडणारे असतात. त्यामुळे इतर काव्यप्रकारांतून गजल या काव्यप्रकाराला तेथे अधिक मान्यता मिळते. अशा मिश्र काव्यप्रकाराच्या सादरीकरणात गजल ला जास्त बक्षिसे आणि वहावा मिळाल्याचे मी स्वत: अनुभवले आहे. प्रश्न गजल आणि इतर काव्य यांच्या द्वंदाचा नाहीये. हे दोन भिन्न काव्यप्रकार आहे. गजलेची प्रकृती निराळी आहे. दोन्ही काव्यप्रकार त्या त्या जागी श्रेष्ठ आहेत. यात कोणा एका काव्य रचनाकाराची बुद्धी श्रेष्ठ आणि दुसर्याची कनिष्ठ असे समजायला नको. परंतु ते तसेच होते. मिश्र काव्यप्रकार असतील तेथे गजल करणारे बाजी मारतात. त्यांचे सादरीकरण चांगले असते. त्यामुळे परिक्षकांवर त्यांची छाप पडते. गजलेला प्राप्त झालेले प्रतिष्ठेचे वलय इत्यादी गुण यावेळी उपयोगी पडतात. वास्तविक पाहता इतर काव्यप्रकारही तितक्याच ताकदीचे असतात. काव्यमंचावर केवळ गजलेचे सादरीकरण असणारे कार्यक्रम नेहमी होत असतात. तेथे इतर काव्यप्रकार सादर होत नाहीत किंवा होवू दिले जात नाहीत. परंतु नेहमीच्या काव्यस्पर्धांत किंवा कविसंमेलनात इतर काव्यप्रकारांसोबत गजल देखील विनासायास समाविष्ट केली जाते नव्हे ती बक्षिसासदेखील पात्र ठरते. मिपावरील सध्याची काव्यस्पर्धा २०२० मध्येदेखील गजल आणि इतर काव्यप्रकार येत आहेत ही याचीच साक्ष आहे. इतर काव्यप्रकार आणि गजल यामध्ये वाद घालून श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकार नसावा. दोन्ही साहित्य भगीनी आहेत. काव्याचे अलंकार आहेत. मिपावर कविता आणि गजल असे दोन स्वतंत्र प्रकार (विभाग) असावेत असे मला वाटते. दोन्ही आपआपल्या जागी श्रेष्ठ आहेत. इतर संस्थळावर असल्या दोन्ही प्रकारांसाठी निरनिराळे विभाग आहेत. या काव्यस्पर्धेत परिक्षक गजल आणि इतर काव्यप्रकार असा भेद परिक्षक करतील ही अपेक्षा. (हे सारे लिहून एका वादाला सुरुवात केल्यासारखे वाटते आहे.)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54566 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

लिंक आहे का सर्व लिखाणाची?

गणेशा
Tue, 05/19/2020 - 07:53 नवीन
लिंक आहे का सर्व लिखाणाची? वाचेल मी.. सगळे. वरती '? ' चुकून पडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

वैभव जोशी म्हणजे.. जाऊ देत.

राघव
Tue, 05/19/2020 - 08:17 नवीन
वैभव जोशी म्हणजे.. जाऊ देत. खूप सुंदर लिहितात. एकत्रित लेखन मात्र सापडले नाही बॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लिंक कुठून आणू?

आगाऊ म्हादया......
Wed, 05/20/2020 - 06:20 नवीन
ह्या गझलकारांना मी स्वतः ऐकलं आहे आणि मग घरी आल्यावर गझला आठवून लिहिलीत, क्वचित प्रसंगी पुढच्या कार्यक्रमात पुन्हा सादर झाली तेव्हा लिहिलीय. आता त्या तोंडपाठ झाल्यात म्हणून भराभर लिहीत गेलो एवढंच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

Ok..

गणेशा
Wed, 05/20/2020 - 06:33 नवीन
Ok.. मजेने : तुम्हीच सगळ्या आठवा आणि लिहा.. आम्ही वाचतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ म्हादया......

@आगाऊ म्हाद्या, प्रतिसाद आवडला!

मन्या ऽ
Tue, 05/19/2020 - 08:49 नवीन
भुषण कटककर हे बेफिकीर या नावाने लिहीतात. त्यांनी गज़लेच्या व्याकरण- नियमांवलीवर लिहीलेल्या लेखाची लिंक सापडली तर देईल इथे.. अर्थात तस मिपाच्या धोरणात बसत असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ म्हादया......

धन्यवाद

आगाऊ म्हादया......
Wed, 05/20/2020 - 06:22 नवीन
यस्स, भूषण कटककर, एक कार्यक्रमांतून सांगितलेलं, मी विसरलो होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ

अतिशय सुंदर प्रतिसाद!

सत्यजित...
Mon, 06/01/2020 - 22:41 नवीन
अतिशय सुंदर प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ म्हादया......

तिला अशी दुय्यम

चौकस२१२
Sat, 05/16/2020 - 14:21 नवीन
"तिला अशी दुय्यम आणि वेगळी वागणूक मिळू नये " मला नाही वाटत कि कोणी मराठी गझलेला दुय्यम ठरवत आहे .. गझल हि स्वतःची इतकी परिपूर्ण आहे कि तिचं साठी वेगळे स्थान ठेवावे एखाद्या स्पर्धेत असे बहुतेक पाषाणभेद यांचे मूळ मत असावे असे वाटतो असो आपण संधर्भ दिलेल्या मराठी गझला वाचून चांगले वाटले
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आगाऊ म्हादया......
Sat, 05/16/2020 - 14:28 नवीन
माझा देखील सूर मुळात भेद नसावा असा आहे. म्हणून मी दुय्यम आणि वेगळी अशा दोन्ही शब्दांचा वापर केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

वृत्त बद्ध कविता

निनाद
Mon, 05/18/2020 - 08:45 नवीन
वृत्त बद्ध कविता असा वेगळा उपविभाग येथे असला पाहिजे त्यामुळे सकस काव्य शोधताना इतर कचरा रचना चिवडत बसाव्या लागणार नाहीत. छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाही असा नियम असावा. छंद देणे बंधनकारक असावे. मग दर्ज्यामध्ये नक्कीच फरक पडेल.
  • Log in or register to post comments

छंद / वृत्त ठरवून कविता

राघव
Mon, 05/18/2020 - 15:10 नवीन
छंद / वृत्त ठरवून कविता लिहिल्या जाते? छंद/वृत्त/अलंकार्/गण/मात्रा यातलं काहीही न समजता / माहित नसता, कविता होणं शक्य नाही? तसं असेल तर मी जे काही थोडंफार लेखन आजवर केलंय, त्यात एकही कविता नाही असंच म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

मी सुद्धा हेच लिहीणार होते.

मन्या ऽ
Tue, 05/19/2020 - 08:55 नवीन
मी सुद्धा हेच लिहीणार होते. कवी त्याच्या भावना तो कवितेत मांडत असतो. त्या भावना मुक्तछंदात असोत, गज़लेत असोत वा वृत्तबद्ध कवितांमध्ये. व्यक्त होण आणि ते इतरांपर्यत पोहोचण महत्वाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही

गणेशा
Tue, 05/19/2020 - 08:09 नवीन
छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाही ह म्हणजे लग्न न झालेली माणसे, नपुसंक असतात असे म्हणण्यासारखे आहे.. गझल आवडते मला.. खुप आवडते.. पण वृत्त नसलेल्या कविता हि तितक्याच जवळच्या वाटतात.. भावनेच्या त्या जसेच्या तसे रूप वाटते.. पण वृत्तात लिहिले पाहिजे, वृत्त पाहिजेच हि अवाजवी मागणी करणारे.. शब्दा वर हि हक्क गाजवू लागतात तेंव्हा? मग ती गझल असु वा निव्वळ कविता.. त्याचे काय..ज्यावर अहंकार चिकटतो.. तो संपतो असे आपले मत.. शब्द हे शब्द असतात...ते प्रेमिका च्या गळ्यात हि हार बनतात.. कोठ्यावर हि फुलेच बरसवतात.. घरात असता ते तिथे हि फुलांचा वर्षाव करतात.. पण म्हणून कोणी फुलांचा बाजार मांडून, तीच खरी फुले असे म्हणत असेल तर अवघड आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

हा अन्याय ठरेल

आगाऊ म्हादया......
Wed, 05/20/2020 - 06:24 नवीन
अनेक उदाहरणं देता येतील ज्यात मुक्तछंद आहे पण तरीही त्या उत्तमकाव्य आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

वेगळा उपविभाग

निनाद
Wed, 05/20/2020 - 08:11 नवीन
वृत्त बद्ध कविता असा वेगळा उपविभाग येथे असला पाहिजे त्या विभागात छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाही असा नियम असावा. छंद देणे बंधनकारक असावे. आशा आहे आता स्पष्ट झाले असावे.
  • Log in or register to post comments

हे अफाट आहे....वाचनखूण

मनिष
Wed, 05/20/2020 - 17:42 नवीन
हे अफाट आहे....वाचनखूण साठवतोय!
  • Log in or register to post comments

समर्पक चर्चा!

सत्यजित...
Mon, 06/01/2020 - 22:51 नवीन
बर्‍याच जणांंचे प्रतिसाद आवडले! गझल श्रेष्ठ की कविता? मग त्यातही छंदबद्ध तीच कविता की कविता मुक्तछंदही?? मला हे प्रश्नच अवाजवी वाटतात,कदाचित मला कधी पडले नसावेत म्हणूनही असेल! मला वाटतं कुठलंही लिखाण ज्यात एक ओघ असतो,केवळ शाब्दीक लयीचाच नव्हे,भावनीक ओघ,ते काव्य असावं! त्या ओघांत जो वाहत जाईल त्याने मनसोक्त तरंगत तरंगत रहावं! जमलंच तर दाद द्यावी!
  • Log in or register to post comments

__^__

गणेशा
Mon, 06/01/2020 - 23:09 नवीन
__^__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा