मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[कविता' २०२०] - ..पुढे तिचा मी ईश्वर झालो..

साहित्य संपादक · · स्पर्धा

..पुढे तिचा मी ईश्वर झालो..




बघा किती मी कणखर झालो कुणी म्हणाले पत्थर झालो.. तिला म्हणालो भक्त तुझा मी (पुढे तिचा मी ईश्वर झालो.) बरेच झाले बेघर झालो.. किती घरांचे छप्पर झालो जिवंत असता माहित नव्हतो प्रसिध्द मेल्यानंतर झालो!! उपाय अगदी साधा ज्याचा अजार असला दुर्धर झालो खरेय दुनिया "गोल"च नक्की . समुद्र झालो घागर झालो. प्रलय घडावा वर मागितला.. उगाच भोळा शंकर झालो.. नको नको त्या प्रश्नांचेही हवे हवेसे उत्तर झालो जिच्या अदेने जीव हि जावा असाच मृत्यु सुंदर झालो


वाचन 9061 प्रतिक्रिया 0