..पुढे तिचा मी ईश्वर झालो..

बघा किती मी कणखर झालो
कुणी म्हणाले पत्थर झालो..
तिला म्हणालो भक्त तुझा मी
(पुढे तिचा मी ईश्वर झालो.)
बरेच झाले बेघर झालो..
किती घरांचे छप्पर झालो
जिवंत असता माहित नव्हतो
प्रसिध्द मेल्यानंतर झालो!!
उपाय अगदी साधा ज्याचा
अजार असला दुर्धर झालो
खरेय दुनिया "गोल"च नक्की .
समुद्र झालो घागर झालो.
प्रलय घडावा वर मागितला..
उगाच भोळा शंकर झालो..
नको नको त्या प्रश्नांचेही
हवे हवेसे उत्तर झालो
जिच्या अदेने जीव हि जावा
असाच मृत्यु सुंदर झालो

वाचने
9090
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
+१
+१
+1
फक्त
+१
नाही समजली..
नक्की काय नाही समजले?
In reply to नाही समजली.. by मन्या ऽ
+१
काही ओळी खासच
कविता आवडली
वाह्...