Skip to main content

[कविता' २०२०] - ..पुढे तिचा मी ईश्वर झालो..

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/05/2020 14:31 या दिवशी प्रकाशित केले.

..पुढे तिचा मी ईश्वर झालो..




बघा किती मी कणखर झालो कुणी म्हणाले पत्थर झालो.. तिला म्हणालो भक्त तुझा मी (पुढे तिचा मी ईश्वर झालो.) बरेच झाले बेघर झालो.. किती घरांचे छप्पर झालो जिवंत असता माहित नव्हतो प्रसिध्द मेल्यानंतर झालो!! उपाय अगदी साधा ज्याचा अजार असला दुर्धर झालो खरेय दुनिया "गोल"च नक्की . समुद्र झालो घागर झालो. प्रलय घडावा वर मागितला.. उगाच भोळा शंकर झालो.. नको नको त्या प्रश्नांचेही हवे हवेसे उत्तर झालो जिच्या अदेने जीव हि जावा असाच मृत्यु सुंदर झालो


वाचने 9090
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

+1

+१

+१

+1

तिला म्हणालो भक्त तुझा मी (पुढे तिचा मी ईश्वर झालो.)
हेच कडवे किंवा शेर आवडला. त्यामुळे सबंध कवितेला/गजलेला गुण नाही देत. सं - दी - प

+१

तिला म्हणालो भक्त तुझा मी (पुढे तिचा मी ईश्वर झालो.) बरेच झाले बेघर झालो.. किती घरांचे छप्पर झालो जिवंत असता माहित नव्हतो प्रसिध्द मेल्यानंतर झालो!! नको नको त्या प्रश्नांचेही हवे हवेसे उत्तर झालो ही चारही कडवी आवडली. सुंदर!

ईश्वर,छप्पर,नंतर,घागर... बढिया शेर!