स्थलांतर migration कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
4 May 2020 - 9:21 am
गाभा: 

प्राजक्ता यांचा कॅनडा स्थलांतर migration विषयी प्रश्न होता त्यावरून हे लिहावेसे वाटले
जर कोणाला स्थलांतरित स्वारस्य आहे असे दिसताय तर एक दोन गोष्टी सुचवयव्यश्य वाटतात ( कोविड नसताना ची परिस्थिती)
एक दोन गोष्टी आधी गृहीत धरल्या आहेत त्या म्हणजे
- आपण बहुतेक पाश्चिमात्य इंग्रजी देशांतील स्तलांतर बद्दल बोलत आहोत म्हणजे कॅनडा , ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, युनाइटेड स्टेट्स आणि युनाइटेड किंग्डम , यूरोप मध्ये भाषेहूमुळे आणि अपुऱ्या माहिती मुले धरले नाहीये ( याशिवाय सिंगापोर पण धरता येईल परंतु सिंगापुर चे स्तहलन्तर थोडे वेगळे आहे
- स्थलांतर लांब पल्ल्याचे की २-४ वर्षासाठी ? ( सध्या आपण लॅब पल्ल्य्याचे म्हणजे जवळ जवळ कायमचे ) याचा विचार करू
- बहुतेक मराठी स्तलांतरी अजून तरी नोकरी करणारे असतात असे गृहीत धरुयात
- या लेखाचा हेतू हा काही " परदेशात कसे चांगले आणि भारतात कसे बेकार " असला नाहीये .. त्यामुळे कृपया प्रतिक्रया दिलीत तर यावर वाद घालू नका

प्रथम आपण स्वतःला काही प्रश्न विचारावेत
१) स्थलांतरच मुख्य कारण काय त्याचा विचार करा , पैसे ( बचत या अर्थाने) राहणीमान ? संधी? कि काही इतर वयक्तिक
२) बदलाची तयारी आहे का , व्यासायिक, चालीरीती, जेवण खान, इत्यादी
४) नातेवाईकांपासून दूर राहण्याची तयारी आहे का? आपली मुले आपल्यासारखी गोतावळ्यात वाढणार नाहीत याची तयारी आहे का ?

मूळ कारण: केवळ बचत हा असेल तर वरील पाश्चिमात्य देशांपेक्षा कदाचित जवळचं आखाती देश किंवा पूर्वे कंदील इंडोनेशिया सारखे देश यातील संधी मिळत असेल तर ती जास्त चांगली असू शकेल याचा विचार करा कारण असे कि या पाश्चिमात्य देशात प्रामुख्याने येण्याची कारणे केवळ बचत हि अवघड आहे येथील राहणी म्हणजे तेवढ्याच श्रमात
एकूण आयष्यातील सोपे पण आणि एक वेगळ्याप्रकरचा आनंद मग त्यात घरी बाग असो किंवा घराची डागडुजी स्वतः कारणे किंवा शिरमंत नसताना सुद्धा चांगल्या गोष्टी परवडणे अनुभव घेता येणे असे हि होऊ शकते ..
- येथे आयुष्य अवघड आहे का? याचे उत्तर हो आणि नाही हि
प्रथम : नकारात्मक
१) स्वतःचीच कामे स्वतः कारवी लागतील/ भारतात समजा ५० जनाची टीम चे मुकादम असलात तर इथे कदाचित ४ जणांचे मुकादम असाल ,
वर्णद्वेष आहे का तर हो आहे आणि नाही हि जसा इतर देशात आहे तसेच कधी उघड कधी छुपा.. पण एकूण samajne "सर्व वर्ण समभाव " स्वीकारला आहे आणि त्यामुळे जसे "भारतात गाडी चालवली तर माणूस कोठेही गाडी चालवू शकतो" तसेच काहीसे ...
२) दरवर्षी कंपनी च्या खर्चाने भारतात सुट्टी हा प्रकार नाही आयकर भरून मग जी बचत होईल त्यातून हि भारताची "फॉरीन " ट्रिप करावी लागेल
३) छोट्या गावात गेलात तर कदाचित भारतीय किराणा मिळणे थोडे अवघड असेल
४) मुले हि मिश्र समाजात वाढतील .. तयारी पाहिजे
५) हवामान कदाचित बदलेल
६) सरकारी नोकरी लागली तरी तिथे भरपूर काम करावे लागेल

आता नाही सकारत्मक :
- बरीच खाजगी आणि सरकारी कामे सुलभ रित्या होतील
- उद्या समजा तुमच्या नेहमीच्या क्षेत्रात काम नसेल तर इतर क्षेत्रात तुम्ही विना संकोच जाऊ शकाल... आणि त्यामुळे खूप उत्पन्नात तफावत होणार नाही
- संगणक/ तांत्रिक. वैद्यकीय याशिव्या इतर क्षेत्रात संधी मिळू शकते आणि आपण त्यात मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा चांगल्या पद्धतीचे राहणीमान ठशाकाल
- सर्वसाधारण लाच लुचपत कमी
- श्रीमंत नसताना सुद्धा इतर छंद जोपासता येतील म्हणजे छोटी बोट घेऊन मासेमारी किंवा सार्वजनिक गोल्फ कोर्स वॉर गोल्फ खेळणे यासाठी तुम्ही "जि एम " लेवल असले पाहिलेज असे नाही..
- कायमचे रहिवासी यांना फक्त सरकारी नोकरी आणि राजकारण हे सोडले तर सर्व करता येते ..
- नग्रिक्त्व मिळणे काही वर्षांनी शक्य फार अवघड नाही
स्थलांतराचं पद्धती:
१) वरील पैकी ऑस्ट्रेलिया , कानडा, आणि नु झीलंड येथे "विना नोकरी कायमचा स्थलांतरीत व्हिसा " skilled migration अशी सोय आहे
घरात बसून आपल्या या तीन देशातील कायमचा राहण्याचा व्हिसा मिळू शकतो आपलं शिक्षण , अनुभव आणि वय या प्रमाणे आपल्याला गुण मिळतात आणि आपण जर पुरेसे मिळवलेत तर व्हिसा मिळेल ..
- सरकारी स्तोत्रावर मा हिती मिळवा आणि मग पाहिजे तर स्थानिक दलाला कडे जा https://immi.homeaffairs.gov.au/visas/getting-a-visa/visa-listing/skille...
- कोणी दलाल जर तुम्हाला"तिथे गेल्यावर " खात्रीचे उत्पन्न असे सांगत असेल तर ते खोटे असेल... फक्त बेकारी भत्ता असू शकतो पण त्यास्तही त्याचा पण अभ्यास करावं कंगतो , भत्ता किती मिळतो?लगेच मिळतो का? इत्यादी आणि राहण्याचा खर्च किती

२) उद्योजक व्हिसा : अमेरिकेत ईबी ५ नावाचा कुटुंब व्हिसा केवळ ५ लाख अमेरिकन गुंतवून करणार असाल तर मिळू शकतो त्यात धोका असतो पैसे बुडण्याचा तेव्हा जपून , इतर देशात हि तशी सोय आहेपण त्यास्तही ची रक्कम जास्त असू शकते
३) तात्पुरता कामाचा व्हिसा येथे यावर चर्चा करीत नाही कारण तो हेतू नाही ..आणि तयासाठी नोकरी लागतेच

प्रतिक्रिया

स्वतन्त्र's picture

4 May 2020 - 11:12 am | स्वतन्त्र

मला IT प्रोग्रामिंग मध्ये १० वर्षाचा अनुभव आहे आणि माझ वय ३२ आहे .मला भारताबाहेर नोकरी निमित्त स्थलांतर करायचे झाल्यास सुरूवात कशी करता येईल.कृपया मार्गदर्शन करावे.

चौकस२१२'s picture

4 May 2020 - 2:52 pm | चौकस२१२

आपला जुना धागा २०१७ आर्किटेक्ट होण्यासंबंधी ...वाचला आणि खास करून (डॉ खरे आणि उल्लू यांनी दिलेला चांगला सल्ला पण भावला)
यावरून आपल्यात काहीतरी धडपड करण्याची इच्छा आहे हे दिसले ...तेव्हा सोडू नका नीट माहिती काढा ..
आपली मूळ पदवी आणि अनुभव याचया जोरावर

स्वतन्त्र's picture

6 May 2020 - 4:29 pm | स्वतन्त्र

खूप खूप आभारी आहे.
सध्या आहे त्या क्षेत्रात थोडासा स्थिरावून मग त्या क्षेत्राकडे लक्ष द्यावे म्हणतो.परदेशात भारतापेक्षा एकाहून अधिक क्षेत्रात शिक्षण घेणे सुकर दिसते.आणि बाहेर जाऊन थोडा अनुभव विस्तारण्याची आकांक्षा आहे.

स्वप्नांची राणी's picture

8 May 2020 - 9:39 pm | स्वप्नांची राणी

cic.gc.ca हि कॅनेडीयन government ची immigration website आहे. कॅनेडीयन इमीग्रेशनची माहिती या आणि फक्त याच वेबसाईटवरून मिळवा. अतिशय पारदर्शक आणि विस्तृत माहिती ईथे उपलब्ध आहे. सोप्पी आणि detailed website आहे ही. सगळे फॉर्म्स आणि चेकलिस्ट्स ईथेच मिळतील. Application process is entirely online. सगळ्या कागदपत्रांच्या नोटराइज्ड कॉपी ऑनलाईनच अपलोड करायच्या असतात.

ईमिग्रेशन वेग॑वेगळया मार्गाने करता येते. आपल्यासाठी कॅनडात जाऊन शिक्षण घेणे, म्हणजेच स्टडी विसा किंवा स्टडी परमीट हा ही मार्ग आहे.

आपल्या शैक्षणिक आणि आपल्या कार्यक्षेत्रातला अनुभव यावर आधारीत असा ईमिग्रेशन प्रोग्रॅमही आहे. ह्या मार्गाने डायरेक्ट कॅनेडियन PR (Permanent Resident) मिळवता येतो.

या वेबसाईटवर एक NOC list (National Occupational Classification) आहे. त्यानुसार आपले शिक्षण आणि अनुभवानुसार पात्रता स्वतःलाच ठरवता येते. हि लिस्ट म्हणजे कॅनडात सध्या कोणत्या क्षेत्रात जॉब्स मिळू शकतात किंवा उपलब्ध आहेत, याचा डेटाबेस आहे.

कॅनडात ईमिग्रेशन करायचे असल्यास English Language Test (IELTS General) ही द्यावी लागते. तर डॉक्युमेंट्स जमविणे आणि ही ईंग्लिश भाषेची पात्रता टेस्ट देणे ही कामे जरा लवकरात लवकर सुरु करावित.

ईमिग्रेशन एजन्ट्स पण आहेत. पण फ्रँकली त्यांची गरज नसते. ते फक्त आपल्याकडून सगळी डॉक्युमेंट्स घेऊन अप्लोड करणे हेच काम करतात. 'आमच्याकडून ईमिग्रेशनची प्रोसेस केल्यास ती procedure speedup होइल.." किंवा '१००% व्हिसा मिळेल वगैरे भूलथापांना बळी पडू नये. कॅनडात एकंदरीतच सरकारी किंवा ईतरही कामांमधे transparency असते. आपल्याला त्याची सवय नसते. आणि अगदी याच मानसिकतेचा फायदा एजंट्स उचलतांना दिसतात.

मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

आपण आधी वरील काही मुद्दे विचारत घ्या आणि आधी ठरवा कि कायमस्वरूपी कि तात्पुरते आणि ध्येय या गोष्टी सांगा म्हणजे कोणी सल्ला देऊ शकेल!
वय हा महत्वाचा मुद्दा आहे .. स्किल टेस्ट मध्ये बसता का पहा , याशिवाय
तात्पुरते जायचे असेल तर मार्ग वेगळे आहेत आणि देश हि वेगळे आहेत खास करून आई टी क्षेत्रात तर काय तुम्हाला स्वतःलाच जास्त संध्या माहिती असतील.. कितीतरी भारतीय उद्योग भारतातून लोक तिकडे पाठवतात .. त्यामुळे ते तर जास्त सोप्पे असेल
अजून काही मुद्दे सांगायचे राहून गेले ते असे
- जर कुटुंब असेल तर त्यातील दोघांपैकी कोण जास्त सहजतेने पॉईंट टेस्ट उत्तीर्ण होऊ शकतो ते तपासावे
- आधी पी आर व्हिसा कि भारतातूनच नोकरी बघतो.. तर साधारणपणे असे म्हणता येईल कि बाकी क्षेत्रांच्या मानाने आई टी क्षेत्रात अशी घरबसल्या
कॉल वरून मुलाखत होऊन नोकरी मिळून जाण्याचे प्रमाण जास्त आहे कारण हे काम जगभर एकाच प्रकारे होत असणार ( माझा अंदाज) .. परंतु स्किल टेट्स घेऊन जाणार्यात अभियांत्रिकी क्षेत्रातील ( आणि जे अजूनही अभियंते म्हणून काम करतात ) अशांचचि संख्या पण खूप आहे
- आधी प्रवासी व्हिसावर जाऊन आणि मग बघू प्रयत्न करून तिथे .. हा मार्ग धोक्याचा आणि खर्चिक आहे त्यामुळे फंदात ना पडलेले बरे
- अर्थात मागणी प्रमाणे असते.. मागे जेव्हा अमेरिकेत फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी ला खूप मागणी होती तेव्हा मित्राचं बहीण न्यूझीलंड ला प्रयत्न करून थकली पण तिला भारतात परत जाऊन झटकन अमेरिकेत नोकरी मिळली !

Prajakta२१'s picture

4 May 2020 - 9:00 pm | Prajakta२१

खूप आभार आणि शुभेच्छा

निनाद's picture

5 May 2020 - 8:27 am | निनाद

लेखाच्या आशयाशी सहमत आहे.
कॅनडा-ऑस्ट्रेलिया सारख्या देशाचा परमनंट रेसिडेन्सी व्हिसा घ्यावा.
आणि मगच नोकरीसाठी प्रयत्न करावेत.

परमनंट रेसिडेन्सी व्हिसा ही सुमारे दोन किंवा तीन वर्षाची प्रोसेस असू शकते याचे भान ठेऊन प्रयत्नाला लागावे.
सर्व सोपस्कार पुर्ण करून रेसिडेन्सी व्हिसाचे अ‍ॅप्लिकेशन होणे म्हणजे visa application lodge होणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी लागणारा खर्च समोर दिसत असला तरी तो करावा. कारण लक्षात घ्या यानंतर परमनंट रेसिडेन्सी व्हिसा मिळणार आहे. म्हणजे कायम राहण्याचा.

इंग्रजीचा सराव ही अनेक जणांची समस्या असते. खास करून ग्रामीण भागातून आलेले लोक अशी तक्रार करताना आढळतात. कारण आपण भारतीय इंग्रजी बोलतो ऐकतो. यासाठी त्या त्या देशाचा रेडियो (टिव्हि नाही!) ऐकणे महत्त्वाचे आहे. उदा ऑस्ट्रेलियाचा एबीसी रेडियो. https://www.abc.net.au/radio-australia/programs/ यामुळे तेथील भाषेचा अंदाज येऊ लागतो. कोणते उच्चार कसे आहेत आणि केले पाहिजेत हे कळू लागते.
कार्यक्रम ऐकून त्याचा गोषवारा लिहायचा प्रयत्न केल्यास अजून फरक पडू लागतो.

एबीसी रेडियोवर कार्यक्रमांचा खजिना आहे. अनेक उत्तमोत्तम जुने रेडियो कार्यक्रम येथे मोफत ऐकू शकता.