प्राजक्ता यांचा कॅनडा स्थलांतर migration विषयी प्रश्न होता त्यावरून हे लिहावेसे वाटले
जर कोणाला स्थलांतरित स्वारस्य आहे असे दिसताय तर एक दोन गोष्टी सुचवयव्यश्य वाटतात ( कोविड नसताना ची परिस्थिती)
एक दोन गोष्टी आधी गृहीत धरल्या आहेत त्या म्हणजे
- आपण बहुतेक पाश्चिमात्य इंग्रजी देशांतील स्तलांतर बद्दल बोलत आहोत म्हणजे कॅनडा , ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, युनाइटेड स्टेट्स आणि युनाइटेड किंग्डम , यूरोप मध्ये भाषेहूमुळे आणि अपुऱ्या माहिती मुले धरले नाहीये ( याशिवाय सिंगापोर पण धरता येईल परंतु सिंगापुर चे स्तहलन्तर थोडे वेगळे आहे
- स्थलांतर लांब पल्ल्याचे की २-४ वर्षासाठी ? ( सध्या आपण लॅब पल्ल्य्याचे म्हणजे जवळ जवळ कायमचे ) याचा विचार करू
- बहुतेक मराठी स्तलांतरी अजून तरी नोकरी करणारे असतात असे गृहीत धरुयात
- या लेखाचा हेतू हा काही " परदेशात कसे चांगले आणि भारतात कसे बेकार " असला नाहीये .. त्यामुळे कृपया प्रतिक्रया दिलीत तर यावर वाद घालू नका
प्रथम आपण स्वतःला काही प्रश्न विचारावेत
१) स्थलांतरच मुख्य कारण काय त्याचा विचार करा , पैसे ( बचत या अर्थाने) राहणीमान ? संधी? कि काही इतर वयक्तिक
२) बदलाची तयारी आहे का , व्यासायिक, चालीरीती, जेवण खान, इत्यादी
४) नातेवाईकांपासून दूर राहण्याची तयारी आहे का? आपली मुले आपल्यासारखी गोतावळ्यात वाढणार नाहीत याची तयारी आहे का ?
मूळ कारण: केवळ बचत हा असेल तर वरील पाश्चिमात्य देशांपेक्षा कदाचित जवळचं आखाती देश किंवा पूर्वे कंदील इंडोनेशिया सारखे देश यातील संधी मिळत असेल तर ती जास्त चांगली असू शकेल याचा विचार करा कारण असे कि या पाश्चिमात्य देशात प्रामुख्याने येण्याची कारणे केवळ बचत हि अवघड आहे येथील राहणी म्हणजे तेवढ्याच श्रमात
एकूण आयष्यातील सोपे पण आणि एक वेगळ्याप्रकरचा आनंद मग त्यात घरी बाग असो किंवा घराची डागडुजी स्वतः कारणे किंवा शिरमंत नसताना सुद्धा चांगल्या गोष्टी परवडणे अनुभव घेता येणे असे हि होऊ शकते ..
- येथे आयुष्य अवघड आहे का? याचे उत्तर हो आणि नाही हि
प्रथम : नकारात्मक
१) स्वतःचीच कामे स्वतः कारवी लागतील/ भारतात समजा ५० जनाची टीम चे मुकादम असलात तर इथे कदाचित ४ जणांचे मुकादम असाल ,
वर्णद्वेष आहे का तर हो आहे आणि नाही हि जसा इतर देशात आहे तसेच कधी उघड कधी छुपा.. पण एकूण samajne "सर्व वर्ण समभाव " स्वीकारला आहे आणि त्यामुळे जसे "भारतात गाडी चालवली तर माणूस कोठेही गाडी चालवू शकतो" तसेच काहीसे ...
२) दरवर्षी कंपनी च्या खर्चाने भारतात सुट्टी हा प्रकार नाही आयकर भरून मग जी बचत होईल त्यातून हि भारताची "फॉरीन " ट्रिप करावी लागेल
३) छोट्या गावात गेलात तर कदाचित भारतीय किराणा मिळणे थोडे अवघड असेल
४) मुले हि मिश्र समाजात वाढतील .. तयारी पाहिजे
५) हवामान कदाचित बदलेल
६) सरकारी नोकरी लागली तरी तिथे भरपूर काम करावे लागेल
आता नाही सकारत्मक :
- बरीच खाजगी आणि सरकारी कामे सुलभ रित्या होतील
- उद्या समजा तुमच्या नेहमीच्या क्षेत्रात काम नसेल तर इतर क्षेत्रात तुम्ही विना संकोच जाऊ शकाल... आणि त्यामुळे खूप उत्पन्नात तफावत होणार नाही
- संगणक/ तांत्रिक. वैद्यकीय याशिव्या इतर क्षेत्रात संधी मिळू शकते आणि आपण त्यात मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा चांगल्या पद्धतीचे राहणीमान ठशाकाल
- सर्वसाधारण लाच लुचपत कमी
- श्रीमंत नसताना सुद्धा इतर छंद जोपासता येतील म्हणजे छोटी बोट घेऊन मासेमारी किंवा सार्वजनिक गोल्फ कोर्स वॉर गोल्फ खेळणे यासाठी तुम्ही "जि एम " लेवल असले पाहिलेज असे नाही..
- कायमचे रहिवासी यांना फक्त सरकारी नोकरी आणि राजकारण हे सोडले तर सर्व करता येते ..
- नग्रिक्त्व मिळणे काही वर्षांनी शक्य फार अवघड नाही
स्थलांतराचं पद्धती:
१) वरील पैकी ऑस्ट्रेलिया , कानडा, आणि नु झीलंड येथे "विना नोकरी कायमचा स्थलांतरीत व्हिसा " skilled migration अशी सोय आहे
घरात बसून आपल्या या तीन देशातील कायमचा राहण्याचा व्हिसा मिळू शकतो आपलं शिक्षण , अनुभव आणि वय या प्रमाणे आपल्याला गुण मिळतात आणि आपण जर पुरेसे मिळवलेत तर व्हिसा मिळेल ..
- सरकारी स्तोत्रावर मा हिती मिळवा आणि मग पाहिजे तर स्थानिक दलाला कडे जा https://immi.homeaffairs.gov.au/visas/getting-a-visa/visa-listing/skill…
- कोणी दलाल जर तुम्हाला"तिथे गेल्यावर " खात्रीचे उत्पन्न असे सांगत असेल तर ते खोटे असेल... फक्त बेकारी भत्ता असू शकतो पण त्यास्तही त्याचा पण अभ्यास करावं कंगतो , भत्ता किती मिळतो?लगेच मिळतो का? इत्यादी आणि राहण्याचा खर्च किती
२) उद्योजक व्हिसा : अमेरिकेत ईबी ५ नावाचा कुटुंब व्हिसा केवळ ५ लाख अमेरिकन गुंतवून करणार असाल तर मिळू शकतो त्यात धोका असतो पैसे बुडण्याचा तेव्हा जपून , इतर देशात हि तशी सोय आहेपण त्यास्तही ची रक्कम जास्त असू शकते
३) तात्पुरता कामाचा व्हिसा येथे यावर चर्चा करीत नाही कारण तो हेतू नाही ..आणि तयासाठी नोकरी लागतेच
वर्गीकरण
वाचने
5531
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मार्गदर्शन हवे
धडपड करण्याची इच्छा
In reply to मार्गदर्शन हवे by स्वतन्त्र
धन्यवाद !
In reply to धडपड करण्याची इच्छा by चौकस२१२
कॅनेडीयन पी. आर.
In reply to मार्गदर्शन हवे by स्वतन्त्र
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
In reply to कॅनेडीयन पी. आर. by स्वप्नांची राणी
टप्याटप्याने विचार करा माहिती काढा
चांगले मार्गदर्शन
सहमत