समुद्र... कसा ?
असा किंवा तसा...
समुद्र... कधी शांत, कधी रागीट...
कधी अस्ताव्यस्त, कधी नीट..
कधी धीरोदत्त, कधी उतावळा..
कधी निळा, कधी सावळा..
कधी उद्धट, कधी प्रेमळ..
कधी गहिरा, कधी नितळ..
कधी आनंदी, कधी रुसवा..
कधी सरळ, कधी फसवा..
कधी राजा, कधी वैरागी..
कधी भाग्यवंत, कधी अभागी..
कधी साधक, कधी बाधक..
कधी ओंगळ, कधी मादक..
कधी शहाणा, कधी वेडा..
कधी संपूर्णच, कधी थोडा..
----------- विनायक बेलोसे-----------
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1920
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि माझी आवड्ती कविता...
सो ईनोसंट
In reply to हि माझी आवड्ती कविता... by veebee009
छान
छान