✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महिलांची T20 जागतिक स्पर्धा 2020

म
मुक्त विहारि यांनी
Fri, 02/21/2020 - 10:27  ·  लेख
लेख
नमस्कार, आज पासून "महिलांची T20 जागतिक स्पर्धा 2020" चालू होत आहे. ह्याच महिन्यात, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड, ह्यांच्यात तिरंगी T20, सामने झाले. त्या सामन्यांचा अनुभव, भारतीय क्रिकेट संघाला कामाला येईल. गृप A मधील संघ खालील प्रमाणे. ... ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंड गृप B मधील संघ खालील प्रमाणे. .... पाकिस्तान, इंग्लंड, साउथ आफ्रिका, थायलंड आणि वेस्ट इंडिज. गृप A मध्ये, ऑस्ट्रेलिया तर गृप B मध्ये इंग्लंड अव्वल स्थानावर असण्याची शक्यता जास्त आहे. भारत आणि बांगलादेश ही मॅच जास्त रंगतदार होणार...किंबहुना भारताचा सेमी फायनल मधला प्रवेश ही मॅच ठरवेल, असा माझा अंदाज आहे. पण जर आज आपण ऑस्ट्रेलिया बरोबर जिंकलो तर, पुढचा प्रवास नक्कीच सुखावह ठरेल... भारतीय संघाने हा कप जिंकावा, ही मनापासून इच्छा आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6701 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मी पयला :)

टवाळ कार्टा
Fri, 02/21/2020 - 19:02 नवीन
मी पयला :)
  • Log in or register to post comments

स्वागत आहे. ..

मुक्त विहारि
Fri, 02/21/2020 - 19:14 नवीन
स्वागत आहे. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आजची मॅच भारतीय क्रिकेट संघाने जिंकली. ..

मुक्त विहारि
Fri, 02/21/2020 - 19:17 नवीन
सुरूवात तरी उत्तम झाली.
  • Log in or register to post comments

पूनम राऊत आणि शिखा पांडे

दुर्गविहारी
Fri, 02/21/2020 - 23:10 नवीन
पूनम राऊत आणि शिखा पांडे यांनी जवळपास हरलेली मॅच खेचून आणली. थरारक सामना. असाच परफॉर्मन्स आपली टीम कायम राखेल आणि विश्व्चषक पुन्हा मिळेल अशी आशा करूया.
  • Log in or register to post comments

खरोखर एक्सायटिंग !

सस्नेह
Sat, 02/22/2020 - 11:39 नवीन
शेवटच्या ५ ओव्हर्स तर जबरी प्रेक्षणीय !!
  • Log in or register to post comments

भारतीय संघास

हेमंतकुमार
Sat, 02/22/2020 - 11:56 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

झकास झाली ऑस्ट्रेलियन

नूतन सावंत
Sat, 02/22/2020 - 17:49 नवीन
झकास झाली ऑस्ट्रेलियन संघाबरोनरची मॅच!
  • Log in or register to post comments

भारत विरुद्ध बांगलादेश

मुक्त विहारि
Mon, 02/24/2020 - 16:00 नवीन
आज दुपारी 04:30 वाजता
  • Log in or register to post comments

आजची मॅच. .

मुक्त विहारि
गुरुवार, 02/27/2020 - 08:25 नवीन
भारत विरुद्ध न्यूझीलंड
  • Log in or register to post comments

जबरदस्त मॅच. ...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/27/2020 - 13:13 नवीन
गोलंदाजांनी परत एकदा मॅच जिंकून दिली. शेफाली वर्मा (नेहमी प्रमाणे) अप्रतिम खेळली. भारतीय संघ, जरी सेमी फायनल पर्यंत पोहोचला तरी, चांगल्या सुरूवाती नंतर मधली फळी ढेपाळत आहे. सलग 3 मॅचेस मध्ये हीच बोंब आहे. सेमी फायनल मध्ये आपला सामना एक तर इंग्लंड बरोबर तरी होईल किंवा साउथ आफ्रिके बरोबर तरी होईल. आणि हे दोन्ही संघ एकदम व्यावसायिक आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांना आता जबाबदारी ओळखूनच खेळणे भाग आहे. एकटी शेफाली किंवा पूनम किती वेळा उपयोगी पडणार? हरमनप्रीत कौरचे फलंदाजीतले अपयश संघाला खड्ड्यात घालू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आज सेमी फायनलच्या मॅचेस आहेत.

मुक्त विहारि
गुरुवार, 03/05/2020 - 09:17 नवीन
पहिली सेमी फायनल. .. इंग्लंड विरुद्ध भारत आणि दुसरी सेमी फायनल. .. ऑसीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • Log in or register to post comments

फायनल

नि३सोलपुरकर
गुरुवार, 03/05/2020 - 12:01 नवीन
भारतीय संघ फायनल साठी पात्र ठरला . ( सेमी फायनल न होता ) पावसामुळे सामना रद्द झाला आणी गुण तालीकेत भारतीय संघ अव्वल स्थानी होता . इनिवे , भारतीय संघास खुप खुप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

आज फायनल. ..

मुक्त विहारि
Sun, 03/08/2020 - 08:01 नवीन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी साडेबारा वाजता.
  • Log in or register to post comments

दारूण पराभव. ...

मुक्त विहारि
Sun, 03/08/2020 - 16:05 नवीन
ऑसीजने पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले. सांघिक कामगिरी म्हणजे नक्की काय असतं? हे समजले तरी खूप झाले.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा