मी इंग्लिश पर्याय निवडतो ... कारण दिसणारे ऑप्शन्स इंग्रजीत पटकन उमगतात , आणि एटीएम ही टंगळमंगळ करण्याची जागा वाटली नाही... आणि नको तिथं उगाच मराठीचा अभिमान दाखवावा (नक्की कोणाला दाखवतो ?) असे वाटत नाही ...
बाकी मराठीचा अभिमान असावा आम्हालाही आहे .. पण मराठी आली पाहिजे म्हणून बाकी भाषांना शिव्या देणार्यांनी इंग्रजी शिवाय काम चालवून दाखवावे ... आपल्या मिसळपावचा कोडही मराठीत नाही... मराठीचा नको तिथे अभिमान असणारांनी राडे घालणारांनी एकदा सर्व गोष्टी मराठीत उपलब्ध करून द्याव्यात.
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
आयसीआयसीआय बॅंकेत नक्कीच निवडतो.
एचडीएफसी बॅंकेच्या आय**ना अजून मराठी भाषा माहित नसावी.
ब्रँचमध्ये गेल्यावर मराठीतच बोलतो. एका अतीशहाण्याने हिंदीत बोलायला सांगितले तेव्हा राडा करून आलो.
जय महाराष्ट्र
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
एचडीएफसी बॅंकेच्या आय**ना अजून मराठी भाषा माहित नसावी.
पुण्याच्या एचडीएफसीमध्ये आम्हीही जाळ काढून आलो. साल्यांना मराठी 'सॉफ्टवेअर' 'इंप्लिमेंट' करणे अजुन 'पॉसिबल' झाले नाहीय्ये! मग हिंदी कसं झालं? ह्या प्रश्नावर मात्र तोंडात मिठाची गुळणी!
एका अतीशहाण्याने हिंदीत बोलायला सांगितले तेव्हा राडा करून आलो.
मलाही हा अनुभव आला, मग राडा वगैरे नाही, पण शांतपणे त्याच्या नजरेत नजर मिसळुन खांद्यावर हात ठेऊन 'तू कोणाशी बोलतो आहेस ह्याची कल्पना आहे का? हे बिहार यु.पी. नाहीय्ये!' इतकंच बोललो. तो समजायचं ते नीट समजला, आणि "सॉरी सर! आय विल सेंड समवन मराठी टू हेल्प यू" असं इंग्रजीत केकाटत गप निघाला...मी त्याला एकच विचारलं, "व्हेन कॅन आय एक्सपेक्ट यू टू हेल्प मी इन मराठी? यू आर वर्किंग इन महाराष्ट्र,& लेट मी टेल यू, इट्स रिजनल & ऑफिशिअल लँग्वेज इज मराठी, नॉट हिंदी ऑर इंग्लिश! नेक्स्ट टाईम यु बेटर बी प्रिपेअर्ड! आय वोन्ट मॅनेज विथ इंग्लिश एनिमोअर!" साला, म्यानिजर धोतरात उंदीर शिरल्यागत धावत आला आणि परिस्थिती हाताळली. म्हणे, " काय करणार सर, ते ज्यांना इथे पाठवतात, त्यांच्याशी जमवून घ्यावं लागतं. आता तुमच्यासारख्या आणखी ५०-१०० जणांनी असं वागायचं ठरवलं तर नक्कीच त्यांना मराठीत बोलावं लागेल ना? पंण आपलीच लोक जमवुन घेतात म्हणल्यावर कोण कशाला शिकेल?
मी गप परत फिरलो. म्हणलं, आपलाच दाम खोटा तिथे काय करणार आपण?
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)गुरुवार, 13/11/2008
>>>मातृभाषा !
म्हणजे आई कडून मिळालेली भाषा हेच असेल तर !
माझी मातृभाषा कन्नड आहे !
पण माझे वडील महाराष्ट्रातील व त्यांची बोली भाषा मराठी / कर्मभुमी महाराष्ट्र !
त्यामुळे माझी भाषा देखील मराठीच !
*****
राहीला मताचा प्रश्न ! मत दिले आहे !
मातृभाषा मराठी नसूनही, एटीएम वर मराठी भाषेचाच पर्याय निवडतो/निवडते.
येथे दिल्ली मध्ये काही बँकाच्या एटीएम मध्ये मला मराठी हा पर्याय भेटतो (तेव्हा होणारा आनंद मी येथे शब्दात नाही मांडू शकत ;) )
सरकारी बँका जवळ जवळ ८ एक भाषा पर्याय म्हणून देतात असा अनुभव आहे !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
माफ करा पण या असल्या कौलांनी काहीही साध्य होणार नाही. मला नाही वाटत कुणीही स्पष्टपणे मी मराठी न वापरता इंग्रजी वापरतो असे सांगेल. तथाकथित बिनबुडाच्या भाकड चर्चांमधे तसेच साहित्यसंमेलनामधे मराठीसाठी काहीतरी केले पाहीजे असे गळे काढायचे अन स्वतःच्या पाल्याला किंवा मुलाला इंग्रजी शाळेत घालायचे कारण काय तर म्हणे त्याचे करियर मधे नुकसान होवु नये. अहो कसले करियर अन कसले काय? ही मंदी बघा कसले कसले लोक असले तसले करुन सोडेल. तेव्हा नेहमीप्रमाणे आजही मी परत सांगतो तुम्ही करियर वगैरे फंदात पडुन आपल्या मुलांचे नुकसान करु नका. त्याला मातृभाषेतुनच शिक्षण द्या. अर्थव्यवस्थेचे बारा वाजलेलेच आहेत तुमच्या पोराच्या आयुष्याचे वाजवु नका. अजुनही वेळ गेलेली नाही. अमेरीका व इंग्लंड मधल्या नोक-यांच्या अपेक्षेने इंग्रजीत पोराला शिकवाल तर हैव ही जाईल अन दैव ही जाईल.
तर हा असलाच भाकडपणा या कौलात स्पष्ट दिसतो. अहो हे मराठी संकेत स्थळ आहे याची स्पष्ट कल्पना असतांना जो सदस्य स्वतःचे नाव पण देवनागरीत लिहु शकत नाही त्याला आम्ही मराठीसाठी काय करतो अन काय नाही हे विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही असे आमचे स्पष्ट प्रामाणिक मत आहे. याबद्दल कुणाला राग आला तरी पर्वा नाही. असो.
नाना
>>>>अहो हे मराठी संकेत स्थळ आहे याची स्पष्ट कल्पना असतांना जो सदस्य स्वतःचे नाव पण देवनागरीत लिहु शकत नाही त्याला आम्ही मराठीसाठी काय करतो अन काय नाही हे विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही असे आमचे स्पष्ट प्रामाणिक मत आहे.
अहो महाशय, इथे सदस्य होताना "मराठीतील" "लिम्बुटिम्बू" आधीच कुणीतरी घेतलेले असल्याने मला "विन्ग्रजीतून" limbutimbu असे नाव घेणे भाग पडले! आपल्याला प्रामाणिकपणे खरे कारण "समजून" येईल अशी आशा करतो!
आपल्या बाकी मजकुरावर "वादविवाद्/चर्चा" इत्यादी करीता "आपणच स्वतः" स्वतन्त्र पान उघडले पाहीजे असे वाटत नाही का?
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
मला नाही वाटत कुणीही स्पष्टपणे मी मराठी न वापरता इंग्रजी वापरतो असे सांगेल.
का नाही सांगणार? माझी मातृभाषा मराठी आहे, पण बँकेचे (या शब्दापासूनच सुरुवात करा) बहुतांश व्यवहार इंग्लिशमधूनच होतात तर ए.टी.एम.चा वापर का नाही? सोयीचं ते चांगलं. ए.टी.एमचं कोणी सुंदर आणि प्रामाणिक भाषांतर करा आधी मग आपण शुद्ध मराठीततरी हा कौल घेऊ शकतो.
अर्थात मला या कौलाचं प्रयोजन कळलं नाही महत्त्वाचं पचलं नाही म्हणून मी शेवटच्या पर्यायाला मत दिलं.
पण म्हणून उद्या झोपेतून कोणी तोंडावर पाणी ओतून उठवलं तर वैतागून मी फकार नाही सुरु करणार.
बाकी नाना तुमचे सगळे मुद्दे एकदम मान्य. असल्या कौलांनी काही होणार नाही. ए.टी.एम.वर मराठी वापरणारे लोकं, हे कौल घेणारे लोकं, जेव्हा खरोखर काम करायची वेळ येते तेव्हा करतील याबद्दल मला फार शंका आहे.
गेल्या १,५ वर्षापासुन महाराष्ट्राच्या बाहेर रहात असल्याने मी "पर्याय क्र. ७ " ला मत दिलेले आहे.
तसेही त्या आधी महाराष्ट्रात रहात असताना कधी कधी सहज सवईने "मराठी" वापरले आहे पण त्यामागे "जाज्वल्य अभिमान" वगैरे भानगड नव्हती.
शिवाय असल्या प्रकाराने जास्त काही फरक पडेल हे अपेक्षीत नाही व ह्या गॄहीतकावर विश्वास नाही ...
पुढे मागे महाराष्ट्रात गेल्यावर "मराठीच" वापरेन असेही नाही, ही बाब फार महत्वाची नाही ....
पण स्थानीक लोकांसाठी स्थानीक भाषा "ए टी एम" मशीन्सवर उपलब्ध असल्यास आम्हाला त्याचे कौतुक आहे.
एखादा जास्त इंग्रजी न जाणणारा माणुस जेव्हा त्या मशिन्सचा वापर "मराठी भाषा" वापरुन करतो तेव्हा आम्हाला कौतुक व समाधान वाटते.
बाकी सोय, सहजता महत्वाची , तो जाज्वल्य अभिमान वगैरे गोष्टी ह्याइथे माझ्या मते जास्त महत्वाच्या नाहीत ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
या पोल मुले थोदिशी मराठीपणा दाखवण्यासाठी एक नवि जागा मिळाली.... सो... विल डु इट
आयरनी, आयरनी (कृपया उच्चार आपल्यला हवा तसा, इथल्या-तिथल्या स्थानिकांचा संदर्भ न देता सुधारून घ्यावा) म्हणतात ती हिच कारे टार्या? ;) मराठीचे माहित नाही पण मला एका विंग्रजी शब्दाचा अर्थ (की मतितार्थ) अगदी उदाहरणासहित स्पष्ट झाला!!! =))
मी गेली बरेच वर्षे महाराष्ट्राबाहेर रहात असल्याने मराठी वापरण्याचा प्रश्न आला नाही. मधे कधितरी गावी गेल्यावर मराठी भाषेचा पर्याय आहे असे पाहीले होते. परंतु ईंग्रजी जरा जास्त सोयिची वाटल्याने बहुदा तेच वापरेल. मला वाटते एटीएम मधे मराठी वापरुन मराठी बाणा वगेरे काही दिसणार नाही. कुठल्याही भाषा वापरायची सवय झाली की फारसा फरक पडत नाही.
बँकेचे कामकाज ईंग्रजीत होत असले तरी तिथे मराठी बोलनं, दैनंदिन जीवनात मराठी वापरणे किंवा मुलांना मराठी शाळेत शिकवनं हे मला जास्त महत्वाचे वाटते. मराठी बाणा तिथे दिसतो.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
मतदानात सहभागी आणि प्रतिक्रिया देणार्या सर्वान्ना धन्यवाद! :)
कदाचित अजुनही मतदान होत राहील, प्रतिसादही येत रहातील!
वरील प्रतिक्रिया वाचताना एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला, तो म्हणजे, एटीएम वर मराठि वापरलेच नाही तर काय बिघडले अशा काहीशा अर्थाचा हे
मराठी पर्याय कितीसे जण, किन्वा किती थोडेसे, किन्वा कोणीच निवडत नाही, असा सान्ख्यिकी पुरावा उपलब्ध झाल्यास, असलेली "मराठीची" सुविधा काढली जाणे कितपत शक्य हे? असे होणारच नाही का? त्यामुळे काही बिघडेल वा नाही बिघडणार? याकडेही मी लक्ष वेधू इच्छीतो
प्रत्येकाने केवळ स्वतःपुरता विचार केल्यास, एक प्रकारचे उत्तर येवु शकते, व सामुहीक नजरेने पाहिल्यास कदाचित दुसरे प्रकारचे उत्तर येवु शकतो, म्हणजे असे बघा की, हल्ली तात्पुरते कामगारान्ना देखिल पगार वाटप अशा बॅन्कातुन केले जाते जेथे त्यान्ना एटीएम वापरण्याची गरज पडते, असे हे सर्वच कामगार "इन्ग्रजी सुशिक्षित" नस्तात, जेव्हा ते पैसे काढायला जातात तेव्हा त्यान्ना किती किती अडचणीन्ना तोन्ड द्यावे लागते ते अनेकवार मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने अनुभवले आहे. मात्र अशा उदाहरणात देखिल, आम्ही काही कमी शिकलेलो नाहीत, आम्हालाही "विन्ग्रजी" येते हे सिद्ध करण्याच्या अट्टाहासापाई, किन्वा इन्ग्रजी न येणे "कमीपणाचे" वाटून बहुतान्श लोक मराठीचा पर्याय असुनही न स्विकारताना बघितलेत. इन्ग्रजी बद्दलची ही "न्युनगन्डाची" भावना मराठीच नव्हे तर हिन्दी भाषीकातही अनुभवली हे!
नऊवारी वा पाचवारी साडी नेसणारी आई म्हातारी होते, अन तरण्याताठ्या पोरापोरीन्ना तिच्याबरोबर बाहेर जायला "लाज", सॉरी..... शुद्ध भाषेत सान्गायच तर "ऑकवर्ड फील" होते, अशी अनेक उदाहरणे जागोजागी नीट बघितली तर दिसतात! सख्ख्या जन्मदात्या आईची ही दशा मानवी "स्वकेन्द्रीत अहम्भावी स्वभावातून" होऊ शकते तर आई कडून देणगी म्हणून मिळालेल्या एका "भाषेची" काय गत होत असेल?
वरील पोलचा उद्देश काही जणान्ना कळाला नाही! आणि ते साहजिकच हे! तसा तो काहीन्ना कळणार नाही हा अन्दाज असल्यानेच तो पर्यायही ठेवला होता.
वरील पोल घेण्यामागिल सर्वप्रथम उद्देश हाच होता की बघावे तरी की किती जण आपल्या मातृभाषेबद्दल सजग आहेत!
किती जण (अगदी सहज) शक्य तिथे देखिल तिचाच वापर करतात/वा करत नाहीत. किती जणान्ना (निदान सामाजिक जबाबदारी म्हणून तरी) असा वापर करायचा असतो असे वाटते वा नाही वाटत.
तसेच या निमित्ताने, व्यक्तिव्यक्ती मधिल विचारातील अनेकविध प्रकार सर्वान्नाच अनुभवास येतिल व त्यानिमित्ताने वाचकाच्या मेन्दून काही एक विचारप्रक्रिया ज्याच्यात्याचा वकुबाप्रमाणे होईल अशा अपेक्षेने हा कौल ठेवला!
यावर विचारच करायचा नसेल, तर मग चौविसतास चॅनेलवर क्रिकेट्/फॅशन शो इत्यादिक अनेक निरुपद्रवी/निरुद्देशीय, खास करुन डोक्याला त्रास न देणार्या अन (दारूच्या तत्कालिक धुन्दीप्रमाणे) मनाला सहजासहजी सुखावणार्या गोष्टी उपलब्ध आहेतच, नाही का?
यामुळेच, या कौलाकरता थोडा वेळ काढून मतदान व प्रतिक्रिया व वाचन केलेल्या सर्वान्ना मी धन्यवाद देतो आहे. :)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
मराठी पर्याय कितीसे जण, किन्वा किती थोडेसे, किन्वा कोणीच निवडत नाही, असा सान्ख्यिकी पुरावा उपलब्ध झाल्यास, असलेली "मराठीची" सुविधा काढली जाणे कितपत शक्य हे?
हे शक्य आहे. त्या यंत्रावर 'मराठी' पर्याय कितिवेळा वापरला ह्याची नोंद ठेवणे सहज शक्य आहे . त्याना जर कमी वापर आढळून आला तर ते त्या यंत्राचा निर्मिती खर्च कमी करण्या साठी मराठीचा पर्याय काढुन टाकतील. कोणी तक्रार केली तर , ते तो सांखीकी पुरावा आपल्या तोंडावर फेकतील आणि आपल्याला 'मराठी पाट्या' सारखे लढावे लागेल. गोष्टी त्या थराला गेल्यावर सावरणे अवघड होईल. ज्या गोष्टी करणे आपल्याला सहज शक्य आहेत त्या का करु नये.
आपल्यतील उदासीनता आपल्याला घातक ठरेल.
१००% सहमत. आज आपण शक्य असेल तिथे मराठीला प्राधान्य दिले तरंच मराठी टिकेल. पहील्या पर्यायाला मत दिले आहे, पन ज्या ए टि एम वर मराठीचा पर्याय नाही तेथे मात्र इंग्रजी हा पर्याय निवडतो.
............अभिजीत मोटे.
मी शिव्या मराठीत देतो.
एटिएम वर पैशे निघाले नाहित तर ज्या बँकेचे एटिएम असेल तिला.....
अन
हे असले वांझोटे पोल जो कोणी काढतो त्याला देखील.
(स्पष्ट) अभिज्ञ.
मातृभाषा मराठी असून, एटीएम वर मराठी भाषेचाच पर्याय निवडते.
पन ज्या ए टि एम वर मराठीचा पर्याय नाही तेथे मात्र इंग्रजी हा पर्याय निवडते.कारन पर्याय नसतो खुप रागहि येतो पन काय करनार. (|: काहि एटीएम वर मराठीचा पर्याय नसतो.
माफ करा पण मी अजुनही कोवेपै (एटीएम.) ही सुविधा नाही वापरलेली.
कारण ही सुविधा वापरण्यासाठी जितके पैसे खात्यात लागतात तितके
नाही आहेत. असो.
पण एटीएम ला बरा पर्याय सुचविला ना?
तुम्ही सुचवलेला प्रतिशब्द कोवेपै आताच उच्चारण गॉजवर तपासून पाहिला. त्याचे गुणांकन मूळ शब्द एटीएमपेक्षा खूपच जास्त येते. सबब, हा प्रतिशब्द रूळणार नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
"स्वयंचलित रोखपाल यंत्र" असं भाषांतर करता येऊ शकेल काय? आणि त्याची आद्याक्षरं घेऊन 'स्व.रो.यं.' ???
रोखपाल = कॅशीयर्/टेलर
(सौजन्य: ब्यांक ऑफ म्हाराष्ट्र, शनिवार पेठ, पुणे-३०)
>>"स्वयंचलित रोखपाल यंत्र" असं भाषांतर करता येऊ शकेल काय? आणि त्याची आद्याक्षरं घेऊन 'स्व.रो.यं.' ???
+१, चालु शकेल ...
चला, ह्या चर्चेच्या निमीत्ताने एखादा चांगला प्रतिशब्द मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे ...
चालु द्यात ...
नेहमीप्रमाणे (अवांतर) : हा "बसतयं" शब्द व्याकरणात बरोबर "बसतो" आहे की नाही ते तपासावे. आजकाल आम्ही "पाहुयात, करुयात, बसतयं, चालतयं" अशा शब्दांच्या बाबतीत फार "संवेदनाशील" झालो आहोत ... ;)
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
"स्वयंचलित रोखपाल यंत्र" च्या ऐवजी "स्वयंचलित रोखपाल मशीन" केलं तर स्वरोम आसा छानसा शब्द होतो जो रुळु शकेल
आणि "मशीन" हा बर्यापैकी मराठीकरण पुर्ण झालेला शब्द आहे. त्याला प्रत्यय लावता येतात जसे मशीनवर/मशीनीवर.. तेव्हा "स्वरोम" रुळवता येईलसे वाटते
-(स्वरोऽम आवडणारा) ऋषिकेश
अतिरेकी भाषाशुद्धीच्या बाजुने मी नाही तरीही, स्वभाषेत भाषान्तर किन्वा नेमका शब्द तयार करणे यासही हरकत नाही
काही पर्याय एटीएम साठी पुढीलप्रमाणे
१. केव्हाही पैसे = केपै
आता सुट्टे पैसे कुठे मिळतात हो एटीएम वर? एकच एक पन्नास पैशाच नाण तर चलनात शिल्लक हे, तेही बाद होईल लौकरच! मग उरतील ती रुपयाची नाणी, तेव्हा "पैसे" हा शब्दच नको ना वापरायला? :D
तर मग
२. केव्हाही रुपये = केरू
वा वा वा केरू, छानच की, हव तर चला "केरूनानाकडे" जावुन रक्कम आणू असेही म्हणल्यास कसे?????
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
प्रतिक्रिया
पहीला
केवळ इंग्रजी
In reply to पहीला by मराठी_माणूस
सहमत..
In reply to केवळ इंग्रजी by टारझन
मराठीच..
In reply to सहमत.. by स्वप्निल..
नक्कीच
शाब्बास पंत!
In reply to नक्कीच by धोंडोपंत
>>>मातृभाषा
पहिला पर्याय
जय महाराष्ट्र
माफ करा पण
कदाचीत
In reply to माफ करा पण by अवलिया
आधी प्रामाणिकपणे कारण विचारा हो! :)
In reply to माफ करा पण by अवलिया
मग तुझं
In reply to आधी प्रामाणिकपणे कारण विचारा हो! :) by limbutimbu
मला नाही
In reply to माफ करा पण by अवलिया
तस मराठी
In reply to मला नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला तर
काय म्हन्ता?
In reply to मला तर by गणा मास्तर
नाना
In reply to काय म्हन्ता? by सुनील
पण
In reply to नाना by अवलिया
नाय छापखान
In reply to पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
सावकारी
In reply to पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
एच. डी. एफ. सी.
टाळ्या
In reply to एच. डी. एफ. सी. by ज्ञ
मी
पर्याय क्र. ७ ला मत ....
त्याचे काय आहे कि...
पुन्हा टाळ्या
In reply to त्याचे काय आहे कि... by veebee009
या पोल
In reply to पुन्हा टाळ्या by टारझन
शेवटुन दुसर्या पर्यायाला मत दिले आहे . .
धन्यवाद
मराठी
सहमत
पर्याय क्रमांक ७
इंग्रजी
शिव्या
इथले माझे
मी पुर्वी
मी पुर्वी
सुविधा
कोणत्याही वेळी पैसे
नाही
In reply to कोणत्याही वेळी पैसे by सुनील मोहन
कोवेपै
In reply to कोणत्याही वेळी पैसे by सुनील मोहन
शिवणयंत्र?
In reply to कोवेपै by अभिज्ञ
बँकेत टेलर
In reply to शिवणयंत्र? by सुनील
बसत नसेलच कशावरून ?
In reply to बँकेत टेलर by अभिज्ञ
एनि टाईम मनी नव्हे!
In reply to कोणत्याही वेळी पैसे by सुनील मोहन
मला वाटतय..
नाही हो.
अजिबात नाही
In reply to नाही हो. by सुनील मोहन
हे बसतंय का बघा तुमच्या मीटरमध्ये ;-)
In reply to नाही हो. by सुनील मोहन
बसतयं की ...
In reply to हे बसतंय का बघा तुमच्या मीटरमध्ये ;-) by धमाल मुलगा
स्वरोऽम
In reply to हे बसतंय का बघा तुमच्या मीटरमध्ये ;-) by धमाल मुलगा
काही पर्याय
In reply to स्वरोऽम by ऋषिकेश
"स्वयंचलित रोखपाल यंत्र"
In reply to स्वरोऽम by ऋषिकेश