✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सहल

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Mon, 12/09/2019 - 14:50  ·  लेख
लेख
गुरुजी २०-२५ मुलाना घेऊन वन सहलिला निघाले असतात.. . वाटेत अचानक विजा कडकडु लागतात..सोसाट्याचा वारा सुटतो.पाऊस सुरु होतो .व मुले घाबरतात.८-९ वर्षाची असतात गुरुजीना बाजुलाच एक गुहा दिसते व ते मुलाना म्हणतात "मुलानो चला त्या गुहेत आपण पाऊस संपेपर्यंत निवारा घेऊ. मुले व गुरुजी दाटिवाटीने गुहेत आंग चोरुन उभे असतात..पण एक घटना घडते.. एक विजेचा लोळ गुहेच्या तोंडाजवळ येऊन आदळत असतो..मुले घाबरतात.. हा प्रकार सारखा चालु असतो.. गुरुजी विचार करतात अन मुलाना म्हणतात..मुलानो..आपल्यामधे असा एकजण आहे ज्याला मारण्या साठी विज सारखी गुहेच्या मुखाजवळ आदळत आहे....आपण असे करु समोर झाड आहे...आपल्या पैकि एक एक जण घावत जाऊन झाडाला शिवुन गुहेत परत येईल ..ज्यावर विज कोसळणार त्यावर मधेच कोसळेल..व त्या मुळे बाकिचे तरी सुरक्षित रहातिल. असे म्हणत.गुरुजी पळत पळत जातात झाडाला शिवतात व गुहेत येतात..विज त्यांच्यावर पडत नाहि.. असे करत सर्व मुले झाडाला शिवुन गुहेत येतात,, शेवटचा मुलगा राहिला असतो... सारे जण विचार करतात हाच तो असावा..मुलगा घाबरलेला असतो..पण तो धिराने पळत पळत झाडाला शिवतो...अन विज गुहेत घुसते अन मास्तर व सर्व मुलावर कोसळते. मुलगा मात्र ते द्रुष्य आश्चर्य चकित होऊन बघत असतो...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
4104 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

विज गुहेत घुसते अन मास्तर व

जॉनविक्क
Tue, 12/10/2019 - 19:23 नवीन
विज गुहेत घुसते अन मास्तर व सर्व मुलावर कोसळते.
कहर कलाटणी
  • Log in or register to post comments

सुशिंच्या एक लहानपणी वाचलेली

mrcoolguynice
Tue, 12/10/2019 - 21:46 नवीन
सुशिंच्या एक लहानपणी वाचलेली कथा आठवली. असो, चांदोबा चंपक ठक ठक बोरोबरच आता सुहास शिरवळकर साहित्याचा आनंद मिळतोय ... कदाचित थोड्याच दिवसात लिओ टॉल्स्टॉय, हेमिंगवे, शॉ प्रभूतींच्या साहित्याची वाट पाहणे आले..
  • Log in or register to post comments

काही दुष्ट दुष्ट मिपाकर,

mrcoolguynice
Wed, 12/11/2019 - 10:03 नवीन
काही दुष्ट दुष्ट मिपाकर, अकुंच्या प्रतिभेचे पंख हेटाळणी करून छाटण्याच्या प्रयत्नात असतात. आणि त्यांना हा महाराष्ट्र कधी माफ करणार नाही.
  • Log in or register to post comments

ऍकच्युअली लोकांचे धाग्यावरील

जॉनविक्क
Wed, 12/11/2019 - 17:12 नवीन
ऍकच्युअली लोकांचे धाग्यावरील प्रतिसाद वाचणं आकुंच्या जीवावर येतं, म्हणजे त्यांना ते आवडतच नाही, तो त्यांच्या मनस्वी आनंदाचा भाग म्हणून बरे का आणी दुसरे काहीही कारण नाही, पण त्यामुळे अकुंच्या प्रतिभेचे पंख हेटाळणी करून छाटण्याचे प्रयत्न वगैरे परस्पर फोल ठरतात :) महाराष्ट्रापर्यंत गोष्टी लांबतच नाहीत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice

छान आहे कथा. ..

मुक्त विहारि
Wed, 12/18/2019 - 20:13 नवीन
आवडली. .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा