सहल
गुरुजी २०-२५ मुलाना घेऊन वन सहलिला निघाले असतात..
.
वाटेत अचानक विजा कडकडु लागतात..सोसाट्याचा वारा सुटतो.पाऊस सुरु होतो .व मुले घाबरतात.८-९ वर्षाची असतात
गुरुजीना बाजुलाच एक गुहा दिसते व ते मुलाना म्हणतात "मुलानो चला त्या गुहेत आपण पाऊस संपेपर्यंत निवारा घेऊ.
मुले व गुरुजी दाटिवाटीने गुहेत आंग चोरुन उभे असतात..पण एक घटना घडते..
एक विजेचा लोळ गुहेच्या तोंडाजवळ येऊन आदळत असतो..मुले घाबरतात..
हा प्रकार सारखा चालु असतो..
गुरुजी विचार करतात अन मुलाना म्हणतात..मुलानो..आपल्यामधे असा एकजण आहे ज्याला मारण्या साठी विज सारखी गुहेच्या मुखाजवळ आदळत आहे....आपण असे करु समोर झाड आहे...आपल्या पैकि एक एक जण घावत जाऊन झाडाला शिवुन गुहेत परत येईल ..ज्यावर विज कोसळणार त्यावर मधेच कोसळेल..व त्या मुळे बाकिचे तरी सुरक्षित रहातिल.
असे म्हणत.गुरुजी पळत पळत जातात झाडाला शिवतात व गुहेत येतात..विज त्यांच्यावर पडत नाहि..
असे करत सर्व मुले झाडाला शिवुन गुहेत येतात,,
शेवटचा मुलगा राहिला असतो...
सारे जण विचार करतात हाच तो असावा..मुलगा घाबरलेला असतो..पण तो धिराने पळत पळत झाडाला शिवतो...अन विज गुहेत घुसते अन मास्तर व सर्व मुलावर कोसळते.
मुलगा मात्र ते द्रुष्य आश्चर्य चकित होऊन बघत असतो...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विज गुहेत घुसते अन मास्तर व
सुशिंच्या एक लहानपणी वाचलेली
काही दुष्ट दुष्ट मिपाकर,
ऍकच्युअली लोकांचे धाग्यावरील
छान आहे कथा. ..