दूष्काळ झळा...

Primary tabs

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
2 Dec 2019 - 3:03 pm

चोचभर दाण्यासाठी
वेशी बाहेर पाखरं
टीचभर पोटासाठी
घर उंबर्‍याशी वैर ||

पाणी आटलं डोळ्यात
शेत जळलं रानात
पोर धाडलं शरात
गाव दुष्काळ पिडित ||

कधीची दारातली तुळस .. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली...
पांढर्‍या रानागत गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, जेंव्हा होता आवळला फास...

नाही गोठ्यामधी माय
ना टोपल्यात भाकर
गुलछडी उभी पेटली
काऴळ ठिक्कुर घर ||

शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली, अन्नाचा कुठ हाय तपास...
शासनाची पांढरी बुजगावनी.. फिरतात कधी शेतात, धा रुपडं हातात टेकवून टिव्हीत मिरवतात..

कणसात नाय दाणं
रीती कापसाची बोंड
जगण्याच्या अट्टासाची
गळी अडकली धोंड
गळी अडकली धोंड ||

त्याच मरण कोणत्या फांदिवर लटकलय , माहीत नाय.. पण एव्हड कळुन चुकलय..
मोठ्ठा मोठ्ठा असा कोण नसतो .. दुष्काळाच्या ह्या वनव्यात फक्त शेतकरी पेटतो.. फक्त शेतकरी पेटतो...

--- शब्दमेघ (गणेशा) _'रानातली वाट.. एक न संपणारा परिघ' ..पुन:प्रकाशित

माझी कविताजीवनमान

प्रतिक्रिया

चांगली रचना. सल बोचरी आहे.

पाषाणभेद's picture

4 Dec 2019 - 4:20 am | पाषाणभेद

कविता काळजापर्यंत पोहोचली.