काउन्टिंग (Counting)- शशक.

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
15 Oct 2019 - 2:22 pm

शंभर, नव्व्याण्णव, अठ्ठ्याण्णव
आई म्हणायची राग आला की उलटे आकडे मोजायचे.
एकुणनव्वद, अठ्ठ्याऐशी..सत्त्याऐशी
मग राग पळून जातो म्हणे...
एक्क्याऐशी, ऐंशी ....
ऐंशीच्या आधी काय?? नेहमीच चुकतं माझं इथे. अंअं आठवलं,
सत्तर, एकोणसत्तर..
पण मग बाबा का नाही म्हणत उलटे अंक कधी ?
बाबांना मात्र आई कध्धीच काही सांगत नाही की रागवत नाही. सगळी शिकवणी काय ती मलाच.
चव्वेचाळीस, त्रेचाळीस...
तरी बाबा रागावतात तिला. मारतात सुद्धा.
हे काय आत्ता पण किती मारलं. किती हलवलं तरी उठतच नाहीये ती.
चोवीस, तेवीस...
मग? मला राग नाही येणार बाबांचा?
तीन, दोन, एक शुन्य...
गेला राग एकदाचा!

मी शांतपणे बाबांच्या पोटातून ,रक्तानं भिजलेली सुरी बाहेर खेचली.

कथा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

15 Oct 2019 - 2:32 pm | ज्योति अळवणी

बापरे

अफाट

चौथा कोनाडा's picture

15 Oct 2019 - 3:34 pm | चौथा कोनाडा

बाप रे ......... खतरनाक कथा आहे ही.
शेवट वाच्ताना अन्गावर सर्रकन काटा आला !

जॉनविक्क's picture

15 Oct 2019 - 4:04 pm | जॉनविक्क

विशेष वाटली नाही.

मृणालिनी's picture

15 Oct 2019 - 4:48 pm | मृणालिनी

जबरदस्त!

प्रचेतस's picture

15 Oct 2019 - 7:23 pm | प्रचेतस

भयंकर

यशोधरा's picture

15 Oct 2019 - 8:22 pm | यशोधरा

धक्का तंत्र जमलंय..

बोलघेवडा's picture

15 Oct 2019 - 10:43 pm | बोलघेवडा

जबरदस्त!!!

पद्मावति's picture

15 Oct 2019 - 10:47 pm | पद्मावति

बापरे! खतरनाक जमलीय.

जव्हेरगंज's picture

15 Oct 2019 - 11:15 pm | जव्हेरगंज

भारी होती!
फक्त शेवटचं वाक्य अतार्किक वाटलं. काहीतरी वेगळं सॉफ्ट हवं होतं तिथं.

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2019 - 8:57 am | प्राची अश्विनी
प्राची अश्विनी's picture

16 Oct 2019 - 8:58 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सर्वांनाच.

तुषार काळभोर's picture

16 Oct 2019 - 11:38 am | तुषार काळभोर

शशकचा जो महत्वाचा निकष आहे (१००-शब्दसंख्येपेक्षा जास्त महत्वाचा) - शेवटच्या वाक्यात धक्का देणं - तो खूप छान जमवलाय.

पाटीलभाऊ's picture

16 Oct 2019 - 12:14 pm | पाटीलभाऊ

खतरनाक जमलीय.

मराठी_माणूस's picture

16 Oct 2019 - 12:45 pm | मराठी_माणूस

उलट मोजणीचा तर काहीच उपयोग झालेला दिसत नाही, रागाच्या भरात चाकुचा वार तर केला गेला.

आई बाबांना ठेवण्यापेक्षा जर एखाद्या माजुरड्या शिक्षक किंवा शिक्षिकेला ठेवलं असतं , तर कथेने इतका खोलवर परिणाम केलाच नसता .. बहुतांश पालक , आजकाल आपल्या पाल्याची जरा जास्तच काळजी घेताना दिसतात , त्यामुळे जर कथानकात त्यांचाच अंत होणार असेल तर कुणालाही/ वाचकाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे . पण जर इथे शिक्षण क्षेत्रातला चाललेला प्रचंड भ्रष्टचार यावर जर भाष्य झाले असते तर वाहवाच मिळाली असती सर्वबाजूने .. माफ करा , मी स्पष्ट मत नोंदवत आहे .. पण एकंदरीत शशक सुंदर झाली आहे ..

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Oct 2019 - 5:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

शेवटचा व्टिस्ट थोडा अपेक्षीत होता पण गोष्टीचा एकंदर परीणाम भारी आला.

रच्याकने:- मी शशक स्पर्धेच्या वेळी एक कथा लिहिली होती. विषय साधारण हाच होता (विवाहीत स्त्री वर होणारे अत्याचार)
पण कथा वाचल्यावर ती स्पर्धेला किंवा इथे टाकावी की नाही असा प्रश्ण पडल्याने दुसरी कथा लिहिली.

पैजारबुवा,

नाखु's picture

17 Oct 2019 - 7:20 am | नाखु

योग्य समेवर दिला आहे.
आवडली आहे

धक्का ते मालधक्का प्रवासी नाखु पांढरपेशा

समीरसूर's picture

17 Oct 2019 - 2:14 pm | समीरसूर

उत्कृष्ट कथा! आवडली.

जॉनविक्क's picture

17 Oct 2019 - 3:22 pm | जॉनविक्क

ज्या कोणाला या कथेतील 100 शब्दात धक्का वगैरे बसला असेल त्यांनी जोकर चित्रपट चुकूनही बघू नये, त्यांच्या हृदयाला धक्का बसायची दाट शक्यता आहे. जन आरोग्य हितार्थ जारी.

_/\_

गुहेमधे राहणारयांची कीव करणारा - जॉनविक्क

प्राची अश्विनी's picture

18 Oct 2019 - 11:18 am | प्राची अश्विनी

हे म्हणजे सोसायटीच्या गणेशोत्सवातल्या गाण्याचं कौतुक करणा-यांनी लता मंगेशकरचं गाणं चुकुनही ऐकू नये..
असं म्हणण्यासारखं झालं. ;)

प्राची अश्विनी's picture

18 Oct 2019 - 10:59 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सर्वांनाच.

कानडाऊ योगेशु's picture

24 Oct 2019 - 3:19 pm | कानडाऊ योगेशु

अ‍ॅक्चुअली वाक्यरचनेमुळे कथेमध्ये ट्वीस्ट असणार हे जाणवते त्यामूळे वाचकाची आधीच तयारी झाली असते मनाची. त्यामूळे शेवट वाचल्यावर बर्याच जणांना तितकाचा पटला नाही पण पूर्ण कथा वाचायला लावणे व त्यावर एक मत नोंदवायला भाग पाडणे हे कथेचे यश आहे. शॉल्लिट!