शंभर, नव्व्याण्णव, अठ्ठ्याण्णव
आई म्हणायची राग आला की उलटे आकडे मोजायचे.
एकुणनव्वद, अठ्ठ्याऐशी..सत्त्याऐशी
मग राग पळून जातो म्हणे...
एक्क्याऐशी, ऐंशी ....
ऐंशीच्या आधी काय?? नेहमीच चुकतं माझं इथे. अंअं आठवलं,
सत्तर, एकोणसत्तर..
पण मग बाबा का नाही म्हणत उलटे अंक कधी ?
बाबांना मात्र आई कध्धीच काही सांगत नाही की रागवत नाही. सगळी शिकवणी काय ती मलाच.
चव्वेचाळीस, त्रेचाळीस...
तरी बाबा रागावतात तिला. मारतात सुद्धा.
हे काय आत्ता पण किती मारलं. किती हलवलं तरी उठतच नाहीये ती.
चोवीस, तेवीस...
मग? मला राग नाही येणार बाबांचा?
तीन, दोन, एक शुन्य...
गेला राग एकदाचा!
मी शांतपणे बाबांच्या पोटातून ,रक्तानं भिजलेली सुरी बाहेर खेचली.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7736
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे अफाट
बाप रे ......... खतरनाक कथा
ठीक.
कमी शब्दात जास्त कथा!
भयंकर
धक्का तंत्र जमलंय..
जबरदस्त!!!
बापरे! खतरनाक जमलीय.
भारी होती!
हं.
In reply to भारी होती! by जव्हेरगंज
धन्यवाद सर्वांनाच.
मस्त शशक
खतरनाक
उलट मोजणीचा तर काहीच उपयोग
आई बाबांना ठेवण्यापेक्षा जर
जबरदस्त...
धक्का
दर्जेदार!!
अवांतर ज्याकिनाला
:):)
In reply to अवांतर ज्याकिनाला by जॉनविक्क
धन्यवाद सर्वांनाच.
अॅक्चुअली वाक्यरचनेमुळे