आमोद सुनांंसि जालें!

यशोधरा's picture
यशोधरा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

आमोद सुनांंसि जालें!

कधीकाळी दिवाळी म्हणजे घरात आठवडा - दहा दिवसभर आधी फराळाच्या निरनिराळ्या पदार्थांचा घमघमाट सुटत असे. हो, खवैय्यांना आमोद सुनांसि जालें, असा साक्षात्कार व्हायची तीच ती घटिका असायची! ती अनुभवता ब्रह्मानंदी टाळी लागायची बाकी! दिवाळीची चाहूल लागायची तीच मुळी घरात फराळ बनवायचा घाट घातला गेला की. आयुष्याला शहरांतूनसुद्धा काहीशी संथ लय होती, श्वास घ्यायला उसंत होती आणि साग्रसंगीतरीत्या चवीचवीने सण साजरे करता येण्याची चैन नशिबात होती.

बघता बघता गेल्या काही वर्षांत बऱ्याच ठिकाणी चित्र बदललं आहे. आयुष्य चांगलंच वेगवान झालंय, जगण्यासाठीची स्पर्धा वाढली आहे, शिक्षण, करिअरसाठी वेळ देत राहणं, आयुष्याची बऱ्यापैकी अपरिहार्यता झाली आहे. हे सगळं वाईट आहे, असं अजिबात नाही. होणारे बदल अधिक आर्थिक सुबत्ता घेऊन येतात, एकूणच रोजच्या जीवनातही अधिक पर्याय घेऊन येतात. काही गोष्टी मागे सोडून द्यायलाही भाग पाडतात. प्रत्येक जीवनशैलीचे बरे-वाईट परिणाम असतातच, त्याला पर्याय नाही. जीवनगाणे गायचं आणि पुढे पुढे चालायचं.

तरीही, कधीकधी त्या संथ दिवसांची लय पुन्हा साधावी वाटते. चारी ठाव फराळ घरी करणं काही कारणाने शक्य नसलं, तरी थोडं फार करावं वाटत असेल, तर हा झटपट बनवता येईल, असा लाडूचा प्रकार.

माझ्या मैत्रिणीने मला सांगितलेली ही सोपी पाककृती.

लागणारा वेळ:

२० ते ३० मिनिटं

लागणारे जिन्नस:

१ वाटी रवा
१ वाटी पिवळं धम्मक गूळ किसून
१ वाटी ओलं खोबरं किसून
वेलदोड्यांची पूड
तूप
मनुका, बदाम, काजू जरुरीनुसार.

क्रमवार पाककृती:

१. एक ते दीड टेबलस्पून तुपात रवा चांगला खरपूस भाजून घ्या.
२. भाजून घेतलेला रवा जरा गार व्हायला ठेवा.
३. गार झालेला रवा, ओल्या खोबऱ्याचा कीस आणि किसलेला पिवळाधमक गूळ एका भांड्यात एकत्र करून, ते भांडं कुकरमध्ये ठेवून हे मिश्रण सुकंच १० मिनिटांसाठी वाफवून घ्या. कुकरला शिटी लावायची नाही. हवं तर वेगवेगळ्या भांड्यांत ठेवून वाफवून झाल्यावर हे मिश्रण एकत्र करू शकता.
४. वाफवलेलं मिश्रण बाहेर काढून त्यात वेलदोड्याची पूड घालावी. वाफवलेलं भांडं बाहेर काढलं की खरपूस भाजलेला रवा, वितळलं-न वितळलं असं गूळ आणि वाफवला गेलेला खोबऱ्याचा कीस ह्याचा मंद सुवास नाकात शिरल्याशिवाय राहत नाही! खऱ्या खवैय्याला 'आमोद सुनासि' अनुभूती यायचा हाच तो क्षण! नाक आणि खाद्यपदार्थाचा सुवास एकरूप झाल्याची! नाक हेच सुवास झालेय आणि सुवास हाच नाक झालंय, असा क्षण! एक क्षण डोळे मिटून, समाधानाने दीर्घ श्वास घेऊन तो सुगंध अनुभवायला हरकत नाही, पण अजून लाडू वळून व्हायचेत मंडळी!
५. आता मिश्रण जरा गरम असतानाच लाडू वळायला घ्या. मिश्रण सुकं वाटलं तर थोडं १-२ टीस्पून तूप घालावं. बदाम, काजू ह्यांची भरड पूड घाला, अथवा लाडू वळताना मनुका आणि एकेक काजू/ बदाम लावता येतील.

झाले लाडू. सोपे, साधे आणि झटपट होणारे. साग्रसंगीत लाडू बनवायला वेळ नसेल, तर हे लाडू दिवाळीसाठी नक्की करा!

तळटीप : जास्त दिवसांसाठी ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवा.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2019 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडेश...!

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 1:04 pm | पद्मावति

झटपट आणि मस्तं. करून बघणार हे लाडू नक्कीच.

मायमराठी's picture

27 Oct 2019 - 12:33 pm | मायमराठी

"तरीही, कधीकधी त्या संथ दिवसांची लय पुन्हा साधावी वाटते."
यशोधराजी, लाडू हा जरी विषय असला तरी त्याच्या आडून तुमच्या नेमक्या भावना पोचल्या. मला फराळाच्या पदार्थांच्या चवीपेक्षा आपल्या प्रियजनांना आपल्या हातचं नेहमीचंच पण गेल्यावर्षीपेक्षा अजून रुचकर असं काहीतरी खिलवायचं; ही सकारात्मक आसक्ती खूप महत्त्वाची वाटते .
तसंही गृहिणी ही पदवी मिळणं सोपं नसतं.
आपण करून दाखवलेले लाडू व त्यामागच्या गोड शुभेच्छा भावल्या व पोचल्या.

टर्मीनेटर's picture

29 Oct 2019 - 11:17 am | टर्मीनेटर

यशोधराजी लाडवांची रेसिपी आवडली. नुसते रव्याचे लाडू मला नाही आवडत, पण ह्या रेसिपीत रव्याच्या जोडीला माझे आवडते गुळ-खोबऱ्याचे कॉम्बीनेशन असल्याने हे लाडू खचितच आवडतील अशी खात्री पटली.

मायमराठींनी वरील प्रतिसादात भावनेचा उल्लेख केल्यावर चटकन डोळ्यांसमोर उभी राहिलेली इंडियन ऑईलची दिवाळीसाठी तयार केलेली आणि प्रचंड आवडलेली "इस दिवाली पेहले इंडियन फिर ऑईल" ही, सीमेवर तैनात असलेल्या मुलासाठी 'बेसन के लड्डू' तयार करून पाठवणाऱ्या आईच्या भावना व्यक्त करणारी जाहिरात इथे देण्याचा मोह टाळता येत नाहीये...

कंजूस's picture

27 Oct 2019 - 7:32 pm | कंजूस

संपले का आहेत?

यशोधरा's picture

27 Oct 2019 - 7:46 pm | यशोधरा

संपले तरी पुन्हा करू की! हाकानाका :)

कंजूस's picture

28 Oct 2019 - 4:30 am | कंजूस

दोन वर्षांपूर्वी शालेय वर्गातील २४ मुलंमुली लोणावळ्यात भेटलो तेव्हा एकीने लाडू आणलेले. . "आमच्याकडे सासू, मेव्हणी,बायको असले पदार्थ हौसेने करतात आणि ते मलाच खावे लागतात." असं म्हटल्यावर "अरे, सहा उरलेत आणि ते परत नेणार नाहीये. देऊ का?" डबाच दिला.
मंगळुरकडचे लोक हे पदार्थ किती चांगले करतात हे खाल्ल्यावरच कळेल.

नूतन's picture

28 Oct 2019 - 3:35 pm | नूतन

करून बघेन

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 12:20 am | मीअपर्णा

ते सुरुवातीचं चिंतन खूप तरल झालंय.

लाडू प्रकरण मला ते वळता येत नसल्यामुळे झेपत नाही. मला हेही फोटो दिसत नाहीत पण केव्हातरी करुन बघेन नक्की कारण मुलांना लाडू खूप आवडतात.

का बरं फोटो नाही दिसत तुला?
नक्की करून पाहा. झटपट कृती असल्याने मी ह्या लाडवांच्या वाटेला गेले आहे. =))

जुइ's picture

29 Oct 2019 - 1:38 am | जुइ

झटपट आणि मोजके साहित्य वापरून केलेली लाडूची पाककृती आवडली. नक्कीच करून बघेन.

यशोधरा's picture

29 Oct 2019 - 9:52 am | यशोधरा

सर्व वाचक आणि अभिप्रायदात्यांचे आभार.

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 9:46 am | मुक्त विहारि

धन्यवाद

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Nov 2019 - 12:42 pm | हणमंतअण्णा शंकर...

आलें की जालें?

यशोधरा's picture

25 Nov 2019 - 2:12 pm | यशोधरा

जालें. हे पहा,

अमृतानुभव, प्रकरण नववें, जीवन्मुक्तदशाकथन.

आतां आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले । आरिसे उठले । लोचनेसी ॥ ९-१ ॥ आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणें । कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥ ९-२ ॥ जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे । चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥ ९-३ ॥

अमृतानुभव sanskritdocuments.org ह्या साईटवर वाचायला मिळेल.

आमोद सुनासि आले हा दि बा मोकाशी ह्यांचा कथासंग्रह आहे.

विजुभाऊ's picture

27 Nov 2019 - 7:31 am | विजुभाऊ

हा हा हा