ठाकठोक
लेखनविषय (Tags)
ठाकठोक
---------
मी तसा ओके आहे .
फक्त एक गोष्ट सोडता . मला जास्त आवाज आवडत नाही . सहनच होत नाही.
पण वरच्या मजल्यावरची ती जीवघेणी ठाकठोक ! ती बाई हे सारं मुद्दाम करते .
मला त्रास द्यायला. छळायला.
यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा; नाहीतर मी मरून जाईन असं वाटतं.
आज मला बरं वाटतंय. शांत शांत . वेगळंच .कारण वरचा आवाज बंद झालाय.
पण पोलीस आले आणि त्यांनी मला धरलं .
“का खून केलास तिचा ?” एका पोलिसाने विचारलं.
मला काहीच आठवत नव्हतं. सांगणार तरी काय?
एका कामवालीने मध्येच तोंड घातलं ,” साहेब, ती बाईसुद्धा वेडसर होती. तिला सारखा पालींचा भास व्हायचा . नसलेल्या पालींच्या मागे ती घरभर फिरायची. त्यांना मारत - ठोकत !”
प्रतिक्रिया
कथा बीज चांगले आहे. पण अजून
मस्त शशक!!
मस्तच.
समजली नाही कथा .
दोन वेड्यांची
लघुकथा आवडली!
बोलता भी काणा और सुनता भी काणा :-))
सगळ्या वाचकांचा आभारी आहे
पैलवान विशेष आभार
विजुभाऊ ही लघुकथाच आहे .