Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जव्हेरगंज on Mon, 07/22/2019 - 01:54
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
"अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला. अशावेळी भल्याभल्यांची फाटते. नव्हे फाटायलाच पाहिजे. कपाळावर घाम जमा होतो. आणि भरपूर तहान लागते. "आपण बस यहापे पिक्चर देखने आया था" नुकताच मारलेला गांजा अशावेळी कामाला येतो. "मुझे नही लगता.." रात्रीच्या एक वाजता हा माणूस गॉगल घालून बोलतोय. हि गोष्ट खरं बघितलं तर डोक्यात तिडीक जाणारी आहे. "ये सुलेमान का आदमी है साब.." जीपमध्ये बसलेला लुकडा हवालदार माझ्याकडे हात दाखवत जोरात म्हणाला. खरं तर तिथे दोन हवालदार होते. दुसरा मिशावाला होता. जाडजूड. बहुतेक त्याला झोप वगैरे आली असावी. "गांजा तो हम भी पीते है. चलो एक एक हो जाये.." काळ्या गॉगलवाल्या इन्स्पेक्टरने आता रिवॉल्वर कमरेला अडकवली. आता तो रंगात आला होता. खांद्यावर हात टाकून मला तो जीप कडे घेऊन गेला. "क्या मजाक कर रहे हो साब, आपन किसी सुलेमान को जानता तक नही. हा आपुन छोटामोठा झमेला जरूर करता है. लेकीन इसमे आपुनको मत घुसेडो साब.." मिशावाल्या जाड्या हवालदाराने गाडी सुरू केली तेव्हा आपनही थोडं गयावया केलं. "इसको ऑफर दो साब.." लुकडा हवालदार तसा बारीक अंगकाठीचा होता. पण बराच मुरलेला दिसत होता. "हा.. ऑफर... " इन्स्पेक्टर जरा सावरून बसला आणि सरळ माझ्याकडे बघत म्हणाला "देख दस पेटी देगा, बस आपुनको सुलेमानका पता दे. लाईफ बन जाएगी तेरी.." गाडी मुंबई सोडून हायवेला लागली होती. जीप असली तरी झरझर पळत होती. रस्त्यावरचं बेफाम वारं आत घुसंत होतं. "जब आपुन इस च्युतेको जानताही नही तो पता कैसा देगा.." यावर तिघेही खळखळून हसले. "भरोसा नहीं साब, पुलिस पे भरोसा नही है" लुकडा हवालदारा चिलीम पेटवत म्हणाला. मग त्यानं एक झुरक मारला. धूर सोडत त्यानं चिलीम इन्स्पेक्टरकडं सोपवली. "ठिक है, ठिक है... " इन्स्पेक्टरनं हळूवार झुरका मारत धूर छातीत भरुन घेतला. आहाहा. जन्नत. "अब दुसरा ऑफर... तू हमे सुलेमान का पता दे.. हम तुझे जिंदा छोड देंगे.." "ये मस्त ऑफर है साब.." लुकडा हवालदार जोरजोरात हसायला लागला. मिशावाल्या हवालदाराला तर ठसका लागला. हा साला गाडी ठोकेल कुठेतरी. "आपन उसको जानता है मगर मालूम नही वो किधर मिलेगा" आणि अचानक गाडीला ब्रेक लावून ड्रायव्हरने गाडी उभी केली. रात्रीच्या दोन अडीच तरी वाजल्या असतील. कुठल्यातरी घाटात आम्ही पोहोचलो होतो. दूरून दिसणारे मुंबईचे लुकलुकते दिवे सोडले तर तिथे वर्दळ अशी नव्हतीच. "सुसू करने का है. आयेगा?" इन्स्पेक्टर बाहेर होत म्हणाला. मग आम्ही चौघांनी मिळून तिथे सुसू केली. "वो.. चित्रा टॉकीज के सामने क्या करने आया था.." इन्स्पेक्टरनं चैन लावत विचारलं. "वो.. पार्सल लेने आया था.." मी चैन लावत सांगितलं. "कैसा पार्सल?" लुकड्या हवालदाराची चैन बहुतेक अटकली होती. तिला खालीवर करत तो म्हणाला. "आपन कोना गोवा मे एक घर मंगता है साब. छोटासाच. बीच के आसपास.." मी सौदा करायला प्रारंभ केला. "मिलेगा.." इन्स्पेक्टरनं डिल फायनल केली. " और साथ मे एक रशियन आयटम भी मिलेगी, अग सच बोला तो" डोंगरउतारावरच्या थंडगार हवेने मन प्रफुल्लित झाले होते. अंधारात पण निसर्ग किती सुंदर दिसतो. साला इथं कोणी राहत कसं नाही. "वो पार्सल कोकेन का था." मी महत्वपूर्ण माहिती पुरवली. इन्स्पेक्टर खूश झाला. "और सुलेमान..?" लुकड्या हवालदार जीपच्या बोनेटवर रेलून बसला होता. त्याची चैन आता बहुतेक लागली होती. "उसने ही बुलाया था. चित्रा टॉकीज के सामने. वो खाली फोन करता है. और पार्सल कीसी कचरे के डब्बे मे रख देता है." "मतलब उसे कभी मिला नही तू..?" इन्स्पेक्टर इथे थोडा नाराज वाटला. "नही, कभी नही.." इथे मी पण थोडा नाराज झालो. "कहापे ले जाना था ये पार्सल..?" सांगू की नको अशा पेचात मी जरा गोंधळूनच गेलो. "अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला. "होटेल मेरीडीयम. कमरा नं.२३० , आपन उधर काम करता है. सफाई का" एकदाचा सांगून मोकळा झालो. इन्स्पेक्टरनं रिवॉल्वर खाली घेतलं. कपाळावर जमा झालेला घाम डोंगराच्या हवेत गारठू लागला. हात वर करून मी आळस झटकला. नाही म्हटलं तरी छातीची धडधड वाढलेलीच होती. इन्स्पेक्टर चालत जीपकडे गेला. सीटखाली लपवलेली प्लास्टिक पिशवी माझ्याकडे देत म्हणाला, "क्या वो पार्सल यही था?" च्यायला. डिट्टो. हे काय? आणि एवढा वेळ शांत बसलेला मिशावाला जाड्या हवालदार हातातले पिस्तूल रोखत माझ्याकडे चालत आला. "आपन सचमे तुझपे बहोत भरोसा करता था." याचा आवाज तर सेम टू सेम सुलेमान सारखा आहे. " लेकीन तू तो सबकुछ यहा बक रहा है यार, आपुनको ऐसा आदमी मंगताइच नै." धडाम.
  • Log in or register to post comments
  • 20571 views

प्रतिक्रिया

Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Mon, 07/22/2019 - 02:07

Permalink

धडामकन संपलीकी...

वाटलं होतं दीर्घ कथा असेल. कथानक छान होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Mon, 07/22/2019 - 07:15

Permalink

जब्बरदस्त!

झकास ट्विस्ट असतात राव तुमचे! खल्लास मजा आली जव्हेरगंज साहेब. डिटेलिंग कसले सही, चेन अडकली असावी हा हा हा हा हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 07/22/2019 - 07:51

Permalink

एक नंबर!!

गोष्ट, सांगण्याची पद्धत अन शेवटचा ट्विस्ट- सगळंच भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by मृणालिनी on Mon, 07/22/2019 - 08:20

Permalink

मस्त

लघुकथा आवडली. शेवट मस्त! सुंदर लिखाणशैली!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 07/22/2019 - 08:34

Permalink

तत्तर तत्तर

जव्हेरभौ बऱ्याच दिवसांनी इस प्यास्या धरतीवर बारीश की बूंदे पडावी तसं झालं. हौर आन्दो. Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 07/22/2019 - 08:40

In reply to तत्तर तत्तर by चांदणे संदीप

Permalink

तंतोतंत सहमत

पलटी जबराट आहे जव्हेरगंज लिखाणाची शैली आवडणारा वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Mon, 07/22/2019 - 15:12

In reply to तत्तर तत्तर by चांदणे संदीप

Permalink

+१. मस्त ट्विस्ट!

+१. मस्त ट्विस्ट!
  • Log in or register to post comments

Submitted by आंबट चिंच on Mon, 07/22/2019 - 09:26

Permalink

mast

mast
  • Log in or register to post comments

Submitted by जालिम लोशन on Mon, 07/22/2019 - 09:38

Permalink

+1

छान
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 07/22/2019 - 09:52

Permalink

मस्तच

ढिशक्याव. जेजी इज ब्याक.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Mon, 07/22/2019 - 11:17

Permalink

बऱ्याच दिवसांनी

बऱ्याच दिवसांनी तुमची कथा वाचली एकदम धडाम
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 07/22/2019 - 11:44

Permalink

आधी प्रेडीक्टेबल वाटली पण

आधी प्रेडीक्टेबल वाटली पण शेवटचा ट्विस्ट एकदम भारी. मजा आली वाचून.
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on Mon, 07/22/2019 - 11:56

Permalink

च्यायला भारीच . एक नंबर

च्यायला भारीच . एक नंबर
  • Log in or register to post comments

Submitted by अनिंद्य on Mon, 07/22/2019 - 12:07

Permalink

बेश्ट !

बेश्ट !
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्र.शेखर on Mon, 07/22/2019 - 13:12

Permalink

लई भारी. आवडली. वाचून असा

लई भारी. आवडली. वाचून असा विचार आला की हीच कथा, त्या कथेतील इतर 3 पात्रांंनी सांगितली तर कशी असेल? म्हणजे इंस्पेक्टर कशी सांगेल, हवलदार कशी सांगेल ...
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on Mon, 07/22/2019 - 15:29

Permalink

मस्त, मस्त

और आन्दो
  • Log in or register to post comments

Submitted by लई भारी on Mon, 07/22/2019 - 16:10

Permalink

मस्तच!

आवडला ट्विस्ट! मला पण मोठी कथा असेल असं वाटलं होत.
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्यनागरिक on Mon, 07/22/2019 - 17:10

Permalink

एक तुच्छ शंका

जर त्या माणसालाच गोळी घातली जाते तर हे कथानक प्रथमपुरुषी कसं ? कथा मस्तंच आहे याबद्दल शंका नाही. जव्हेर्गंज यांना सवाल करावे ही माझी लायकी नाही पण तरीही डोक्यांत कीडा आलाच
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 07/22/2019 - 18:08

In reply to एक तुच्छ शंका by सामान्यनागरिक

Permalink

गोळी

गोळी माणसालाच मारलीये असं कुठं लिहिलंय? अन गोळी जरी माणसाला लागली तरी तो मेलाच पाहिजे असं थोडीच आहे!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Mon, 07/22/2019 - 18:58

In reply to गोळी by तुषार काळभोर

Permalink

हेच म्हणणार होतो

आणि एक भूत त्याचे आत्मवृत्त कथन करत होते हा हि ट्विस्ट देता येतोच कि.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 07/22/2019 - 20:36

In reply to हेच म्हणणार होतो by जॉनविक्क

Permalink

हो

सिक्वेलची सोय!!
  • Log in or register to post comments

Submitted by मास्टरमाईन्ड on Tue, 07/23/2019 - 12:24

Permalink

बर्याच दिवसानी

तुमचं लिखाण आलंय तुमचं लिखाण वाचून सवय झाल्यानं इन्स्पेक्टरच सुलेमान वाटला होता. काय राव... तुम्ही पण त्या सोन्याबापूंसारखे गायब झालात.
  • Log in or register to post comments

Submitted by रेमिंग्टन on गुरुवार, 07/25/2019 - 02:14

Permalink

कडक!!!

काय लिहिता राव!! सॅल्युट :-) लघुकथा प्रकरात तुम्ही हे सगळं बसवू शकता, मस्तच.. तुमचे आधीचे सगळे लेख अधाशासारखे वाचून काढले. लैच भारी!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Wed, 07/31/2019 - 23:48

Permalink

एकदम झक्कास

एकदम झक्कास संशय देखील आला नाही मिशावल्याचा. ट्विस्ट सॉलिड. खूप आवडली कथा. बऱ्याच दिवसांनी तुमचं लिखाण आलं. मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 08/01/2019 - 01:42

Permalink

ये भारी है....

ये भारी है....मजा आली पढनेको!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 08/19/2019 - 18:30

Permalink

जबराट ट्विस्ट. भारी डिटेलिंग

जबराट ट्विस्ट. भारी डिटेलिंग केलंय कथेत.
  • Log in or register to post comments

Submitted by Namokar on Mon, 08/19/2019 - 19:40

Permalink

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 08/19/2019 - 20:06

Permalink

२२ जुलै ला प्रकाशित होऊनही

२२ जुलै ला प्रकाशित होऊनही अजूनपर्यंत वाचनात कसा आला नव्हता हा धागा काय माहित! जव्हेरभाऊ, नेहमीप्रमाणेच मस्त लिहिली आहे तुम्ही ही कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वलिखित on Sun, 09/01/2019 - 18:49

Permalink

छान

पण पहिल्यासारखा टच नाही आला या कथेत
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sun, 09/01/2019 - 22:52

Permalink

छान.. अंडर कव्हर कॉप माहीत

छान.. अंडर कव्हर कॉप माहीत होतं, हे त्याच्या विरुद्ध :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 04/30/2020 - 01:56

Permalink

जबरदस्त कथा

जव्हेरगंज, नेहमीप्रमाणे छोटीशी पण जबरदस्त कथा आहे. या लायनीतल्या लोकांचं असंच होतं. इथे आत जायचे रस्ते हजार आहेत, पण बाहेर यायचा रस्ता एकंच. धडाम! त्यामुळे मिळेल ते सुख ओरबाडून घ्यायची प्रवृत्ती असते. फिल्मलायनीपेक्षा कैकपटीने धोकादायक प्रलोभनं पावलोपावली असतात. अशाच एकात नायक अडकला. दुर्दैवी, पण अटळ शेवट! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com