✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सर्पणाला एकदा पालवी फुटली

ख — खिलजि, Fri, 07/05/2019 - 15:25
सर्पणाला एकदा पालवी फुटली त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली सर्पणच ते चुलीत जळायचेच होते इतरांसारखेच राख होऊन वर जायचे होते प्रेतांच्या ढिगाऱ्यात असेच पडून होते स्वगत सर्पणाचे == फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ? कधी राख होईन , हि भीती मनात पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ जगावे वाढावे ते कोणा प्रित्यर्थ ? उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी कुणी तोडे पान, कुणा आवडे फुल कुणी घेई जीव ,पेटवण्यासाठी चूल किती देऊ फळे , जरी आमुची बाळे तरी नाही शमले त्यांचे नीच चाळे आम्ही वाढतो देण्यासाठी ते श्वास ते श्वास घेता घेता घेती आमचाच घास गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा ते पाप फेडण्या पुनर्जन्म झाडाचा {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

प्रतिक्रिया द्या
9110 वाचन

💬 प्रतिसाद (24)

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/05/2019 - 15:40 नवीन
कलपना आवडली, असेच बकर्‍याचे, मनोगतही लिहिता येईल, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

कोंबडीचे मनोगतही लिहा ना

Yogesh Sawant
Fri, 07/05/2019 - 16:27 नवीन
कोंबडीचे मनोगतही लिहा ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कोंबडीला पाय फुटले

महासंग्राम
Fri, 07/05/2019 - 16:42 नवीन
कोंबडीला पाय फुटले त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली कोंबडीच ती चुलीत तंदुरी व्हायचीच इतरांसारखेच चिकन होऊन पोटात जायचे होते ग्रिलवर असेच पडून होते स्वगत कोंबडीचे == फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ? कधी तंदूर होईन , हि ठेवुनी भीती मनात पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ जगावे वाढावे कोंबडीने ते कोणा प्रित्यर्थ ? उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी कुणी तोडे मान, कुणा आवडे तंगडी अवघे आमचे जीवन इथे घाले लंगडी कुणी घेई जीव ,पेटवण्यासाठी चूल किती देऊ अंडे , हिच आमुची बाळे तरी नाही शमले त्यांचे नीच चाळे आम्ही वाढतो होण्यासाठी चिकन ते ग्लास घेता घेता घेती आमचाच घास गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा ते पाप फेडण्या पुनर्जन्म कोंबडीचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Yogesh Sawant

बेस्ट

अभ्या..
Fri, 07/05/2019 - 17:41 नवीन
आह्हा, सुरेख मंबा. तुझमें है दम...... . . एकेक प्रिंट काढून सुगुणा, व्हेन्कॉब, बारामतीचिक, आमीरच्या सगळ्या दुकानात लावू आपण. ;) पाम्प्लेटं छापून पोल्ट्रीत उधळू वेंकीजच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

+1

जालिम लोशन
Fri, 07/05/2019 - 15:47 नवीन
ऊत्तम
  • Log in or register to post comments

==)) ==)) ==))

खिलजि
Fri, 07/05/2019 - 18:00 नवीन
धन्यवाद सर्वाना ,, मस्तच प्रतिसाद आले आहेत .. मंदार शेट , थोडासा बदल करतो आहे .
  • Log in or register to post comments

हि घ्या मंदार शेट ,,

खिलजि
Fri, 07/05/2019 - 18:08 नवीन
हि घ्या मंदार शेट ,, आपल्या सर्वांच्या सेवेत सादर करीत आहे .. बाकी अजूनही इतरांच्या प्रतीक्षेत आहे .. पै बु काका , या पावसाळी वातावरणात एक धमाकेदार तुम्ही सुचवलेल्या कल्पनेवर जोरदार काहीतरी आलंच पाहिजे .. एक रेकवेस्ट म्हणून समजा हवं तर अंड्यातून एक कोंबडी बाहेर पडली तीलाही जगण्यात मजा वाटू लागली कोंबडीच ती चुलीत तंदुरी व्हायचीच इतरांसारखेच चिकन होऊन पोटात जायचीच खाटिकाच्या पिंजर्यात अशीच पडून होती स्वगत कोंबडीचे == फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ? कधी तंदूर होईन , हि ठेवुनी भीती मनात पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ वाढावे कोंबडीने ते कोणा प्रित्यर्थ ? उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी कुणी तोडे मान, कुणा आवडे तंगडी अवघे आमचे जीवन इथे घाले लंगडी कुणी घेई जीव ,कमवून अंडी देऊनही अंडी बनवती आमचीच हंडी आम्ही वाढतो फक्त होण्यास चिकन ते घास घेती थोडी मदिरा टाकून गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा ते पाप फेडण्या पुनर्जन्म कोंबडीचा
  • Log in or register to post comments

Ewwwww एकदम कडक झालाय तंदूर

महासंग्राम
Mon, 07/08/2019 - 09:35 नवीन
Ewwwww एकदम कडक झालाय तंदूर आपलं कोंबडीचे मनोगत वर्जिनल तर मस्तच लिहिलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

मूळ कविता आणि विडंबन दोन्ही

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/05/2019 - 19:33 नवीन
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही मस्तं !
  • Log in or register to post comments

छान!!!

गड्डा झब्बू
Fri, 07/05/2019 - 19:44 नवीन
छान!!!
  • Log in or register to post comments

मी कवितेचे मनोगत

नाखु
Fri, 07/05/2019 - 20:03 नवीन
वाचण्यास उत्सुक आहे. एकदा कवीतेस धुमारे फुटले,तिलाही अर्थाची गोडी लागली. आपणही बालक होवून बागडाव, आपल्याला वाचकाने कडेवर घ्यावं,लाड करावे, आचरटपणा केला तर रागवावे आणि खोडकरपणा हसून हसून स्विकारावा. कवितेचे मनोगत मी कितीही लयात आणि तालात असली तरी विडंबन होण्याचं प्राक्तन चुकणार नाही! केशवकुमार तावडीतून केशवसुत सुटले नाहीत,मी तर अगदीच परावलंबी. तुझ्या शब्दांच्या कपड्यात बांधून कधी अंग उघडे,तर कधी अंग तोकडे. जुळवलेल्या जिलबीला चकलीचा खमंगपणा आणायचा तुझा अट्टहास असेलही. पण हे कविश्रेष्ठ कविता आणि पीठाची गिरणी यात फरक आहे रे. गिरणीत कामाला असलेल्या इसमाच्या सर्वांगावर पिठ पेरणी असते त्याच्याकडून आपलेच दळण आणायला लोक येतात. तुझ्या काव्याच तसं नाही वाचकाला आवडली तर तो घेउन जातोच जातो पण सुगंध चार ठिकाणी नक्की शेअर करतो. आणि तरी तुझी कवीता तुझ्यापाशी शाबूत असते कारण तीच पीठ झालेलं नसल्यानेच ती तुझ्याच अंतरंगात विरघळून गेलेली असते ती तू सुद्धा कधी काढू शकत नाहीस,झटकण्यासाठी!! कविता तुझीच आहे फक्त तिला नैसर्गिकरीत्या फुलू दे,बाकी अर्थ,गेयता सारं फिजूल आहे आणि समीक्षक तो तर फितूर आहे का फिदा तेच कुणालाही कळले नाही... वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

क्या बात है नाखु काका

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/06/2019 - 12:20 नवीन
काय जबरा लिवलय... या साठी माझाकडून तुम्हाला कोंढळकरची एक मस्तानी लागू झाली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

पूर्णतः सहमत पै बु काकांशी ..

खिलजि
Sat, 07/06/2019 - 12:23 नवीन
पूर्णतः सहमत पै बु काकांशी .. जब्राट लिवलंय ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

नाखुकाका (महाराजा) , आपले

खिलजि
Sat, 07/06/2019 - 12:11 नवीन
नाखुकाका (महाराजा) , आपले सांगणे/बरसने , मी माझा गौरव समजतो . आपण माझ्या काही मोजक्या मिपाकरांच्या समूहात सामील आहात ज्यांना माझ्या मनाने पूर्णतः झेड सुरक्षा प्रदान केलेली आहे . एक चांगला कवी बनण्याची माझ्याकडे निश्चितच ती प्रतिभा नाही आहे... पण मी बघतो , या दोन डोळ्यांनी खोलवर बघतो .. आणि मग सुरु होतो एक कल्पनेचा प्रवास , त्यामध्ये कविता कुठेही येत नाही .. येते ती फक्त र द फ ची भाषा .. नैसर्गिक खुलण्याबाबत बोलायचे झाले तर ते बर्याचदा फारच किळसवाणे होते , त्यामुळे ते मी आंजावर टाकायचे टाळतो .. वरील कल्पना मला मी दोन दिवसापूर्वी अंत्यविधीसाठी गेलो होतो तेव्हा सुचली .. सर्वजण शोकाकुल होते , बाजूलाच जाळण्यासाठी लाकडे उभी करून ठेवली होती , त्यातल्या काहींना पावसाच्या पाण्यामुळे पालवी फुटली होती .. दुर्दैवाने काही काळानंतर त्यांचेही राख होऊन जाणे अटळ होते .. हे सर्व पाहून आणि विचार करून हा कल्पनेचा खटाटोप झाला ... पण नाखुकाका असेच प्रतिसाद देत राहा , एक चांगली दिशा मिळते .. कदाचित त्यामधून शिकून पुढे काही भले तरी निश्चितच होईल ..
  • Log in or register to post comments

ही कवीता

नाखु
Sat, 07/06/2019 - 12:32 नवीन
आपल्या काव्याला उत्तर किंवा प्रतिसाद म्हणून नाहीच मुळी तर कवीतेला काय वाटतेय याचं मनोगत व्यक्त केले आहे. चांगल्या अर्थवाही आणि दाहक वास्तव समोर आणाणर्या कवीता सुद्धा आवडतात पण प्रत्त्येक वेळी मीटरच्या बंधनात गेली की शब्द कवायती करत असल्यासारखे वाटते. आपल्या खिलाडूवृत्ती ला मनःपूर्वक दाद दिली आहे. वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

धन्यवाद नाखुकाका ,, आपले

खिलजि
Sat, 07/06/2019 - 12:42 नवीन
धन्यवाद नाखुकाका ,, आपले शुभाशीर्वाद असेच पाठीशी राहून देत . कधी चुकलो मुकलो तर शाब्दिक फटके दिले तरी चालतील पण प्रतिसाद देत राहा ....
  • Log in or register to post comments

वाह!

जॉनविक्क
Sat, 07/06/2019 - 15:51 नवीन
  • Log in or register to post comments

धन्यवाद जॉनविक्क साहेब ,

खिलजि
Sat, 07/06/2019 - 16:25 नवीन
धन्यवाद जॉनविक्क साहेब , धन्यवाद
  • Log in or register to post comments

मुळ कविता आणि प्रतिसाद दोन्ही

चंद्र.शेखर
Sat, 07/06/2019 - 17:28 नवीन
मुळ कविता आणि प्रतिसाद दोन्ही खुप छान. आवडले
  • Log in or register to post comments

खिलजी ची आवडलेली पहिला वहिली

स्वलिखित
Mon, 07/08/2019 - 17:17 नवीन
खिलजी ची आवडलेली पहिला वहिली कविता ....
  • Log in or register to post comments

जब्राट अभिप्राय ... आवडलं

खिलजि
Mon, 07/08/2019 - 18:43 नवीन
जब्राट अभिप्राय ... आवडलं यातच सर्वकाही आलं .. धन्यवाद ..त्रिवार त्रिवार धन्यवाद .. आता अजून एक टाकली आहे ती एक डाव वाचा आणि कळवा बरे आपले म्हणणे ..
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Mon, 07/08/2019 - 19:39 नवीन
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

सर्पणाला एकदा पालवी फुटली

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/09/2019 - 11:57 नवीन
सर्पणाला एकदा पालवी फुटली म्हणूनच, "सुक्याबरोबर ओले जळते" ही म्हण तयार झाली
  • Log in or register to post comments

नमस्कार ,

खिलजि
Tue, 07/09/2019 - 15:29 नवीन
आज चक्क कुमारसाहेबांची चक्कर झालीय इथे .. अहोभाग्य आमुचे म्हणावे .. धन्यवाद सर्व वाचक मान्यवरांना.. असेच आपले प्रेम मिळू देत ..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा